खरे म्हणजे आंबेडकर मोठे होते महान होते पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .


Subject: पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
खरे म्हणजे आंबेडकर इतके मोठे होते की ते किती महान होते हे आता नव्याने सांगण्याची गरजच नाही.आंबेडकरी जनता इतकी पिचलेली आहे की,...... फडके सर आज आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्व भारतीय जनता तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणस COMMON MAN पिचलेली आहोत असे मला वाटते. त्यास सर्व पक्षातील भ्रष्ट्र राजकीय नेते जबाबदार आहेत. साधा विचार करा आज पिचलेल्या जनतेने डॉक्टर,मिडीयावर राग काढून हल्ला केला तर त्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवून जेल मध्ये टाकण्याची सरकार तयारी करत आहे. पण भ्रष्ट्राच्रार
नेहरू पासून राहुल गांधी पर्यंत सर्व नेते भ्रष्ट्राच्रारा विरुद्ध बोलतात पण एकानेही हा कायदा करायची हिम्मत केली नाही. का? हा कायदा केला तर आपण सर्वजण जेल मध्ये असू असे या भ्रष्ट्र नेत्यांना भीती वाटते का?
ज्या मुळे देशाचा सत्यानाश झाला त्या विरुद्ध अजामीनपात्र कायदा सरकार करत नाही.आपण ही गप्प बसतो हीच आमची शोकांतीका आहे भारतात लोकशाही म्हणजे भ्रष्ट्र नेत्यांची, नेत्यांच्या भ्रष्ट्राच्रारा साठी फक्त जनतेच्या मतदाना द्वारे चालवली जाणारी शासन प्रणाली झाली आहे. लिंकन ला असे अभिप्रेत नव्हते.
सामान्य जनतेला लहानसाहन कारणामुळे अजामीनपात्र गुन्हा नोंदवून तुरुंगात टाकणारे कायदे करणारे सरकार भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा का नोंदवत नाही असा कायदा का करत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. नेत्यांना जाब विचारण्याची ताकद त्यांच्यात नाही. इतकी अज्ञानी आहे की ती या नेत्यांमागे फरफटली जात आहे. अडाणीच नव्हे तर जी शहाणी शिकलेली बुद्धिवादी जनता सुद्धा एक तर या नेत्यांच्या मागे फरफटत जाते किंवा घरात बसून राहते. ज्या वेळी मत द्यावयाचे तेंव्हा टी.व्ही.पाहत बसते.माझ्या एक मताने काय होणार म्हणून. नंतर मात्र तावातावाने सिस्टीम कशी चूक आहे या वर मात्र मीच सर्वज्ञ आहे, मलाच अक्कल आहे अश्या थाटात बहस,चर्चा करत असते. राखीव जागांचा उपयोग खरच गरजवंताला होत नाही. ज्या प्रमाणे सगळ्या योजनांचा गेरफायदा उच्च वर्णातील भष्ट्र नेतेच उचलतात तसेच दलित समाजाचे भष्ट्र नेतेच गेरफायदा उचलतात या मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे. राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
या कायद्या करता पाठपुरावा कारणे आणि हा कायदा लागू कारणे आवश्यक वाटते. आपण सर्वांनी या करता सतत प्रयत्न कारणे ही काळाची गरज आहे. तर? आपले विचार अवश्य कळवा
पटलं तर पुढे सांगा चूक असेल तर माझा कान पकडा
जाता जाता बातम्या चालू आहेत ऐकु येतात शरद पवारांनी गृह-निर्माण सोसायटीत मुसलमानांना घरे द्यावी असा प्रस्ताव मांडला आहे त्याच बरोबर आपल्या income tax विभागाचे वरती मागून घोडे असा प्रकार करत IPL आणि मोदी वर छापे टाकले म्हणे सामान्य माणसाने थोडा खर्च केला तर त्यास परेशान करणारा हा विभाग काय, IPL चा तमाशा चालू झाल्या पासून चीअर गर्ल्स चा नाच पाहत गप्प बसला होता काय? का आत्ता his masters voice च्या इमानी श्वाना प्रमाणे ( माफ करा ही तुलना करून मी श्वानांचे मन दुखावले .त्यांचा अपमान मी करू शकत नाही. बाकी नंतरच्या लेखात.

Thanks & regard,

Thanthanpal,

Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

दुर्दैव...

आंबेडकरांची महानता आणि मोठेपणा आपल्याला "कटू" सत्य वाटते आणि इतरांनी देखील ते "कटू सत्य" म्हणून मानावे नाहीतर शोकांतिका आहे असे म्हणावेसे वाटते यातच शोकांतिका आहे, हे दुर्दैवी आहे. त्यापुढे हा लेख वाचण्यात काही हशील वाटत नाही. असो, ज्याची त्याची मर्जी, बोलणेच खुंटले. :(

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

लेखाचा रोख कळला नाही

काय कळलं नाय बॉ.

कुठलाच आरोप अजामीनपात्र असू नये असे वाटते.

(शहाणा, शिकलेला, बुद्धिवादी सामान्य) नितिन थत्ते

(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

+१ आवेशपूर्ण आणि गूढ

असेच म्हणतो.
आवेशपूर्ण आणि गूढ लेख आहे.

'आपण' कोण?

मी तरी मान्य करतो! 'आपण' कोण?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कटू सत्य ह्या शब्दाला प्रखर विरोध आहे.

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************

१)खरे म्हणजे आंबेडकर इतके मोठे होते की ते किती महान होते .......पण कटू सत्य आपण मान्य करत नाही..

-कटू सत्य ह्या शब्दाला प्रखर विरोध आहे. हे सत्य आहे असे म्हणा..

२)आज आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्व भारतीय जनता तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणस COMMON MAN पिचलेली आहोत असे मला वाटते.

-बरोबर पण कारणं वेगवेगळी व अनेक आहेत.. व त्यात मतभिन्नता होउ शकते..

३) हा कायदा केला तर आपण सर्वजण जेल मध्ये असू असे या भ्रष्ट्र नेत्यांना भीती वाटते का?

-भ्रष्ट्राच्राराची मुळे खोल आहेत..नेते सुटतील जनता त्रस्त होईल.केवळ कायद्याने प्रश्न सुटतात का?

४)लिंकन ला असे अभिप्रेत नव्हते

-लिंकनचा काय संबध..

५)इतकी अज्ञानी आहे की ती या नेत्यांमागे फरफटली जात आहे. अडाणीच नव्हे तर जी शहाणी शिकलेली बुद्धिवादी जनता सुद्धा एक तर या नेत्यांच्या मागे फरफटत जाते किंवा घरात बसून राहते. ज्या वेळी मत द्यावयाचे तेंव्हा टी.व्ही.पाहत बसते.माझ्या एक मताने काय होणार म्हणून. नंतर मात्र तावातावाने सिस्टीम कशी चूक आहे या वर मात्र मीच सर्वज्ञ आहे, मलाच अक्कल आहे अश्या थाटात बहस,चर्चा करत असते.

-एक जात सर्व अज्ञानी व नेत्यांमागे फरफटली जाणारी...मजा वाटली..

६) राखीव जागांचा उपयोग खरच गरजवंताला होत नाही. ज्या प्रमाणे सगळ्या योजनांचा गेरफायदा उच्च वर्णातील भष्ट्र नेतेच उचलतात तसेच दलित समाजाचे भष्ट्र नेतेच गेरफायदा उचलतात या मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे.

-आता राखीव जागा गरजवंताला मिळत नाही हे बरोबर पण राखीव जागांवर उच्चवर्णातील नेते काय कोणीच apply सुध्दा कायद्याने करु शकत नाही.

-कोणत्या कारणाने काळे गोरे असा भेद मानु नये.. हे काय कारण झाले...भेद मानणेच चुक आहे

७)राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता

-टिकून राहावी या करता ???

८)आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .

-हे मात्र १००% मान्य.

आजारी समाज पुरुषाश बरे करण्या करता आवशक असलेले कड ओषाधाची गोळी

thanthanpal.blogspot.com
कटु शब्दाचा वाचकानी शब्दशः अर्थ घेतल्या मुळे वाचकांचा गेरसमज झाला आहे . सत्य हें सत्यच असते हें कोणी नाकारत नाही. ….. जेंव्हा आजर हा गंभीर असतो तेंव्हा द्यावी लागणारी गोळी ही कडूच असते. ती कडू आहे म्हणून आपण गोळी घेतली नाही तर आजार जास्त गंभीर होवून रोगी दगावण्याचा संभव असतो. त्यामुळे बाबासाहेबांच्या मोठेपणा हे एक आजच्या आजारी असणाऱ्या समाज पुरुषाश बरे करण्या करता आवशक असलेले ओषाधाची गोळी आहे. आज समाजातील मोठा गट हे ओषध घेण्यास मागे पुढे पाहतो या मुळे बाबासाहेबांची,जयंती फक्त कांही समाजच साजरी करतो तर बाकी समाज या पासून अलिप्त राहतो त्याच प्रमाणे शीवाजी जयंती चे घ्या. या महापुरुषाची जयंती तर दोन वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे करतात याला काय म्हणावे याने समाजाची अवस्था आणखी खराब होईल म्हणून मोठेपणा मान्य जो पर्यंत सर्व समाज करत नाही तो पर्यंत कांहीच उपयोग नाही तरी वाचकांनी अर्थ समजून घ्यावा . खरे तर हे काम समाजातील नेत्याचे आहे , बुद्धीमान लोकांचे आहे पण मतांची लाचारी, माझा समाजाशी काय संबंध या बुद्धीमान लोकांच्या कुपमंडूक वृत्ती मुळे कटू ओषध देणे चे काम तुम्हा आम्हा COMMON MAN लाच करावे लागणार ते मी केले तर माझी कांही चुकी झाली नाही.
कारण आखरी समाजाला लागलेला रोग बरा होण्याशी मतलब.

प्रतिसादातील विचारांशी सहमत

हाच प्रतिसाद जर लेख म्हणून आला असता तर तुमचे विचार (तुम्ही ह्या लेखात मांडू पाहणारे विचार) स्पष्टपणे समजले असते असे मला वाटते.
ह्या प्रतिसादातील विचारांशी सहमत.

कळकळ

व्यक्त झालेली आहे, पण मुद्दे नीट कळले नाहीत. उदा. आपण मतदान न करता टी.व्ही. बघत बसतो याचा नक्की अर्थ काय? भारतात इतर लोकशाहींच्या तुलनेत कांकणभर जास्तच मतदान होतं असा माझा समज होता. धम्मकलाडूंनी म्हटल्याप्रमाणे या लेखात आपण म्हटलेला समुदाय कुठचा?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

भाषेवरील भ्रष्टाचार

भाषेवरील उघडउघड होणारे भ्रष्टाचार आपण सहन करतो, म्हणूनच आपल्याला इतर भ्रष्टाचार सहन करायची सवय होते?
या लेखातून मी काढलेले एकमेव तात्पर्य! --वाचक्नवी

:)

पटले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अजामीनपात्र गुन्हा

भ्रष्टाचार हा अजामीनपात्र गुन्हा आहे अशी माझी समजूत आहे. ज्या गुन्ह्याची शिक्षा ३ (?) महिन्यावर असते असे सर्व गुन्हे अजामीनपात्र असतात. जामीनपात्र गुन्ह्यात पोलिस जामीन देऊ शकतात तर अजामीनपात्र गुन्ह्यात कोर्ट जामीन देऊ शकते.
या सर्वाचा इंडीयन पिनल कोडशी (१८८०)संबंध आहे ज्याच्याशी आंबेडकर वा राज्यघटनेशी सुतराम संबंध नाही.

प्रमोद

आक्षेपार्ह

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पस्तुत लेखातील"...आंबेडकर मोठे होते महान होते पण हे कटू सत्य ....." हे वाक्य निषेधार्ह तर आहेच, पण आक्षेपार्हही आहे. उपक्रम संस्थळावर अशा विधानांना स्थान देऊ नये.माझ्या मते ते त्वरित काढून टाकावे.अन्यथा आपले संस्थळ अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनाठायी उदारमतवाद नसावा.

केवळ वाक्यच?

अर्थपूर्ण विचारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मी पाठिंबा देऊ केला असता.
कोणी प्रतिसाद न दिल्यास 'चर्चेचा प्रस्ताव' नावाखालील हे असंबद्ध rant दुर्लक्षित होऊन मरून जाईल अशी आशा मी करत होतो. केवळ एक वाक्यच नव्हे तर हा चर्चेचा प्रस्तावच त्याज्य आहे.

मला वाटते...

खरे म्हणजे आंबेडकर मोठे होते, महान होते. "पण हे आपण मान्य करत नाही" हे कटू सत्य हीच आपली शोकांतीका आहे . असे लेखकाला म्हणायचे आहे. भावनाओंको पहचानो भाई.

 
^ वर