मानसोपचार : काही विचार

आधुनिक मानसोपचारांना १०० वर्षांहून अधिक काळापासून वापरले जाते आहे. तरीही आजही या शाखेला नेमके कुठे बसवावे याबद्दल अनेक मते आहेत. आधुनिक मानसोपचारांचे जनक फ्रॉइड यांनी विकसित केलेली उपचारपद्धती ट्रान्सफरन्स, ओडिपस कॉम्प्लेक्स, इड-इगो-सुपरइगो यांचे अस्तित्व, स्वप्नांचे अर्थ यावर आधारित आहे. यातील एकही संकल्पना प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. असे असूनही फ्रॉइड यांना त्यांच्या उपचारांमध्ये अभूतपूर्व यश मिळाले.

आज मानसोपचारांमध्ये अनेक शाखा आहेत. क्लिनिकल सायकोथेरपी, बिहेविअरल थेरपी, कॉग्निटीव्ह अप्रोच इ. बरेचदा वेगवेगळ्या शाखेच्या तज्ञांमध्ये रूग्णाच्या निदानाबद्दल वेगवेगळी मते असतात. रूग्णाच्या खर्चिक उपचारांना लागणारा वेळ काही महिने ते आठ ते दहा वर्षे इतकाही लांबू शकतो. बरेचदा रूग्ण प्रगती होत नसेल तर डॉक्टर बदलून बघतो. थेरपीबरोबर ९९% वेळा हे डॉक्टर लोक प्रोझेक सारखी खिन्नता दूर करणारी औषधे वापरतात. बरेचदा रूग्णांना याचा फायदा होतो आणि ते बरेही होतात. पण ते बरे होतीलच अशी खात्री कुठलाही मानसोपचारतज्ञ देऊ शकत नाही.

असे असूनही प्रत्येक इस्पितळात, कारागृहात मानसोपचार विभाग असतो. कोर्टात मानसोपचार तज्ञाची साक्ष ग्राह्य धरली जाते. बरेचदा या साक्षीमुळे आरोपीची मृत्युदंडाची शिक्षाही वाचते.

मानसोपचार विज्ञान आहे की कला? काही मानसोपचार तज्ञ अत्यंत यशस्वी होतात यामागचे कारण काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

माहिती

चेतापेशींतून माहिती वाहिली की त्यांच्या जोडण्या बदलतात याचे एक उदाहरण म्हणून कृपया हेबियन शिक्षणाविषयी वाचा. मेंदूत असे बदल घडल्यामुळे व्यक्तिमत्व बदलते असे मी म्हटले होते. पण असे बदल हळूहळू घडतात.
ट्रॅक करण्यासाठी मी एक आयडिया वापरतो. मी आधी येथून प्रतिसाद उघडतो. प्रतिसाद दुसर्‍या/तिसर्‍या पानावर असल्याचे लक्षात आल्यास येथे दिलेली वाचनखूण प्रणाली उघडतो. ती ऑपॉप दुसर्‍या/तिसर्‍या पानावरील प्रतिसाद हुडकून तो उघडून देते. हा धागा चौथ्या पानावर पोहोचला तर वाचनखूण प्रणालीची नवी आवृत्ती बनवेन.

धन्यवाद । सहमती

दुव्यांबद्दल धन्यवाद.

मेंदूला एम्बेडेड सिस्टिम सुद्धा म्हणता येईल.

या विधानाशी बराचसा सहमत आहे.

जोडण्यांमध्ये होणारे बदल प्रत्येक व्यक्तिसापेक्ष असल्यास या बदलांची दिशा, स्वरुप आधीच ठरलेले असतील. 'आधीच ठरलेली बदलांची दिशा, स्वरुप' हे मन असावे की या बदलांमुळे निर्माण झालेल्या 'वायरींगला' मन म्हणावे यावर विचार करतोय.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

कला

धन्यवाद!
म्हणजे मन हे मेंदुपेक्षा, विचारापेक्षा वेगळे आहे.
मन हा स्वतंत्र प्रत्यक्ष अवयव नाही (मेंदु प्रमाणे)
"मन" हे कोणत्याही विद्युत/चुंबकीय लहरी सोडते असे ऐकिवात नाहि अथवा सिद्ध झाले नाहि (बरोबर ना?)

तर मग अर्थातच मन ही एक संकल्पना आहे जी प्रयोगशाळेत, ज्ञात विज्ञानाच्या नियमांनी प्रयोगशाळेत सिद्ध होत नाहित. तर मग मनाचे वागणे, त्याची क्रिया-प्रतिक्रिया यांना नियमांत बांधता येत नाहि.. एखाद्या कलेप्रमाणे अनुभवांती, सृजनशीलतेने मन समजून घ्यावे लागते.. आणि त्याच कलात्मकतेने मनात बिघाड असल्यास प्रसंगी प्रत्येक केसमधे वेगळी सृजनशीलता दाखवून उपचार करावे लागतात.. तेव्हा मानसोपचार ही कला आहे असे तुर्तास मानण्यास प्रत्यवाय दिसत नाहि

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

चूक

"मन" हे कोणत्याही विद्युत/चुंबकीय लहरी सोडते असे ऐकिवात नाहि अथवा सिद्ध झाले नाहि (बरोबर ना?)

झोपेत, वेगवेगळे विचार करताना, इ. fMRI, EEG, इ. मध्ये मनाचे वेगवेगळे स्कॅन दिसतात की! अशा तपासांमध्ये मृत मेंदूचे फोटुही वेगळे येतात.

मन व मेंदु वेगळे आहेत ना?

अहो पण मन व मेंदु वेगळे आहेत ना?
ईईजी मेंदूतील वेगवेगळ्या लहरी पकडतो.. दाखवतो.. मनाचं काय?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

तुका म्हणे होय मनासी संवाद

मेंदूशी इंटरफेस करायचे मन हा एकमेव फंक्शन नाही. उदा. रक्तप्रवाह (व त्याद्वारे ऑक्सीजन) पाठवण्यासाठी वेगळे इंटरफेस आहेत. मन हे फंक्शन मेंदू या ऑब्जेक्टची पब्लिक मेथड आहे (रिटर्न वॅल्यू विचार) असे चित्र समोर आणले तर लगेच कळेल व गोंधळ होणार नाही.

तुला ऑब्जेक्ट डायग्राम काढून दाखवू का? :-)

(सन सर्टिफाईड) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अद्वैत

मेंदू आणि मन यांना वेगवेगळे मानण्यास मी नकार दिला आहे.
मन ही/या मेथड/मेथड्स आणि मेंदू हे ऑब्जेक्ट हे रूपक चांगले वाटते.

वाचकांनी पुढील पानांवरील प्रतिसाद वाचणे सोपे करण्यासाठीची ही आयडिया पहावी.

मन हे फंक्शन/मेथड आहे

मनाचे अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासाठी मेंदूचे अस्तित्व सिद्ध करणे पुरेसे ठरावे. मेंदू या ऑब्जेक्टशी इंटरफेस करण्यासाठी मन या फंक्शनचा वापर विचार या प्रकाराचे मेसेजेस एक्सचेंज करुन होतो. मानसिक रोग म्हणजे मन या फंक्शनमध्ये कुठेतरी बग आहे ज्यामुळे विचाराचे प्रोसेसिंग नीट होत नाही. आणि मानसोपचार म्हणजे हे बग फिक्सिंग ज्यात मनावर व पर्यायाने मेंदू या ऑब्जेक्टवर उपचार केले जातात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सांगायचा मुद्दा

मेंदु हार्डवेअर आहे (रिअल, स्पर्षता येण्याजोगा)
जर मन हे फंक्शन असेल तर त्यातील बग काढण्यासाठी जर हार्डवेअरवरचे उपचार करावे लागले तर ते मेंदुचे झाले.. आणि ते विज्ञान वेगळे आहेच. मात्र तो मानसोपचारातील छोटा भाग झाला
असो.

माझा सांगायचा मुद्दा असा की मन हे फंक्शन कधी कसे वागेल हे कोणत्याही नियमांत बांधता येत नाहि.. तर ते कलात्मकतेने शोधावे लागते.. त्यातील बग ही नेहमी डिबग स्टेटमेंटस घालून मिळतीलच याची खात्री नाहि.. आणि बग समजल्यावरही त्याचा फिक्स करणे अर्थातच मानसोपचार हे काम सॉफ्टवेअर प्रमाणे ठराविक आज्ञावलीने होईल याची खात्री देता येत नाहि तर ते कलाकाराच्या (इथे मानसोपचारतज्ञ) सृजनशीलतेने त्या त्या प्रसंगानूसार हाताळून ठिक करावे लागते.. त्यामुळे मानसोपचार विज्ञान मानता येणार नाहि असे अजूनही वाटते.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

ऑप्टिमाईज एवरीथिंग अँड बी अनहॅप्पी - डोनाल्ड नुथ

मेंदू हार्डवेअर आहे, तसेच ते एक ऑब्जेक्टही आहे. (ऊप्सच्या प्राथमिक शिकवणीत कारचे उदाहरण दिले जाते तसेच हे) .

प्रोग्रामिंग सुद्धा एक कला आहे असे डोनाल्ड नुथचे म्हणणे आहे. मानसोपचाराची तू नक्की काय व्याख्या मानतोस ते अजून स्पष्ट झालेले नाही. (सायकिऍट्री कि सायकोथेरपी). त्यामुळे कला कि विज्ञान हा प्रश्नही अनुत्तरित राहतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चुंबकीय लहरी

डिस्कवरी वाहिनीवर पाहिलेल्या एका कार्यक्रमात मेंदूचे कार्य न्यूरॉन्स मार्फत व चुंबकीय लहरीसदृश लहरींमार्फतच चालते असे पाहिले होते . 'विचार' या प्रकारचा मेसेज एक्सचेंज करण्याचे माध्यम चुंबकीय लहरी असणे शक्य आहे. तुम्ही समोर मिसळपाव पाहता व (आवडीनुसार-प्राधान्यानुसार) एकतर तुमच्या तोंडाला पाणी सुटते किंवा ओकारी येते. या एकंदर प्रोसेसमध्ये डोळ्याने मिसळपाव दिसणे व तोंडात पाणी किंवा ओकारी येणे हे चुंबकीय लहरींचाच परिपाक आहे.

चू.भू.द्या.घ्या.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

खंडन नव्हे, पण स्पष्टीकरण हवे

म्हणजे मन हे मेंदुपेक्षा, विचारापेक्षा वेगळे आहे.
मन हा स्वतंत्र प्रत्यक्ष अवयव नाही (मेंदु प्रमाणे)
"मन" हे कोणत्याही विद्युत/चुंबकीय लहरी सोडते असे ऐकिवात नाहि अथवा सिद्ध झाले नाहि (बरोबर ना?)
.
तर मग अर्थातच मन ही एक संकल्पना आहे जी प्रयोगशाळेत, ज्ञात विज्ञानाच्या नियमांनी प्रयोगशाळेत सिद्ध होत नाहित.

पहिल्या तीन ओळींचा चवथ्या (निष्कर्षात्मक) ओळीशी संबंध लागत नाही.

कुठल्याही संकल्पना प्रयोगशाळेत कशा सिद्ध होतात? उदाहरणार्थ "संख्या"/"पाय"/"उणे-एकचे-वर्गमूळ" या सर्व संकल्पना आहेत. या संकल्पना म्हणजे कुठली स्पर्श करण्यालायक जडवस्तू दाखवता येत नाही. होय, "पाय"सुद्धा! वर्तुळ बोटाने दाखवता येते, पण परिघाला त्रिज्येने भाग द्यायचे अचाट कार्य बोटाने स्पर्शता येत नाही. "दोन सफरचंदे" हाताने स्पर्शता येतात, पण "दोन" संख्या हाताने स्पर्शता येत नाही. "दोन सफरचंदे" आणि "दोन संत्री" यांना स्पर्श केल्यानंतर "द्वित्व" ही अचाट संकल्पना समजते, ती स्पर्शता येत नाही. या सर्व सम्कल्पनांमधून विद्युच्चुंबकीय लहरीसुद्धा निघत नाहीत.

तरी प्रयोगशाळेतल्या निरीक्षणांची गणिते करताना या संकल्पना समान्यपणे वापरलेल्या दिसतात. इतकेच काय, असल्या शुद्ध संकल्पना वापरल्याशिवाय प्रयोगशाळेतली निरीक्षणे समजतदेखील नाहीत.
- - -

तुमचा मथितार्थ वेगळा असावा. येथे मनोव्यापाराचेच दोन पैलू वेगळे उदाहरण म्हणून देतो. शेकडो मराठीभाषकांच्या बोलण्याचे निरीक्षण करून आपण ताळे लावू शकतो : ९९% मराठी लोक "अमुक" म्हणतात, "तमुक" म्हटलेले त्यांना पटत नाही. वगैरे.
उदाहरणार्थ : पर्याय दिल्यास "ओल्या पिपांत उंदिर मेले" असा पर्याय निवडतात, "पिपांत मेले ओल्या उंदिर" असा पर्याय नकारतात.
हे जे काय निवडणे आहे, ते "मनोव्यापार" असावेत. त्या मनोव्यापारातून थेट विद्युच्चुंबकीय निरीक्षण आपण करत नाही. त्या मनोव्यापारातून उमटणार्‍या तोंडा-घशातील ध्वनीचेच श्रवण-निरीक्षण आपण करू शकतो.
मात्र "९९% मराठीभाषक सहसा विशेषणे विशेष्यापासून तोडत नाही" हा अनुभवजन्य निष्कर्ष (मी याला वैज्ञानिक निष्कर्ष म्हणेन) सांगतात. तो तोंडा-घशातील स्नायूंच्या हालचालीबद्दल नव्हे. निष्कर्ष मनोव्यापाराबद्दल आहे. अशा प्रकारे मनोव्यापार संभवनीयतेच्या "नियमांत बांधता येतात". (१% उड्डाणांत स्पेस शटल कोसळते तरी अभियांत्रिकीला "अप्लाइड विज्ञान"च म्हणतात.)

मर्ढेकरांनी "पिपांत मेले ओल्या उंदिर" असा प्रयोग केला आहे. ती प्रतिभा आहे. त्यात दर कडव्यात वेगळी सृजनशीलता आहे.

- - -
माझ्या मते वरील दोन प्रकारांत मनोव्यापारांच्या निरीक्षणात काही फरक आहे, तो जाणण्यासारखा आहे. मी स्वतः प्रथम प्रकाराला "भाषाविज्ञान" म्हणतो, तर दुसर्‍या प्रकाराला "कवित्व-कला".
अनुभव-दर्शित नियम एकीकडे तर प्रतिभा दुसरीकडे विशेष जाणवते.
स्पर्श, विद्युच्चुंबकीय लहरी, वगैरे नि:संदर्भ आहेत.

एखादा छायाचित्रकार प्रयोगशाळेत मोजल्यासारखे लाईट-मीटर, कलर-मीटरच्या साहाय्याने प्रतिभावंत चित्रे बनवत असेल, तर माझ्यासाठी ती कला. मी शाळेत भूमितीच्या शिक्षकाने सांगितली म्हणून नियमानुसार गचाळ चित्रे काढत होतो ती कला नाही. (घोकंपट्टी होती हे खरे. पण नियम समजून चित्रे काढली असती तर ते विज्ञान होते. माझ्या भदाड्या पेन्सिलीच्या वर्तुळाचा "पाय"शी काहीही स्पर्श-संबंध नसला तरी.)

डिप्रेशन

खिन्नतेवर (डिप्रेशन) एक रोचक लेख वाचण्यात आला.

 
^ वर