मानसोपचार : काही विचार

आधुनिक मानसोपचारांना १०० वर्षांहून अधिक काळापासून वापरले जाते आहे. तरीही आजही या शाखेला नेमके कुठे बसवावे याबद्दल अनेक मते आहेत. आधुनिक मानसोपचारांचे जनक फ्रॉइड यांनी विकसित केलेली उपचारपद्धती ट्रान्सफरन्स, ओडिपस कॉम्प्लेक्स, इड-इगो-सुपरइगो यांचे अस्तित्व, स्वप्नांचे अर्थ यावर आधारित आहे. यातील एकही संकल्पना प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. असे असूनही फ्रॉइड यांना त्यांच्या उपचारांमध्ये अभूतपूर्व यश मिळाले.

आज मानसोपचारांमध्ये अनेक शाखा आहेत. क्लिनिकल सायकोथेरपी, बिहेविअरल थेरपी, कॉग्निटीव्ह अप्रोच इ. बरेचदा वेगवेगळ्या शाखेच्या तज्ञांमध्ये रूग्णाच्या निदानाबद्दल वेगवेगळी मते असतात. रूग्णाच्या खर्चिक उपचारांना लागणारा वेळ काही महिने ते आठ ते दहा वर्षे इतकाही लांबू शकतो. बरेचदा रूग्ण प्रगती होत नसेल तर डॉक्टर बदलून बघतो. थेरपीबरोबर ९९% वेळा हे डॉक्टर लोक प्रोझेक सारखी खिन्नता दूर करणारी औषधे वापरतात. बरेचदा रूग्णांना याचा फायदा होतो आणि ते बरेही होतात. पण ते बरे होतीलच अशी खात्री कुठलाही मानसोपचारतज्ञ देऊ शकत नाही.

असे असूनही प्रत्येक इस्पितळात, कारागृहात मानसोपचार विभाग असतो. कोर्टात मानसोपचार तज्ञाची साक्ष ग्राह्य धरली जाते. बरेचदा या साक्षीमुळे आरोपीची मृत्युदंडाची शिक्षाही वाचते.

मानसोपचार विज्ञान आहे की कला? काही मानसोपचार तज्ञ अत्यंत यशस्वी होतात यामागचे कारण काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

विज्ञान

सायकॉलॉजीची कलाशाखेत गणना होते तर सायकाईट्रीची विज्ञानात.
शस्त्रक्रिया, औषधे, आणि इतर 'थेरप्युटिक' कृती उदा. समूह उपचार, समुपदेशन, वागणूक उपचार, इ. यांच्यापैकी शस्त्रक्रिया, औषधे यांचे प्रमाण वाढले आहे तर विजेचे झटके, समुपदेशकाची बडबड, इ. इम्पिरिकल/कार्गो-कल्ट उपचार कमी झाले आहेत.

(प्रोझॅक विषयी बरेच उलटसुलट निष्कर्ष आढळतात.)

शस्त्रक्रिया?

मला वैद्यकीय ज्ञान अजिबात नाही.त्यामुळे उत्सुकता म्हणून मी हा प्रश्न विचारत आहे. ओसीडी, स्किझोफ्रेनिया, अँक्झायटी, हिस्टेरिया वा तत्सम मानसिक रोगांपैकी कोणत्या रोगासाठी शस्त्रक्रिया करावी लागते?

औषधे यांचे प्रमाण वाढले आहे....समुपदेशकाची बडबड, इ. उपचार कमी झाले आहेत

सहमत. बऱ्याचदा समुपदेशकाच्या बडबडीचा इन्स्टंट फायदा होत नाही. त्याऐवजी डॉक्टरने अँटीडिप्रेसंट किंवा अँटीझायोलायटिक दिले तर लगेच आराम पडतो त्यामुळे रुग्णाच्या बाबतीत असे होत असावे.

मात्र अशा औषधांचा साईड इफेक्ट फार मोठा असावा असा माझा अंदाज आहे. विशेषतः विथड्रॉल इफेक्ट्स व अशा औषधांचे व्यसन लागणे वगैरे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ऑफ हॅन्ड

तीव्र ओसीडीच्या रुग्णांवर आता भारतातही शस्त्रक्रिया होतात असे वर्तमानपत्रात वाचले होते.

मात्र अशा औषधांचा साईड इफेक्ट फार मोठा असावा असा माझा अंदाज आहे. विशेषतः विथड्रॉल इफेक्ट्स व अशा औषधांचे व्यसन लागणे वगैरे.

परिणाम असेल तर दुष्परिणाम होतातच. आपल्याला अन्नपाणी आणि हवेचे व्यसन नाही का? कॉस्ट-बेनेफिट तुलना करतात.

हा हा

आपल्याला अन्नपाणी आणि हवेचे व्यसन नाही का?

ईनोद आवडला.

अन्नपाणी किंवा हवेशिवाय जगणे शक्य नाही. (आयसीयूमधले काही पेशंट नाकात नळ्या घालूनही जिवंत असतात असे उदा. कृ. देऊ नका.)

परिणाम असेल तर दुष्परिणाम होणार हे मान्य. पण सायकिऍट्रिक औषधांचा दुष्परिणाम हा शारीरिक रोगांवर केल्या जाणाऱ्या उपचारांपेक्षा मोठा असतो असा माझा अंदाज आहे. तो चुकीचा असणे शक्य आहे कारण वैद्यकाच्या बाबतीत मी लेमॅन आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

भरपूर आहेत

पण सायकिऍट्रिक औषधांचा दुष्परिणाम हा शारीरिक रोगांवर केल्या जाणाऱ्या उपचारांपेक्षा मोठा असतो असा माझा अंदाज आहे.

मोठा असतो किंवा नाही कल्पना नाही पण साइड इफेक्ट् भरपूर आहेत. उदा. प्रोझेकचे साइड एफेक्ट

severe blistering, peeling, and red skin rash; very stiff (rigid) muscles, high fever, sweating, fast or uneven heartbeats, tremors, overactive reflexes; nausea, vomiting, diarrhea, loss of appetite, feeling unsteady, loss of coordination; or headache, trouble concentrating, memory problems, weakness, confusion, hallucinations, fainting, seizure, shallow breathing or breathing that stops.

किंबहुना मानसोपचार/अल्युपथी साठी दिल्या जाणार्‍या औषधांमध्ये असे एकही औषध नसावे की ज्याचे दुष्परिणाम नाहीत.


अवांतर : हवा आणि अन्नपाणी यांचा एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मराठी सायटींवरील काही चर्चा/प्रतिसाद वाचावे लागतात. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

बापरे

हे सारे दुष्परिणाम एकाच व्यक्तीला होत नाहीत. लाखात एखाद्याला शक्यता असली तरी यादीत नोंद असते.

किंबहुना मानसोपचार/अल्युपथी साठी दिल्या जाणार्‍या औषधांमध्ये असे एकही औषध नसावे की ज्याचे दुष्परिणाम नाहीत.

बरोबर.

प्येपरात

तीव्र ओसीडीच्या रुग्णांवर आता भारतातही शस्त्रक्रिया होतात असे वर्तमानपत्रात वाचले होते.

अहो काका, आम्हीही प्येपरात - मुख्यमंत्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आले आणि धो धो पाऊस कोसळू लागला. - असे वाचतो. विश्वास ठेवायचा का मग? शस्त्रक्रिया कुठे होतात? कधी होतात. संदर्भ द्या बघू.

- राजीव.

जरूर

शस्त्रक्रियेच्या बातमीचा दुवा हा आहे.


मुख्यमंत्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आले आणि धो धो पाऊस कोसळू लागला. - असे वाचतो. विश्वास ठेवायचा का मग?

पाऊस आणि दर्शन यांच्या कोरिलेशन कोइफिशियंटची काही आकडेमोड असेल तर तिचा संदर्भ द्या बरे!

असे नसावे

सायकॉलॉजीची कलाशाखेत गणना होते तर सायकाईट्रीची विज्ञानात.

असे नसावे. उदा. हा दुवा पहा.
जर सायकिऍट्री विज्ञान आहे तर ती ज्या संकल्पनांवर आधारीत आहे त्या प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकतात का?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

है शाब्बास

:-)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

यस मिनिस्टर

इथे यस मिनिस्टर आठवले :)

"It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist." ~ Bernard, Yes, Minister

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अपेक्षित

जर सायकिऍट्री विज्ञान आहे तर ती ज्या संकल्पनांवर आधारीत आहे त्या प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकतात का?

नाहीतर ग्राहक संरक्षण कायद्याखाली खटलाच होईल. किमान इम्पिरिकल निरीक्षणेतरी (उदा. १०००० जणांवर केस-कंट्रोल डबल ब्लाईंड प्रयोगात परिणाम झाला) उपलब्ध असतात.

उदाहरणे

कृपया उदाहरणे/संदर्भ द्यावेत. सायकिऍट्री कुठल्या संकल्पनांवर आधारलेली आहे? त्यांची सिद्धता कुठे झालेली आहे? एक उदाहरण घ्यायचे झाले तर मी दिलेल्या दुव्यात "To put it briefly, many mental disorders cannot be definitively diagnosed today." असे म्हटले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा?

आतापर्यंत एकही संदर्भ न देता अशी विधाने करणे विज्ञाननिष्ठ पद्धतीत बसते असे वाटत नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

'प्यारा-सायकल' वाला

तुमचा दुवा भोंदू माणसाचा आहे. शास्त्रज्ञांचे दुवे द्या.
मी वरील प्रतिसादातच म्हटले आहे की विज्ञान संकल्पनांवर आधारित नसू शकते. इम्पिरिकल निरीक्षणे असतील तरी चालते.

'हात लेका' या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांच्या पात्राची इच्छा असते की एखाद्या सायकॉलॉजिस्टशी मुलीचे लग्न व्हावे. मागणी घालण्यासाठी प्रशांत दामलेचे पात्र सायकल चालवीत येते.

उदाहरण

सायकिऍट्री संकल्पनांवर आधारित असलीच पाहिजे. कॅथार्सिस, मेंटल डिसऑर्डरस, स्किझोफ्रेनिया या सर्व संकल्पना सायकिऍट्रीमध्येच येतात.
उदाहरणार्थ कॅथार्सिस ही संकल्पना सायकिऍट्रीमध्ये वापरली जाते. ती सिद्ध करता येते का? जो न्याय तुम्ही आयुर्वेदाला लावता तोच इथेही लावावा.

दुसरा दुवा लेखातच आहे. तसेच सायन्स मासिकाने या विषयावर आख्खा अंक काढला होता, त्याचे काय?

सायकिऍट्री विज्ञान आहे हे सिद्ध करणारा एकही दुवा आत्तापर्यंत तुम्ही दिलेला नाही याची नोंद घ्यावी.

विज्ञान संकल्पनांवर आधारित नसू शकते.

ही विज्ञानाची नवीन व्याख्या आहे का? विज्ञानाची सर्वमान्य व्याख्या "Science (from Latin: scientia, meaning "knowledge") is a systematic enterprise of gathering knowledge about the world and organizing and condensing that knowledge into testable laws and theories" अशी आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

?

मेंटल डिसऑर्डरस, स्किझोफ्रेनिया या तर व्याख्या आहेत. त्या सिद्ध कशा करता येतील? कॅथार्सिसची उपयुक्तता शोधून सांगतो.
दुसर्‍या दुव्यात एक वाक्य आहे "There are multiple practices in clinical psychology that are grounded in science and proven to work, but in the absence of standardized science-based training, those treatments go unused." (ठळक ठसा माझा) न्यूटनचे नियम आईनस्टाईनने ढोबळ (ऍप्रॉक्सिमेट) ठरविले याचा अर्थ विज्ञान संपले असा होत नाही. शिवाय त्या लेखाचा मुख्य हल्ला सायकॉलॉजीवर आहे, सायकिऍट्रीवर नाही.

सायन्स मासिकाने या विषयावर आख्खा अंक काढला होता, त्याचे काय?

हा लेख विकत घेतल्याशिवाय वाचता येणार नाही, कृपया त्यांचा मुद्दा तुम्हीच सांगा.

अजून मी सायकिऍट्रीला विज्ञान सिद्ध करणारा दुवा दिलेला नाहीच :D

आणि

अजून मी सायकिऍट्रीला विज्ञान सिद्ध करणारा दुवा दिलेला नाहीच :D
आणि पूर्वानुभव बघता देताल असे वाटत नाही. संदर्भ न देता विधाने करणे आणि दुसर्‍यांना संदर्भ मागणे हे कुठल्या विज्ञाननिष्ठ पद्धतीत बसते ठाउक नाही.
डिसऑर्डच्या व्याख्येतच घोळ आहे त्यामुळे कुणाला डिसऑर्डर झाली आहे हेच ठरवताना गोची होते. मग याला विज्ञान कसे म्हणायचे?
तुमच्या सायकिऍट्रीच्या व्याख्येत काय बसते? कॅथार्सिस, ट्रान्सफरन्स, ओडिपस कॉम्प्लेक्स, युंगचा कलेक्टिव्ह कॉन्शसनेस यांना कसे सिद्ध करता येईल?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

कारण

आणि पूर्वानुभव बघता देताल असे वाटत नाही. संदर्भ न देता विधाने करणे आणि दुसर्‍यांना संदर्भ मागणे हे कुठल्या विज्ञाननिष्ठ पद्धतीत बसते ठाउक नाही.

तुम्ही भोंदू माणसाचा संदर्भ दिलात हे आधी मान्य करा.

डिसऑर्डच्या व्याख्येतच घोळ आहे त्यामुळे कुणाला डिसऑर्डर झाली आहे हेच ठरवताना गोची होते. मग याला विज्ञान कसे म्हणायचे?

व्याख्या बदलतात. पूर्वी मीटर, ग्रॅम, अशा एककांच्याही व्याख्या ढोबळ होत्या. विज्ञानाचे नियम बदलत असतात. त्यात 'बिग डील' काय? आजच्या विज्ञानात चुका सापडल्या की उद्याचे विज्ञान तयार होते.

तुमच्या सायकिऍट्रीच्या व्याख्येत काय बसते? कॅथार्सिस, ट्रान्सफरन्स, ओडिपस कॉम्प्लेक्स, युंगचा कलेक्टिव्ह कॉन्शसनेस यांना कसे सिद्ध करता येईल?

मानसिक रोगांच्या उपचारासाठी जी औषधे, शस्त्रक्रिया आणि इतर कृती प्रभावशाली (वैज्ञानिक प्रयोगांचा निष्कर्ष, वैयक्तिक अनुभवांचा नव्हे) ठरतील ते वापरणे अशी सायकिऍट्रीची व्याख्या करता येईल. विशिष्ट कृतींचा फायदा होतो की नाही हा तपशीलाचा भाग झाला.
विज्ञानाची तुम्ही जी व्याख्या दिलीत त्यात संकल्पना (कन्सेप्ट) हा शब्द नाही याचीही नोंद घ्या.

सोडा हो

आधी पुरावे द्या मग बोला. तुम्ही म्हणाल ते विज्ञान समजण्याइतके आमचे दुर्दैव नाही.

मला ताप आला आणि रक्तात मलेरियाचे जंतू सापडले तर मलेरियाचे निदान करता येते.
मला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे किंवा नाही याचे १००% निदान करण्यासाठी कोणती टेस्ट आहे?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पहले तुम

सायकिऍट्री अवैज्ञानिक असल्याच्या दाव्यापुष्ट्यर्थ लबाडी केल्याचे मान्य करा.

रक्त तपासूनही मलेरियाचेही १००% खात्रीलायक निदान होत नाही. सेन्सिटिविटी, स्पेसिफिसिटी कधीच १ नसतात.

रोगनिदान करण्यासाठी signs व्यतिरिक्त symptoms सुद्धा बघितले जातात. symptoms वरून ओसीडीचे निदान सोपेच असते. शिवाय फंक्शनल MRI सुद्धा संशोधिला जातो आहे.

काहीही

विज्ञानावादी इतका रडीचा डाव खेळतात हे पाहून खेद झाला. बरोबर आहे म्हणा, पुरावा नाहीच तर देणार कुठून? शिवाय पुरावा नाही हे कबुल करायला इगो प्रॉब्लेम येतो.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

दमलात?

आधीच

हा संदर्भ आधीच पाहीला आहे. यातून कॅथार्सिसला वैज्ञानिक आधार काय हे कळत नाही. आणि आजही बरेच सायकिऍट्रीस्ट कॅथार्सिस वापरतात.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

नक्की?

या आणि या दुव्यांवरील लेख विकत घ्यावे लागतात पण सारांशानुसार कॅथार्सिस फालतू आहे.

तरीही

कॅथार्सिस फालतू आहे.
तरीही सायकिऍट्रीस्ट कॅथार्सिस वापरतात?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

माहिती नाही

मला मनोविकारतज्ञांशी (रुग्ण म्हणून) भेटण्याचा अनुभव नाही (म्हणजे अजून कधी पकडून नेले नाही इतकेच). तुमच्या मनोविकारतज्ञाला हे लेख वाचावयास सांगा.

प्रः एक मनोविकारतज्ञ दुसर्‍याला 'हाय-हॅलो' कसा करेल?
उ: यू आर फाईन, हाऊ ऍम आय?

ईनोद

प्रः एक मनोविकारतज्ञ दुसर्‍याला 'हाय-हॅलो' कसा करेल?
उ: यू आर फाईन, हाऊ ऍम आय?

फु ट लो


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आक्षेप

तुमच्या मनोविकारतज्ञाला हे लेख वाचावयास सांगा.

वैयक्तिक व खोडसाळ आरोपाचा निषेध.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

;)

भोंदू माणसाच्या लेखाचे दुवे देण्याची लबाडी केल्याचा आरोप मी आरागॉर्न यांच्यावर केला होता. त्याच्याकडे त्यांनी सोयिस्कर कानाडोळा केला.

मुसळ

आधी कॅथार्सिसची उपयुक्तता सांगत होतात, नंतर कॅथार्सिस फालतू ह्याला काय म्हणायचे?
मुद्दे संपले म्हणून आता बहुधा गुद्दे सुरू झाले.
बाय द वे, कुठल्याही वादामध्ये आपली सरशी झालीच पाहीजे असा अट्टाहास करणे आणि त्यासाठी कोणत्याही पातळीला जाणे ही डिसऑर्डर असावी का?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

?

आधी कॅथार्सिसची उपयुक्तता सांगत होतात

संदर्भ द्या. मी 'माहिती नाही' असे म्हणालो होतो.

कुठल्याही वादामध्ये आपली सरशी झालीच पाहीजे असा अट्टाहास करणे आणि त्यासाठी कोणत्याही पातळीला जाणे ही डिसऑर्डर असावी का?

डिट्टो.
आधी तुम्ही पातळी सोडली.

मग?

त्याचा अर्थ "कॅथार्सिसची उपयुक्तता आहे की नाही ते शोधून सांगतो" असा होतो.

संपादकांना विनंती

हा प्रतिसाद वैयक्तिक असला तरी राहू द्यावा. तथाकथित विज्ञानवादी मुद्दा नसला की कुठल्या पातळीला जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

--

विनंतीबद्द्ल धन्यवाद

तथाकथित विज्ञानवादी मुद्दा नसला की कुठल्या पातळीला जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सज्जनाशी अतिसज्जन खटाशी महाखट.
मुद्यांवर दिलेल्या उत्तरांकडे तुम्ही कानाडोळा करता.

अरे देखी तेरी चतुराई

:)

" alt="">

झेपत नाही हो!

आरागॉर्न यांनी मागितलेला संदर्भ येथे मिळत नाहीये असे वरील चर्चेमध्ये दिसते आहे.
विज्ञानवादी इतका रडीचा डाव खेळतात पण ते मान्यही करायला इतके जड जाते हे पाहून मलाही खेद झाला.

पुरावा नाहीच तर देणार कुठून?

पुरावा नाही? चक्क पुरावा नाही? अरेरे!
बिचारे आयुर्वेदवाले... पुरावे आणा म्हणतायेत म्हणे त्यांना विज्ञानवादी असे ऐकले ;))

शिवाय पुरावा नाही हे कबुल करायला इगो प्रॉब्लेम येतो.

असो, संदर्भच देता आला नाही म्हणजे लोच्याच झाला म्हणायचा एका भंपक विज्ञानवाद्याचा इथे!

ते तोंडावर आपटणे वगैरे म्हणतात, ते असेच असते का हो?

आपला
कुठेही आपटणारा
गुंडोपंत

आवांतर:
-एका वि.वाद्याचे स्वगत-

ओह! ओह!!! इगो प्रॉब्लेम!! तो ही माझा?
चक्क माझा इगो काढतो म्हणजे काय?
अरे नसेल आला एखाद्यावेळी संदर्भ देता म्हणून काय इतके झोडायचे?
काय म्हणता, मी सोडत नाही?... अहो होते एखाद्या वेळी! काय इतके?

इगो!! इगो इगो
आधी इगो म्हणजे काय याची व्याख्या केली पाहिजे. मग त्याची सिद्धता!
आणि हो मुख्य म्हणजे त्याचे संदर्भ द्यावे लागतील बरंका!
सिद्धता झाली की त्यात येणार्‍या विकृतींचा विचार करता येईल.
पण मग विकृती म्हणजे काय याची व्याख्या केली पाहिजे.
तर ती कशी असू शकेल हे पाहता येईल.
पण मग त्या आधी प्रकृती म्हणजे काय हे पाहिले पाहिजे त्याची व्याख्या केली पाहिजे.

मग त्याची चाचणी. म्हणजे परत सायकॉलॉजीचा विचार!

ओह नो!
पण ती सायकॉलॉजीची शाखा तरी वैज्ञानिक आहे की नाही? ती तर कला आहे! मग त्या कलेची चाचणी?
हात्त तिच्या आली परत पंचाईत! पण सायकॉलॉजीचा विचार करण्याचा विचार तरी वैज्ञानिक आहे का ते आधी तपासून पाहिले पाहिजे ;))

छे! याचा माझा काही संबंधच नाही कारण मी विज्ञानवादी आहे.
मानवी मनाच्या गोष्टींच्या आचारविचारांशी माझा काय संबंध?
२ अधिक २ म्हणजे ४ बास्स्स्!
बोलूच नका पुढे!

हम्म्!
या आरागॉर्नला पण काही काम नाही, रिकामटेकडा कुठचा!
मागच्यावेळी तर घ्यायचा प्रयत्न केला होता.
पण हा पठ्ठ्या हाती लागत नाहीये.

हे प्रकरण अंगाशी येते आहे!
च्छा! उपक्रमावरून आता काही दिवस गायब तरी व्हावे, किंवा मागे बदलला तसा आपला आयडी तरी बदलून घ्यावा...
म्हणजे मागचे मागे... कसें?
(कसें या शब्दाचा उच्चार किनारपट्टीवर राहणारे काही विशिष्ट समुहाचे लोक करतात तसा करावा!)

?

तुम्ही ज्या प्रतिसादाला प्रतिसाद दिलात त्यानंतर पाच प्रतिसाद (माझे ३ आणि आरागॉर्न यांचे २) आहेत आणि त्यांत कॅथार्सिस विषयी आमचे एकमत झाल्याचे दिसते. ते तुमचे वाचायचे राहून गेले का?
मी सायकॉलॉजीचा बचाव करीत नाही. मी धाग्याच्या सुरुवातीपासून सायकिऍट्रीच्या समर्थनार्थ लिहितो आहे. आरागॉर्न यांना सायकॉलॉजीवर राग दिसतो आहे पण शब्द 'मानसोपचार' वापरला आहे.
मी एकदाही आयडी बदललेला नाही.

कसें या शब्दाचा उच्चार किनारपट्टीवर राहणारे काही विशिष्ट समुहाचे लोक करतात तसा करावा!

मला फद्फदे आणि शिक्रण आवडतात त्याचा येथे काय संबंध?

एकमत नाही

त्यांत कॅथार्सिस विषयी आमचे एकमत झाल्याचे दिसते.

एकमत नंतर झाले. मी आधीपासून कॅथार्सिसला आधार नाही हे म्हणत होतो आणि तुम्ही कॅथार्सिसची "उपयुक्तता" शोधत होतात. ती सापडली नाही तेव्हा नाईलाजाने कॅथार्सिस फालतू असे कबूल केलेत. हे आधीच केले असते तर इतका घोळ घालायची गरज पडली नसती.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

नक्की सांगा

तुम्ही कॅथार्सिसची "उपयुक्तता" शोधत होतात.

शोधत होतो हे खरे आहे. पण "आधी कॅथार्सिस उपयुक्त असल्याचा दावा केला" हा जावईशोध का लावलात?
आधीच का कबूल करू? मला खरेच काही माहिती नव्हती.

टेस्ट नसावी

मला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे किंवा नाही याचे १००% निदान करण्यासाठी कोणती टेस्ट आहे?

कोणत्याही मनोविकाराचे निदान करण्यासाठी काही टेस्ट नसावी असे माझ्या मर्यादित वाचनावरुन व नुकत्याच आलेल्या स्व-अनुभवावरुन मी काढलेला निष्कर्ष आहे.

चार महिन्यांपूर्वी कॉफी ब्रेक डिस्कशनमध्ये सहज गप्पा मारत असताना दैववाद-प्रयत्नवाद व नशीब अशा विषयावरील चर्चेत (आम्ही उपक्रमाबाहेरही याच चर्चा करतो :)) ) एका मित्राने मला त्याच्या परिचितांच्या बाबत घडलेली एक दुर्दैवी घटना सांगितली. त्या परिचितांच्या ९ वर्षे वयाच्या मुलाला बोन मॅरो कॅन्सर आहे. तो कॅन्सर बरा होण्याजोगा नाही व रुग्ण काही महिन्यांचाच सोबती आहे. रोगी मुलगा त्याच्या आईवडिलांना रोज रात्री तुम्ही माझ्यासाठी उपचारास्तव काहीच करत नाही असे सांगत राहतो. आईवडिलांनी या प्रसंगी काय करावे?
ह्या पार्श्वभूमीनंतर आमच्या चर्चेत माझ्या मित्राने त्याचा निष्कर्ष असा सांगितला की इतक्या लहान वयात ह्या मोठ्या स्वरुपाच्या वेदना सोसायला लागल्याने मुलाचे वागणे थोडे अप्रगल्भ असले तरी त्याचे बोलणे अगदी मोठ्या माणसासारखे आहे. मित्राने पुढे मला असे सांगितले की देव असा काही एका बाजूने अन्याय करतो तेव्हा दुसऱ्या बाजूने त्याची भरपाई करतो. मी या वाक्याचे स्पष्टीकरण विचारले तेव्हा मित्राने सांगितले की त्या मुलावर केमोथेरपीचे उपचार चालू आहेत, ज्याला वयाने मोठी माणसे प्रचंड घाबरतात पण हा मुलगा त्याला अजिबात घाबरत नाही.

मला स्वतःला केमोथेरपी फक्त नाव ऐकून माहीत होती. त्यामुळे केमोथेरपीत घाबरण्यासारखे काय असते हा प्रश्न मी मित्राला विचारला. नंतर त्याने मला केमोथेरपी डिटेल समजावून सांगितली व ती प्रोसेस ऐकून मला पोटात ढवळून आले व चक्कर आली (वेसोवेगल सिंकोप).

मिनिटाभरात मी सावरुन बसलो पण हा प्रकार ऑफिसात घडल्याने ऑफिसातल्या डॉक्टरने स्वतःचे पावशेर टाकून लगेच ऍडमिट होण्याचा सल्ला दिला. चक्कर का आली हे कळणे महत्त्वाचे आहे वगैरे डोस पाजले. १ दिवस सर्व चाचण्या केल्या (ईसीजी, सीटी स्क्यान, एमआरआय, ३डी इको कार्डिओग्राम, होल्टर मॉनिटर टेस्ट) यात काही सापडले नाही. फक्त माझा रक्तदाब सामान्य प्रमाणापेक्षा थोडा कमी आहे (नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या बाबतीत तो शक्यतो कमीच असतो) ११०/७०-६५ एवढा निष्कर्ष काढला व पाणी व मिठाचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला.

मला काहीही झाले नाही असा निष्कर्ष काढून डॉ. नी दोन तीन दिवसांच्या ऍसिडिटीच्या गोळ्या देऊन डिसचार्ज दिला. या डॉ.ना आपण डॉ. अ म्हणूयात. मी एक दोन दिवस सुटी घेऊन पुन्हा ऑफिसला जायला लागलो. कदाचित फोबियामुळे पुन्हा कॉफी पिताना मला सिंकोपचे सिम्पटम्स जाणवू लागले. (ज्यांनी हा प्रकार अनुभवला असेल त्यांना हातापायाला घाम सुटणे वगैरे प्रकारचे हे सिम्पटम्प्स लगेच कळतात व त्वरित खाली बसल्यास चक्कर येणे चाळता येते)

मी पुन्हा डॉ. अ कडे जाऊन त्याला हा प्रकार सांगितला. व थायरॉईड, टिल्ट टेबल टेस्ट वगैरे घेण्याची विनंती केली. त्या टेस्टमधेही काही सापडले नाही. मग त्याने कॉन्शस-सबकॉन्शस वगैरे काहीतरी बडबड करुन एक मंत्र म्हणण्याचा सल्ला दिला. (आय एम फाईन-आय एम स्ट्रॉंग-आय कॅन ओवरकम एनी डिफिकल्टी अशा आशयाचा) पण वैद्यकीय उपचार काहीही नाही.

मात्र मला रोज फक्त सकाळी कॉफीच्या वेळेस सिंकोपची शक्यता जाणवत होती. नंतर दिवसभर काही वाटत नव्हते. १५ दिवस या डॉक्टरकडे वेळ घालवल्यानंतर मग दुसऱ्या डॉ. ब कडे गेलो. त्याने स्टेथोस्कोप लावून छाती पाठ सगळे तपासून पाहिले आणि मला कामातील स्ट्रेसमुळे अँक्झायटीचा त्रास असल्याचे निदान केले?????? (आयुर्वेदिक डॉ. ना नाडी पाहून कफदोष कसा समजतो हा जसा मला पडलेला प्रश्न आहे तसाच स्टेथोस्कोपने अँक्झायटी कशी कळते हाही मला पडलेला प्रश्न आहे.) Clonazepam चे अंश असलेल्या लिब्रियम, रिवोट्रिल वगैरे गोळ्या ४ आठवडे घेण्याचा सल्ला दिला व नंतर हा डोस कमी करु असे सांगितले. नंतर डोस थोडा कमी केला व अजून महिनाभर घ्यायला सांगितल्या. अजून थोडे दिवस गोळ्या घ्यायच्या आहेत.

या दोन्ही डॉ.चे क्वालिफिकेशन सेम आहेत. दोघेही एमडी, एमएस, कार्डियोलॉजिस्ट, इंटेसिविस्ट आणि आणखी काहीतरी आहेत (सायकलिस्ट??)

मग डॉ. अ ला हे निदान का करता आले नाही व डॉ. ब ला फक्त स्टेथोस्कोपच्या सहाय्याने हे निदान कसे करता आले याचे स्पष्टीकरण काय?
या गोळ्यांचा खरंच काही फायदा होतो की केवळ प्लासिबो आहेत. (प्लासिबो नसाव्यात कारण काही दुष्परिणाम मला जाणवत आहेत.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभार

अनुभव सांगितल्याबद्दल आभार. तुम्हाला लवकर आराम पडो हीच सदिच्छा.

--

आराम

वेसोवेगल सिंकोप हा सामान्य प्रकार आहे. बहुतेकांना तो अनुभव येतो. (उदा काही जणांना रक्त पाहिल्यावर भोवळ येते वगैरे) मात्र डॉ. ब ने अँक्झायटी सांगितल्याने घरच्यांच्या दबावाखाली मला मेडिकेशन सुरु करावे लागले. आता ते अचानक बंद करणे शक्य नाही. (विथड्रॉल सिम्पट्म्स)

वेसोवेगल सिंकोपची घटना वगळता मुळात मला काहीच झाले नव्हते असे वाटते. पण Clonazepam च्या साईड इफेक्टमध्ये 'फॉल्स सेन्स ऑफ वेल बिईंग' असेही आहे त्यामुळे नक्की काही कळत नाही. डॉक्टर ब ला ही शंका विचारली तर तो म्हणतो तुम्ही औषधाची काळजी करता म्हणजेच तुम्हाला अँक्झायटीचा त्रास आहे. असा हा अल्युपथीचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

टेस्ट आणि उपाय

मित्राने पुढे मला असे सांगितले की देव असा काही एका बाजूने अन्याय करतो तेव्हा दुसऱ्या बाजूने त्याची भरपाई करतो.

मठ्ठ मित्र. असे ऐकले की माझी मैत्री तुटते.

स्टेथोस्कोपने अँक्झायटी कशी कळते हाही मला पडलेला प्रश्न आहे.

अँक्झायटीमुळे पल्सरेट वाढतो, धडधड होतो.

नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या बाबतीत तो शक्यतो कमीच असतो

पायांच्या स्नायूंच्या व्यायामाने सिंकोपची शक्यता कमी होते.

प्लासिबो नसाव्यात कारण काही दुष्परिणाम मला जाणवत आहेत.

प्लॅसिबोचे परिणाम 'जाणवत' असल्यास रुग्णावर अधिक प्रभाव पडतो म्हणून प्लॅसिबोमध्ये (दुष्)परिणाम करणारी द्रव्ये घालीत असत.

धकधक करने लगा

मठ्ठ मित्र. असे ऐकले की माझी मैत्री तुटते.

मित्राच्या अनेक बाजूंपैकी ही एक बाजू आहे. मला त्याच्या इतर बाजू महत्त्वाच्या वाटतात. मला हॉस्पिटलापर्यंत नेणे आणणे, तिथला फॉर्म भरणे वगैरे कामे त्याने हसतमुखाने केली ही त्याची दुसरी बाजू. अमुकतमुक व्यक्ती आस्तिक आहे हे त्या व्यक्तीला नाकारण्याचे कारण माझ्या बाबतीत नाही. माझे आईवडील आस्तिक आहेत त्याचा आमच्या रोजच्या व्यवहारात काही अडथळा येत नाही.

अँक्झायटीमुळे पल्सरेट वाढतो, धडधड होतो.

गंमत म्हणजे मला ज्या दिवशी सिंकोपचा अनुभव आला त्यादिवशी व अन्य जेव्हा केव्हा माझी तपासणी झाली आहे तेव्हाही माझा पल्सरेट हा किंचित कमी आहे हे डॉ. नी सांगितले आहे. (५६ च्या आसपास किंबहुना त्यामुळेच रक्तदाबही कमी आहे असे डॉ.चे म्हणणे आहे). सलग २४ तास केलेल्या होल्टर मॉनिटरमध्ये tachycardia किंवा bradycardia चे अगदी नाममात्र इव्हेंट्स सापडले (अनुक्रमे १ व २). भूक लागण्याच्या वेळेस पाल्पिटेशनचा मला क्वचित अनुभव येतो. पण होल्टर मॉनिटरमध्ये जे समजले नाही ते स्टेथोस्कोपने कसे समजले?

पायांच्या स्नायूंच्या व्यायामाने सिंकोपची शक्यता कमी होते.

हे नेटवर मी वाचले होते व डॉक्टरला सांगितले की गेले सात महिने मी रोज ५ किमी पळतो. त्यामुळे मला काहीही झालेले नाही. पण डॉक्टर अँक्झायटीवरच अडून बसला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तसे नाही

मित्राच्या अनेक बाजूंपैकी ही एक बाजू आहे. मला त्याच्या इतर बाजू महत्त्वाच्या वाटतात. मला हॉस्पिटलापर्यंत नेणे आणणे, तिथला फॉर्म भरणे वगैरे कामे त्याने हसतमुखाने केली ही त्याची दुसरी बाजू. अमुकतमुक व्यक्ती आस्तिक आहे हे त्या व्यक्तीला नाकारण्याचे कारण माझ्या बाबतीत नाही. माझे आईवडील आस्तिक आहेत त्याचा आमच्या रोजच्या व्यवहारात काही अडथळा येत नाही.

मी नाही मैत्री तोडत. मी अक्कल काढतो आणि लोक मैत्री सोडतात. आस्तिक आहे हे त्या व्यक्तीला नाकारण्याचे कारण नाही. पण "दुसऱ्या बाजूने त्याची भरपाई करतो." हे वाक्य हलकट/क्रूर आहे.

नुस्त्या सिंकोपवरून अँक्झायटीचे निदान करणे मला चूक वाटते.

रॉँग रीडिंग बिट्विन द लाईन्स

मी नाही मैत्री तोडत. मी अक्कल काढतो आणि लोक मैत्री सोडतात.

हो त्यात काहीच वाद नाही.

पण "दुसऱ्या बाजूने त्याची भरपाई करतो." हे वाक्य हलकट/क्रूर आहे.

माझ्या प्रतिसादाचा सपशेल चुकीचा अर्थ लावला आहे. एखादी व्यक्ती आस्तिक असते म्हणजे त्या व्यक्तीचे सर्वच वागणे चुकीचे असते असे मानून व त्या व्यक्तीचा आस्तिकपणा हे व्यंग आहे असे मानून तिला हिणवणे/नाकारणे चुकीचे आहे असे मला वाटते, असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ होता. उलट आस्तिक/नास्तिक असणे याचा व्यवहारातल्या चांगल्या वागणुकीसाठी किंवा माणुसकी दाखवण्यासाठी काहीही संबंध नाही हे मला इथे अधोरेखित करायचे होते. आस्तिक असणे हा माझ्या मित्राचा चॉईस आहे आणि त्याने त्याबाबत माझी भरपाई करावी अशा प्रकारची कुठलीही अपेक्षा इथे अभिप्रेत नाही. मात्र माझा मित्र एका वाक्यावरुन मठ्ठ आहे असा निष्कर्ष काढणे हे जास्त हलकट व क्रूर आहे असे मला वाटते.

नुस्त्या सिंकोपवरून अँक्झायटीचे निदान करणे मला चूक वाटते.

हे माझ्यासारख्या वैद्यकअडाण्याला नेटवर चार पाने वाचून कळले तर एमडी एमएस झालेल्या डॉक्टरला कसे काय कळले नाही ही माझी मूळ शंका होती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अर्थ

"दुसऱ्या बाजूने त्याची भरपाई करतो." या वाक्याचा अर्थ काय?

हम्म

देव दुसऱ्या बाजूने त्याची भरपाई करतो. ह्या वाक्याचा अर्थ आपण विचारला होतात. मी चुकीचा अर्थ लावला.

सदर वाक्य माझ्या मित्राच्या तोंडचे असल्याने त्याचे स्पष्टीकरण माझ्याऐवजी तोच देऊ शकेल.

पण हे वाक्य या संदर्भात क्रूर आहे हे मान्य. एकंदर त्या मुलाबाबत जे झाले आहे तेच पुरेसे क्रूर आहे. असो


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

त्रयस्थ शंका

नुस्त्या सिंकोपवरून अँक्झायटीचे निदान करणे मला चूक वाटते.

मी सामान्यपणे सारख्याच क्षमता, पात्रता व अनुभव असणाऱ्या एकाच इस्पितळातल्या दोन वेगवेगळ्या डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेतला. दोघांनी एकाच ठिकाणी काढलेले सर्व रिपोर्ट्स पाहिले. दोघांनीही सारख्याच प्रकारची तपासणी केली. मात्र दोघांचेही निदान पूर्ण वेगवेगळे होते.

बऱ्याचदा फलज्योतिषावर आक्षेप घेणाऱ्यांचा असा आक्षेप असतो की एकच कुंडली दोन ज्योतिषांना दाखवली तर दोघेही वेगवेगळे भविष्य सांगतात त्यामुळे फलज्योतिषाला शास्त्र मानता येणार नाही.

मी येथे असे लिहिले होते की माझी कुंडली दोन ज्योतिषांनी पाहून एकदोन भाकिते व भूतकाळातल्या घटना अचूक वर्तवल्या. दोन्ही ज्योतिषी एकमेकांना ओळखत नाहीत. त्यामुळे त्यांनी cahoot करुन असे केले असल्याची सुतराम शक्यता नाही.

मला आलेल्या वैयक्तिक अनुभवावरुन फलज्योतिष अधिक शास्त्रशुद्ध व वैद्यक हे अशास्त्रीय आहे असा निष्कर्ष मला काढता येऊ शकतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर