मराठी भाषेचा क्रांतिकाल

ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते तो इ.स.१८७५ ते १९२० हा कालखंड मराठी भाषेचा क्रांतिकाल म्हणून ओळखला जातो.या काळात जे काव्य निर्माण झाले ,त्याचा चेहरा-मोहरा बराचसा भिन्न आहे.मुख्यतः केशवसुतांनी कवितारचनेत उद्देश ,वृत्ते,आशय, या सर्व प्रकारे बदल केले. म्हणूनच त्यांना मराठी कवितेचे अग्रदूत म्हणतात. याशिवाय अजून बरेच कवी आहे कि ज्यांच्यामुळे त्या काळात मराठी भाषेला दर्जा लाभला.
त्यातील काही कवींची ओळख खालील प्रमाणे..
# कवी रे. नारायण वामन टिळक : ज्यांच्या मनात समाजाविषयी तळमळ होती. तसेच ते प्रेमळ सश्रद्ध होते.
त्यांच्या 'मुल तें मुल ' या सुंदर कवितेतील काही पंक्ती..

तुला म्हणावे फुल जरी-फुल जरी...
फुलाहुनी तू अधिक तरी
फुल विकसती सुगंध देती
परिस्थिती जो दिसे बरी-असे बरी.
तुझे हास्य हे नित्य परी..
तेज तुझे वितारे इतरी-हे इतरी
तमास अवघे दूर करी..

#चंद्रशेखर शिवराम गो-हे : त्यांनी आजन्म शरीरिक व मानसिक श्रम सोसून आपली भाषा कमावली होती. त्यांनी गोदागौरव नावाचे भाव काव्य लिहिले आहे.
आणि म्हणूनच त्यांना कवितेविषयी खूप आदर होता. तो आदर त्यांच्या कविताआरती या कवितेतून व्यक्त होतो..

तुझ्यास्तव उपेक्षिल्या बहुविध सुविद्या कला,
तुझ्यास्तव न ती पदे ,उपपदे मिळाली मला,
तुझ्यास्तव न लोभात विभवमार्ग मी टाळले,
तुझ्यास्तव सखे! मला स्वजन तेही कंटाळले.

# राष्ट्रीय कवी गोविंद: त्यावेळी गणेशोत्सवात किंवा शिवजयंतीचा वेळी म्हणण्यासाठी राष्ट्र कवितांची निर्मिती होत असे.
आणि त्यात हे कवी अग्रभागी होते रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले या त्यांच्या स्फूर्तीदायक काव्यामुळे त्यांचे नाव अवघ्या महाराष्ट्रात दुमदुमले . 'सुंदर मी होणार' हे त्यांचे मृत्युविषयक काव्य आशावादाने रसरसलेले आहे. त्यातील काही ओळी..

हृदयरोगाच्या ज्वाला विझुनी सुख माझे निवणार
माझा मृत्यू माझे सारे अश्रुपर गिळणार
कटक-पांजर तनु-पीडेचा पिचुनिया फुटणार
बंदिवान मम आत्मा चातक सुखेनैव सुटणार..
आणि शेवटी ते म्हणतात..
नवे ओज मज, ने तेज मज, सर्व नवे मिळणार

असे आणखी अगणित कवी आहेत ज्यांच्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली..ज्यांनी खंडकाव्य लिहिले.वृत्तकाव्य लिहिले, भावकाव्य लिहिले राष्ट्र्काव्य लिहिले.. यातील फक्त काही कवींची नावें खाली आहेत..
कवी दत्त,बालकवी,माधव ज्युलियन (डॉ. म.त्र्यं. पटवर्धन),आनंदराव टेकाडे,वनायक दामोदर सावरकर,राजकवी यशवंत,कवी गिरीश,गोविंदाग्रज(राम गणेश गडकरी), दु. आ तिवारी, माधव केशव काटदरे,भा रा तांबे...

त्यातीलच एक कवी ह. गु. सलगरकर यांची अतिशय सुंदर कविता..

'मराठी गाडी यशाचा धनी'
जीजामाउली म्हणे ,"शिवाजी कोंडाण्यावरते
कुणाचे निशाण फडफडते
यश अस्मानी दुष्मानाचे डुलते डौलाने ,दरारा तुझा मनी नेणे
सर करुनी गड कोंडाणा देशील कधी मज बाळा ...

कोंडाण्याचे सुतकी वैभव बघवेना नयनी
मराठी गाडी यशाचा धनी "

Comments

मराठी भाषेचा क्रांतिकाल

चुकांबद्दल क्षमस्व..
'मराठी गडी यशाचा धनी'
जीजामाउली म्हणे ,"शिवाजी कोंडाण्यावरते
कुणाचे निशाण फडफडते
यश अस्मानी दुष्मानाचे डुलते डौलाने ,दरारा तुझा मनी नेणे
सर करुनी गड कोंडाणा देशील कधी मज बाळा ...

कोंडाण्याचे सुतकी वैभव बघवेना नयनी
मराठी गडी यशाचा धनी "

वा

धन्यवाद.
पैकी एक-एक कवी-साहित्यिकाला घेऊन एक-एक लेख लिहायचे मनावर घ्या, अशी विनंती.

मराठी भाषेचा क्रांतिकाल

नक्किच..पण तुम्हालाही यांच्यापैकि कोणाची साहित्य संपदा माहित असेल तर पोस्ट करावी.

 
^ वर