भ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला.
आजच एका समाजसेवी संस्थे कडून एक मेल आला. महाराष्ट्रात महिलावरील अत्याचार नवीन नाही. आपण सर्व महिलाच सन्मानासाठी, त्यांचा न्यायासाठी काम करत आहोत. कुटुंब अर्थ सहाय्य योजना विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे. तुमचे आमचे लक्ष नसल्यामुळे कोट्यावधी रुपयाची योजना धूळखात पडून आहे. तुम्ही जरा लक्ष दिल्यास हजारो विधवा महिलांना न्याय मिळणार आहे. एकेका जिल्ह्यात २-२- कोटीचे अनुदान शासकीय कर्मचार्यांच्या लालफिती गलथान कारभार मुळे गेल्या ५ वर्षा पासून पडून आहे. भ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला.
विधवा होण हा स्त्री चा दोष मानणे ही आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीचा सर्वात मोठा दोष आहे.आणि ज्यांचे नवरे जिवंत त्याच स्त्रिया ह्या विधवांचे अस्तित्व नाकारतात हे दुर्देवी आहे. एकदा नवरा निधन पावला की त्या स्त्रीची किमत समाज शून्य करून टाकतो. पण हीच विधवा नवऱ्याच्या निधना नंतर त्याच्या वंशाच्या दिव्यांना कितीही संकट आले तरी ती दूर करून मोठी करते, उच्च शिक्षण देते.स्वतः एक वेळ उपाशी राहते पण मुलांना कमी पडू देत नाही.त्याच बरोबर स्वतः;च्या शीलाचे संरक्षण करण्याची घराण्याचे नाव इज्जत राखण्याची अवघड जबाबदारी सुद्धा पर पाडते. पण या सत्या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून समाज तीला जीने मुश्कील करतो. या त्रास देण्यात पुरुषा पेक्षा तिच्या आसपासच्या विवाहित स्त्रियाच आघाडीवर असतात. विधवा स्त्री जरी यांच्या नवऱ्यास सद्हेतूने बोलली तरी या विवाहिता तिच्या विरुद्ध वाटेल त्या अफवा पसरवतात आणि आपल्या नवऱ्यास सुद्धा भांडत बसतात.जसा कांही यांचा नवरा ती विधवा पळवून च नेवू लागली होती. स्त्रीयांच्या उत्सवाचे अनेक सण पूर्वपरंपरेने आयोजित करण्यात येतात, पण स्त्री विधवा झाली की या सणांना येण्यास बंदी घातली जाते . हेच मुळात चूक आहे.मकरसंक्रांत सारख्या स्त्रीच्या महत्वाच्या सणाला तीला डावलले जाते.खर तर नवऱ्याच्या माघारी मुलांची आई बरोबरच वडिलांची जबाबदारी पाळणाऱ्या या विधवा या हळदी-कुंकुवाच्या खऱ्या हक्कदार आहेत. पण याच वेळी तिची आर्थिक सामाजिक शारीरिक पिळवणूक केली जाते. पण ती या सर्वाना पुरून उरते.
या उलट, पुरषाचे नवऱ्याचे वागणे, बायको मृत झाली की तिच्या मासिक श्राद्धा ची ही वाट न पाहता हे महाशय लग्न करून मोकळे होतात. याला कारण की आई विना पोरांचे हाल होतात, म्हणून पुन्हा लग्न
केले असे सांगतात . आई विना मुल पोरकी होतात म्हणून पुरुषाला लग्नाची परवानगी. हाच न्याय स्त्रीला का लावला जात नाही. बापा विना पोर उघड्यावर पडतील म्हणून स्त्रीचे लग्न लावून दिले जात नाही. असा कसा धर्म आणि धर्मशास्त्र. तर पुरुष हा कमावता असूनही पुन्हा लग्न करतो. पण स्त्रीला उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने लग्न करू नये असे आमचे धर्मशास्त्र सागते आहे याचा आधार घेत स्त्रिया वर अन्याय २१ व्या शतकात ही चालूच आहेत. या धर्मशास्त्र लिहाणार्यांच्या
शहाणपणा विषयी यामुळे शंका येते. दोनशे वर्षा पूर्वी सती प्रथेतून स्त्रियांची सुटका करणाऱ्या राजा राम मोहन रोय मुलीना शिक्षण देणाऱ्या महात्मा जोतीबा फुले यांच्या क्रांतिकारक
विचारांचा पुढे आपण किती मागासलेले आहोत हे समजते. आज परत एकदा अशा विचारवंतांची गरज आहे.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
Comments
योजने ची माहीती द्या.
ठणठणपाळ,
अतिशय कळकळीने लेख लिहिलाय,
योजने बद्दलची माहितीसुद्धा लिहिलीत तर अधिक चांगले होईल.
कागदा वरच्या सरकारी योजना सामान्यांपर्यंत पोचतच नाहीत हे त्यांच्या असफलतेच्या कारणांपैकी एक मोठे कारण आहे. उपक्रम सारख्या संकेतस्थळांचा यासाठी चांगला उपयोग होउ शकेल. या करता एखादा धागाही सुरु करायला हरकत नाही.