उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
दुसरे पान
निखिल जोशी
June 4, 2010 - 10:46 am
उपक्रमवर चर्चा ५० प्रतिसादांपेक्षा लांबली की पुढील पानांवरील प्रतिसाद वाचणे कठीण होते. यावर काही उपाय मला माहिती नव्हता.
माझा तोडगा हा चाकाचा पुनर्शोध नसावा अशी आशा आहे.
- फायरफॉक्समध्ये बुकमार्कस->ऑर्गनाईझ बुकमार्कस या पर्यायाची निवड करावी (इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये पर्णखुणेस फेवरिटस असे संबोधितात.).
- बुकमार्कस मेनूवर (किंवा त्याच्या एखाद्या उपगटावर) उंदराची उजवी कळ दाबून न्यू बुकमार्क बनवावे.
- नव्या बुकमार्कच्या लोकेशनमध्ये पुढील ओळ चिकटवावी.
- javascript:(function(){loc=location.href.split('#');fin=(loc[0] + '?page=1#' + loc[1]);window.location=fin;})();
- ऍड या कळीवर टिचकी मारून पर्णखुणे जपून ठेवावी.
उपक्रमवरील कोणताही प्रतिसाद उघडल्यावर जर असे लक्षात आले की तो प्रतिसाद दुसर्या पानावर आहे, तर जपून ठेवलेली पर्णखुण उघडावी.
पान ३ वरील प्रतिसाद वाचण्यासाठी वरील ओळीत page=2 असा बदल करावा (आणि त्यापुढील पानांसाठी त्याचप्रमाणे ...).
पण तिसर्या पानावर चर्चा चालली म्हणजे भलतीच रसाळ असणार, तुमची अशी आवडती चर्चा कोणती?
दुवे:
Comments
आश्चर्य
तथाकथित कंस्ट्रक्टिव प्रयत्नांना प्रतिष्ठा असते असे ऐकले होते.
यांपैकी कोणतीही शक्यता असली तरी येथे प्रतिसाद अपेक्षित होते.
पर्णखूण या प्रतिशब्दापेक्षा पर्णखूण-प्रणाली (बुकमार्कलेट) योग्य वाटतो.
:-)
हेच पण मी थेट युआरएल मध्ये नोड नं च्या पुढे '?page=1' लावुन् करतो.
अडचण् अर्थात हीच की प्रतिसाद (२ पे़क्षा जास्त पाने असल्यास) कुठल्या पानावर आहे हे कळत् नाही (ट्रायल अँड एरर आहेच् म्हणा). बुकमार्क करण्याची कल्पना मात्र आवडली. क्लिष्ट मराठी (;-)) लोकांना कळले नसल्याने प्रतिसाद आले नसतील. ;-)
-Nile
हे घ्या
पान दोनवर प्रतिसाद सापडला नाही तर पुढील बुकमार्कलेट पान तीनवर जाऊन प्रतिसाद उघडते (अन्यथा पान दोनवर जाऊन प्रतिसाद उघडते).
हे जावास्क्रिप्ट जरा मंद आहे. (पान क्र. दोन तपासण्यास लागणारा वेळ हे त्याचे कारण आहे.) याशिवाय ही पर्णखूण-प्रणाली फायरफॉक्समध्येच चालते. इंटरनेट एक्स्प्लोररसाठी थोडे बदल करावे लागतील. (मूळ लेखातील प्रणाली सामायिक आहे.)
javascript:(function(){loc=location.href.split('#');fin1=(loc[0]+'?page=1#'+loc[1]);fin2=(loc[0]+'?page=2#'+loc[1]);objXml = new XMLHttpRequest();objXml.open("GET",fin1,false);objXml.send(null);str=objXml.responseText;if(0 > str.search(loc[1])) window.location=fin2;else window.location=fin1;})();
पान चारसाठीची (किंवा जनरिक) पर्णखूण-प्रणाली बनविणे आता सोपे वाटते. पान चारपर्यंत एखादा नवा धागा पोहोचला तर लिहेन म्हणतो.
धन्यवाद ;-)
सावरकरी पर्यायी शब्द हे केवळ शब्द बनविणार्यालाच गार (कूल) वाटत असावेत.
एक्सेप्शन
पान दोनवर ज्याचा दुवा उद्धृत आहे अशा, पान तीनवरील, प्रतिसादासाठी ही पर्णखूण-प्रणाली वापरण्याचा प्रयत्न झाला तर मात्र अपयश येईल.
शब्दमाळेचे (स्ट्रिंग) वाचन (पार्सिंग) खूपच बुद्धिमान पद्धतीने केल्याशिवाय बहुदा हा अपवाद टाळता येणार नाही.
नको.
यापेक्षा सगळे प्रतिसाद एकाच पानावर (नवीन प्रतिसादांच्या खुणेसह) दिसावेत असा आग्रह उपक्रम प्रशासनाकडे धरेन.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
प्रयोग करण्यात माझी दिरंगाई
प्रयोग करण्याबत अजून टंगळमंगळ करतो आहे.
मात्र युक्ती शोधून काढल्याबाबत, आणि येथे सांगितल्याबाबत धन्यवाद.
(१००वर प्रतिसाद, अबब... ५० प्रतिसादांच्या वर जेव्हा संवाद होतो, तेव्हा नवीन मुद्दे यायचे थांबतात, आणि त्याच-त्या मुद्द्यांना पुन्हापुन्हा अधिक ठासून सांगितले जाते, असा माझा अनुभव आहे. म्हणून चर्चा वाचण्याबाबत टंगळमंगळ फार होते. मात्र अपवादात्मक असलेल्या लांबलचक सुसंवादांनाही मी मुकतो, हा माझा तोटाच आहे.)
इतर संस्थळे
मिपावरही हे जावास्क्रिप्ट आऊट ऑफ द बॉक्स चालते आहे.
पॅच
कितीही पानी धाग्यात नेमका प्रतिसाद कोणत्या पानावर आहे ते शोधून ते पान उघडून अपेक्षित प्रतिसादापर्यंत पान खाली सरकविणारे स्क्रिप्ट लिहिण्याचा प्रयत्न मी अनिश्चित काळापर्यंत स्थगित करतो आहे. सध्या ४ पानांपर्यंत उपयोगी स्क्रिप्ट बनविले आहे.
दोन्ही जुन्या आवृत्त्याही येथे नीट देतो. दुव्याला वाचनखूण म्हणून जपून ठेवले की स्क्रिप्ट कधीही वापरता येईल.
उपक्रम पान २: हे स्क्रिप्ट केवळ पान २ चे प्रतिसाद शोधेल पण त्यासाठी ते पुढील स्क्रिप्टांच्या निम्मीच बँडविड्थ खाईल आणि पान २ लगेच उघडेल.
उपक्रम पान २ वा ३: हे स्क्रिप्ट पुढील स्क्रिप्ट इतकेच मंद आहे आणि बँडविड्थही तितकीच खाईल. म्हणजे हे स्क्रिप्ट निरुपयोगी आहे.
उपक्रम पान २ वा ३ वा ४: हा आजचा पॅच आहे. २०० पेक्षा अधिक प्रतिसादवाला धागा होण्याची आशा/भीती नसल्यामुळे येथेच थांबतो.
अवांतर: 'ऍ ऐवजी अॅ' या एका फुटकळ स्क्रिप्टसाठी वेगळा लेख न बनविता ते स्क्रिप्ट मी शंतनू यांच्या लेखाच्या धाग्यात, एका प्रतिसादात दिले असल्यामुळे कालांतराने ते स्क्रिप्ट शोधणे कठीण होऊ शकेल. म्हणून येथे त्या प्रतिसादाचा दुवा देत आहे. कृपया संपादित करू नये.
पाचवे पान
या चर्चेची परिस्थिती (पोजिशन) आणि वेग (वेलॉसिटी) बघता पान२ते५ हा नवा पॅच खेळाडूंना उपयोगी ठरू शकेल असे वाटते. याआधी कोणती चर्चा पाचव्या पानावर गेली होती काय?
नवीन
नवीन प्याच लागू करण्याइतकी चर्चा रोचक नाही :प्
मात्र या समस्येवर कायमस्वरूपी उपाय नसावा का? दुसर्या पानावर जावे लागणे थांबवता येईल का?
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय
हम्म
मूळ चर्चा रोचक उरली नसेल तरी भावभावनांचे कंगोरे छाण दिसत आहेत ;◡
एक उपायः मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.