मार्टिन गार्डनर यांचे निधन

झाले. रविवार २३ मे २०१० या दिवशी वयाच्या ९४ व्या वर्षी
(१९१४-२०१०) ते निवर्तले.हे वृत्त RDF संस्थळावर कळले.
.
सायंटिफिक अमेरिकन मासिकातील "मॅथेमॅटिकल गेम्स" स्तंभाचे लेखक म्हणून मार्टिन यांचे नाव प्रथम वाचले.सोपी भाषा, लहान आणि नि:संदिग्ध, सुस्पष्ट विधाने यांमुळे गार्डनर यांचे लेखन मला आवडते.एकदा वाचले की वाक्याचा अर्थ स्पष्ट कळतो.
गणिती मनोरंजन(मॅथेमॅटिक्स फ़ॉर एंटरटेनमेंट) या विषयाचे ते अध्वर्यू होते.त्यांचे सायंटिफ़िक अमेरिकन मधील सदर वाचून लालित्यपूर्ण कोडी लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि त्या दिशेने थोडा प्रयत्‍न केला.
स्केप्टिकल एनक्वायरर या नियतकालिकात गार्डनर यांनी भ्रामकविज्ञान(स्यूडोसायन्स) विरोधात सातत्यान पुष्कळ लेखन केले.मात्र अशा लेखनात वेळ वाया जातो असे त्यांचे मत होते.
गार्डनर यांच्यावरील मृत्युलेखनात जेम्स रॅंडी लिहितात,"...मार्टिनला शांतपणे मृत्यू आला.कसल्या वेदना भोगाव्या लागल्या नाहीत.मार्टिन गेला. माझे विश्व थोडे अंधारमय झाले."
गार्डनरनां जे कधीच भेटू शकले नाहीत असे माझ्यासारखे त्यांचे अनेक चाहते म्हणतील,
" मार्टिन गार्डनर गेले. तरी त्यांच्या पुस्तकांतून आम्हाला नेहमीच प्रकाश मिळत राहील."

Comments

अरेरे

मार्टीन गार्डनर यांच्या मनोरंजक गणिती पुस्तके नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या स्केप्टीकल लिखाणांपैकी एक म्हणजे सायन्स गूड ब्याड आंड बोगस हे विज्ञातील गैरप्रकारांवर प्रकाश टाकणारे महत्वाचे पुस्तक होते. ज्याप्रमाणे धर्मकल्पनांमुळे मिथ्याविज्ञान उभे राहते (क्रिएशनिज्म, गायीच्या मलमूत्राचे विज्ञान) तसेच ते आयडियॉलॉजी (कम्युनिस्ट, नाझी) मुळे देखिल ते उभे राहिले होते हे त्यांच्या पुस्तकातून मला कळले. हल्ली ऑरगॉन यांनी लिहिलेल्या विज्ञानातील गैरप्रकारातून मार्टिन गार्डनर यांची आठवण झाली होती.

प्रमोद

अच्छा!

" मार्टिन गार्डनर गेले. तरी त्यांच्या पुस्तकांतून आम्हाला नेहमीच प्रकाश मिळत राहील."

विचारूनही जे मिळाले नव्हते त्यातल्या काही गोष्टींच्या प्रकाशाचे मूळ आता लक्षात आले. ;)

आपला
ढापोपंत

गुंडोपंत हे नाव तर अगदी फुलटॉस

अहो, गुंडोपंत नावाची अशी टेस्टलेस विडंबने तिकडे शोभतात!
आणि तुमचे गुंडोपंत हे नाव तर अगदी फुलटॉस आहे. :):):)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

इकडूनच

नावाची विडंबने इकडूनच तिकडे गेली आहेत!

फार फार पूर्वी म्हणजे प्राचीन काळी, येथे सर्कीट नावाचा एक झकास आयडी राहात असे.
त्याने यांची सुरुवात केली होती. (सर्कीट तोगडिया नावाने)

नंतर प्रशासनाने इतर कारणास्तव त्या आयडीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली. :(

आपला
गुंडोपंत

मनोरंजक आणि विचारप्रवर्तक कोडी

श्री. गार्डनर यांची कोडी मनोरंजक आणि विचारप्रवर्तक असत. म्हणजे अजून आहेत!

मार्टिन गार्डनरविषयी आणखी थोडे....

शेवटची काही वर्षे सोडल्यास गेली 50-60 वर्षे मार्टिन गार्डनर सातत्याने लेखन करत आले होते. त्यानी लिहिलेल्या 60-70 पुस्तकाबद्दल, शेकडोंनी लिहिलेल्या लेख व परीक्षणाबद्दल 2-4 परिच्छेद नक्कीच पुरणार नाहीत. 1954 साली त्यांनी लिहिलेल्या Fads and Fallacies in the Name of Science या पुस्तकापासून आधुनिक चिकित्सकांच्या चळवळीची मुहुर्तमेढ झाली असे म्हणण्यास हरकत नसावी.
मागे वळून पाहिल्यास गार्डनर यांनी 95 वर्षाचे आयुष्य समाधानाने जगल्याचे लक्षात राहील. विसाव्या शतकातील उत्तरार्धात त्यांनी अनेक विषयावर टिप्पणी केली, लेख लिहिले. व जेथे जेथे विसंगती होती त्यावर भाष्य केले. मुळात त्यांना ‘विज्ञान लेखक’ असे म्हणणे चुकीचे ठरेल. गार्डनर यांचा आवाका फार मोठा होता. Alice in Wonderland या लुई कॅरॉलच्या पुस्तकातील प्रत्येक पानावर सटीप (annotation) लिहून हे पुस्तक केवळ फुटकळ मनोरंजनासाठी नव्हे तर त्यामागील गणीतीय आशयसुद्धा तितकाच अभ्यासयुक्त आहे, हे दाखवून दिले. त्याच प्रमाणे Snark, the Ancient Mariner, Casey at the Bat, the Innocence of Father Brown, Night Before Christmas या पुस्तकावरसुद्धा त्यांनी सटीप लिहिलेले आहेत. त्यांची The Flight of Peter Fromm ही आत्मचरित्रात्मक कादंबरीसुद्धा वाचनीय आहे. The Encyclopedia of Impromptu Magic या जादूविषयक कोशाबरोबरच गणीतीय कोड्यांची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिले आहेत. 1938-1995 पर्यंतच्या त्यांच्या लेखन साहित्याचा संग्रह The Night is Large या पुस्तकात मिळेल. लहानांसाठी Humpty Dumpty या मासिकाचे संपादन ते करत होते.
1914 साली जन्मलेले गार्डनर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लढावू जहाजावर काम करत असतानाच नाविक दलासाठीच्या वार्तापत्राचे संपादक म्हणून काम करत होते. जर्मन U बोटीच्या वाताहतीसाठी असलेल्या किलर ग्रुपमध्ये त्यांचा सहभाग होता.
शिकॅगो विद्यापीठातील हायस्कूलच्या परीक्षेनंतर गार्डनर यांना खरे तर Caltech येथे भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचा होता. Caltechच्या प्रवेशासाठीच्या काही अटी ते पूर्ण करू न शकल्यामुळे शिकॅगो विद्यापीठातून फिलॉसॉफी ऑफ सायन्स याविषयाचा अभ्यास केला व पदवी प्राप्त करण्याच्या आधीच त्यांनी आपण पूर्ण वेळ लेखक व्हावे असा निश्चय केला. मार्टिन गार्डनर यांना गणितशास्त्रातील कुठलीही पदवी वा उच्च पदवी मिळालेली नव्हती. परंतु मनोरंजनात्मक गणित ही एक ज्ञानशाखाच त्यांनी उभी केली. या विषयावर त्यांनी सातत्याने सायंटिफिक अमेरिकन या इंग्रजी मासिकामध्ये सुमारे पंचवीस वर्षे लेखन केले. त्यामुळे त्या कालखंडातील 2-3 पिढ्यांना गार्डनर यांचे लेख म्हणजे बौद्धिक मेजवानी ठरत असे. गणीतीय कोडी, फ्लेक्सॉगॉन्स, पॉलिमिनोज, सोमाक्यूब्स, टॅनग्रॅम्स, पेनरोज टैलिंग, फ्रक्टल्स, ओरिगामी, इ.इ. प्रकारच्या माध्यमातून गणिताविषयी रुची त्यांनी उत्पन्न केली.
जरी ते स्केप्टिकल ग्रुपसाठी लेखन करत असले तरी ते स्वत:ला नास्तिक वा मानवतावादी म्हणून घेण्यास तयार नव्हते. त्यांचा परमेश्वर स्पिनोझाचासुद्धा नव्हता. विलियम जेम्स यांच्या Will to Believe याचा पगडा गार्डनरवर होता. त्याच्या मते विज्ञानाशी सुसंगत अशा श्रद्धा बाळगायला हरकत नाही. मात्र न्यू एज, परामानसशास्त्र, सायकोकिनेसिस यासारख्या भंपक प्रकारांना त्याचा संपूर्ण विरोध असे. जेम्स रँडीबरोबर राहून त्यांनी अशा फॅडच्या विरोधात चळवळच उभी केली.
गार्डनरबद्दल लिहिण्यासारखे भरपूर आहे. कदाचित त्यांचे चाहते वा तज्ञ याविषयी नक्कीच लिहितील.

वा!

अशी असावी ओळख!

मस्त लिहिलेत प्रभाकरराव - भरपूर माहिती - पुस्तकांची नावे!
अगदी आवडले.
धन्यवाद!!

आपला
गुंडोपंत

सायंटिफिक अमेरिकन

सायंटिफिक अमेरिकन मासिकाने गार्डनर यांच्या स्मरणार्थ काही लेख इथे ठेवले आहेत.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

 
^ वर