अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी

अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी महाराष्ट्राला देण्याची तय्यारी नाही.
फक्त उत्सव साजरे करा बाकी कांही केले नाही तरी चालते असा या मुंबईतील मराठी नेत्यांचा समज झालेला आहे.उभा महाराष्ट्र पाणी आणि वीजे अभावी जळत आहे पण या नेत्यांना याची फिकीर नाही. यांना फक्त मिडिया समोर चमकायचे आहे. लोकांना एक वेळचे जेवण मिळत नसताना हे पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धा आयोजित करत आहेत. जनाची नाही तरी मन से ची लाज वाटायला पाहिजे. गेल्या ४० वर्षात मराठी च्या भल्यासाठी यांनी फक्त घोषणा बाजी केली भार्ष्टचार कमी पडला आता जनतेचे रक्त जमवून गिनीज बुक मध्ये नाव येण्यासाठी तर पुरण पोळीचा विक्रम थेरे करत आहेत.

आम्हाला तुम्ही पुरणपोळी उत्सव करतात म्हणून राग नाही राग आहे तो तुमच्या दुपट्टी वागण्याचा राग आहे. उभ्या महाराष्ट्रात आज वीज नाही पिण्यास पाणी नाही.आणि मुंबईत तुम्ही दीवस रात लाईट च्या प्रकाशात भ्रष्ट क्रिकेटचे सामने जल्लोषात भरवतात. हाच सामना दिवसा उजेडात ठेवून कांही खेड्यांच्या घरातील एक मिणमिणता दिवा उजळावा असे वाटले नाही. रक्तदानाचा विक्रम केलात अभिमान आहे.पण सामान्य जनतेला त्याचा काय फायदा झाला याचा अंतर्मुख होवून विचार करा. राजाचे धोरण जनतेच्या हिताचे पाहिजे पण येथे फक्त नेत्याच्या मोठेपणाचा विचार केला जातो.
स्वताच्या नाकर्तेपणाची जगभरात बदनामी होवू नये म्हणून आंतरराष्ट्रीय शहर म्हणून सर्व राज्याची वीज चोरून मुंबईत रोज दिवाळी साजरी करतात. हा अन्याय काय म्हणून आम्ही सहन करावा? आता शेतीला पाणी कापून तुम्हाला रेन डान्स करण्याकरता पाणी पुरवठा केला जातो. जरा कोठे गेरसोय झाली की मिडिया समोर तुमचा धिंगाणा चालू चालू असतो.आमच्या रोज मरणावर तुम्ही शेतकऱ्यात हिम्मत नाही म्हणून आत्महत्या करतात असे अकलेचे तारे तोडतात. जरा मुंबईच्या बाहेरचे जगात फक्त ८ दीवस वीज पाण्या शिवाय राहून दाखवा तुमचे पाय धरतो. अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी महाराष्ट्राला देण्याची तय्यारी नाही.

आपण बेळगावच्या नावाने गळे काढून रडतात पण विदर्भ गडचिरोली येथील आदिवासी यांची दुखे: दिसत नाही. आत्महत्या दिसत नाही. आधी घर नीट सांभाळा नंतर बेळगाव चा विचार करा. या हरलेल्या लढाईचा बहाणा करून जनतेला मूर्ख किती दिवस बनवणार? आणि मुख्य बात बेळगाव हे कांही पाकिस्थानात नाही ते भारतातच आहे तेथे बेळगाव सुखी आहे.फक्त कांही लोकांच्या राजकारणा करता पोटापाण्या करता हा प्रश्न तेल ओतून सतत ज्वलंत कसा राहील असे पाहीले जाते. मी बेळगाव ला हमेशा जातो महाराष्ट्राच्या कोणत्याही बकाल शहरा पेक्षा बेळगाव चांगले विस्तारले आहे. अजूनही शांत आहे. पश्चिम महाराष्ट्रा सारखी गुंडगिरी नाही.
लोकसत्ता रविवारचा सुवर्ण महोत्सव अंक दिनाक २५/०४/२०१० पहा प्रत्येक क्षेत्रात तुमच्या नाकर्तेपणाचा पुरावा सर्व पुराव्यानिशी वाचा. पण महोत्सव साजरा करण्या पासून तुम्हाला वेळ मिळाला तर पाहिजे?
स्वताच्या शोकां करता वाटेल तसा खर्च करता येतो.मल्टिफ्लेक्स मध्ये ५० रुपयाचे २० ग्राम पोपकोर्न आरामात खाता ,कॉकाकोलाचा टिन पक्क १०० ला आरामात पितात पण तेच शेतमालाचे भाव जरा वाढले की मिडिया आणि तुमचा महागाई वर तमाशा सुरु असतो. घोड्यांच्या शर्यती चालतात, कब्रे डान्स जोरात चालतो, पण खेड्यातील बैलांच्या शर्यती, तमाशा चालत नाही. कोर्टातून मूर्ख मानवतावादी,पांढरपेशे समाजसेवक,ढोंगी प्राणी प्रेमी बंदी आणतात.बालकामगारांचा हिडीस डान्स चालतो पण पोट भरण्यासाठी काम करणारा बालकामगार चालत नाही. घाशीराम कोतवाल, गिधाडे, सखाराम बाईंडर चालतात पण दादा कोंडकेचे सिनेमे चालत नाही.पण हे लोक शहरातील बदमाशी बद्दल तोंडाला गांधीछाप चिकट टेप लावून गप्प बसतात. लाचलुचपत,भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करा. त्यांना तुरुंगात टाका त्याची वेध अवेधे मालमत्ता जप्त करण्या करता कोर्टात जात नाहीत.कारण ही व्यवस्था त्यांच्या फायद्याची आहे, त्या व्यवस्थेचे ते स्वतः: एक कडी आहे. हे मान्य करण्याची हिम्मत नाही.
आता तुम्ही मराठीच्या भावने शिवाय दुसरे एक तरी कारण आम्ही महाराष्ट्रात का राहावे या करता सांगाल का? आणि बेळगाव महाराष्ट्रात का पाहिजे.
--
Thanks & regard,

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

आपल्या विचारांशी सहमत.

एकाच महाराष्ट्रात कितीतरी परस्परविरोधी गोष्टी दिसतात.
असो, आपल्या लेखातील मते पटणारीच आहेत.
अजून येऊ द्या....!

अवांतर : शिर्षकाच्याबाबतीत जरा मनावर घ्या बॉ...! शिर्षक लैच लांबलचक होतं राव....!

- दिलीप बिरुटे

पुर्ण सहमत

आपले सर्वच लेख मी नेहमी वाचतो आणि लेखातील विचार मला पटलेले आहेत.

तळमळ पटते

तुमच्या विचाराकडे थयथयाट म्हणून दुर्लक्ष होतांना दिसते आहे. पण तरीही विचारातली तळमळ आणि वास्तवता पटते. ज्यांना उद्देशून तुम्ही हे लिहीता त्यांची कातडी गेंड्याची आहे. तुमच्या आमच्यातलीच काही गरीब मेंढरं मात्र या गेंड्यांकडे आशेने डोळे लाऊन बसण्यात धन्यता मानत आहेत हे दूर्देव. आपण एकसंघ महाराष्ट्राचे समर्थन करु हे मान्य पण त्यासाठी किमान पोट तरी भरलेले पाहीजे.

अगदी योग्य विचार मांडले आहेत

महाराष्ट्रात इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी कोणाही राजकारण्याला अथवा उद्योगपतीला तिकडे लक्ष द्यावे वाटले नाही...वाटणारही नाही कारण त्यात पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही नाही...होऊ द्या तरुण विधवा शेतकऱ्यांचा पलटणी तयार...काय करणार त्या ? ह्या हरम्खोरानाकडे क्रिकेट मध्ये ओतायला हजारो कोटी रुपये आहेत पण महाराष्ट्राला पोसणाऱ्या शेतकर्यासाठी काहीही नाही...ना पैसा, ना वीज, ना पाणी...काय करायचे त्यांनी ? आणि योजनांचा लाभ हे राजकारणी शेतकरीच घेतात....गरीब उघड्यावर. उत्पादन झाले नाही कि किमती वाढतात आणि मग बोंबाबोंब सुरु होते...किमती कमी करा म्हणून...गावामध्ये शिक्षित लोक फारसे नसल्याने वृक्षतोड होते, पाऊस पडत नाही...शेतीला पाणी नाही...आणि यावर ताण कोणालाही याची काळजी वाटत नाही...आपली मात्र नुसतीच तगमग होत राहते.

तळमळ की मळमळ

श्रीमान ठणठणपाळ,

आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे कळत नाही. तुमचा राग नक्की कोणावर आहे. मुंबईवर की महाराष्ट्रावर? आतापर्यंत मुंबईचे असे किती मुख्यमंत्री झाले? ते सोडा हो, आतापर्यंतच्या सर्व मंत्रीमंडळांमध्ये किती मुंबईचे मंत्री होते. आयपीएल सामने भरविणारे नेते कुणीकडचे आहेत? शेतकर्‍यांना आळशी म्हणणारे मुख्यमंत्री ग्रामीण महाराष्ट्राचेच होते. वॉटर पार्क्स व मल्टीप्लेक्स् महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत हे आपणांस माहित नाही का? उर्वरित राज्याची वीज चोरून मुंबईसाठी वापरली जाते हे विधान कशाच्या आधारावर करता? मुंबईसाठी वीजेचा दर आपणांस माहीत आहे का? मी स्वतः मुंबई व् उर्वरित महाराष्ट्र असा भेद करत् नाही. परंतु आपले लिखाण असंबद्ध असल्याने केवळ वस्तुस्थिती निदर्शनास आणीत आहे.

मुंबईवरुन आपली गाडी महाराष्ट्रावर घसरली. बेळगावात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय व दडपशाही हा लोकशाहीच्या दृष्टीने गुन्हा नाहितर काय आहे? आता तुम्ही कर्नाटकी असाल तर मात्र तुमची मळमळ समजू शकतो. कृपया असंबद्ध मुद्दे मांडून बेळगावच्या विषयात कानड्यांची पाठराखण करु नका.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

जयेश

फारच बटबटीत मांडणी

भाई ठणठणपाळ
आपली मांडणी फारच आक्रस्ताळेपणाची व बटबटीत असते. तुम्ही काय 'विद्रोही' वैगेरे आहात काय? तुमची सगळी मांडणी काळे व पांढरे या स्वरूपात असते. जर सामाजिक समस्यांवर तारतम्याने विचार केला तर बरं होईल. लेखाचा आशय, मांडणी, शीर्षक, शुध्दलेखन, तार्किक सुसंगती याच्याकडे लक्ष दिले तर फार बरं होईल. बाकी बेळगाववर कशाला घसरलात?

विदर्भ

http://mr.upakram.org/node/2235

येथे पूर्वी काही चर्चा झाली आहे.
बाकी ठणठणपाळ यांनी अभिनिवेश कमी करावा असे मलाही वाटते.

विचार योग्यच आहेत. विदर्भ मराठवाड्याला वेगळे व्हायचे असेल तर माझा पाठींबा आहे/विरोध नाही. कुणा १०५ हुतात्म्यांच्या आत्म्यांसाठी आज करोडो लोकांचे नुकसान होऊ नये.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

आपण माझे विचार तुमच्या विचारशक्तीने खोडू शकत नसल्याने मुख्य विषय

thanthanpal.blogspot.comबैरागी , माझी मांडणी बटबटीत असते मान्य आहे. तुम्हाला मिडीयाचा बटबटीत पणा कधी जाणवला नाही. समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्यान ३.५% लोक नेहमीच विद्रोही ठरवून स्वत:ची आत्मवंचना करून घेत असतात शुद्ध लेखन पेक्षा समाजातील विसंगती कडे लक्ष दिल्यास समाज अधिक सुखी होईल . बहुजनाला लुबाडून एशोआरामा च्या तुमच्या भ्रष्ट्र व्यवस्थेला सुरुंग लागत असल्यामुळे तुमच्या पाया खालची वाळू सरकत आहे. आणि लक्षात ठेवा जगाचा इतिहास याच विद्रोही विचारवंतानी बदललेला आहे. राहिला बेळगाव चा प्रश्न जरा उघड्या डोळ्याने पहा जे होणार नाही त्या गोष्टीच्या भूलथापा देवून COMMON MAN ची दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्ष बेळगाव ला नेहमी जात असल्या मुळे वास्तव सत्य मांडले. आपण माझे विचार तुमच्या विचारशक्तीने खोडू शकत नसल्याने मुख्य विषयाला सोडून लेखाचा आशय, मांडणी, शीर्षक, शुध्दलेखन, तार्किक सुसंगती यांना महत्व देत आहात

हे '३.५% तुम्ही' कोण?

ठणठणपाळ आण्णा, तुमचे 'विचार' योग्य असतात म्हणून आम्ही ते वाचतो.
याचा अर्थ त्यातील बटबटीतपणा आम्हाला जाणवत नाही असे नाही. हा भडकपणा टाळता आला तर बरे, शुद्धलेखनाकडे लक्ष दिल्यास उत्तम -असे सुचवल्याने तुम्हाला इतका राग यायचे काय कारण?

'तुम्हाला मिडीयाचा बटबटीत पणा कधी जाणवला नाही. 'असे विधान तुम्ही कशाचा आधारे केलेत? तो बटबटीतपणा आम्हाला जाणवतो आणि त्याचा तिटकारा वाटतो म्हणून, उपक्रमावर तसा बटबटीतपणा येऊ नये म्हणून तर उपरोक्त विनंती आहे. हे न समजून घेता तुम्ही अतार्किक विधाने करीत आहात.

'समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्यान ३.५% लोक नेहमीच विद्रोही ठरवून स्वत:ची आत्मवंचना करून घेत असतात ' या तुमच्या विधानातील हे ३.५% कोण? याचा तुमच्या 'दृष्टीने' खुलासा करावा म्हणजे आम्ही त्याअ ३.५% मध्ये मोडतो की नाही ते ठरवता येईल.

'बहुजनाला लुबाडून एशोआरामा च्या तुमच्या भ्रष्ट्र व्यवस्थेला सुरुंग लागत असल्यामुळे तुमच्या पाया खालची वाळू सरकत आहे. आणि लक्षात ठेवा जगाचा इतिहास याच विद्रोही विचारवंतानी बदललेला आहे.' अशी हास्यास्पद, सभाछाप गुळगुळीत वाक्ये फेकून तुम्हाला अशिक्षित लोकांना काही काळ झुलवता येईल पण इथे असणारे वाचक सुबुद्ध आहेत आणि त्यांना अशा आगलाव्या भाषेची गरज नाही. समस्त भारतीय समाजाच्या समस्या काय आहेत? त्याची पूर्ण जाणीव उपक्रमाच्या वाचकांना आहे. त्या समस्यांचे निराकारण कसे व्हावे? त्याबद्दल त्यांची (प्रत्यही उलटसुलट) मते आहेत. तुम्ही काही नाविन्यपूर्ण/ येथील वाचकांचे डोळे उघडणारे असे लिहीत आहात हा गैरसमज नको.

आपले विचार काय आहेत ते समजले आहे आणि ते खोडून काढण्याची कोणाला गरज वाटत नाही हे समजून घ्यावे. या समस्यांचे उत्तर म्हणून विदर्भ वेगळा करा, सीमाप्रश्नावरची हकाटी बंद करा येथपासून ते सगळ्या राजकारण्यांना एकसाथ गोळ्या घातल्या पाहिजेत इथेपर्यंत सर्व मते आम्हाला माहित आहेत. पण त्यांच्याशी आम्ही सहमत नाही ही आमची चूक आहे काय?

असे असेल तर आपण आपले लेख इथे लिहिण्यापेक्षा एखाद्या भडक प्रवृत्तीच्या वृत्तपत्रात छापावेत. तिथे तुम्हाला सहमतीचे प्रतिसाद मिळू शकतील आणि तुमची मळमळ शांत होईल.(असे शक्यतो येथील लेखकांना सुचवावेसे वाटत नाही पण येथील वाचकांबद्दल तुमची अशी एकांगी मते असतील तर असे सुचवण्यात काही गैर नाही.)

उपक्रम हे विचारांचे मुक्तपीठ असल्याने आपल्या लिखाणावर आलेले विरोधी प्रतिसादही पचवायची तयारी हवी.

व्वा...!

शुद्ध लेखन पेक्षा समाजातील विसंगती कडे लक्ष दिल्यास समाज अधिक सुखी होईल .

व्वा...! वरील वाक्याला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

>>>माझे विचार तुमच्या विचारशक्तीने खोडू शकत नसल्याने मुख्य विषयाला सोडून लेखाचा आशय, मांडणी, शीर्षक, शुध्दलेखन, तार्किक सुसंगती यांना महत्व देत आहात.

किंचित सहमत आहे. विचारांनी प्रतिवाद करता येईलही. पण, त्यासाठी मांडणी, शुद्धलेखन, तार्किक सुसंगती याकडे बोट करणे योग्य नाही असे वाटले. [शिर्षकाचा मुद्दा सोडून]

-दिलीप बिरुटे

किमान प्रयत्न तर करून बघा ना

बहुजनाला लुबाडून एशोआरामा च्या तुमच्या भ्रष्ट्र व्यवस्थेला सुरुंग लागत असल्यामुळे तुमच्या पाया खालची वाळू सरकत आहे.
'तुमच्या'? ठणठणपाळ, तुम्ही बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या दिसतात. कुठे नेत आहात विषय? तुमचे विचार कोणी खोडणार नाही हो. पण तुमची भाषणबाजी कमी कराल का? चौकात उभे राहून बोंबलल्यासारखे लिहू नका. उपक्रम हे व्यासपीठ त्यासाठी योग्य नाही, असे कुणी म्हटल्यावर तुम्हाला लगेच बहुजनांना लुबाडणे आठवावे! इतके सदस्य तुमच्यामुळे (शीर्षक, बटबटीतपणा) त्रस्त झाले आहेत. तेव्हा तुम्ही किमान प्रयत्न तर करून बघा ना.

प्रशासनाने शीर्षकाच्या लांबीवर मर्यादा घालायला हवी. ठरावीक शब्दसंख्या ओलांडल्या शीर्षकाची कटाई (ट्रिमिंग) व्हायला हवी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असहमत

भाई ठणठणपाळ,

१. आपण आपली मांडणी बटबटीत असते हे मान्य केले आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्या लिखाणात बदल कराल, अशी अपेक्षा आहे.
२. मला मिडीयाचा बटबटीतपणा जाणवला नाही, हे तुम्ही कशाच्या आधारे गृहीत धरत आहात? आणि आता आपल्या चर्चेमध्ये हे मध्येच काय घुसडले?
३. समाजाच्या भल्याचा विचार करणार्‍यांना विद्रोही ठरवणार्‍या लोकांची ३.५% टक्केवारी कोठून आणली? काय संशोधन वैगेरे केले आहे काय? जरा सांगा आम्हालाही. कार्ल मार्क्स, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांनी प्रस्थापित व्यवस्थेची आणि त्यावरील अभिजनांच्या वर्चस्वाची सप्रमाण, मूलगामी चिकित्सा केली होती. त्यामुळे त्यांना आपण विधायक अर्थाने विद्रोही म्हणतो. त्यांनी समाजपरिवर्तनाला केलेले योगदान महत्त्वाचे आहे. अर्थातच मी या अर्थाने आपल्याला विद्रोही म्हणणे शक्य नव्हते. कोणताही मूलगामी विधायक विचार न मांडता, स्वत:ची प्रमाणबुद्धी न वापरता, केवळ पूर्वग्रह बाळगून, एखाद्या घटनेबद्दल आक्रस्ताळेपणे मत मांडत राहणे या अर्थाने आपल्याला विद्रोही म्हटलेलं आहे. त्याला असलेली उपहासाची छटा तुमच्या लक्षात आलेली दिसत नाही. तुम्ही स्वत:ला पहिल्या अर्थाने विद्रोही समजत आहात असे दिसतंय. अवघड आहे... असो
४. "शुद्ध लेखन पेक्षा समाजातील विसंगती कडे लक्ष दिल्यास समाज अधिक सुखी होईल" हे तुमचं वाक्य टाळ्याखाऊ व आपली अप्रगल्भ मनोदशा दाखवणार आहे. मी तुमच्या लिखाणातील विविध दोष दाखवले होते. त्यापैकी अशुद्धलेखन हा एक दोष होता. आपण ज्या भाषेमध्ये लेखन करत आहोत व समाजातील विसंगती दाखवण्याचा दावा करत आहोत, त्या भाषेचा योग्य वापर करण्याच्या सूचनेमध्ये वाईट काय? तुमच्या लेखनातून असे ध्वनित होते की मला समाजातील विसंगतीपेक्षा शुद्धलेखन महत्त्वाचे वाटते, अर्थातच हे चूक आहे.
५. स्वत:चे दोष लपविण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे मराठी बोलीभाषेच्या आड दडला आहात. मला मराठी बोलीभाषेचे सौंदर्य व तिची स्वायत्तता मान्य आहे. याचा अर्थ प्रमाण मानल्या गेलेल्या भाषेची कशीही मोडतोड करायला परवानगी आहे, असे नाही. हे बारकाईने समजून घ्यावे. हल्ली स्वत:ला शुद्धलेखन जमत नसले की प्रमाण भाषा म्हणून आजची मराठी मान्य नाही, असे म्हणायची टूमच दिसतेय. आपला ही समावेश त्यातच करावा लागेल.
६. बाकी शुद्धलेखनाच्या जोडीला अन्यही दोष दाखवले होते. आपल्या लेखनातील आशयहीनता व तार्किक सुसंगतीचा अभाव याच्याविषयी आपण काय करणार?
६."बहुजनाला लुबाडून एशोआरामा च्या तुमच्या भ्रष्ट्र व्यवस्थेला सुरुंग लागत असल्यामुळे तुमच्या पाया खालची वाळू सरकत आहे." ही असली वाक्य कशाला लिहिता राव! बहुजनांना लुबाडून उभारण्यात आलेली भ्रष्ट व्यवस्था आमची कशी काय झाली? तुम्ही लिहिल्यामुळे तिला सुरुंग लागत आहे, असा तुमचा दावा असल्यास अतिशय हास्यास्पद व वास्तवाचे अजिबात भान नसलेला दावा आहे.
७. आता बेळगावचा प्रश्न. तुम्ही बेळगावला नेहमी जाता म्हणून सीमाप्रश्नाचा निकाल लावण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त झाला आहे काय? जर याचे उत्तर होकारार्थी असेल तर मग बेळगावमध्ये राहणार्‍या मराठी भाषिकांना हा अधिकार तुमच्यापेक्षा अधिक प्रमाणात प्राप्त होईल. ते शहर शांत आहे किंवा तिथे मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत, म्हणून तेथील मराठी जनांची केली जाणारी भाषिक गळचेपी कशी समर्थनीय ठरेल? तुम्हाला या प्रश्नांचे गांभीर्यच समजले नाही असेच म्हणावे लागेल.

उपक्रम हे विचारांचे मुक्तपीठ असल्याने आपल्या लिखाणावर आलेले विरो

thanthanpal.blogspot.com

उपक्रम हे विचारांचे मुक्तपीठ असल्याने आपल्या लिखाणावर आलेले विरोधी प्रतिसादही पचवायची तयारी हवी.

माझे ही तेच मत आहे. आपण मान्य केले धन्यवाद

विचारांवर बंदी द्यानावर बंदी या मुळेच भारताचे नुकसान झाले आ

thanthanpal.blogspot.com
विसुनाना तुमच्या मनात जे ३.५% आहेत त्यांचा आणि मी सांगत असलेल्या ३.५% चा संबंध नाही. हे ३.५% लोक म्हणजे जे व्यवस्थेचा गेरफायदा स्वतःच्या फायदा करून घेणारा वर्ग त्यात आपण येतो का नाही हे ज्याने त्याने ठरवावे . ( लेख इथे लिहिण्यापेक्षा एखाद्या भडक प्रवृत्तीच्या वृत्तपत्रात
छापावेत ) संगणक युगात कोणाच्या विचारांवर बंदी घालणे योग्य आहे का नाही यावर मी मत दिले तर अजून वाद होईल विचारांवर बंदी द्यानावर बंदी या मुळेच भारताचे नुकसान झाले आहे.

येथे लेख अवश्य टाका

ठणठणपाळ, तुमच्या लेखांवर विचार केला असता त्यात तथ्य असते असे अनेकांनी वर म्हटले आहे. याचबरोबर लेखांत बटबटीतपणा असतो असेही म्हटले आहे. म्हणजेच योग्य शब्दांत लिहिलेले (जसे, चपखल आणि लहान शीर्षक, लेखाला शेंडा-बुडखा वगैरे) लेख लोकांना आवडतीलच. आपल्या "टार्गेट ऑडिअन्स"ला ओळखणे लेखकाला यायला हवे. जर उपक्रमी सदस्य तुम्हाला काही सुचवत असतील तर तसा बदल लेखात करून बघा. लोकांना लेख अधिक आवडेल.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

लेखकाच्या परिपक्वते विषयी संशय येईल.

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************
हे ३.५% को णी मोजले?
लिखाणात तथ्य असते, व ते कित्येकांना माहीत असते. पण श्री ठणठणपाळ सतत राग काढत आहेत असे वाटते,प्रत्येक लेखात त्यांना अश्या प्रकारे सुचना मिळुनही ते काहीही बदल करायला तयार नाही.ह्यात लेखकाच्या परिपक्वते विषयी संशय येईल.तसा होऊ नये म्हणुन जर उपक्रमी सदस्य तुम्हाला काही सुचवत असतील तर तसा बदल लेखात करून बघा. ही सुचना आहे.बाकी ...मर्जी आपकी.

शैलु

एक मे महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव

एक मे महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव .मोठ्या शहरात जोरात साजरा होत आहे. आम्ही सुद्धा आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. कारण सरकारी उत्सवाला साजरा करण्या करता वीज बंद केली जात नाही. पण हाय घड्याळात सकाळचे ६ वाजले आणि लाईट गेली ती ११ वाजे ला आली त्या मुळे सकाळची देशभक्तीपर गाणे मेरे देश की धरती वगेरे ऐकण्याची संधी गेली. यामुळे उत्सव आहे असे वाटलेच नाही. आजकाल कोंबड ओरडण्याची वाट पहावी लागत नाही आमचे घड्याळ वीज जाणे येणे यावरच लावली जातात.
यापुढची सत्य घटना सांगतो.मुलाचा पुण्यातील IT कंपनीत काम करणारा मित्र आई-वडिलांना भेटण्यास बऱ्याच दिवसांनी गावाकडे आला होता. सकाळी गुल झालेली लाईट ११ वाजता आली. गप्पा मरत असताना लगेच घंट्या भरात वीज गुल. घामाच्या धारा सुरु. त्याने थोडा वेळ सहन केले. नंतर माझ्या कडे तावातावाने आला. काका , आता लाईट कधी येणार मी शांतपणे सांगितले ५.३ वाजता. तो चिडला , काका तुम्ही लोक इतके शांत कसे बसू शकता, लोक धिंगाणा करत नाही का? नेत्यांना , MSEB च्या लोकांना मारत का नाही. या ४५ डिग्री तापमानात पंख्या, कुलर शिवाय कसे राहतात . आमच्या कडे लाईट जात नाही. गेली तर अधिकाऱ्यांची खेर नाही. लोक ठोकून काढतात. ४ दिवसा साठी आलेला त्याने आजच्या रात्रीचे वातानुकुल बस चे परतीचे तिकीट काढले.
यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .

वीज कपात

वीज जाण्याबद्दल ठोकून काढायला हरकत नाही. म्हणजे वीज जाण्याबद्दल नाही पण वीज जाण्यात भेदभाव करू नये म्हणून.
जर खेड्यात विज १०-१२ तास जात असेल तर मुंबईत किमान ३-४ तास तरी वीज घालवायला हवी.

मुंबईला चोवीसतास वीज पुरवायलाच हवी नाहीतर इथले उद्योग धंदे बाहेर जातील हा प्रचार तद्दन खोटा आहे. आज असंख्य कंपन्यांनी गुरगाव सारख्या शहरांत आपली कार्यालये आणि कारखाने काढले आहेत. तेथे या कंयन्यांना रोज जवळजवळ ८ तास वीज पुरवली जात नाही. पण तरीही नव्या नव्या कंपन्या तेथे आपले उद्योग थाटत आहेत.

मुंबईमध्ये वीज जात नाही कारण मुंबईत टाटा आणि रिलायन्स वीज पुरवठा करतात असा गैरसमज पसरवण्याचे काम या कृतीतून होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रातली सुमारे ५०० मेगवॅट वीज तोडून मुंबईला पुरवली जाते. (२९ एप्रिल च्या रिपोर्ट प्रमाणे दुपारी १२ वाजता ६८८ मे वॅ संध्याकाळी ५ वा ८२० मे वॅ वीज टाटाला दिली गेली. रिलायन्स + टाटाची एकूण गरज ३००० मे वॅ त्यांचे स्वतःची निर्मिती दु १२ वा २३०० मेवॅ आणि सायं ५ वा २१०० मेवॅ होती )

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

वीजकपातीत भेदभाव नकोच

मुंबईला चोवीसतास वीज पुरवायलाच हवी नाहीतर इथले उद्योग धंदे बाहेर जातील हा प्रचार तद्दन खोटा आहे. आज असंख्य कंपन्यांनी गुरगाव सारख्या शहरांत आपली कार्यालये आणि कारखाने काढले आहेत. तेथे या कंयन्यांना रोज जवळजवळ ८ तास वीज पुरवली जात नाही. पण तरीही नव्या नव्या कंपन्या तेथे आपले उद्योग थाटत आहेत.

उद्योगधंदे मुंबईबाहेर गेल्यास काही हरकत नाही. मुंबई तशीही जरा जास्तच फुगली आहे. स्लिमट्रिम होईल. तब्येत सुधरेल.

मुंबईमध्ये वीज जात नाही कारण मुंबईत टाटा आणि रिलायन्स वीज पुरवठा करतात असा गैरसमज पसरवण्याचे काम या कृतीतून होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रातली सुमारे ५०० मेगवॅट वीज तोडून मुंबईला पुरवली जाते. (२९ एप्रिल च्या रिपोर्ट प्रमाणे दुपारी १२ वाजता ६८८ मे वॅ संध्याकाळी ५ वा ८२० मे वॅ वीज टाटाला दिली गेली. रिलायन्स + टाटाची एकूण गरज ३००० मे वॅ त्यांचे स्वतःची निर्मिती दु १२ वा २३०० मेवॅ आणि सायं ५ वा २१०० मेवॅ होती )
धन्यवाद. वीजकपातीत भेदभाव नको ह्याबाबत सहमत आहे.

जयेश ह्यांनीही हे आकडे नजरेखालून घातल्यास बरे होईल असे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सूचना

वर जो २९ एप्रिलच्या रिपोर्टप्रमाणे असा दुवा दिला आहे तो डायनॅमिक असतो. आज त्या दुव्यावर २ मे चा रिपोर्ट दिसत आहे.
रविवार असल्यामुळे आकडे कमी दिसत आहेत. वीकडे चे रिपोर्ट पाहिले तर योग्य परिस्थितीचे दर्शन होते.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

नाही हे भडक वाटले नाही.

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************

नाही हे भडक वाटले नाही.आपल्या लेखन पध्दती बद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत,त्या कारणाने मुख्य विषयाकडे दुर्लक्ष होते आहे का? हे आपण पहावे.आपण स्वतः अवलोकन करु शकाल.धन्यवाद.

शैलु.

विजे अभावी उभा महाराष्ट्र संकटात सापडला असताना रात्रीच्या प्रका

'ट्‌वेंटी-20 क्रिकेटची पंढरी' असा लौकिक अल्पावधीत निर्माण केलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रकाशझोतातील सामने, निओ क्रिकेटवर थेट प्रक्षेपण, बक्षीस रक्कमेत घसघशीत वाढ, अशा वैशिष्ट्यांसह दुसऱ्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगला (एमपीएल) 17 मे पासून प्रारंभ होत आहे. उपांत्य सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने या स्पर्धेला वेगळी झळाळी प्राप्त होणार आ
27 मे - पहिली उपांत्य लढत (दुपारी 4-00, डी. वाय. पाटील स्टेडियम), दुसरी उपांत्य लढत (सायंकाळी 7-30, डी. वाय. पाटील स्टेडियम)
28 मे - विश्रांतीचा दिवस
29 मे - अंतिम लढत (सायंकाळी 6-30, डी. वाय. पाटील स्टेडियम).

विजे अभावी उभा महाराष्ट्र संकटात सापडला असताना रात्रीच्या प्रकाश झोतात क्रिकेट सामने घेणे हा मूर्खपणा आहे ग्रामीण भागातील जनतेच्या जखमेवर तिखट मीठ चोळण्या सारखे आहे.
शासन झोपले आहे का? जनतेने या लाईटच्या प्रकाश झोतात सामने घेण्यास विरोध करावा वेळ प्रसंगी कोर्टाने हस्तक्षेप करून हा सामना रद्द करावा. उभा महाराष्ट्र उन्हात जळत असताना हे सामने कसे भरवले जातात . विजेची अशी उधळ पट्टी केली जाते याचा अर्थ वीज टंचाई कृत्रिम आहे. जनतेला मूर्ख बनवले जात आहे. विजेचा असा दुरुपयोग त्वरित थांबवावा सामाजिक जबाबदारीचे भान जाणीवपूर्वक बाळगणाऱ्या सकाळने तरी सामने लाईट च्या प्रकाशात घेण्यास विरोध करून विजेची नासाडी टाळावी.

 
^ वर