सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने
प्रति, 06/05/2010
श्री.माननीय मुख्य न्यायधीश
मुंबई हाय कोर्ट मुंबई
विषय :- विजेचा क्रिकेट सामन्यातील दुरुपयोग थांबविणे बाबत.
सन्मानीय न्यायधीश महोदय,
या जनहित याचिकेद्वारे द्वारे मी आपणास विनंती करतो की आज महाराष्ट्राची विजेची गंभीर समस्या पाहता आणि १० ते १५ घंटे लोडशेडिंग असताना क्रिकेटचे सामने रात्री विजेचा वापर करून विजेची नासाडी करण्यास आपण बंदी घालावी ही विनंती आज प्रत्येक ठिकाणी असे रात्रीचे सामने आयोजित करून वीज नासाडी केली जाते. महाराष्ट्रा शासन MSEB यांना या बाबत प्रतिवादी करावे , ही विनंती.
सदरील पत्राची जनहित याचिका म्हणून दाखल घेण्यात यावी.ही नम्र विनंती.
Yours faithfully
Thanthanpal parbhanikar
ENCLOSER’S OPINION OF AFFECTED CITIZENS OF LOADSHEDING ELECTRICITY
tumchya matasi me sahmat aahe ki load shedding suru astana IPL chi kahi garaj naahi.
~*~Dhiraj~*~
2) नक्कीच, रात्रीच्या प्रकाशझोतात खेळवल्या जाणार्या सामन्यांवर माझा सुद्धा बहिष्कार आहे!
send@vishaltelangre.tk>
NEWS IN SAKAL PAPER
'एमपीएल' सामने डी. वाय. पाटील स्टेडियमवर
सकाळ वृत्तसेवा Thursday, May 06,
Thursday, May 06, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: mpl, cricket, pune, sports
पुणे - 'ट्वेंटी-20 क्रिकेटची पंढरी' असा लौकिक अल्पावधीत निर्माण केलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रकाशझोतातील सामने, निओ क्रिकेटवर थेट प्रक्षेपण, बक्षीस रक्कमेत घसघशीत वाढ, अशा वैशिष्ट्यांसह दुसऱ्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगला (एमपीएल) 17 मे पासून प्रारंभ होत आहे. उपांत्य सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने या स्पर्धेला वेगळी झळाळी प्राप्त होणार आहे.
आपण ही अशी याचिका पोस्ट कार्डवर पाठवावी ही नम्र विनंती.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
Comments
दोन वर्षे ३६ आठवडे आधी
वरील विषयावर दोन वर्षे ३६ आठवडे आधी निषेध नोंदवला आहे...त्याच मताचा पुनरुच्चार करतो..
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
न क्कीच...पाठवणार..
महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************
नक्कीच...पाठवणार..ये हुवी कुछ बात.. अजुन काय करता येईल?अश्या पध्दतीने याचीका घेतली जाते का?
शैलु..
याचिका
हो. अशी पोष्टकार्डावरील याचिका घेतली जाते.
हा उपाय मलाही मान्य आहे. मीही पत्र पाठवीन.
त्यातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही पण प्रयत्न म्हणून करायला हरकत नाही.
जेव्हा ती याचिका सुनावणीला येईल तेव्हा सरकार त्याचे वेगवेगळ्या मार्गांनी समर्थन करील.
त्यातील काही मुद्दे किती वीज वापरणार, तुटवडा किती, फक्त मॅचला बंदी कशी घालता येईल असे असतील.
माझ्या मते असे विशिष्ट उधळपट्टीचे मुद्दे मांडण्यात अर्थ नाही. वीज पुरवठ्याच्या बाबतीत भेदभाव का? हाच मुद्दा योग्य आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
करेक्ट...!
>>>वीज पुरवठ्याच्या बाबतीत भेदभाव का? हाच मुद्दा योग्य आहे.
करेक्ट.
-दिलीप बिरुटे