वाईट करणाऱ्याचे खरेच वाईट होते काय?
महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे. मंदीरातील अभिषेक बंद करण्यावरुन वाद घालणाऱ्या पुजारी आणि इतर संबंधित मंडळींचे हात दानपेटीतल्या भ्रष्टाचारात देखील प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या गुंतलेले आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले. मंदीरातील मुर्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या साडीचोळीचा लिलाव होऊन ह्याच साड्या पुन्हा अव्वाच्या सव्वा किमतीला भक्तांच्या माथी मारल्या जातात हे सर्वांना माहित असेलच. पण तुळजाभवानीच्या दानपेटीतील दागिन्यांचा इतक्या पद्धतशीर पणे अपहार करुन गब्बर बननाऱ्यांचे हे कृत्य त्यांच्या अपूर्व धाडसाची प्रचीती देऊन जाते. ( इथे कुणाचे चारआणे किंवा एखादी पेन्सिल चोरली तर देव शिक्षा देईल याचा आम्हाला भयंकर धाक असतो.) तुळजाभवानीच्या गुप्तदानपेटीत भाविक जो पैसा व दागिने टाकतात त्याचा दरमहा लिलाव करण्याची पद्धत आहे. या लिलावात फक्त ठराविक लोकांनाच भाग घेता येईल याची व्यवस्था( ! ) केली गेलेली आहे. या लिलावाच्या मूळ बोली रक्कमेत व लिलावात भाग घेण्याच्या शुल्कात गेल्या दहा पंधरा वर्षात अवघ्या काही हजारांची वाढ झालेली आहे. आणि या शुल्काचा फक्त काही हिस्सा घेऊन अनेकांना लिलावात भाग घेऊ देण्याचे औदार्य अनेकवेळा दाखवण्यात आलेले आहे. आणि जे काही शुल्क घेतले त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष व धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याच्या नियमालाही तिलांजली दिली गेली. हे सगळे आपल्या उपस्थितीत व्हायला हवे याची तत्कालीन जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांना माहित नसण्याचीच शक्यता आहे किंवा हेतूपूरस्सर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असणेही शक्य आहे. या सगळ्या लबाड साखळीत अनियमितपणा निर्माण झाल्यामुळे म्हणा की काही अन्य कारणामूळे म्हणा या सर्व प्रकाराबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांनी दानपेटीत जमा होणाऱ्या देणगीची सरासरी काढण्याच्या उद्देशाने एक महिन्याच्या अंतराने दानपेटी उघडली तेव्हा त्यात तब्बल बावीस लाख रुपये रोख, त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने व साडेपाचकिलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील लिलावाची माहिती प्रशासनाला देतांना संबंधितांकडे दहा वर्षात सेहेचाळीस ग्राम सोने व अर्धा कीलो चांदी इतकेच दान जमा झाल्याची माहिती दिली होती. एकंदरीत लोकांच्या श्रद्धाभावनेचा (!) गैरफायदा घेऊन लिलावात सहभागी लोकांनी वर्षानुवर्ष स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले. लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका असे म्हणत मूर्तीची झीज होत असल्याचा अहवाल असतांनाही अभिषेकांवरच्या बंदीला विरोध केला. या सर्वात त्यांना भवानीच्या कोपाची भीती कशी वाटली नाही याचा विचार भोळीभाबडी जनता आता करत असेल. पण या लोकांना नक्की माहित असते की आपल्या समोर जो मांडला आहे तो फक्त दगड आणि तो आपले काही वाकडे करु शकत नाही. म्हणून मुजोरपणाने देवादेखत लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे काम ही मंडळी बिनबोभाटपणे करु शकतात. जनतेचे प्रातिनिधीक स्वरुपातले प्रतिनिधीसुध्दा केले त्याला भरावे लागेल अशी निरर्थक आशावादी विधाने करुन या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. पण जर केले त्याला भरावे लागले असते तर हजारो लोकांचे मुडदे पाडण्यात सहभागी असणाऱ्या दाऊद इब्राहीमला अख्खे आयुष्य सुखासमाधानात जगायला मिळाले नसते. कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोठे पुरस्कार मिळून कृतकृत्य होता आले नसते. जो लबाडी करतो त्याच्या विरोधात कायदा माननाऱ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. करेल तो भरेल या नावाने सुजाण लोक शांत बसून राहीले तर या अपप्रवृत्तींचे दिवसेंदिवस फावणार आहे. कारण यांना पक्के कळून चुकलेले असते की असे काहीच भरावे लागत नाही.
Comments
माझे मत
वाईट करणाऱ्याचे खरेच वाईट होतेच असे नाही. चांगले करणाऱ्याचे खरेच चांगलेच होतेच असे नाही. शिवाय वाईट किंवा चांगले हे कसे ठरवणार? आणि कोण ठरवणार? या जगात देव नावाची कुठलीही चीजवस्तू नाही. अन्यथा तुळजाभवानीने जागृत होऊन त्या लबाडांची मुंडकी छाटली असती, नाही का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
+१
अगदी मनातलं बोललात. यावरून हेच सिद्ध होतं कि या जगात देव नावाची कुठलीही चीजवस्तू /शक्ती नाही.
सहमत
सहमत आहे.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का
धम्मकलाडू यांचे मत
मी धम्मकलाडू यांच्या मताशी सहमत आहे. शिवाय एक ज्याला वाईट म्हणतो त्याला दुसरा एखादा चांगले म्हणू शकतो. नीती अनीती या आपल्या मनाच्या व परिस्थितीनुसार बदलत रहाणार्या कल्पना असतात. दुष्टांना देव शासन करतो ही कवी कल्पना आहे. जे फसवले जातात किंवा ज्यांचे वाईट होते त्या भोळाभाबड्या लोकांच्या मनाचे समाधान करण्यासाठी या असल्या समजुतींचा (देवपूजेसारखाच) उपयोग होतो यात शंकाच नाही. अशा प्रकारच्या समजुतींची तीच खरी उपयुक्तता आहे असे वाटते.
चन्द्रशेखर
मूर्तीची झीज
अरेरे! तुळजाभवानीचीच मूर्ती गंडकी नदीतील पाषाणातून घडवली आहे ना? अशा ऐतिहासिक संपत्तीचा दूध, दही, मधाच्या मार्याने होणारा नाश क्लेशकारक आहे आणि खाद्यपदार्थांचा नाशही.
असो. वाईट करणार्यांचे वाईट होण्याची शक्यता त्यांचे कृत्य पकडले गेल्यास शक्य असते पण देवामुळे नाही तर कायद्याच्या किंवा इतर कचाट्यात सापडल्याने. आता या कचाट्यांतून सुटण्याच्या क्लृप्ती ज्यांना माहित आहेत त्यांचे काय होते ते माहित असावेच. :-)
माझी आपली एक थिअरी आहे
आपल्या वागणूकीचे जसे प्रतिबिंब आपल्या मनात उमटले असेल तशी त्याची प्रतिक्रिया होते. म्हणजे, मनाला पापाची टोचणी जाणवत असेल तर त्याचा नक्की वाईट परिणाम दिसून येउ शकतो. शेवटी आपल्या मनात प्रचंड शक्ती आहे (असा माझा विश्वास आहे) आणि त्याचमुळे आपल्याभोवती निगेटिव्ह एनर्जी तयार होत असेल.
पण मनातच जर 'ह्यात काही पाप नाहीये, काय झाले थोडेसे पैसे खाल्ले तर? सगळेच खातात आजकाल" अशी भावना असेल तर मात्र वाईट होण्याची शक्यता बरीच कमी असते.
हेच !
मी ही हेच म्हणतो. फक्त -
|शेवटी आपल्या मनात प्रचंड शक्ती आहे (असा माझा विश्वास आहे) आणि त्याचमुळे आपल्याभोवती निगेटिव्ह एनर्जी तयार होत असेल. >>
मला वाटते की मनात निर्माण झालेल्या भावनेत शक्ती आहे (भावना शक्ती / इच्छा शक्ती) .
केहते है किसी चीज को अगर दिल से चाहो तो सारी कायानाथ तुम्हे उससे मिलाने कि कोशिश मे लग जाती है.. वगैरे!
आता ही चीझच जर कुणासाठी वैट असेल तर काय. इथे ज्याची इच्छाशक्ती जास्त पावरफुल तो वर्चस्व गाजवनार.
मी तर म्हणतो सजीव म्हणजेच स-इच्च्छाशक्ती. कधी-कधी तर वाटते की आपण श्वास घेतो हा सुद्धा आपल्या सुप्त इच्छाशक्तीचाच पार्ट असावा.
उदाहरण
कोठेतरी वाचलेले एक उदाहरण आठवले. "तुम्ही जर जन्मापासून शाकाहारी असलात, आणि न जाणो चुकून जंगलात वाट चुकलात तर जंगलातील मांसाहारी प्राणी (भुकेले असल्यास) तुम्हाला खातील का?"
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हाहाहा
An atheist was on safari when he suddenly realized that the lion that he had been following had circled round and was stalking him instead. As the lion approached from the rear, the atheist did what anyone would have. He began to run. And, naturally, the lion gave chase.
As he began to tire, the atheist fell to his knees and cried out, "Oh, God, please help me!"
In heaven, God stopped and spoke to the atheist, "You don't believe in me, why should I help you?"
The atheist said, "Please, God, prove your existence to me and help me, please."
God: "And just how should I do that?"
Atheist: "Please, oh God, prove your love to me and make this lion a Christian lion."
Next thing he knew, the lion behind him stopped stone cold in his tracks just feet behind the atheist.
Just as the atheist was breathing a sigh of relief, he saw the lion sit up, fold his paws and say, "Dear Lord, thank you for the meal which I am about to partake."
खूप रोमन अक्षरे लिहिल्याबद्द्ल क्षमस्वमे.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
भारी इस्टोरी हाये...
देव बनिवला कुनी ? माणसानी.... तो कसा आनी कोनाच काय वाकडं करनार ? आपुनच आपलं समाधान करायचं का वाईटच वाईट हुईल म्हनून...कारन आपलं कुनी भलं कराया बसलं न्हाई का आपल्याला कोनाच काय वाकडं करता येणार न्हाई .... मंग निस्त देव देव कराच आनी दगडाव इस्वास ठीवाचा...कसं ? अन येळ आली आन जमलं तर काय सांगाव अपुनबी असंच वागू...कसं ?
अन अपुन निस्ती आरडावरड केल्यानी कायबी ह्व्नार न्हाई....आपलं कोण ऐकताय हितं ?