उपमा अलंकार्

मराठी भाषेला आकर्षक आणि मोहक बनवणारा हा अलंकार आहे. अलंकार! थोड्क्यात काय तर मराठी भाषेचे आभुषण! एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे हूबेहुब आणि सरस वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा. उपमा म्ह्ट्ले कि, वि.स. खांडेकराची मुग्ध कादंबा-यांची आठवण होते. त्यांनी आपल्या "हिरवा चाफा" या कादंबरीत सुरेख उपमा वापरल्या आहेत.

"मावशींना पहिले कि, तत्यांना घरच्या खळ्यातील तुळशीची आठवण होई. तसे झाड मोठे नाह, फ़ुले-फळे नहित. सारे धन काय ते मंजि-या . पण वृंदावनातील त्या तुळशीकडे नजर गेली कि मन कसे उल्हसित होत असे. त्यांचे प्रेमळ डोळे जणू काहि संध्याकाळी त्या तुळशीपुढे ठेवलेली निरंजनेच. "
हे वाचलं कि मावशीची सोज्वळ प्रतिमा डोळ्यासमोर न उभी रहिली तर नवलच.
आणखि एक अशीच आहे.

"एखद्या वेलीला दोनच फ़ुले यावीत,पण त्यातुन जगाला धुंद करणारा सुगंध पसरत असावा, तसे केशरचे डोळे होते."

याच नयनांना दिलेली आणखी एक मोह्क उपमा," डोळे किती तीव्र आणि तेजस्वी! जणू काही अन्धा-या रात्री चमकणारे शुक्र आणि मंगळच! "

भी. दा. पानवलकरांनी आपल्या व्यक्तिचित्रांमधुन अनेक नविन शब्द आणि उपमा आणल्या. जसं कि,
"या लेखनाला अर्धपिक्या गाभूळ्या कैरीचा स्वाद आहे. या स्वादाची सुध्दा एक गंमत असते." अश कहि आगळ्या उपमा!

आनंद अन्तरकरांनी रत्नकीळ या पुस्तकात,शामराव ओक हे व्यक्तिचित्र रेखाट्ताना, त्याना शामराई अशी उपमा दिली आहे. त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी त्यांच्या स्वभावाविषयी लिह्लय,
"शामराई-नावाचं एक सुंदर बन!तिथल्या नाना रुपांच्या ,नाना रंगांच्या अतिविभोर वृक्षवेली..मुक्त चैतन्यमय वारे..एक अथांग निळं ,सुस्मित सरोवर..त्या सरोवराच्या काठानं स्नेहासक्त पावले टाकित चाललेले जिव्हाळ्याचे स्नेही..."

अशी अनेक सुरेख उदाहरणे सापडतील...जी वाचुन आपल्या कल्पनाशक्तिला वाव मिळेल. त्यांचा एक अनोखा संग्रह करता येईल..अशाच काहि सुरेख् उपमा तुमच्याकडून अपेक्षित आहेत.

 
^ वर