मानसोपचार : काही विचार
आधुनिक मानसोपचारांना १०० वर्षांहून अधिक काळापासून वापरले जाते आहे. तरीही आजही या शाखेला नेमके कुठे बसवावे याबद्दल अनेक मते आहेत. आधुनिक मानसोपचारांचे जनक फ्रॉइड यांनी विकसित केलेली उपचारपद्धती ट्रान्सफरन्स, ओडिपस कॉम्प्लेक्स, इड-इगो-सुपरइगो यांचे अस्तित्व, स्वप्नांचे अर्थ यावर आधारित आहे. यातील एकही संकल्पना प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. असे असूनही फ्रॉइड यांना त्यांच्या उपचारांमध्ये अभूतपूर्व यश मिळाले.
आज मानसोपचारांमध्ये अनेक शाखा आहेत. क्लिनिकल सायकोथेरपी, बिहेविअरल थेरपी, कॉग्निटीव्ह अप्रोच इ. बरेचदा वेगवेगळ्या शाखेच्या तज्ञांमध्ये रूग्णाच्या निदानाबद्दल वेगवेगळी मते असतात. रूग्णाच्या खर्चिक उपचारांना लागणारा वेळ काही महिने ते आठ ते दहा वर्षे इतकाही लांबू शकतो. बरेचदा रूग्ण प्रगती होत नसेल तर डॉक्टर बदलून बघतो. थेरपीबरोबर ९९% वेळा हे डॉक्टर लोक प्रोझेक सारखी खिन्नता दूर करणारी औषधे वापरतात. बरेचदा रूग्णांना याचा फायदा होतो आणि ते बरेही होतात. पण ते बरे होतीलच अशी खात्री कुठलाही मानसोपचारतज्ञ देऊ शकत नाही.
असे असूनही प्रत्येक इस्पितळात, कारागृहात मानसोपचार विभाग असतो. कोर्टात मानसोपचार तज्ञाची साक्ष ग्राह्य धरली जाते. बरेचदा या साक्षीमुळे आरोपीची मृत्युदंडाची शिक्षाही वाचते.
मानसोपचार विज्ञान आहे की कला? काही मानसोपचार तज्ञ अत्यंत यशस्वी होतात यामागचे कारण काय?
Comments
नाडी
आमचे आप्त एक् प्रसिद्ध व 'प्रतिथयश्' असे आयुर्वेदिक् वैद्य आहेत. त्यांन मी तुम्ही नाडीवरुन् कसे काय् ओळखता हे सांगा अशी विनंती केली. त्यावर् त्यांनी सांगितलेले थोडक्यात सांगतो. "नाडी बघताना मी रुग्णाशी बोलतो, त्याने काय् खाल्ले(नविन्) आहे, काय् करत् होताना त्रास् झाला वगैरे वगैरे. अनेकवेळा तुम्हाला लक्षणे आणि त्याचे कारण् अनुभवावरुन् माहित् असते त्यामुळे निदान् करणे काही अवघड नाही." (इथे हे नेहमीच्या अडचणींबद्दल् अर्थातच, पुन्हा ट्रायल अँड् एरर असतेच)
डॉ. चे कौशल्य हे फार महत्त्वाचे असल्याने अ आणि ब मध्ये फरक् असणारच.
बाकी तुम्ही लिहलेला प्रकारः तो मुलगा अजिबात् घाबरत् नव्हता: हा मेंदुतील् संरचनेनुसारही असु शकतो हे वाचल्याचे आठवते.
-Nile
शंका
डिप्रेशन व इतर मानसिक आजारांकरता गोळ्या (उदा. प्रोझॅक, झोलॉफ्ट, लेक्साप्रो वगैरे) दिल्या जातात. या उपचारांना मानसोपचार समजता येईल काय? मानसिक आजारांवर केले जाणारे उपचार ही मानसोपचाराची व्याख्या मान्य होण्यासारखी असल्यास मानसिक आजार अस्तित्त्वात आहेत हे सिद्ध करावे लागेल. अशी सिद्धता करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. तेव्हा मानसोपचारशास्त्रास विज्ञान समजण्यात काय अडचण आहे? समुपदेशन वगैरेंचे परिणाम अभ्यासता येणे कठिण आहे म्हणून त्यांना विज्ञान न समजणे योग्य आहे का?
मानसशास्त्रास विज्ञान समजावे किंवा नाही हा वेगळाच प्रश्न आहे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
संदर्भ?
शस्त्रक्रिया, औषधे, आणि इतर 'थेरप्युटिक' कृती उदा. समूह उपचार, समुपदेशन, वागणूक उपचार, इ. यांच्यापैकी शस्त्रक्रिया, औषधे यांचे प्रमाण वाढले आहे तर विजेचे झटके, समुपदेशकाची बडबड, इ. इम्पिरिकल/कार्गो-कल्ट उपचार कमी झाले आहेत.
असे कोण म्हणते?
का?
आकडेवारी आणि प्रयोगाच्या अनुमानित लिखाणाचा प्रकाशनासहीत संदर्भ?
आपला
गुंडोपंत
नीट वाचा
कुठला प्रयोग? माझ्या वाक्यात अनुमान, प्रयोग, आकडे, निष्कर्ष हे शब्द नाहीत. आरागॉर्न यांचा विशेष राग असलेले उपचार प्रचलित वैज्ञानिक वैद्यकात कमी होत आहेत एवढाच तो दावा आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ संदर्भ देणे सोपे आहे. तुमची काहीतरी भलतीच अपेक्षा आहे.
स्वगतात तसेच या धाग्यात तुम्ही माझ्यावर केलेल्या आरोपांचा निषेध. मी कधी आयडी बदललेला नाही आणि उपक्रमवरून गायबही नव्हतो.
मानसोपचारः एक विचार
मानसोपचार विज्ञान असो वा कला. मात्र असे धागे व त्यावर आलेले प्रतिसाद पाहून मानसोपचाराची गरज अधोरेखित होते असे वाटते.
(मनोचिकित्सक) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत
मात्र असे धागे व त्यावर आलेले प्रतिसाद पाहून मानसोपचाराची गरज अधोरेखित होते असे वाटते.
सहमत आहे.
--
काही मानसोपचार तज्ञ अत्यंत यशस्वी होतात यामागचे कारण काय?
कारण ते प्रथितयश वर्तमानपत्रांमध्ये साप्ताहिक लेख लिहितात व त्यामुळे त्यांची माहिती रुग्णांना होते. अन्यथा मानसोपचार तज्ञ फक्त येरवडा किंवा ठाण्यालाच असतात असा गैरसमज सर्वदूर आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
खरे आहे
अंशतः खरे आहे. माझ्या मते लेख वगैरे लिहीणारे काही तज्ञ माहीतीपूर्ण लेख लिहीतात, उदा. डॉ. आनंद नाडकर्णी.
माझा रोख प्रसिद्ध नसणार्यांकडे होता. साधारणपणे मानसोपचार तज्ञ निवडताना लोक परिचित, मित्र वगैरेंना विचारतात आणि ज्याचा चांगला अनुभव असेल त्याच्याकडे जातात. (अर्थात हे बाकीच्या डॉक्टरांसाठीही खरे असावे.)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
कला
कला (कौलात माझे मत).
(तर्क : "क्युबिझम" मध्ये बर्याच संकल्पना असतात - आकृतींचे ठोकळे-दंड-गोलक यांच्यात विश्लेषण, संश्लेषात्मक क्युबिझम, दृष्टिकोनांच्या विविधतेचे एकत्रित चित्रण वगैरे. या गोष्टी प्रयोगशाळेत दाखवता येत नाहीत. काही क्युबिस्टांचे यश अभूतपूर्व आहे. काही चित्रकार शैली बदलून बघतात. कधीकधी बदललेली शैली आस्वादकांमध्ये यशस्वी होते. मात्र याची हमी देता येत नाही. माझ्या मते क्यूबिझम ही कलापरंपरा आहे. तद्वत.)
(फ्रॉइडने सुरुवातीला या प्रकाराला वैज्ञानिक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला, असे अंधुक आठवते. मात्र फ्रॉइडच्या निरीक्षण-नोंदवण्यात काटेकोरपणाचा अभाव फार आहे, त्याची उदाहरणे वाचल्याचे आठवते. मात्र संदर्भ शोधायचे कष्ट घ्यायचे मन होत नाही. कोणाला माहीत असतील तर द्यावेत. नाहीतर किंवदंता म्हणून ही बाब सोडून द्यावी.)
कोर्टामध्ये काळानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या साक्षी ग्राह्य धरतात - काही उदाहरणे येथे.
काही मानसोपचार तज्ज्ञ अतिशय यशस्वी होतात खरे. कधीकधी लोकांना बाळपणीचे विसरलेले लैंगिक अत्याचार वगैरे आठवतात, त्या आठवणी मोकळ्या केल्यामुळे त्यांना दिलासा मिळतो. अशा "सापडवलेल्या" आठवणींच्या वस्तुनिष्ठ सत्यासत्यतेबद्दल शंका उत्पन्न करणार्या कथाही आपल्याला कळतात.
जोवर आईने/बापाने लैंगिक अत्याचार केल्याची [कल्पनारम्य] आठवण जागल्यामुळे दु:खी व्यक्तीचे दु:ख हलके होते, आणि [असे कुठले अत्याचार न-केलेल्या] आई-बापाचे काही बिघडत नाही, तोवर या कलात्मक अनुभवांना उपचार म्हणूनही "यशस्वी" म्हटल्यास माझी फारशी हरकत नाही. मात्र "एका दु:खी व्यक्तीला दिलासा" मिळून मग या नवजागृत आठवणींमुळे कोणा निर्दोष व्यक्तीला झळ पोचणार असेल, तर यास उपचार म्हणून "यश" म्हणता येणार नाही, असे माझे मत आहे.
कलात्मक अनुभवाने अवघ्या समाजातही आठवण जागृत होऊ शकते. (उदाहरणार्थ : बर्थ ऑफ ए नेशन ही चित्रपट-कलाकृती - या कलाकृतीने एका पूर्ण समाजात एका वेगळ्याच इतिहासाच्या स्मृती कायम केल्या.)
थोडक्यात : "यशस्वी" म्हणजे काय हे ठरवल्यास "मानसोपचार यशस्वी होतो का?" याची चाचणी अनुभवाने करता येते. "इड-इगो-सुपरइगो म्हणजे काय-काय कृती/निरीक्षणे होत?" हे सांगितल्यास त्या गोष्टी प्रयोगशाळेतही दाखवता येतील, बहुधा. मात्र असे करण्यात मानसोपचार-शाखेस काही रस नाही. (हे ठीकच आहे. आकृतींची ठोकळा-गोळा-दंड विश्लेषणे आणि संश्लेषणे प्रयोगशाळेत किंवा अनुभवात तपासण्यात क्युबिस्ट चित्रकारांना काहीही रस नव्हता.) मानसोपचार आणि क्यूबिझम, दोन्ही कला, कुठलीच विज्ञान नव्हे.
पुनश्च [तोकड्या अभ्यासावरून] माझा कौल : विज्ञान नव्हे. कला होय.
कोलित दिलेत
हा धागा सायकॉलॉजीविषयी आहे की सायकिऍट्री असे मी आधीच विचारले होते.
'आईने/बापाने लैंगिक अत्याचार केल्याची आठवण जागविणारे तज्ज्ञ भोंदू आहेत' या विषयावर सगानने सविस्तर लिहिलेच आहे. तुमच्या प्रतिसादामुळे मात्र पूर्ण सायकिऍट्री खोटी असल्याचा संदेश मिळू शकेल. (मानसिक रोगांवर औषधोपचारही करू नये असे आरागॉर्न यांना वाटते. तुम्ही समुपदेशनावर टीका केली आहे पण मानसोपचार हा शब्द वापरला आहे. सायकिऍट्रीला तो समानार्थी नाही का?)
शक्य आहे
चर्चेच्या पहिल्या परिच्छेदास अनुसरून फ्रॉइडच्या उपचारपद्धतीबद्दल प्रतिसाद दिलेला आहे.
(मानसोपचार शब्द मूळ चर्चाप्रस्तावातला घेतलेला आहे. जर शब्द चुकला असेल तर शब्दकोश बघून फरक करायला पाहिजे. जो काय तांत्रिक शब्द आहे, तो मूळ चर्चाप्रस्तावात आणि माझ्या प्रतिसादातही "मानसोपचार" या जागी भरावा.)
माझ्या
मानसिक रोगांवर औषधोपचारही करू नये असे आरागॉर्न यांना वाटते.
असे मी कुठेही म्हटलेले नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
उद्देश काय?
प्रोझॅकच्या दुष्परिणामांविषयी कशाला लिहिलेत? "किंबहुना मानसोपचार/अल्युपथी साठी दिल्या जाणार्या औषधांमध्ये असे एकही औषध नसावे की ज्याचे दुष्परिणाम नाहीत." याचा बाऊ करण्यामागे काय हेतु आहे?
प्रतिसाद
आजानुकर्ण यांच्या "पण सायकिऍट्रिक औषधांचा दुष्परिणाम हा शारीरिक रोगांवर केल्या जाणाऱ्या उपचारांपेक्षा मोठा असतो असा माझा अंदाज आहे." या वाक्याला प्रतिसाद म्हणून मी प्रोझेकचे साइड इफेक्ट दिले. किंबहुना मानसोपचार/अल्युपथी साठी दिल्या जाणार्या औषधांमध्ये असे एकही औषध नसावे की ज्याचे दुष्परिणाम नाहीत हे वाक्यही त्याच संदर्भात होते. यात बाऊ करण्याचा प्रश्न कुठे आला? औषधांचे साइड इफेक्ट लोकांपासून लपवून ठेवले पाहिजेत का?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
तुलना
मानसोपचाराची तुलना आपण आयुर्वेदाशी केली आहे. मानसोपचार हा शब्द आपण धनंजय यांना अभिप्रेत अर्थाने वापरला नसून तुमच्या व्याख्येत औषधांचाही समावेश आहे. आयुर्वेदाला विरोध करणार्यांनी मानसोपचारालाही विरोध करावा अशी आपली मांडणी आहे.
अख्खे मानसोपचारशास्त्रच अवैज्ञानिक असल्याचा आपला दावा आहे, त्यात औषधविरोधही येतो.
"परिणाम असेल तर दुष्परिणाम होणार हे मान्य. पण.." या वाक्यातील 'पण' ला दुजोरा देण्यासाठी आपण दुष्परिणाम नोंदलेत. त्यातून 'औषधे घेऊ नयेत' असा अर्थ निघतो.
वर
त्याच प्रतिसादाशी तुम्ही सहमत आहात. आता त्यातून वेगवेगळे अर्थ काढायचे असतील तर खुशाल काढा.
मानसोपचारातील काही पद्धतींना वैज्ञानिक आधार नाही असे माझे मत आहे. पण मी त्या वापरू नयेत असे म्हटलेले नाही. आयुर्वेदाशी तुलना एवढ्यासाठी केली की तुम्ही कफ-वात याला वैज्ञानिक आधार नाही म्हणून ते मानायला तयार नाहीत. पण कॅथार्सिस, ट्रान्सफरन्स यांनाही वैज्ञानिक आधार नाही आणि ते वापरले जातात. ते कसे चालते?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
फक्त 'काही'?
या प्रतिसादाला तर मी उत्तरच दिलेले नाही. "परिणाम असेल तर दुष्परिणाम होणार हे मान्य. पण..." या वाक्याशी माझी सहमति कशी ठरविली?
"हे सारे दुष्परिणाम एकाच व्यक्तीला होत नाहीत. लाखात एखाद्याला शक्यता असली तरी यादीत नोंद असते." हे वाक्य सहमति दर्शवीत नाही. "किंबहुना मानसोपचार/अल्युपथी साठी दिल्या जाणार्या औषधांमध्ये असे एकही औषध नसावे की ज्याचे दुष्परिणाम नाहीत." या सुट्या विधानाला माझी स्वीकृती आहे पण कंटेक्स्ट लबाड आहे हे त्तेव्हाच सांगायचे राहिले.
'काही' नव्हे, सर्व! आम्ही अख्ख्या आयुर्वेदाला विरोध करतो म्हणून अख्ख्या मानसोपचारालाच विरोध करावा असा त्याचा अर्थ होतो.
वैज्ञानिक आधार नाही ते काहीही आम्हाला चालत नाही. फ्रॉईडवर माझे प्रेम नाही पण तुम्ही अख्ख्या मानसोपचारशास्त्राच्याच (ज्यात औषधोपचारांचाही समावेश केलात) जिवावर उठलात.
हे काय आहे?
>किंबहुना मानसोपचार/अल्युपथी साठी दिल्या जाणार्या औषधांमध्ये असे एकही औषध नसावे की ज्याचे दुष्परिणाम नाहीत.
बरोबर.
याला सहमती नाही तर काय म्हणायचे? नंतर हे लिहायचे राहीले, ते लिहायचे राहीले ह्याला काय अर्थ?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
ठीक
मी अस्पष्ट प्रतिसाद दिला हे मान्य पण तुमच्या प्रतिसादातून औषधविरोध दिसतोच.
धन्यवाद
जोवर आईने/बापाने लैंगिक अत्याचार केल्याची [कल्पनारम्य] आठवण जागल्यामुळे दु:खी व्यक्तीचे दु:ख हलके होते, आणि [असे कुठले अत्याचार न-केलेल्या] आई-बापाचे काही बिघडत नाही, तोवर या कलात्मक अनुभवांना उपचार म्हणूनही "यशस्वी" म्हटल्यास माझी फारशी हरकत नाही. मात्र "एका दु:खी व्यक्तीला दिलासा" मिळून मग या नवजागृत आठवणींमुळे कोणा निर्दोष व्यक्तीला झळ पोचणार असेल, तर यास उपचार म्हणून "यश" म्हणता येणार नाही, असे माझे मत आहे.
विस्तृत आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझे मत असेच आहे. मानसोपचारांमध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात (उदा. कॅथार्सिस) त्यांना वैज्ञानिक आधार नाही असे मला वाटते. त्या यशस्वी होतात याची अनेक उदाहरणे आहेत.
मी मानसोपचारांच्या अजिबात विरोधात नाही हे इथे नमूद करू इच्छीतो.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
कला की सामाजिक विज्ञान
आरागॉर्न यांनी जे मूळ मुद्धे उपस्थित केले आणि त्यावरील रिकामटेकडा-आरागॉर्न संवादात काही भर घालण्याची माझी पात्रता नाही.
सायकॉलॉजीची कलाशाखेत गणना होते तर सायकाईट्रीची विज्ञानात.
यात कलाशाखा याचा अर्थ सामाजिक विज्ञान असा हल्ली मानला जातो. मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भुगोल, भाषाशास्त्र आणि समाजशास्त्र असी भारतातील बी.ए. प्रकाराची मोट आहे. याचा 'कला' या अर्थाने येणार्या चित्रकला, संगीत कला, नाट्यकला इत्यादींशी (फाईन आर्ट) संबंध नाही (त्यातील पदवीधरास येथे बी.एफ्.ए. म्हटले जाते.) धनंजय यांची येथे कुठेतरी गफलत झाली असावी.
भौतिकशास्त्र (पदार्थ + रसायन) यात जेवढे प्रयोग केले जाऊ शकतात त्यापेक्षा कमी प्रयोग जीवशास्त्रात होतात. त्याहूनही कमी प्रयोग (जवळपास नगण्य) सामाजिक विज्ञानात होतात. (त्यातल्या त्यात मानसशास्त्रात प्रयोग जास्त होतात.) त्यामुळे फॉल्सिफाएबल विधानांची तपासणी होणे जरा कमीच होते. वस्तुनिष्ठता आणि नेमक्या संकल्पना (संकल्पना या सुसंवादासाठी असतात.) या विज्ञानशाखेच्या (इथे सायन्स स्ट्रीम असा अर्थ अभिप्रेत आहे.) या सामाजिक विज्ञानात (सोशल सायन्स स्ट्रीम) आहेत . (किंवा त्याकडे वाटचाल आहे.) मात्र प्रयोग प्रचिती सिद्धता इकडे ते साहजिक तोकडे पडतात. सामाजिक विज्ञानांना विज्ञान म्हणावे की नाही हा एक वेगळा वाद होऊ शकतो.
आरागॉर्न यांनी मूळ सुचविलेल्या मुद्यात व त्यावरील प्रतिसादात एक गल्लत मला जाणवली. विज्ञान आणि त्याची उपयोजिता (सायन्स ऍड अप्लाईड सायन्स) यात ती गल्लत असावी. मानसोपचार तज्ञ हा शरीररचना आणि मानसशास्त्र या दोन विज्ञानांच्यातील तज्ञ असावा पण तो तेवढाच नाही तर तो त्याचे ज्ञान वापरून काही उपचार करणारा आहे. अप्लाईड सायन्सेसना तंत्रज्ञान म्हणायची एक पद्धत आहे. तंत्रज्ञानाला विज्ञानाच्या फॉल्सिफाएबल सिद्धांतांच्या पेक्षा काही अधिक गोष्टींची गरज असते. ती म्हणजे प्राप्त परिस्थितीत, बरेचदा अपूर्ण ज्ञानात (वैधकीय चाचणी वेळखाऊ/पैसेखाऊ असल्यामुळे होऊ शकते) तातडीने काहीतरी (पण त्यातल्या त्यात योग्य) करायची गरज असते.
मानसोपचार तज्ञाला (सायकियाट्रिस्टला) मी जास्त तंत्रज्ञ आणि कमी शास्त्रज्ञ म्हणेन.
प्रमोद
स्पष्टीकरण
मूळ चर्चाप्रस्तावाचा अर्थ मी "विज्ञान की कला" या सामान्य वापरातल्या द्वैताच्या संदर्भात घेतलेला आहे.
उदाहरणार्थ : "वैद्यक - विज्ञान की कला?" ; "छायाचित्रण - विज्ञान की कला?" ; "स्वयंपाक - विज्ञान की कला?" असल्या मथळ्याचे लेख अधूनमधून वाचायला मिळतात, त्या प्रकारचा अर्थ घेतला. अशा लेखांमध्ये-गप्पांमध्ये "विज्ञान" म्हणजे प्रयोग-सिद्धांताने सामान्यीकरणाचे तंत्र (अप्लाइड) आणि "कला" म्हणजे प्रतिभेने असामान्य नवनिर्मितीचे तंत्र (अप्लाइडच) - अशा प्रकारची चर्चा केलेली दिसते. मी देखील त्याच प्रकारे चर्चा केलेली आहे. शुद्ध तथ्यज्ञान (विज्ञान) किंवा शुद्ध सौंदर्यानुभव (कलास्वाद) हे दोन्ही अशा प्रकारच्या चर्चांमध्ये नि:संदर्भ असतात, असा माझा अनुभव आहे. त्यांचा संदर्भ माझ्या प्रतिसादातही नाही.
(सायन्स स्ट्रीम, आर्ट्स् स्ट्रीम, कॉमर्स स्ट्रीम, वगैरेंचा संदर्भ माझ्या प्रतिसादात नाही, हे सांगणे नलगे.)
माझ्या वरील प्रतिसादात भौतिक आणि सामाजिक विज्ञानांना (दोहोंना) ढोबळ नाव "विज्ञान" असे वापरले होते, त्या दोहोंत अनुभवांचे सामान्यीकरण करायचे तंत्र वापरतात. फ्रॉइड-पद्धतीचा मानसोपचार हा अप्लाइड कला दिशेने जातो, असे माझे मत सांगितले आहे. वाटल्यास "कमर्शियल आर्ट" म्हणा. यात प्रतिभेला महत्त्व आहे. प्रयोग-सिद्ध तत्त्वांना नव्हे.
पुरुषाच्या बाळपणी त्याच्या आईबद्दल लैंगिक भावना होत्या - जमल्यास लैंगिक संबंधही होते - याची आठवण कुठल्या प्रकारे करवून द्यायची? याचे कौशल्य प्रतिभेच्या क्षेत्रातले आहे. "समटाइम्स अ सिगार इज जस्ट अ सिगार (क्वचितप्रसंगी लैंगिक संकेत नसतात)", या उक्तीमधले "समटाइम्स" प्रसंग कसे ओळखावेत? ही सर्व शुद्ध प्रतिभा आहे.
फ्रॉइडच्या पंथाचे लेखन-निरीक्षण वगैरे मुख्यतः वैज्ञानिक नव्हे (भौतिक तर नाहीच, पण सामाजिक विज्ञानाच्या विचारसरणीचेही नव्हे). असे माझे मत सांगितलेले आहे.
- - -
अवांतर :
"अपूर्ण ज्ञानाच्या समयी वापरायचे निर्णयतंत्र", वगैरे विवेचन ठीकच आहे. थयथयाट करून नासधूस करणार्या व्यक्तीच्या बाबतीत, किंवा एकटे सोडल्यास लगेच आत्महत्येचा प्रयत्न करणार्या व्यक्तीच्या बाबतीत "परिस्थिती बदलावी" अशी तातडी असते, हे खरे आहे.
मात्र छोटासा बदल सुचवतो : "तातडीने काहीतरी करायची गरज असते" असे नसून "तातडीने निर्णय घ्यायची गरज असते" इतकेच.
"कृतीची तातडी भ्रामक असून लगेच काहीही खास करायची गरज नाही" असा पर्याय देखील निर्णयसंचांमध्ये असतो. तो निर्णय घेतल्यास तातडीने काहीच करायचे नसते. (हा पर्याय नेहमी लक्षात ठेवावा, म्हणून वैद्यकात "फर्स्ट डू नो हार्म" असे तत्त्व विद्यार्थ्यांना शिकवतात.)
सुंदर
परत सुंदर प्रतिसाद.
--
बरोबर
तुमचा प्रतिसाद पटला.
प्रमोद
मानसोपचार
मानसोपचार वैज्ञानिक/अवैज्ञानिक म्हणण्या आधी "मन" ही संकल्पना वैज्ञानिक आहे काय? यावर विचार व्हावा असे वाटते.
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
व्याख्या
मन हे मेंदूचे कार्य आहे असे म्हटले तर?
संदर्भ
म्हणायला काय काहिहि म्हणता येईल.. सिद्ध केले आहे का? संदर्भ?
अवांतरः असे असेल तर मी डोक्याने विचार करत नाहि मनात आलं की तसं वागतो/करतो अशी वाक्ये म्हणजे द्वीरुक्ती झाली नाहि का?
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
रिकामटेकडा यांच्याशी सहमत
मन हे मेंदूचे फंक्शन आहे या श्री. रिकामटेकडा यांच्या मताशी मी सहमत आहे.
संदर्भ म्हणून काही दिवसांपूर्वी वाचलेला एक दुवा
या लेखातील खालील वाक्य हे मनाची व्याख्या म्हणून सर्वमान्य होण्यास हरकत नाही.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
कसे ओळखणार - कुठले निकष
एखादी संकल्पना वैज्ञानिक आहे की नाही हे कसे ओळखतात?
(याबद्दल माझे विचार आहेत. "फ्लोजिस्टॉन" लेखात संकल्पना विज्ञानात कशा येतात याबद्दल माझे मत मांडले आहे. "पुंजभौतिकीने..." या भाषांतरात रिचर्ड फाइनमन यांचे मत मांडलेले आहे. "ऊर्जा" शब्दाचा अनेक संदर्भांत वापर होतो, पैकी काही अर्थ वैज्ञानिक संकल्पना आहेत, काही अर्थ नव्हेत, याबद्दल बहुधा आनंद घारे आणि प्रियाली या सदस्यांमध्ये साधक चर्चा झाली, ते वाचल्याचे आठवते. पण अधिक मते, निकष ऐकायला-वाचायला आवडतील.)
"मन" ही संकल्पन (किंवा विशिष्ट संदर्भांतली "मन" ही संकल्पना) वैज्ञानिक आहे की नाही, हे ठरवण्यासाठी ऋषिकेश काय निकष वापरतील?
प्लॅसिबो परिणाम हुडकण्याची पद्धत
डबल ब्लाईंड नसलेला प्रयोग १:
काही रुग्णांना प्लॅसिबो दिले तर काहींना काहीच उपचार दिले नाहीत.
निरीक्षणः
प्लॅसिबो मिळालेल्या रुग्णांची वेदना सहन करण्याची शक्ती अधिक असते.
निष्कर्षः
प्लॅसिबो परिणाम होतो.
डबल ब्लाईंड प्रयोग १:
काही रुग्णांना प्लॅसिबो दिले तर काहींना खरे क्ष औषध दिले. (डबल ब्लाईंड असल्यामुळे प्लॅसिबो परिणाम सर्वांवर सारखाच.)
निरीक्षणः
क्ष औषध मिळालेल्यांची सहनशक्ती बरीच अधिक वाढली.
निष्कर्षः
क्ष औषध खरेच वेदनाशामक आहे.
डबल ब्लाईंड प्रयोग २:
काही रुग्णांना प्लॅसिबो दिले तर काहींना नॅलोक्सोन दिले.
निरीक्षणः
नॅलोक्सोन गटाची सहनशक्ती कमी झाली.
निष्कर्षः
प्लॅसिबो परिणामामध्ये, मॉर्फीनसारखे काहीतरी मेंदूत तयार होते. प्लॅसिबो परिणाम नॅलोक्सोनने बंद पडतो.
डबल ब्लाईंड नसलेला प्रयोग २:
एका गटाचे मानसशास्त्रज्ञांनी समुपदेशन केले, दुसर्या गटास काहीच उपचार केले नाहीत.
निरीक्षणः
पहिल्या गटाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
निष्कर्षः
समुपदेशन फायदेशीर आहे की नाही ते माहिती नाही कारण हा प्लॅसिबो परिणाम असू शकतो.
डबल ब्लाईंड नसलेला प्रयोग ३:
एका गटाचे मानसशास्त्रज्ञांनी समुपदेशन केले, दुसर्या गटास काहीच उपचार केले नाहीत. पहिल्या गटाला नॅलोक्सोन दिले.
निरीक्षणः
???
निष्कर्षः
जर समुपदेशित गटाला फायदा झाला तर तो प्लॅसिबो परिणाम ठरणार नाही.
हे उदाहरण काल्पनिक आहे कारण सर्वच प्रकारचे प्लॅसिबो परिणाम नॅलोक्सोनने बंद पडतात असे गृहीत धरले आहे. पण प्लॅसिबो परिणाम बंद करणार्या औषधाच्या मदतीने समुपदेशन, सायकोऍनालिसिस, ऍक्युप्रेशर, इ. उपचारांचाही वैज्ञानिक अभ्यास करता येईल.
वैज्ञानिक/अवैज्ञानिक/कला?
माझ्या प्रश्नविचारते वेळी 'मनात' असा अर्थ होता (जो बहुदा योग्य शब्दांत उतरला नसावा असे दिसते) की आपण (निदान मी तरी) "मन" नावाची संकल्पना ही "विचार" या संकल्पनेपेक्षा वेगळी मानतो. मग हे मानसोपचार करणारे तथाकथित वैज्ञानिक "मन" कशास म्हणतात? आणि ते विचारांपेक्षा वेगळे आहे असे मानतात का? असल्यास कसे? नसल्यास कसे?
यावर माहिती मिळाल्यास मानसोपचारास कला म्हणावे का विज्ञान का इतर काहि यावर माझे मत बनवण्यास थोडीशी मदत होईल.
तुर्तास मी यास विज्ञान मानत नसलो तरी काहि निष्कर्ष पुन्हा पुन्हा पडताळता येण्याजोग्या नियमांनी बाधलेली कला मानतो.
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
ऑब्जेक्ट ओरिएंटेड ऍपरोच
मेंदू हा स्टॅटिक क्लास डिफाईन करुन त्याची मन ही एक मेथड आहे असे गृहित धरता येईल. मनाचे इनपुट आऊटपुट पॅरामीटर्स 'विचार' या स्वरुपाचे असतील.
म्हणजे मनात विचार आला (इनबाऊंड)
मनातून विचार आला (आऊटबाऊंड) हे सगळे बिहेविअर स्पष्ट होतील. शिवाय मेंदूची इतर कार्ये करण्यासाठी मनाव्यतिरिक्त इतर मेथड्सही असतील.
(हवी असल्यास त्याची यूएमएल प्रकारातील क्लास डायग्राम काढता येईल)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
कुठून?
आम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी 'आत्मा सिद्धांत' दिसतो.
तुका म्हणे मज कळो येती अवगुण
इनबाऊंड पॅरामीटर देणे चुकीचे आहे हे मान्य. विचार ही फक्त रिटर्न व्हॅल्यु असणे योग्य.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बहुधा तेसुद्धा "मन" आणि "विचार" वेगळ्या संकल्पना मानतात
फ्रॉइडच्या वर्णनात "मन" (म्हणजे इड-इगो-सुपरइगो या अवयवांनी/वलयांनी बनलेली संकल्पना) ही "विचारां"पेक्षा वेगळी असते.
यातील प्रक्रिया म्हणजे "विचार", "संवेदना", "इच्छा" वगैरे.
(वरील दोन परिच्छेदांत "मन/विचार वेगळे आहेत का?" आणि "वेगळे असल्यास कसे" या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे आहेत. उत्तरे फ्रॉइड-संप्रदायाची आहेत, माझ्या शब्द-सारांशात सांगितलेली आहेत, पण उत्तरे माझी नव्हेत.)
ही उत्तरे मिळल्यामुळे कला/विज्ञान ठरवायला काय मदत होते?
मन ऑब्जेक्ट आणि विचार हे फंक्शन?
मग मेंदू काय?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
रूपक
मेंदू हे ऑब्जेक्ट, मन ही/या मेथड/मेथड्स आणि विचार या रिटर्न वॅल्यूज?
मेंदू हार्डवेअर
मेंदू हार्डवेअर.
मन ऑपरेटिंग सिस्टिम.
विचार विशिष्ट प्रोग्रॅमचे कार्यान्वय
कृती म्हणजे प्रोग्रॅमची हार्डवेअर फलिते (डिस्प्ले, ध्वनिकरण वगैरे).
संवेदनांचे मज्जा-विद्युत् म्हणजे हार्डवेअरकडून आलेले इन्पुट.
(ही सर्व उपमा माझी आहे. फ्रॉइडच्या तोंडी घातल्यासारखी वाटते, अर्थातच फ्रॉइडच्या काळात संगणक नव्हते. मात्र मेंदू जडपदार्थ, मन तरलपदार्थ, आणि विचार तरलपदार्थावरील लहरी, अशी कुठली उपमा आपण फ्रॉइडच्या तोंडात घालू शकू. पण ती उपमासुद्धा फ्रॉइडची नाही.)
(माझे संगणकांच्या बाबतीत ज्ञान तुटपुंजे आहे. तुमच्या ऑब्जेक्ट-ओरिएंटेड नेमक्या उपमेनंतर माझे हे दु:साहसच म्हणावे.)
शंका
मनाला मेंदूपेक्षा वेगळे अस्तित्व दिल्यास आत्मा सिद्धांताला शिरायला फट मिळेल का?
सांगता येत नाही
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन भिन्न संकल्पना आहेत असे मानल्यामुळे कुठल्या तिसर्या संकल्पनेबाबत (फट मिळाली की नाही याबाबत) आपण काय सांगू शकतो? माझ्या मते काहीच सांगता येत नाही.
मला वाटते, किती संकल्पना मानणे सोयीचे आहे, ते संदर्भानुसार ठरते.
समजा आपल्याकडे फक्त एलपी तबकड्या आणि त्या वाजवायचे यंत्र अभ्यासासाठी आहे. मग आपण म्हणू शकतो की तबकडीवरील सूक्ष्म खड्ड्यांचा संच = विवक्षित ध्वनिमुद्रण. अमक्या खड्ड्यांच्या संचाला "आमिर खानांचा दरबारी", तमुक संचाला "मोत्झार्टचे शांतिस्तवन" वगैरे म्हणणे मूलगामी नसते. हार्डवेअरचे सूक्ष्मातिसूक्ष्म वर्णन केल्यावर सॉफ्टवेअर असे वेगळे काही राहातच नाही.
मात्र समजा आपल्याकडे तबकडी आणि चुंबकीय फीत, हे दोन्ही प्रकार असले, तर
तबकडीवरील अमुक खड्ड्यांचा संच <-> फितीवरील तमुक चुंबकीय आकृती = "आमिर खानांचा दरबारी" अशा नामकरणाने काही फायदा होतो. दोन कमालीच्या वेगवेगळ्या जडपदार्थांना दोन नावे देण्याऐवजी एका नावात भागते. (ऑकमचा वस्तरा.)
मग
हार्डवेअर = तबकडी+सुईच्या कंपनाचा तपशीलवार अभ्यास, चुंबकीय फीत+त्यातून होणारे विद्युत् प्रवाह, त्यातून लाऊडस्पीकरच्या कंपनाचा अभ्यास हा वेगळा काढता येतो
सॉफ्टवेअर = संगीतशास्त्राचा किंवा असा कुठलासा अभ्यास
असे वेगळे संकल्पना-संच, वेगळी अभ्यासक्षेत्रे वगैरे मानण्यात फायदा आहे.
"आत्मा" संकल्पनेला फट मिळते का? यासाठी संदर्भ लागेल. कुठल्याशा संदर्भात मेंदू+मन+आणखी एक संकल्पना मानून भाकिते करण्याची सोय होते का? वगैरे.
(मेंदू आणि मन यांना "वेगळे अस्तित्व देणे" म्हणजे नेमके काय हे मला माहीत नाही. तरी माझ्या मतीने "या दोन वेगळ्या संकल्पना मानणे" असा अर्थ लावलेला आहे. अस्तित्व बहाल करण्याचा काव्यात्मक-अलंकारिक अर्थ सोडल्यास ही प्रक्रिया विचारांसाठी अनावश्यक आहे.)
द्वैत
सॉफ्टवेअर म्हणजेच आत्मा असा दावा होऊ शकतो. सीडी, एलपी, इ. चे रूपक परकायाप्रवेश म्हणूनही वापरता येईल.
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन भिन्न संकल्पना युनिवर्सल ट्युरिंग मशीनमधेच असू शकतात. अगदी मोबाईलचे फर्मवेअरही 'चिप'पेक्षा स्वतंत्र असते. पण स्पेशल पर्पज एम्बेडेड सॉफ्टवेअर असते तसे मेंदूचे नाही का?
शक्य आहे
पण यातून भाकिते कुठली होतात?
म्हणजे एलपी-चुंबकीय फीत यांची उपमा "परकायाप्रवेशा"ला दिली तर कुठल्या भाकितांची किंवा निरीक्षणांची सोय लागते का? अथवा सॉफ्टवेअर म्हणजे आत्मा अशा उपमेने कुठल्या निरीक्षणांची सोय लागते का? सोय लागत असेल तर विचार ग्राह्य आहे.
या बाबतीत (परकायाप्रवेश वगैरेंबाबत) माझे आत्त (डेटा) नगण्य आहे, आणि ते वाढवण्याचा माझा मनसुबाही नाही. :-) त्यामुळे कुठल्या निरीक्षणांची सोय लागते याचा हिशोब स्वानुभवावरून माझ्यासाठी "शून्य" आहे.
आता "सॉफ्टवेअर" करिता नवीन मराठी प्रतिशब्द "आत्मा" असेल तर चालेल. (उपमा नव्हे तर नवा प्रतिशब्द.) पण त्यातून काही विशेष तथ्यज्ञान होत नाही. वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे ध्वनी "प्रतिशब्द" असतात, हे तर आहेच. मात्र "आत्मा" हा शब्द पूर्वी लोकांनी मराठीत वापरलेला आहे, त्याच्याशी गोंधळ होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. त्या पूर्वीच्या शब्दाचा सुद्धा काय नेमका अर्थ आहे, मला माहीत नाही. पण "सॉफ्टवेअर" हा अर्थ नसावा.
मटेरिअलिझम
हार्डवेअरच प्रणालीबद्ध आहे हा जडवादी नल हायपोथेसिस आहे. उलट, 'हार्डवेअरमध्ये एक वेगळी प्रणाली वावरते' या सिद्धांतात दोन गृहीतके आहेत. (त्यांपैकी हार्डवेअरचे अस्तित्व सिद्ध करणे ट्रिविअल आहे. उपक्रमवरील बहुतेकांच्या मेंदूचे अस्तित्व वादातीत आहे.) वेगळे सॉफ्टवेअर ही संकल्पना गृहीत धरणे ऑकॅमच्या वस्तर्याचे उल्लंघन आहे कारण सॉफ्टवेअरचे वेगळे अस्तित्व गृहीत धरून कुठल्याही निरीक्षणांची सोय लागत नाही.
आत्मा हा सॉफ्टवेअरला प्रतिशब्द ठरेल असे माझे प्रतिपादन आहे.
बास का?
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि?
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:
आत्मा हा सॉफ्टवेअरला प्रतिशब्द मानला तर अँटिवायरस कंपन्यांनी दुकान बंद करायचे का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
माय बॅड
'मेंदूतील सॉफ्टवेअरला आत्मा हा प्रतिशब्द प्रचलित अर्थाने वापरता येईल' असे लिहायचे होते.
वेगळे अस्तित्व गृहीत धरणे
"वेगळे अस्तित्व गृहीत धरणे" हा काय प्रकार आहे?
वाक्य समजलेले नाही.
प्रोग्रॅम-प्रणाली हाताने कागदावर लिहिलेली असते, सीडीवरती सूक्ष्म खड्ड्यांमध्ये लिहिलेली असते, हार्डडिस्कवर चुंबकीय आकृतींमध्ये लिहिलेली आहे, याबद्दल माझे कुठलेही खंडन नाही. (तुमच्या "वेगळे अस्तित्व" वाक्याचा संदर्भ या परिच्छेदाशी लागतो का?)
त्या सर्व वस्तूंवरील वेगवेगळ्या माध्यमांतल्या प्रणालीची (तीन संकल्पनांच्या ऐवजी) एकच संकल्पना मानण्यात माझी फार सोय होते. तुम्ही मात्र म्हणता की एक संकल्पनेऐवजी मी दोन संकल्पना मानत आहे.
*मला वाटते - "कोणालातरी परकायाप्रवेश करण्याबाबत गोंधळ व्हायचा धोका आहे" - ही भीती बाजूला ठेवून "ही प्रणाली" "हा दस्तऐवज" "हा उपप्रतिसाद" असल्या संकल्पनांनी माझी सोय होते (कमी संकल्पनांत भागते) हा हिशोब मान्य करावा. पण माझा आग्रह नाही.* कमी संकल्पना मानून मला सहकार्याकडून दस्तऐवज मागवता येत असेल, प्रणाली लिहिता येत असेल, तर अर्थात तशी शिकवण मला हवीच आहे. पण तुमचा वरील हिशोब तरी मला लागत नाही. तुमची एकच संकल्पना उपयुक्ततेसाठी पुरेशी आहे, हे अजून कळत नाही.
तुम्ही म्हणता तसा विचार करायचा प्रयत्न मी करतो :
"सहकार्याच्या आणि माझ्या हार्डवेअरवरती काहीतरी-काहीतरी संरचना आहे" ही एकच संकल्पना मानतो. पण सहकार्याच्या हार्डवेअर मध्ये असलेला दस्तऐवज आणि माझ्या हार्डवेअर मध्ये असलेला दस्तऐवज हे "एकच" असे म्हणण्यास तुम्ही प्रतिरोध करता ("दस्तऐवज" ही दुसरी संकल्पना तुम्ही ऑकमच्या वस्तर्याने कातरून टाकता.)
तरी या बाबतीत मला सहकार्याशी सहकार्य करायचे आहे - ही उपयुक्तता अपेक्षित आहे. तर माझ्या हार्डडिस्कवरचा पहिला बिट त्याच्या हार्डडिस्कवरच्या पहिल्या बिटशी, दुसरा बिट दुसर्या बिटशी... अशी तुलना करूया. सर्व बिटची स्थिती एकसारखी आहे, आणि अन्य कुठल्या फाइलसारखी नव्हे... असे संपेपर्यंत तुलना करूया. पण अजून दोघांकडे "काहीतरी समान आहे" असे मला म्हणता येत नाही. "काहीतरी" ही संकल्पनाच झाली, आणि ही दुसरी संकल्पना करण्यास तुमची अनुमती नाही. (आणि "काहीतरी" म्हणायची अनुमती असेल तर त्या शब्दाऐवजी "दस्तऐवज" शब्द वापरला तर काय वाईट झाले? ) मग आता सहकारी आणि मी पुढचे कार्य जोडीने कसे करू? आमचे सहकार्य ठप्प झाले. अशा परिस्थितीत तुम्ही काय करता?
मला वाटते उपयुक्तताच कमी होईल इतकी कातराकातरी वस्तर्याने झालेली आहे. (थिंग्स शुड बी मेड ऍज सिंपल ऍज पॉसिबल, बट नो सिंप्लर.) तुमची कार्यपद्धत (लुळे न पाडणारी अशी कार्यपद्धत हवी) नीट कळेपर्यंत तरी मी "संगणकाचे हार्डवेअर" आणि "हार्डवेअरवरील दस्तऐवज" या दोन संकल्पना मानूनच घेतो.
युनिवर्सल ट्यूरिंग मशीन
रूपकात अडकल्यास मुद्दा व्यक्त करण्यासाठी कठीण होईल अशी भीती वाटते. रीबूट करून बघतो.
जनरल पर्पज संगणकात कोणतीही आज्ञावली राहू शकते. त्या आज्ञावलीनुसार संगणक वागतो. ट्रांझिस्टर्सची जोडणी तीच असली तरी आज्ञावली बदलली की संगणकाची वागणूक बदलते. ही आज्ञावली संगणकापेक्षा निराळ्या जागेत असते. सीडी, हार्ड डिस्क, रॅम, कॅश, अशा ठिकाणी आज्ञावली राहते आणि संगणकाला नियंत्रित करते. मेंदूची आज्ञावली मात्र चेतापेशींच्या जोडणीपेक्षा निराळी नसते, जोडणी बदलली तरच व्यक्तिमत्व बदलते असा माझा युक्तिवाद आहे. स्मरणातील (मेमरीतील) माहितीनुसार मेंदूची केवळ वागणूक बदलते पण व्यक्तिमत्व मात्र 'हार्ड'वायर्ड असते (उदा. उद्या रविवार आहे असे माझ्या स्मरणात असेल तर सकाळी उशिरापर्यंत लोळत पडेन, वागणूक माहितीवर अवलंबून असली तरी माहितीच्या 'आज्ञेत' नाही; दुसरी एखादी व्यक्ती रविवारचा विधायक वापर करेल. विषम तारखेस रस्त्याच्या एका विवक्षित बाजूस वाहने उभी करण्यास बंदी आहे ही माहिती एखाद्या व्यक्तीच्या स्मरणात असली तरी तिचा आज्ञावलीसारखा परिणाम होत नाही, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व धोका पत्करणारे असू शकते.). या वायरिंगचे नावच मन! मेंदूला एम्बेडेड सिस्टिम सुद्धा म्हणता येईल. (आधीच्या एका प्रतिसादात मी चुकून 'एम्बेडेड सॉफ्टवेअर' हा शब्दप्रयोग केला होता.)
सारांशः
जोडलेले ट्रांझिस्टर्स->संगणक, त्याला वेगळी आज्ञावली चालविते.
जोडलेल्या चेतापेशी->मेंदू, जोडणी म्हणजे मन. वेगळी आज्ञावली नाही.
?
जन्माला आल्यापासून मानव माहिती जमा करतो. या माहितीचा व्यक्तिमत्त्वावर काहीच परिणाम होत नाही असे म्हणायचे आहे काय?
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
तसे नाही
चेतापेशींच्या जोडण्या बदलतात. जोडण्यांची तीव्रता बदलते, तसेच जोडण्यांचा अर्थ लावण्याची पद्धतही ('० आले तर ०, १ आले तर १ पलिकडे पाठवा' हा एक अर्थ आणि 'नॉट गेट' हा दुसरा अर्थ हे सुलभीकृत वर्णन) बदलते.
विस्तार
मला नीटसे कळले नाही. थोडे विस्ताराने लिहिल्यास समजू शकेल. माहितीची आणि चेतापेशींची आंतरक्रिया होत आहे का?
यासाठी नवीन चर्चाच सुरू केली तर ट्रॅक करणे सोपे पडेल.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.