श्रद्धा : काही उदाहरणे
श्रद्धेवर हल्ली इथे आणि इतरत्र बरेच लेख वाचायला मिळतात. या सर्व लेखांमध्ये कुणाचे तरी वैयक्तिक अनुभव आणि त्या अनुभवांचे स्पष्टीकरण असते.
हे अनेकवेळा वाचल्यानंतर राज ठाकरे जसे हमालांवर मराठी बोलण्याची सक्ती करतात पण अंबानींबद्दल मौन बाळगतात तसे काहीसे वाटले.
दुसरी बाजू मांडण्यासाठी श्रद्धेची ही काही उच्चभ्रू उदाहरणे.
१. अमेरिकन डॉलरवरील "इन गॉड वी ट्रस्ट"
२. आपली कोर्टातील गीतेवरची शपथ
३. नाताळच्या सुट्टीत अमेरिकन फिजिकल सोसायटीपासून क्यालटेकपर्यंत सर्व संस्था बंद असतात.
४. झेंडा म्हणजे काय? रंगीबेरंगी एक कापडाचा तुकडा. मग त्याला राष्ट्राध्यक्षांपासून सगळे जण वंदन का करतात?
५. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि दगडू माळी ही सर्व माणसेच आहेत. मग त्यांना देण्यात येणार्या वागणूकीत इतका फरक का?
६. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व मंत्री शपथ घेतात. शपथ म्हणजे काय?
सर्वसामान्य माणसे रोजचे आयुष्य जगण्यासाठीच युद्ध करत असतात. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, सोई-सुविधांच्या नावाने बोंब
या सगळ्याशी संघर्ष करत असताना एखाद्याला श्रद्धेमुळे मानसिक आधार मिळत असेल तर त्यात काय वाईट?
सर्वांकडून बर्ट्रांड रसेलच्या तर्कनिष्टतेची अपेक्षा करणे कितपत बरोबर आहे?
Comments
केवळ विवेकावर आधारलेली श्रद्धाच ग्राह्य्.
श्रद्धेमुळे मानसिक आधार मिळतो, हीसुद्धा मनाची करुन घेतलेली समजूत आहे. श्रद्धेलाही विवेकाचे अधिष्ठान हवे अन्यथा तिचे रुपांतर प्रारंभी अंधश्रद्धेत आणि नंतर अतिरेकवादात होऊ शकते. एखाद्याला त्याच्या आईबद्दल आदर, प्रेम, विश्वास वाटतो, ही श्रद्धा. पण तीच आई पत्नीचा जाच करत असल्यास तिला तिच्या चुकीची जाणीव करु न देणे अथवा आईच्या वर्तनाचे विश्लेषण न करणे, ही अंधश्रद्धा आणि जगात केवळ आईच सर्वश्रेष्ठ, असे मानणे हा अतिरेकवाद्.
मानवी समूहाकडून तर्कनिष्ठता, विवेक याची अपेक्षा करायची नाही तर मग कुणाकडून्? कारण निसर्गाने मानवालाच कृतींमागील विश्लेषणाची विशेष बुद्धिमत्ता दिली आहे. इतर प्राणी 'आहार्, निद्रा, भय, मैथुन' यापलिकडे विचार करत नाहीत. प्राण्यांमधील बुद्धिमत्ता आणि कल्पकता किंवा वात्सल्य व प्रतिकारक्षमता (हल्ला करणे) या गोष्टी या मूलभूत गरजांशीच संबंधित आहेत.
मनुष्य प्राणी या सर्वांहून अधिक उत्क्रांत आहे. संवेदनांच्या रुपाने तो लहानपणापासून घेत गेलेला अनुभव त्याच्या मेंदूच्या स्मृतिकोषांत साठवला जातो आणि त्या संदर्भ चौकटीतच तो सध्याच्या अथवा भविष्यातील कृतींबाबत निर्णय घेतो. प्रश्न असा आहे, की अनुभवांतून सत्याची जाणीव झाल्यानंतरही त्याने चुकीच्या समजुतींना कवटाळून बसावे का?
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास लहानपणी आपण परी, राक्षस, देव, भुते, जादू, चमत्कार या अद्भुत विश्वात रमतो. मोठे झाल्यावर यातील काही खरे नसते आणि आपल्या कृतीच परिणाम घडवतात (तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार) हे उमगूनही 'तेच जुने विश्व खरे' (कारण ते सुखद अनुभूती देते) असे मानण्यात कसला आलाय् शहाणपणा? हे तर विवेकावर जाणूनबुजून घातलेले पांघरुण आहे. बायबलमधील नैतिक तत्त्वांवर श्रद्धा असणे इतपत ठीक, पण बायबलमध्ये म्हटले आहे, की पृथ्वी गोल नसून् चौकोनी आहे, म्हणून त्या समजुतीला कवटाळून बसणे, ही मात्र अंधश्रद्धाच.
एखाद्याच्या श्रद्धेचा इतरांना त्रास होईल न होईल पण अंधश्रद्धेचा आणि अतिरेकवादाचा कायम त्रासच होतो. असो. कुणाही माणसाने विवेकी अन् तर्कनिष्ठ असलेच पाहिजे. तरच विषमता, शोषण, हिंसाचार याला पायबंद बसतो.
अय्या
मी आताच वैयक्तिक अनुभवावर लिहिले आणि नंतर ही चर्चा उघडली. उपक्रमावर एखाद्याची श्रद्धा मांडून ती अंधश्रद्धाच आहे असे दाखवायचे फॅड आलेले आहे.
सहमत आहे...!
>>उपक्रमावर एखाद्याची श्रद्धा मांडून ती अंधश्रद्धाच आहे असे दाखवायचे फॅड आलेले आहे.
सहमत आहे...!
-दिलीप बिरुटे
श्रद्धेवरील विश्वास
एखादी देवभोळी व्यक्ती जर देवाला घाबरून सत्य सांगणार असेल तर त्यात न्यायालय श्रद्धाळू कसे ठरते?
नाताळ/दिवाळी हे धार्मिक सण उरले नसून सामाजिक सण आहेत, उदा. लोकांना भेटणे, भेटींची देवाणघेवाण, दाखवेगिरी, उधळपट्टी, चंगळ, इ.
रविवारसुद्धा काही 'होली'दिवस राहिला नाही.
सहमत.
huhwhat? याचा श्रद्धेशी काय संबंध?
हा मुद्दा गीतेवर हात ठेवण्याविषयीच्या मुद्यासारखाच आहे.
१ अपंगांसाठी एखादा डबा राखीव ठेवू, अख्ख्या लोकलभर अरेरावी/त्रास नको. दुबळेपणासाठी स्पेशल वागणूक ही भीक आहे हे विसरू नये. 'श्रद्धा जाणार नाही' असे म्हणणार्या बहुतेकांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात असे डॉकिन्सचे निरीक्षण आहे.
२ श्रद्धेचा गैरफायदा घेणार्यांमुळे (लादेन, तोगडिया) आम्हाला त्रास होतो.
३ सामान्य माणूसही या आधाराशिवाय सुखी होऊ शकतो असे 'आमचे लोक' म्हणतात, मला खात्री नाही (माझ्या मते 'आमच्यात' आणि 'त्यांच्यात' काहीतरी ठोस फरक असणार; जनुकीय, आनुवंशिक, संस्कारित अशा सार्यांचे मिश्रण असणार. फरक पूर्णपणे रिव्हर्सिबल नाही असेही वाटते.).
सहमत आहे
नाताळने धर्म कसा भ्रष्ट केला आहे, नाताळ सांता ही ख्रिश्चन धर्मातली भेसळ आहे अश्या मताचे अनेक कट्टर धार्मिक लोक दिसतात. उदा. सांता की सैतान?
१९५६साली अमेरिकन काँग्रेसने 'इन गॉड वी ट्रस्ट' हे ब्रीदवाक्य स्वीकारले आणि त्यानंतर हे नोटांवरती छापण्यास सुरुवात झाली. अमेरिकेचा त्याकाळचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी रशीया हा नास्तिक कम्युनिस्ट असल्याने कोल्ड वॉरच्या दीवसांमधे रशीयला एकप्रकारे खुन्नस देण्यास टाकलेले हे ब्रीद वाक्य आले आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मऊ लागले म्हणून
अशीच काही वाक्ये थोड्या वेगळ्याप्रकारे मांडल्याचे आठवते का? जसे,
अंनिस फक्त हिंदू धर्मावरच टिका करते. मुस्लीम-ख्रिश्चनांचा प्रश्न आला की बोलती बंद.
इतके दिवस असे कोणी म्हटले की मी त्याचा विरोध करत असे की सुरुवात आपल्या घरापासून करावी. अंनिसचे कार्यकर्ते जर जन्माने हिंदू असतील आणि मुख्यत्वे हिंदू संस्कृतीतच वावरले असतील तर त्यांनी गैर ते काय केले? परंतु, या विरोधाला आणखीही एक मुद्दा आहे की "मऊ लागेल तिथेच कोपराने खणायचे असते" हा.
उपक्रमावर सातत्याने यनावाला कंपनीचे येणारे लेख हा त्यातलाच प्रकार कारण उपक्रमावर नाडीग्रंथ, ज्योतिषशास्त्र यांना डोक्यावर घेऊन नाचणारे फारसे कोणी नाही. एखादा शशीओक किंवा गुंडोपंत असला तरी बरेचसे सदस्य त्यांच्या विचारसरणीकडे (सर्वच विचारसरणी नाही. गुंडोपंतांनी व्यायामावर आणि इतर विषयांवर रोचक लेख लिहिलेले आहेत.) दुर्लक्ष करतात. असे लेख उपक्रमावर अनुल्लेखाने मारले जातात. बर्याचशा सदस्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील ढोबळ फरक तरी समजतो आणि अशांना झोडपणे सोपे असते. यनावालांचा "कम्फर्ट झोन" उपक्रम आहे. त्यांनी इथे लेख टाकले की बहुसंख्य सदस्य "होय बा!" असेच म्हणतात. त्याने फार मोठा फरक पडत नाही कारण उपक्रमी यनांचे लेख वाचून देवासमोर हात जोडायचे थांबलेले नाहीत, गणपती घरात आणायचे थांबलेले नाहीत किंवा शास्त्रोक्त लग्ने करायचे आणि पत्रिका दाखवायचे राहिलेले नाहीत. म्हणजेच, शेवटी लोक त्यांना जे करायचे असते तेच करतात.
अर्थात, म्हणून प्रबोधन करू नये असे नाही. ते अवश्य करावे. हेच लेख त्यांनी मिसळपाव (तेथील प्रशासन बदलले आहे) आणि मनोगतावर लिहावेत. प्रबोधन तेथेही करावे. राशीफळे, राशीनुसार स्वभाव, नामजप, संतमहिमा वगैरे लेख तेथे अधिक प्रमाणांत येतात. तेथे अशा प्रबोधक लेखांना अधिक वाव आहे. उपक्रमावर काय होते ना की अशा लोकांना वाव मिळत नाही आणि त्याचे पर्यवसन गरज नसताना कीस काढत बसण्यात होतो.
प्रकाश घाटपांड्यांचे मला याबाबत कौतुक वाटते. ते आपले लेख बिनदिक्कत सर्वत्र टाकतात.
उपक्रमावर दत्तगुरुंचा तसाही कोणी नामजप करत नाही. डॉकिन्स साहेबांचा होतो हे मात्र खरे. ;-)
सहमत
उपक्रमावर दत्तगुरुंचा तसाही कोणी नामजप करत नाही. डॉकिन्स साहेबांचा होतो हे मात्र खरे. ;-)
सहमत आहे. ;)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
सहमत आणि असहमत
उपक्रमावर लेख टाकणे म्हणजे 'प्रीचिंग टू द कनवर्टेड' असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे शक्य झाल्यास अंधश्रद्धांवर प्रहार करणारे किंवा प्रबोधनपर लेखन शक्य तितक्या संकेतस्थळांवर प्रकाशित झाल्यास उत्तमच. इतरत्र हे लेखन प्रकाशित व्हायला हवे ह्याबाबतीत सहमत आहे. पण यनावाला कंपनी, कंफर्ट झोन, अंनिस बाबतीत असहमत. आणि उपक्रमावर डॉकिन्स साहेबांचा जप होतो हे मला फार आवडते.
अंनिस
धन्यवाद आणि असे अवश्य व्हायला हवे. त्यानिमित्ताने सदर व्यक्तिंची कार्यशक्ती सत्कारणी लागेल आणि इतर चर्चांमधून धिंगाणा घालण्याचे प्रकार बंद होतील. (धिंगाणा या शब्दाशी आपण असहमत असू शकता. माझी हरकत नाही. सहमती आणि असहमती हे प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य झाले. सदर धिंगाण्याचा त्रास माझ्या चर्चेला झालेला असल्याने भविष्यात अशाप्रकारचे प्रकार होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे मला योग्य वाटते.)
यातील अंनिस हे उदाहरण आहे. उद्या अंनिसचा विषय निघाला तर मी वरीलप्रमाणेच माझे मत मांडेन की अंनिसने अवश्य कार्य करावे. अंनिस किंवा यनावाला यांच्या कार्यावर बोट ठेवायचे नाही. कार्यपद्धतीवर बोट नक्कीच ठेवायचे आहे. म्हणून घाटपांड्यांचे उदाहरण ही दिलेले आहे - ते मऊ लागेल आणि कठिण लागेल तेथे सर्वकडे खणून बघतात.
बाकी यनावाला कंपनी (म्हणजे डोळे झाकून यनावालांशी सहमती दाखवणारे) आणि कम्फर्ट झोन हे माझे व्यक्तिगत विचार त्याच्याशी आपण असहमत असल्यास माझी काहीही हरकत नाही.
यालाही माझी हरकत नाही. किंबहुना, येथे दत्तगुरुचा जप होत नाही आणि डॉकिन्सचा होतो ही वस्तुस्थिती आहे हेच तर दाखवून द्यायचे होते. :-)
आणि
हो!
आणि मी अनेक विवीध विषयांवर 'चला काही तरी करू या' असे मुद्देसूद प्रस्ताव ठेवत असतो,
सदस्यांना वेगवेगळ्या विषयावर लिहायला उद्युक्त करत असतो.
ते विसरू नका!
शिवाय अनेक चर्चात अगत्याने भाग घेतो, कळले नाही तर प्रश्न विचारतो.
मते पटली तर बदलतोही.
कधी कधी हट्टीपणा होतो,
पण काय करणार, मानवी मनोव्यापार मी जरा हळूहळू शिकतो.
बाकी सर्व प्रतिसादाशी सहमत आहे.
या विरोधाला आणखीही एक मुद्दा आहे की "मऊ लागेल तिथेच कोपराने खणायचे असते" हा.
हा हा हा! हाच माझा मुद्दा होता तेव्हा त्या चर्चेत! लक्षात राहिला म्हणायचा! :))
आता चपखल वापरला बाकी तुम्ही तो!
आपला
गुंडोपंत
चांगले खणून काढू
इतरांचे माहीत नाही. त्या भागात खनन करण्यासाठी परवाने नसल्यामुळे आमचा नाइलाज आहे. तुम्ही चार-पाच परवाने मिळवून द्या आणि मग बघा गंमत. चांगले थंड डोक्याने खणून काढू.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कोण कोणावर कसली सक्ती करत आहे?
या बाबतीत कोण कोणावर कसली सक्ती करत आहे?
हे लक्षात आले नाही. उदाहरणे द्याल काय?
आजवर कुठली अंधश्रद्ध किंवा सुश्रद्ध संस्था (खून-वगैरे, किंवा अन्य गुन्हे होत नसतील तर) बळजबरीने बंद झाली आहे? कुठला कौटुंबिक विधी बळजबरीने बंद झाला आहे?
- - -
उच्चभ्रू लोक त्यांच्या श्रद्धांवर किंवा अंधश्रद्धांवर अमुकतमुक खर्च करतात त्याबद्दल जोवर बोलत नाही, तोवर निम्नभ्रूंनीही श्रद्धांवर किंवा अंधश्रद्धांवर खर्च केला तर कोणी बोलू नये, असा काहीसा तर्क सांगितला जातो आहे.
श्रीमंतांना परवडत असेल तर पैसा जाळायला कोण रोखणार आहे? आणि "श्रीमंतांना पैसा जाळायला कोणी रोखत नाही, म्हणून आपणासारख्या बिगरश्रीमंतांना तरी का म्हणून तोट्याबद्दल इशारा द्यावा?" असा चर्चाप्रस्तावकाचा वाद अतिशय विचित्र आहे.
बिगरश्रीमंतांना पैसा जाळणे श्रीमंतांइतक्या प्रमाणात परवडत नाही, ही बाब इतकी गूढ असू नये. तरी श्रीमंतांच्या (अंध)श्रद्धांच्या फायद्या-तोट्यांबद्दल लोकशिक्षण आणि बिगरश्रीमंतांच्या (अंध)श्रद्धांच्या फायद्या-तोट्यांबद्दल लोकशिक्षण यांची बरोबरीची तुलना चर्चाप्रस्तावक करत आहेत. पहिल्या बाबतीत उदासीन असून दुसर्या बाबतीत क्रियाशील असणार्यांना नैतिक दोष देत आहेत. ("सक्ती आणि मौन" हे शब्द निंदाव्यंजक असावेत, आणि नैतिक दोष दाखवणारे असावेत, असे मला वाटते.)
- - -
(सहमतीचा मुद्दा :) जर "मानसिक आधार" हा फायदा असेल तर श्रद्धा पाळावी. मात्र प्रत्येक श्रद्धेबाबत "आधार आहे का? आधाराची किंमत किती?" वगैरे विचार करून श्रद्धेची खरेदी करावी.
यासाठी असामान्य तर्कशक्तीची गरज नाही. देवळाबाहेर जे हार-तुरे, नारळ-कुंकूचे ताट, वगैरे वस्तू मिळतात, त्यांचे बाजारभाव वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या किमतींपैकी आपल्या खिशाला काय परवडते, त्याचा विचार करण्यात लोकांना श्रद्धाघात वाटत नाही. असे करण्यास बहुसंख्य लोक समर्थ असतात, हेच उघड दिसते.
तोच फायद्यातोट्याचा विचार अधिक काळजीपूर्वक करण्यास सांगितला जात आहे. "कोंबडी बळी द्यावी की बकरू" असा विचार करताना संभाव्य फायदे (धनलाभ, पुत्रलाभ, वगैरे), आणि जनावर-गावजेवणाचा खर्च यांचा ताळमेळ लावताना काय विचार करावा : पुत्रलाभाचा संभाव्य फायदा किती? याचे चांगले ज्ञान असले, तर गावजेवणाच्या खर्चाबद्दल अंदाज सुधारतो.
श्रीमंतांनी त्यांच्या फायद्यातोट्याचा विचार करावा. बिगरश्रीमंतांनी त्यांच्या फायद्यातोट्याचा. सर्वांच्या हिशोबाचे गणित वेगवेगळे असेल तर त्याबद्दल आश्चर्य का वाटावे? आणि बिगरश्रीमंतांना फायद्यातोट्याचा हिशोब सांगताना कोणी श्रीमंतांसाठीसुद्धा गणित सांगितले नाही, त्याबद्दल इतका विषाद का वाटावा?
सक्ती नव्हे
इथे श्रद्धेच्या बाबतीत सक्ती होते आहे असे म्हणणे नाही. राज ठाकरेंचे उदाहरण थोडेसे मिसलिडींग आहे हे मान्य. त्यातील मतितार्थ लक्षात घ्यावा.
उच्चभ्रू लोक त्यांच्या श्रद्धांवर किंवा अंधश्रद्धांवर अमुकतमुक खर्च करतात त्याबद्दल जोवर बोलत नाही, तोवर निम्नभ्रूंनीही श्रद्धांवर किंवा अंधश्रद्धांवर खर्च केला तर कोणी बोलू नये, असा काहीसा तर्क सांगितला जातो आहे.
असा तर्क आहे असे मला वाटत नाही. मी उच्चभ्रू शब्द वापरला तो गरीब-श्रीमंत या अर्थाने नव्हे. मला हे दाखवायचे होते की श्रद्धा आपल्या (किंवा इतर देशांच्याही) कायदा, संविधान इ. मध्ये खोलवर रूजलेली आहे. तिला नष्ट करणे अशक्य वाटते.
श्रद्धेबद्दल बोलताना सगळेजण तिचा मानसिकतेशी संबंध विसरतात. नुसते विवेकी व्हा असे म्हटल्याने रामा गड्यापसून राष्ट्रपतींपर्यंत सर्व लोक रसेलैतके विवेकी होणार नाहीत. शिवाय श्रद्धा हा मानसिक आधार काढून घेतला तर त्याच्या जागी पर्याय द्यावा लागेल.
बाकी तुम्ही जे खर्चाबद्दल मुद्दे मांडले आहेत त्यांचा संबंध लक्षात आला नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
नष्ट करण्याचा विचार नाही
कोणी सर्व काही नष्ट करू बघते आहे, ही भीती खरी नव्हे.
बहुतेक ठिकाणी श्रद्धांवर हल्ला हा विशिष्ट श्रद्धांवरच होत असतो, सर्व श्रद्धांवर नव्हे. ज्या श्रद्धांवर हल्ला होत नाही त्यांच्यामधून फारसे नुकसान होत नाही. किंवा फायद्या-तोट्याच्या गणितात तोटा कमी दिसतो. म्हणूनच काही श्रद्धांवरती हल्ला होत नाही, याबद्दल आश्चर्य वाटू नये. या श्रद्धा नष्ट होण्याबद्दल भीतीही बाळगू नये.
ज्या श्रद्धांवर हल्ला होतो, त्यांच्यातून कोणाचेतरी नुकसान होत असते - किंवा फायद्या-तोट्याच्या गणितात कोणालातरी तोट्याचे प्रमाण हल्ला करणार्याला अधिक वाटते. म्हणूनच काही श्रद्धांवरती हल्ला होतो, याबद्दल आश्चर्य वाटू नये. अशा श्रद्धा बदलू शकतात, याबद्दल ऐतिहासिक उदाहरणे आपल्याला सापडतात. (उदाहरणार्थ : आजकाल अश्वमेध फारसे होत नाहीत. फायदा-तोटा हा तोट्याच्याच बाजूला असल्याचे गणित कधीतरी लोकांना इतके पटले, की ती रूढीच नष्ट झाली.)
उच्चभ्रू श्रद्धा विरुद्ध हल्ला केलेली श्रद्धा : यांच्यामधला फरक त्यांच्या-त्यांच्या फायद्या-तोट्याच्या गणितामधून कळतो - खर्चामधून समजतो, असा माझ्या प्रतिसादाचा मथितार्थ आहे.
रामागड्यापासून राष्ट्रपतींपर्यंत लोक सर्व मनुष्यांइतके फायद्या-तोट्याचा विचार करतील, रसेल या मनुष्यविशेषाइतका नव्हे. श्रद्धा असली म्हणून आपण लोक फायदा-तोट्याचा हिशोब थांबवत नाहीत, याचे प्रमाण मी प्रतिसादात दिलेले आहे. (पूजेसाठी सामग्री विकत घेताना भाव आपण बाजारभाव बघतो, वगैरे.) तोटा असलेल्या श्रद्धांच्या बाबतीतही रामा-राष्ट्रपती अशाच प्रकारे विचार करू शकतात. असे इतिहासातही दिसते. "भो पंचम जॉर्ज भूप" या श्रद्धेपेक्षा "भारत माझा देश आहे" ही श्रद्धा अधिक फायद्याची, कमी तोट्याची आहे, असे दिसता, कित्येक लोकांनी पहिली श्रद्धा टाकून दुसरी धरली असे दिसते. यात रामागडी आणि राष्ट्रपती दोघे आले. (रसेल नसूनही.)
सगळ्या श्रद्धा नष्ट होणार नाहीत, ही बाब नि:संदर्भ आहे. ज्या श्रद्धा तोट्याच्या म्हणून लोकांना दिसू लागतील, त्या श्रद्धा कदाचित नष्ट होतील, इतकेच.
भीती
इथे श्रद्धा नष्ट होतील की काय अशी भीती नाही. नष्ट होणार नाहीत हे तुम्हालाही पटते आहे.
ज्या श्रद्धांवर हल्ला होत नाही त्यांच्यामधून फारसे नुकसान होत नाही. किंवा फायद्या-तोट्याच्या गणितात तोटा कमी दिसतो. म्हणूनच काही श्रद्धांवरती हल्ला होत नाही, याबद्दल आश्चर्य वाटू नये. या श्रद्धा नष्ट होण्याबद्दल भीतीही बाळगू नये.
याबाबत साशंक आहे. आताच्याच यनावालांच्या उदाहरणात दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवल्याने कुणाचा काहीच तोटा होत नव्हता.
दुसर्या तर्हेने माझे म्हणणे मांडून बघतो. जगातील सर्व व्यवहार तर्क आणि विवेकाच्याच जोरावर होतात असे नाही. तर्क आणि विवेक यांना स्थान आहे पण ते सर्वव्यापी नाहीत. झेंड्यावरची श्रद्धा हे एक उदाहरण झाले.
आदर्श युटोपिअन जगात कदाचित असे होऊ शकेल. सर्व व्यवहार तर्कनिष्ठ, भावनांना जागा नाही. पण त्या जगात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, कबीराचे दोहे हे ही नसतील.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
श्रद्धेचा आधार
सर्वसामान्य माणसे रोजचे आयुष्य जगण्यासाठीच युद्ध करत असतात. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, सोई-सुविधांच्या नावाने बोंब
या सगळ्याशी संघर्ष करत असताना एखाद्याला श्रद्धेमुळे मानसिक आधार मिळत असेल तर त्यात काय वाईट?
सर्वांकडून बर्ट्रांड रसेलच्या तर्कनिष्टतेची अपेक्षा करणे कितपत बरोबर आहे?
श्रद्धेचा का कसलाही आधार मिळाला तरी खूप हरकत नसावी. पण जिकडे आधार न मिळता खोटी भीति दाखवली जाते त्याचे काय?
म्हणजे अमुक मंत्र /विधी करा म्हणा तुमचे भले होईल ह्याला आधार म्हणाल तर.
अमुक केले नाहीत तर तुमचा कार्यभाग सिद्धीस जाणार नाही/नरकात जाल. पूजेचा प्रसाद खाल्ला नाही तर राज्य-संपत्ती जाईल. अशा गोष्टींना तुमचा आक्षेप राहील का?
आता अमुक मंत्र आणि विधींची यादी आणि त्यासाठी लागणारा खर्च व वेळ आपल्याला पुरत नसेल आधार मिळेल का टांचणी?
कित्येक श्रद्धांच्या प्रसारास दुसर्या तेवढ्याच श्रद्धापूर्ण गोष्टींची भीति दाखवली जाते. 'भूत प्रेत समंधादी रोग व्याधी समस्त ही नासती तूटती चिंता' यात भीती देऊन मग आधार दिला आहे तो ग्राह्य आहे का?
अंबानीने कुठल्या श्रद्धा बाळगल्या आणि त्यामुळे त्याचे अमुक पैशाचे नुकसान झाले. हमालाने श्रद्धा बाळगल्याने त्याचे तमुक पैशाचे नुकसान झाले. या दोन्हींना तुम्ही राष्ट्राध्यक्ष व माळी सारखे एकासारखे मानणार का?
हे प्रीचिंग टु कन्वर्टेड नसावे अशी अपेक्षा.
प्रमोद
ज्याचा
कसली श्रद्धा बाळगावी आणि कसली नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी श्रद्धेची इतर उदाहरणे दिली आहेत ज्यांच्याबद्दल कधीच बोलले जात नाही.
अंबानीने कुठल्या श्रद्धा बाळगल्या आणि त्यामुळे त्याचे अमुक पैशाचे नुकसान झाले. हमालाने श्रद्धा बाळगल्याने त्याचे तमुक पैशाचे नुकसान झाले. या दोन्हींना तुम्ही राष्ट्राध्यक्ष व माळी सारखे एकासारखे मानणार का?
माझी उदाहरणे फारच मिसलिडींग आहेत असे वाटते. :)
अंबानींचा उल्लेख केवळ उदाहरणापुरता होता, त्याचा श्रद्धेशी संबंध नाही.
राष्ट्राध्यक्ष आणि माळी यांच्यात वैज्ञानिकदृष्ट्या फरक नाही. दोघेही माणसेच. तरीही राष्ट्राध्यक्ष आले तर आपण उठून उभे राहतो. याला काय म्हणावे?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
उदाहरणे
१. अमेरिकन डॉलरवरील "इन गॉड वी ट्रस्ट"
२. आपली कोर्टातील गीतेवरची शपथ
३. नाताळच्या सुट्टीत अमेरिकन फिजिकल सोसायटीपासून क्यालटेकपर्यंत सर्व संस्था बंद असतात.
४. झेंडा म्हणजे काय? रंगीबेरंगी एक कापडाचा तुकडा. मग त्याला राष्ट्राध्यक्षांपासून सगळे जण वंदन का करतात?
५. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि दगडू माळी ही सर्व माणसेच आहेत. मग त्यांना देण्यात येणार्या वागणूकीत इतका फरक का?
६. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व मंत्री शपथ घेतात. शपथ म्हणजे काय?
एखादा विधानाच्या सत्यासत्यतेविषयी असलेला पुरावा नसताना केलेला विश्वास यास श्रद्धा म्हणता येईल. ही व्याख्या पटत नसेल तर तुमची व्याख्या सांगा.
कृती या श्रद्धा दर्शवतात. पण कृती असल्या म्हणजे श्रद्धा असतेच असे नाही. एखादा नास्तिक 'तो वर गेला' 'हाय राम्' 'अरे देवा' असे उद्गार काढू शकतो. पण या कृती त्याच्या कदाचित असलेल्या श्रद्धा दर्शवतात किंवा सवय दर्शवतात. तुम्ही दिलेल्या उदाहरणात विधाने कमी असून कृती जास्त आहेत. त्यामुळे नेमक्या कुणाच्या काय श्रद्धा आहेत हे तपासता येत नाही.
माझी उदाहरणे फारच मिसलिडींग आहेत असे वाटते. :)
अंबानींचा उल्लेख केवळ उदाहरणापुरता होता, त्याचा श्रद्धेशी संबंध नाही.
राष्ट्राध्यक्ष आणि माळी यांच्यात वैज्ञानिकदृष्ट्या फरक नाही. दोघेही माणसेच. तरीही राष्ट्राध्यक्ष आले तर आपण उठून उभे राहतो. याला काय म्हणावे?
पूर्वीच आलेल्या प्रतिसादात तुमच्या श्रद्धांच्या यादीवर लिहिणे टाळले होते. (कंटाळवाणे होईल की काय या भीतिने.) मात्र तुम्ही कृतीचा उल्लेख श्रध्दांशी जुळवून थोडी गल्लत तर करीत नाही आहात ना अशी शंका आली.
प्रमोद
प्रमोद
प्रतिसाद
एखादा विधानाच्या सत्यासत्यतेविषयी असलेला पुरावा नसताना केलेला विश्वास यास श्रद्धा म्हणता येईल. ही व्याख्या पटत नसेल तर तुमची व्याख्या सांगा.
कृती या श्रद्धा दर्शवतात. पण कृती असल्या म्हणजे श्रद्धा असतेच असे नाही.
कळले नाही. "इन गॉड वी ट्रस्ट" हे वाक्य माझ्या मते श्रद्धाच दर्शवते. तसेच झेंड्याला वंदन करणेही.
मी देवळात गेलो तर ही कृती माझा देवावरची श्रद्धा दर्शवते.
जर समाजात श्रद्धा इतकी खोलवर रूजलेली आहे तर तिला कसे काढणार?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
श्रद्धा ही कृती नाही
'इन गॉड वी ट्रस्ट' हे विधान विश्वासात्मक आहे. कुणा वी ची ती श्रद्धा.
'झेंड्याला वंदन करणे' या कृतीतून काय विश्वास दिसतो?
पर्याय.
१, झेंडा देवतेला वंदन केल्यास ती मला सुखी करेल.
२. झेंडा राष्ट्राचे प्रतीक आहे, झेंड्याला वंदन केल्यास राष्ट्राला वंदन केल्यासारखे होईल. राष्ट्रदेवता मला सुखी करेल.
३. झेंडा हे राष्ट्राचे (विशिष्ट लोकांचे)प्रतीक आहे. राष्ट्राला वंदन केल्यास राष्ट्र मला आपलेसे करेल.
४. इतर सर्व जण करतात मग मी पण करतो.
५. असे न केल्यास कायद्यानुसार शिक्षा आहे म्हणून मी करतो.
यातील किती विधानांना माझ्या व्याख्येप्रमाणे श्रद्धा म्हणता येईल?
देवळात जाणे या कृतीस ही असेच पर्याय संभवतात. (देत नाही)
जर समाजात श्रद्धा इतकी खोलवर रूजलेली आहे तर तिला कसे काढणार?
हे मला कळले नाही. खोलवरला काही प्रमाण?
प्रमोद
झेंडा
मला झेंड्याला वंदन करणे ही श्रद्धा वाटते.
वैज्ञानिकदृष्टीने झेंडा फक्त एक कापडाचा तुकडा आहे. माझा शर्ट आणि झेंडा यात फरक नाही. तरीही झेंडा मान्यताप्राप्त प्रकारे न वापरल्यास गुन्हा ठरू शकतो. एका कापडाच्या तुकड्याला इतके महत्व? हे तर्कनिष्ठ आहे असे वाटते का?
मग एखाद्याने एखाद्या दगडाला तितकेच पवित्र मानले तर तो अंधश्रद्ध का?
>हे मला कळले नाही. खोलवरला काही प्रमाण?
झेंड्याचेच उदाहरण घ्या. माझ्या मते ही श्रद्धा आहे.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
कावा
सीमेवर जाऊन कोणीतरी मरावे अशी परिस्थिती निर्माण होण्यास हातभार म्हणून मी चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभा राहतो. माझे पॉपकॉर्न सांडले तरी परवडते. खासगीत तसे केले नाही की त्यास हिशोबी विवेक म्हणता येईल.
बाकीच्या मुद्यांचा प्रतिवाद इतरांनी तसेच मी केला आहे. ते पटले का?
व्याख्या
तुमची श्रद्धेची व्याख्या कळेल का? (ती वेगळी आहे असे वाटते.)
माझ्या व्याख्येप्रमाणे झेड्याला वंदन ही कृती श्रद्धा नाही.
'खोलवर' श्रद्धा हा प्रकार समजला नाही. (प्रत्युत्तरानंतरही)
दगडाला नमस्कार ही कृती माझ्या व्याख्येत अंधश्रद्धा होत नाही. मात्र दगड नमस्कार केल्यास माझे भले होईल हे मानणे अंधश्रद्ध होऊ शकेल.
प्रमोद
वेगळी
आपल्या (म्हणजे तुमच्या आणि माझ्या) व्याख्या वेगळ्या आहेत असे वाटते.
एका कापडाच्या तुकड्याला नमस्कार करणे ही माझ्या मते श्रद्धा आहे कारण त्यामागे कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. तुमची व्याख्या हेतूशी निगडीत आहे असे वाटते. तुमची व्याख्या माझ्या व्याख्येत येते पण व्हाइसा व्हर्सा नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना
पुन्हा
सीमेवर जाऊन कोणीतरी मरावे अशी परिस्थिती निर्माण होण्यास हातभार म्हणून मी चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभा राहतो. माझे पॉपकॉर्न सांडले तरी परवडते. ही कृती श्रद्धाजन्य आहे का?
जिवंत माणसांना मिळणारा 'भाव' हा त्यांच्यापासून शक्य फायदा-तोट्यानुसार असतो.
अंगात येण्याचा दावा करणारी वा सत्यसाईबाबा, अम्माला भेटणारा यांच्यासाठी उभे राहणे हा अकलेचा अपमान आहे.
पैसा, आजार वगैरे बाजूला ठेवू
पैशांचे नुकसान, चुकीच्या श्रद्धेपायी आरोग्याचे नुकसान वगैरे बाबी बाजूला ठेवून जरा पुढे जाऊ. यांचेच बडगे नेहमी दाखवले जातात म्हणून. तसे ते बडगे दाखवायला माझी असहमती नाही परंतु उपक्रमावर यापेक्षा वेगळे काही येऊ द्या ना. हे अनेकदा उपक्रमावर येऊन गेल्यावर म्हटलेले आहे. तेव्हा यावेळेस पैसा, आजार, मंत्र-तंत्र, फसवणूक या सर्वांपेक्षा वेगळा आणि साधा सरळ विचार करू.
आपले उदाहरण त्यापैकीच आहे असे मला वाटते कारण ते उपक्रमावर दिलेले आहे. इथे एक उदाहरण देते. ज्यात पैसा, आरोग्य आणि वेळेचाही खूप अपव्यय नाही -
माझ्या घरातील क्ष ही व्यक्ती घरात किंवा बाहेर पूजा-अर्चा करत नाही. कधीतरी सणावाराच्या दिवशी मंदिरात जाते. तिथे प्रसाद खाऊन दोन-चार डॉलर दक्षिणा देऊन परत येते. या व्यक्तीला मी रोज सांगितले "पूजा करू नकोस. वेळ वाया जातो. पूजेने काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा सकाळी बाहेर फेरफटका मारून ये." माझ्या मते दोन-चार वेळेस ही व्यक्ती ते ऐकून घेईल आणि मग मला सांगेल "गप्प बैस. मी पूजा करत नाही हे माहित असताना उगीच लेक्चर का मारतेस? कधीकाळी गेलोच प्रसाद खायला तर तुझी भूणभूण कशाला?"*
लेखकाची उदाहरणे मला तरी मिसलिडिंग वाटली नाहीत पण हमालांवर मराठी बोलण्याची सक्ती हमालांच्या श्रद्धेवर उतरली त्याची गंमत वाटली. गरज नसताना पाल्हाळ लावले तर काही काळाने लोक कंटाळलो असे म्हणणारच. या लेखाचा जन्म त्यातूनच झाला असावा. (हा फक्त माझा अंदाज. लेखक त्याचे स्पष्टीकरण गरज भासल्यास देऊ शकतो.) उपक्रमावर तेच तेच लेख येण्यापेक्षा थोडे वेगळे लेख यावेत किंवा अशा लेखांसाठी वेगळी जमीन शोधावी असे मला वाटते.
बाकी, झेंड्याला वंदन करणे वगैरे सवयींचा भाग असू शकतो किंवा श्रद्धेचाही हे खरेच आहे. त्याचबरोबर या कृतीने कोणाचे कसलेही नुकसान होत नाही तेव्हा रीत-पद्धत म्हणून केले तर काय बिघडते असा विचारही त्यामागे असू शकतो. माणूस आपल्याला न पटणार्या प्रत्येक गोष्टीशी फटकून राहू शकत नाही.
* हे केवळ उदाहरण आहे. प्रत्यक्षात घडलेले नाही परंतु जर मी अशी भूणभूण केली तर असेच उत्तर मिळेल याची निश्चिती आहे.
सहमत
वरील प्रतिसादाशी पूर्ण सहमत.
बाकी मूळ लेखात अजून एक उदाहरण म्हणजे, अमेरिकेची प्रतिज्ञा: I pledge allegiance to the flag of the United States of America, and to the republic for which it stands, one nation under God, indivisible, with liberty and justice for all.
या प्रतिज्ञेत "अंडर द् गॉड" हे शब्द १९५०च्या दशकात घातले गेले. ते लिंकनच्या गॅटीसबर्गच्या भाषणात आहेत असे देखील म्हणले जाते आणि कम्युनिझमशी चालू झालेल्या शीतयुद्धातील एक नागरी विरोध या शब्दांतून घालण्यात आला होता. गंमत म्हणजे मूळ प्रतिज्ञेच्या विरुद्ध कधीकाळी जेहोवाज् विटनेस या ख्रिस्ती समुदायातील लोकही होते, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ध्वजाजी प्रामाणिक रहाणे म्हणणे म्हणजे मुर्तीपूजा केल्यासारखे आहे.
उपक्रमावर तेच तेच लेख येण्यापेक्षा थोडे वेगळे लेख यावेत किंवा अशा लेखांसाठी वेगळी जमीन शोधावी असे मला वाटते.
अगदी खरे आहे. असे होऊन अंधश्रद्धेवर सतत येणारे लेखन जर थांबले तर मी नक्की नारळ फोडीन ;)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
खिरापत खाईन, मग स्वतः लिहायला घेईन
उपक्रमावर अंधश्रद्धा विरोधातले लेख येणे बंद झाले, तर फोडलेल्या नारळाची खिरापत मी खाईन आणि स्वतः अंधश्रद्धाविरोधी लेख लिहायचा श्रीगणेशा करेन!
कोणीतरी या विषयावर लेख लिहिते आहे, म्हणून मला वेगळे लेख लिहायला मोकळीक मिळते.
कोणीतरी गावातली सफाई करत आहे, म्हणून मला हल्लीचा व्यवसाय करायचा अवसर मिळतो. सर्वच जण सफाई कामगार झाले, तर चालणार नाही, हे खरे आहे. मात्र कोणीच सफाई कामगार उरला नाही, तर मला हल्लीचा व्यवसाय सोडून सफाईकाम करावे लागेल.
सहमत आहे.
अनेक ठिकाणी अंधश्रद्धेचे समर्थन/ अंधश्रद्धेच्या समर्थनार्थ प्रचार सुरु असताना, उपक्रमासारख्या स्थळी यास् विरोध (अंधश्रद्धेचे इथे समर्थक असतील तर सातत्याने विरोध) केला तर त्यात वावगे काही नाही, उलट योग्यच आहे.
-Nile
मऊ लागले म्हणून - ३
खरेच आहे. मीही हेच म्हणत होते. मऊ लागले म्हणून वाचला असेलच आपण.
यानिमित्ताने, कंपनीचे सोजीर अटेन्शनमध्ये उभे राहिले आहेत हे बरे झाले पण जालियांवाला बागेत आमच्यासारखे निरपराध उभे आहेत याचे दु:ख आहे.
मउ?
उपक्रमावर नक्की खणण्यास मउ आहे का हे माहित नाही. इतर ठिकाणी मात्र मउ असते, नव्हे मउ पठारे च्या पठारे खणण्याचा माझा अनुभव आहे.
कंटाळा ही वैयक्तीक बाब आहे. समजा असे अनेक् लेख् आले तर ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत असे नाही. वाचलेत तर त्यावर प्रतिक्रीया दिल्याच पाहिजेत असे नाही. ज्यांना प्रबोधन करायचे आहे त्यांना करण्यास विरोध का? त्यांना जर वाटले प्रबोधनाची गरज इथे नाही तर ते लिहणे थांबवतील. होयबा-होयबा करण्यार्यांचा मला तरी काही त्रास् नाही, इतरांनाही होउ नये.
बाकी कोण् सोजीर् आणी कोण् निरपराध हे काही समजले नाही. असो, अवांतरास माझ्याकडुन् समाप्ती.
-Nile
डोळेझाक
उपक्रमावर मऊ आहे कारण इथे बरेचसे लोक अंधश्रद्धाविरोधीच आहेत. या अशा ताई वगैरे येथे नगण्य आहेत. तुझी राशी-माझी राशी, ग्रहणाचे राशींवर परिणाम, तीळांचे महत्त्व असे लेख येथे सहसा येत नाही. नाडीग्रंथाचे लेखही येथे थापले जातात आणि दुर्लक्षित राहतात. अशाप्रकारचे जे लेख येतात त्यांनाही अनुल्लेखाने मारले जाते. तेव्हा बाळबोध प्रबोधनाचा कंटाळा येतो हे सांगण्याचा हक्क सदस्यांना आहे. (हे वरील प्रतिसादात सांगितले आहे तरीही पुन्हा सांगावे लागते. ही डोळेझाक आहे की काय ते कळत नाही. असो.)
माणसे शब्द आपल्याला हवे तसे ट्विस्ट का करतात हेच कळत नाही. धनंजय यांनाही हेच सांगितले आहे. विरोध प्रबोधनाला नाही. त्याच्या पद्धतीला आहे. (विरोध कार्याला नाही, कार्यपद्धतीला आहे हे आधीही सांगितले आहे. तरीही, डोळेझाक होते आहे हेच दाखवून द्यायचे आहे.)
हा आपला अंदाज असावा पण तसे न होता, सदर व्यक्ती इतर चर्चाविषय न समजून घेता तेथे गोंधळ घालतात असा माझा अनुभव आहे.
आपण आपल्याबद्दल बोलावे. इतरांचे आपण का ठरवता?
ते समजणार नाही याची खात्री होतीच. वरील स्पष्टीकरण द्यावे लागले त्यावरूनही ती झालीच. :-)
याबाबत सहमत. अवांतर चर्चेतून फार वाढवू नयेच. ते एखाद्या ठिकाणी बरे दिसते. बाकी, खरडवह्या आहेतच.
कचरा आहे का?
धन्याकाका, आमचे एक गाडगेबाबा होते हो. त्यांनी मलबार हिलला जाऊन कचरा नाही काढला. तिथे परिसर स्वच्छ होता आणि आताही असतो. ज्या गावांत कचरे आहेत तेथे जाऊन साफ करा ना. आधीच साफ असणारा परिसर पुन्हा साफ करायचा - हा सावध आणि कामचुकारीचा पावित्रा नको हो.
- राजीव.
एक प्रश्न
हाहाहा. परिसर स्वच्छ आहे म्हणून कम्प्लेसंट बनायला नका. इथेही दिसला कचरा की केरसुणी घेऊन धावायला हवे.
हे सगळे ठीक आहे रे लेक्स्या. पण एक विचारायचे होते. गाडगेबाबा ज्या गावातली घाण, दुर्गंधी, अस्वच्छता दूर करायला जात तिथली मंडळी गाडगेबाबांच्या अंगावर चिखल टाकत असत काय? प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबांनीच जायला नको. ह्या गावात येणाऱ्या काही मंडळींना त्या गावात प्रतिष्ठा प्राप्त आहे. त्यांनी स्वतःहून हे काम करायला हवे. कसे?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कठिण जमीन
हे खरे आहे सोजिरांनी मेजर व्हावे. माझाही पाठिंबा आहे पण कठिण जमीन खोदताना दम निघतो. त्यापेक्षा, मऊ जमीन खोदणे सोपे असते. सोबत वाहावा ही होते.
केरसुणी आणि सेनापती बापट
असे कधी ऐकले नाही हो धम्मककाका पण आमच्या सेनापती बापटांची गोष्ट ऐका. शाळेत बाईंनी सांगितली होती.
एका रस्त्यावर लोक प्रातर्विधीला बसत. त्यांना सुधारण्यासाठी आमचे सेनापती बापट स्वतः खराटा घेऊन तो रस्ता साफ करत. असे नित्यनियमाने चाले. एक दिवस बापटांना उशीर झाला. बघतात तो काय - रस्त्यावर लोक टमरेले घेऊन ताटकळत उभे होते. त्यांना स्वच्छ रस्त्यावर प्रातर्विधी उरकण्याची सवय झाली होती. ही गोष्ट देण्याचा हेतू असा की सुधारणा आणणे अवघड आहे म्हणून मलबार हिलच झाडून काढायची. झोपडपट्टीच्या रस्त्यांच्या वाटेला जायचे नाही. त्या रस्त्यांवर चालताना "डोळे बंद. पाय शेणात पडला तरी बेहत्तर."
उपक्रमींची गंमत बघतो आहे. ते ठणठणपाळ लिहित होते तेव्हा यांना त्यात बटबटीतपणा दिसत होता. येथे उपक्रमगुरु यनासरांच्या लेखनाचा कंटाळा करू नका हे सल्लेही हेच लोक देतात. दुटप्पीपणाची कमाल आहे.
-राजीव.
असे काही वाटले नाही
सेनापती बापटांचे उदाहरण व आदर्श पुढे ठेवायला हवे. प्रत्येकाला सेनापती होता येत नाही. आणि सेनापती बापटांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा आपण आपापल्या परीने सैनिकाची भूमिका वठवायला हवी.
उपक्रमींची गंमत बघतो आहे. ते ठणठणपाळ लिहित होते तेव्हा यांना त्यात बटबटीतपणा दिसत होता. येथे उपक्रमगुरु यनासरांच्या लेखनाचा कंटाळा करू नका हे सल्लेही हेच लोक देतात. दुटप्पीपणाची कमाल आहे.
मला तरी कुठला दुटप्पीपणा दिसला नाही. मला तरी यनासरांच्या लेखनाचा अजिबात कंटाळा येत नाही. त्यांचे लेखन व प्रतिसाद अत्यंत वाचनीय असतात. तसेच ठणठणपाळांचे लेखनही अनेकार्थांनी मनोरंजक असते. कारण बटबटीतपणा आणि कंटाळा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बटबटीतपणामुळे कंटाळा येईलच असे नाही.
अदृश्य व अस्तित्वात नसलेल्या त्या देवाच्या, अंधश्रद्धांच्या नादी लागलेल्या काही लोकांना मात्र इथे उपक्रमावर सनातन प्रभात ची शाखा स्थापन करायची आहे, असे दिसते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आरोप
कोणी बरे टिंगलटवाळी केली बापटांची धम्मककाका? मी तुम्हाला खरी गोष्ट सांगितली.
सनातन प्रभात???? अहो काका, हे कोण लोक आहेत? त्यांनी सनातन प्रभातची शाखा स्थापन करण्यासाठी कोणते लेख टाकले? कोणते प्रबोधन केले? जरा संदर्भ द्या बघू.
-राजीव.
अनाठायी भीती
सनातन प्रभातचे कार्यकर्ते येथे येऊन लेख लिहून गेलेले आहेत आणि उपक्रमींनी ते आनंदाने पाडलेले आहेत. २००७ पासून सुरु झालेले उपक्रम सनातन प्रभातची शाखा झाल्याचे मला दिसत नाही. तसे ते होऊ नये यासाठी बरेचसे सदस्य प्रयत्न करतील असा मला विश्वास वाटतो. याचबरोबर, उपक्रम अंनिसची शाखाही होऊ नये. उपक्रमाने या सर्वांपासून स्वतंत्र राहावे आणि तटस्थपणे विचार करावेत असे वाटते.
तेव्हा, काही लोकांना उपक्रमावर सनातन प्रभात ची शाखा स्थापन करायची आहे अशी फुकाची हाकाटी पिटण्याची गरज नसावी. अशी अनाठायी भीती बाळगू नये. भित्यापाठी ब्रह्मराक्षस नेहमीच टपलेला असतो यावर "श्रद्धा" ठेवावी. ;-)
का बरे?
"विचार करावेत" म्हणजे? दाभोळकर फतवे काढतात आणि बाकीचे मुळीच विचार करीत नाहीत असे वाटले का?
मी अंनिसचा चार आणे सदस्यही नाही पण जाणूनबुजून तटस्थ राहण्याच्या उद्देशातून तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी आकस आहे असे दिसते.
इफ यू आर नॉट वन ऑफ अस, यू आर वन ऑफ देम -- मॉर्फिअस
इफ यू आर नॉट विथ मी, यू आर माय एनेमी -- ऍनाकिन
आहात
याचप्रमाणे आपण अंनिसचे सदस्य आहात आणि आपण त्यांच्याकडून असे प्रतिसाद देण्यासाठी पैसेही उकळता असे मलाही वाटते. तेव्हा, या अशा माझ्या आणि आपल्या फालतू आरोपबाजीपेक्षा आपल्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय मी घेते.
याचीच प्रचिती आपल्या सर्व प्रतिसादांतून येत असते. धन्यवाद.
माझे मत नाही
वैज्ञानिक दृष्टिकोनापासून भिन्न म्हणजे अवैज्ञानिक विचारसरणी ही 'व्याख्या' आहे. ते माझे इंटरप्रिटेशन नाही.
आधीच्या प्रतिसादात मी दोन उद्गार दिले आहेत, त्यांवरून विज्ञानाची भूमिका समजावी अशी आशा होती.
नातेवाईकाच्या वागणुकीवर टीका करणार्या मनोवृत्तीच्या लोकांच्या लेखांकडेच मुळात दुर्लक्ष केले असतेत तर धागा लांबलाच नसता.
दुर्लक्षाचे स्वागत. वावर मोकळे!
ब्रह्मराक्षसासाठी टपून बसलो आहोत
उपक्रम ही अंनिसची शाखा नाहीच. इतर सदस्यांनी इतर गोष्टींवर लेख लिहावेत ना. त्यांना कोणी रोखले आहे का! आणि डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे बघणे चुकीचे आहे का? अहो कुणी फाटकी कमीझ विकत तर घेतली नाहीच वरून ती फाटकी आहे असे सांगितले म्हणून नाराज झाले तर काय करायचे!
अहो ह्या पूर्ण अंधश्रद्धांपेक्षा हे अर्धवट अंधश्रद्धाळू जास्त खतरनाक आहेत, असे कधी कधी वाटते. (माझ्या एका अर्धवट अंधश्रद्धाळू मित्राची टिप्पिकल वाक्ये: "म्हणजे मला सांगता येणार नाही पण कुठली तरी शक्ती अस्तित्वात आहे" "होमीपदीत नॅनो टेक्नॉलजी आहे" ) असो. आम्ही काही ब्रह्मराक्षसाला भीत नाही. आलाच तर त्याच्या चड्डीची नाडी सोडून (किंवा अिलास्टिक खेचून) पळवून लावू. तसे करताना आम्हाला विशेष आनंद होईल. आम्ही ब्रह्मराक्षसासाठी टपून बसलो आहोत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
डोळस
डोळसपणे बघा हेच आवाहन आहे. म्हणूनच इथले काही प्रतिसाद पुन्हा पुन्हा द्यावे लागले. काही सदस्यांनी अपेक्षित डोळेझाक करून घेतली म्हणून. इतर सदस्य वेगळे लेख लिहितातच पण ते वेगळे आहेत हे समजून न घेताच त्यात धिंगाणा घातला जातो हे दिसून येते म्हणूनच त्यांची कार्यशक्ती इतरत्र लावता येईल असे वाटते.
हो खरे आहे. तेवढेच खतरनाक दुसर्यांना तुच्छ लेखणारे, हेकट विज्ञानवादी आहेत.
आणि त्याहीपेक्षा मोठी गंमत
संकेतस्थळांवर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बढाया मारून घरी साडेसातीसाठी शनिमहात्म्य वाचणारे, मुलाच्या/ मुलीच्या घरचे ऐकत नाहीत म्हणून पत्रिका पाठवणारे, आई-वडिलांची इच्छा म्हणून शास्त्रोक्त लग्न करणारे वगैरे यांची वाटते.
विज्ञानवाद्यांना न्यूनगंड नाही हा काय त्यांचा दोष आहे काय?
तेवढेच खतरनाक दुसर्यांना तुच्छ लेखणारे, हेकट विज्ञानवादी आहेत.
असे वाटत नाही. विज्ञानवाद्यांना न्यूनगंड नाही हा काय त्यांचा दोष आहे काय?
हाहाहाहा. हे चूकच. कोण आहेत हो हे?
माझ्यामते मुलाच्या/मुलीचे घरचे ऐकत नाही म्हणून पत्रिका पाठवणे किंवा आई-वडिलांची इच्छा म्हणून शास्त्रोक्त लग्न करणे ह्यात काही वाईट किंवा चुकीचे नाही. मुलीने किंवा मुलाच्या बापाने पत्रिका मागितली तर पाठवायलाच हवी. पत्रिका तर अगदी चिल्लर गोष्ट आहे हो. आणि एखादा 'कल्चरल हिंदू' (श्रेय: डॉकिन्सबाबा) शास्रोक्त लग्न करत असल्यास तो केवळ परंपरांचे पालन करतो आहे. तुम्हाला उगाच गंमत वाटते आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
असे कसे?
दुसर्यांना तुच्छ लेखणारे लोक न्यूनगंडाने पिडीत नसतात हा निष्कर्ष कसा काढलात कोणजाणे? तुच्छ लेखण्याचा आणि न्यूनगंडाचा संबंध नाही. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत या गैरसमजाशी संबंध किंवा फुकाच्या आढ्यतेशी संबंध वाटतो. आपल्याला कोण खतरनाक वाटते याबाबत माझे आणि आपले मतभेद असू शकतात.
असे कसे? या गोष्टी स्वतःला हव्या तशा ट्विस्ट केल्या जात आहे त्याचीही गंमत वाटते. ज्याला आपण परंपरा म्हणताय त्याला याच धाग्यात अंधश्रद्धा म्हटले गेले आहे याकडे दुर्लक्ष झाले का डोळेझाक?
बरे झाले सांगितलेत पण इथल्या तथाकथित विज्ञानवाद्यांच्या मते प्रतिष्ठितांच्या वागण्यामुळे देवधर्माला (इथे ज्योतिषाला) प्रतिष्ठा मिळण्यात मदत होते, हे ही समजून घ्यावे. :-)
चिल्लर गोष्टी अनेक आहेत. देवळात जाणे, घरात देवापुढे दिवा लावणे, देव ठेवणे वगैरे. चिल्लर काय आणि बंदा रुपया कोणता हे कोणी ठरवावे.
या हिशेबाने, आई वडिलांची इच्छा म्हणून कधीकाळी देवळात जाणे, प्रसाद खाणे, सत्यनारायणाची पूजा घालणे, उपास करणे, कन्यादान करणे वगैरे वगैरे; आई-वडिलांची इच्छा म्हणूनच चुकीचे किंवा वाईट नाही. नाही का?
मला गंमत कसली वाटते हे आपल्याला अद्यापही कळत नसेल तर खेद आहे.
स्लिपरी स्लोप?
पत्रिका देण्यास किंवा शास्त्रोक्त लग्न करण्यास आमचे पोप/पंचायत/देवबंद/पॉलिटब्यूरो मान्यता देणार नाहीत.
मुलीस कर्मकांडात रस नसेल पण पत्रिका न देता रजिस्टर्ड लग्न केल्यास वारसाहक्कातून बाद होण्याची शक्यता असेल तर तत्त्वांना मुरड घालणे हा वैयक्तिक 'हिशोब' होईल. त्यावर इतरांनी टीका केल्यास ती ऐकून घ्यावी लागेल.
कल्चरल हिंदू किंवा कल्चरल ख्रिश्चन असण्यात केवळ आहार, वेशभूषा, इ. 'चूक/बरोबर' नसलेल्या निर्णयांचा समावेश व्हावा, उदा. पुरणापोळी खावी की केक? ज्या कृती चूक असल्याचे ज्ञात आहे त्या करणारे रूढिग्रस्तच म्हणावे लागतील.
इलाज नाही
असे नसून ज्यांना आपल्याला तुच्छ लेखले जात आहे असे वाटते आहे ते बहुधा न्यूनगंडाने ग्रस्त आहेत असे मला सुचवायचे होते. त्यांना बहुधा पॅरनॉइया झाला असतो. हे विज्ञानवादी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत (ते आहेतच ही गोष्ट वेगळी) असे त्यांना सारखे वाटत असते. आता ह्या वाटण्याला काही इलाज नाही.
फक्त परंपरांचे परंपरांचे पालन करणे, निर्वहन करणे ही गोष्ट वेगळी आहे. उदा. शास्त्रोक्त पद्धतीने लग्न केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मला वाटत नाही. गणपतीची निर्जीव मूर्ती दूध पिऊ शकते असे मला अजिबात वाटत नाही. पण मी गणपत्ती बाप्पा मोरया केवळ एक कल्चरल हिंदू म्हणून करत असतो. नाइलाज म्हणून पत्रिका दाखवणारा नास्तिक वर हा मुळात एक नर असतो. त्याला मादी हवी असते. मला पत्रिका बघायची नाही असे स्पष्टपणे सांगूनही पत्रिका मागितली जाऊ शकते. अशावेळी मुलीकडे बघायचे की पत्रिकेकडे की विज्ञानाकडे :) ? ( नाही, नाही! मी विज्ञानवादी आहे. अशा पत्रिका बघणाऱ्या स्थळाला मी नाकारायलाच हवे. जागा हो! अरे त्यामुळे ज्योतिषाला प्रतिष्ठा मिळेल, असे डायलॉग मारायचे का? अशाने कसे होईल :)
चुकीचे नक्कीच नाही. मी (एक कल्चरल हिंदू) तर अशा समारंभांकडे परंपरांचे म्यूझियम म्हणून बघतो. मला ह्या म्यूझियममध्ये जायला आवडते. पण ह्याचा अर्थ क्युरेटर ह्या परंपरांमागची जी कहाणी मला सांगतो आहे त्या कथांवर, भाकडकथांवर माझा विश्वास आहे असा बिलकुल होत नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
प्रीचिंग टू द कनवर्टेड
जे आपल्याला विरोध करतात ते नेमका कशाला विरोध करताहेत हे जाणून न घेता त्यांना न्यूनगंड आहे असा परस्पर निर्णय घेणे हे अयोग्य आहे एवढेच म्हणते. या चर्चेत चालणारे "ऍंड वी ट्विस्ट, वी ट्विस्ट" पाहता विरोध करणारे सर्वच अंधश्रद्धाळू किंवा विज्ञानवादालाच विरोध करणारे आहेत असे जाहीर केल्याचे दिसते आहेच. हा हेकटपणा कंटाळवाणा आहे.
हो ना! गणपतीची मूर्ती दूध पिते असे मलाही वाटत नाही तर मग "गणपती दूध पित नाही" अशा बाळबोध लेखनाने इथल्या लोकांना बेजार करू नका असे म्हटले तर काय बिघडले? त्यात कोणता न्यूनगंड दिसतो तुम्हाला? आपली वेळ आली की परंपरा आणि दुसर्याची ती अंधश्रद्धा असे तर नाही ना.
पत्रिका मागितली म्हणून दिली इतकाच हिशेब असतो का? समजा, पत्रिका जुळते परंतु दोष आहे - शांती करून घ्यावी लागेल, नागबळी-काकबळी द्यावे लागतील (मला यातले फारसे काही माहित नाही पण अशी शांती, बळी करता येतात असे मानू. छट! असे नसतेच काही असे म्हणून टाळू नये.) असे सांगितले तर काय करणार? पत्रिका जमत नाही तुम्हाला मंगळदोष आहे, त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे सांगितले तर काय करणार. नर-मादी वगैरे ठीक आहे हो पण रुढींपुढे मान तुकवावी लागते हे आपण मान्य केलेत हे बरे झाले. प्रतिष्ठितांच्या अशा वागण्यामुळेच अंधश्रद्धेला खतपाणी मिळते याबद्दल काय म्हणता.
"आमचा विश्वास नाही पण तुमचा आहे" या विचारसरणीचाच कंटाळा येऊ लागला आहे हेच सांगायचे आहे. जर उपक्रमावर अशी देवभजनी लागलेली, ज्योतिष मानणारी, दत्तनामाचा जप करणारी माणसे कमी आहेत त्यांना साजेसे लेख येऊ दे, मऊ लागले म्हणून उगीच खणत राहू नका (पक्षी: पिकवू नका, धिंगाणा घालू नका) असे सांगितले तर तुम्हाला न्यूनगंड दिसतो हे खेदजनक आहे.
कंटाळा येणे वैयक्तिक
तिथे "गणपती दूध पित नाही" असे म्हणणे केवळ सिंबॉलिक असू शकते ना. एखाद्याचा गणपती दूध पित असल्यास त्याला पिऊ द्यावे असे तुम्हाला सुचवायचे आहे का.
जोरात हसणार! हाहाहा!
नर-मादी वगैरे ठीक आहे हो पण रुढींपुढे मान तुकवावी लागते हे आपण मान्य केलेत हे बरे झाले.
मान तुकवावी लागते असे मी कुठेही म्हटलेले नाही. लहान मुलांना बरे वाटावे म्हणून आपण त्यांच्या काही गोष्टी ऐकतो. तसेच हे. आता लहान मुलांसाठी गणपती दूध पितो असे मान्य करावे लागेल तर.
प्रतिष्ठितांच्या अशा वागण्यामुळेच अंधश्रद्धेला खतपाणी मिळते याबद्दल काय म्हणता.
प्रतिष्ठित असे वागतात म्हणजे कसे वागतात हे अजून निश्चित झालेले. कल्चरल हिंदू म्हणून वागल्याने, वावरल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळत नाही.
कंटाळा येणे किंवा उत्साह वाटणे हे अत्यंत वैयक्तिक आहे. इथे विज्ञानवाद्यांनीच नमते घ्यायला पाहिजे अशी एक भूमिका दिसते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"