सरकार भ्रष्ट्राचाराच्या गुन्ह्याकरता अजामीनपात्र गुन्ह्याच्या कायदा का करत नाही.

वाचा !! विचार करा !! आणि कृती करा.!! जीवनमरणाचा प्रश्न आहे.
मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक

मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
-Thursday, February 25, 2010 AT 10:05 AM (IST)

Tags: chief post master general, arrest, bribe, cbi

मुंबई - महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एम.एस. बाली यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (ता.२५) अटक केली. पोस्टाच्या जमीन प्रकरणात एका कंत्राटदाराकडे २ कोटी रुपयांची लाच घेताना बाली याला अटक करण्यात आली.
पोस्टाचा भूखंड विकण्याचा घाट बाली याने घातला होता.
जनता .....????

काय सजा होणार आहे .२ दिवस चर्चा नंतर जामिनावर सुटका.सर्व शांत झाल्यावर, मांडवली झाल्यावर परत दुसऱ्या जागी प्रमोशनवर बद्दली. मेरा देश महान.common man वर लहान-सहान गुन्हया बद्दल अजामीनपात्र गुन्हया चा कायदा करणारे सरकार भ्रष्ट्राचाराच्या गुन्ह्याकरता अजामीनपात्र गुन्ह्याच्या कायदा का करत नाही. असा कायदा केला तर भ्रष्ट्राचार ९९% कमी होईल . सरकारच भ्रष्ट्र असल्या मुळे हा कायदा करत नसेल. जनतेला जाहीर आव्हान करतो कि जनतेने सरकार आणि न्यायालयावर असा कायदा करण्या करता पत्रांचा पाऊस पाडावा. निवेदन द्या. 1) गृहमंत्री महाराष्ट्रा सरकार मंत्रालय मुंबई.
2) गृहमंत्री भारत सरकार नवी दिल्ली

सहकार ची चळवळ बाकी महाराष्ट्रात का रुजली नाही.मराठवाड्यात तर सहकार बदनाम झाला आहे. राजकारण्यांनी स्वतः ची संपत्ती निर्माण केली.आणि सामान्य जनतेला कंगाल बनवले. हेच लोक वर्षानोवर्षे निवडून येतात कायदा यांचे कांही वाकडे करू शकत नाही. सहकार द्वारे जनतेला लुबाडनार्याला जेल मध्ये टाकावे आणि त्या नेत्याची त्यांच्या नातेवाईकाची संपूर्ण संपत्ती जप्त करून जे डुबले त्यांना द्यावी.हे नेते संपत्ती कधीही आपल्या नावावर ठेवत नाही. म्हणून कायदा कडक करावा आबापाटील या साठी अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा का करत नाय
डॉ. मुणगेकर, सर हा प्रकार सर्व भारतात राजरोस चालातो आणि याची साखळी थेट दिल्ही दरबारा पर्यंत आहे. त्या मुळे सरकार कशाला कठोर पावले उचलेल.आणि याविरुद्ध शांतता मार्गाने सत्याग्रह करणे म्हणजे दगडावर डोके फोडून घेणे .त्यात आंदोलनाला थोडे फार हिंसक वळण लागले तर आबा पाटील अजामीनपात्र गुन्हा नोंदवून तुम्हा-आम्हाला जेल मध्ये टाकणारा कायदा करण्यास बसले आहेतच. लुटमार,काळाबाजार याला नेहरू पासून सर्व राजकारणी फक्त जेल मध्ये टाकण्याच्या बाता मारतात पण एकाची हि यांना जेल मध्ये टाकण्याची हिम्मत नाही झाली.
भारतातील विद्यार्थी सामान्य नागरिका भवती नोकरशहा राजकारण्याचा असा काही फास बसला आहे की त्यांना आत्महत्त्या करण्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही हे माझे म्हणणे अतिरंजित वाटत असले तरी हेच कटू सत्य आहे. गेल्या ६०वर्षात नोकरशहा , राजकारणी नेत्यांनी कधी त्रासून आत्महत्या केल्याचे आपण ऐकले आहे का? इंग्रजाच्या१५० वर्ष काळा पासून चालत आलेली शिक्षण पद्धती बदलण्याची तसदी सरकारने घेतली नाही.रोजमराच्या जीवनात या दोघानाचा दहशदवाद एव्हढा आहे कि दुश्मनाचा पाकीस्थान चा दहशदवाद बरा हे नाईलाजने मान्य करावे

बहारे चमन बरबाद करने इक उल्लू काफी हे ! यांह तो हर दल मे उल्लू नेता हे! न जाने क्या हाल होगा इस देशका! ये खुदा राम भी न जाने निर्मात्यांचे जेवढे नुकसान होईल, तेवढे आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांकडून ते वसूल असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.यांना दुसरे कांही काम नाही सामान्य माणसास कांही झाले त्याने आवाज उठवला तर अजामीनपात्र गुन्हा पण पाकीस्थान ची भलावण करणाऱ्या शाहुरुख ला संरक्षण असे आत्मघातकी राज्यकर ते असल्यावर पाकीस्थान च्या दहषड्वादी हमाल्याची गरज नाही
राहुल गांधी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा,...
ज्यांचा संपूर्ण राजकारणाचा डोलाराच काळ्या पैश्यावर आधारित आहे त्यांना काळा पैसा बाहेर काढून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सांगणे म्हणजे चोराला चोरी करू नको असे सांगण्या सारखे आहे.
निवडणुकीचा तमाशा पाहिल्यावर फक्त काळा पैसा जांच्या कडे आहे आणि जे निवडणूक अधिकार्याच्या डोळ्यात खोटे निवडणूक खर्च , आणि उत्पन्नाचे खोटे प्रमाण पत्र दाखल करून धूळफेक करू शकतात तेच निवडणूक जिंकू शकतात आणि यांच्या मंत्रीगण पाहीले तर लक्षात येईल. राजाच्या राणीचे चारित्र्य संशयातीत पाहिजे म्हणतात येथे तर सर्वांचे संशयी आहे.
महाराष्ट्रा तील सर्व जिल्हा सहकारी बँक आणि राजकारणी नेत्यांनी काढलेल्या सर्व सहकारी बँकांची हीच दुर्दशा झाली आहे. पण या राजकारण्यांचे कोणीही वाकडे करू शकले नाही सामान्य थकबाकीदारास हेच नेते जीणे नकोसे करून सोडतात पण बँका बुडवून हे आमदार, खासदार मंत्री होतात. निवडणूक आयोग सरकारचे बुजगावणे आहे. या नेत्यांना त्यांच्या नातेवाईकाना खरे तर जेल मध्ये टाकावे पण तेच समाजात मानाने राहतात यांना निवडणूक लढविण्यास कायद्याने सरकार बंदी का घालत नाही? बंदी घातली तर सर्वच राजकारणी जेल मध्ये बसतील घरी जातील
हिशेबी मालमत्तेप्रकरणी अभियंत्याला जामीन!!!!! डॉक्टर वर हल्ला केल्यास सामान्य माणसास अजामीनपात्र अटक , वृतमान पेपर वर हल्ला केल्यास सामान्य माणसास अजामीनपात्र अटक .... पण सामान्य माणसास लुबाडून भ्रष्टाचार बेईमनी करून करोडो रुपये बेकायदेशीर जमवानार्याला मात्र तुरंत जमिना वर सुटका !! अजब न्याय न्यायालयाचा !! बेहिशेबी मालमत्ता , भ्रष्टाचार हा अजामीनपात्र गुन्हा असा कायदा सरकार का करत नाही ? किंवा हा कायदा आपल्या वरच उलटून आपणास अटक होवून जेल मध्ये जावे लागेल हि भीती वाटते
bhagwan patil "GONDOLI" कोरे यांना विकास करण्यास सांगण्या पेक्षा तुमच्या आमच्या गावातील नेते मंडळीना जबाब विचार, जे कोरे करू शकतात ते तुम्ही का केले नाही. इतकी वर्ष या नेत्यांनी सत्ता उपोभागली ती का फक्त स्वतः आणि नातलगांच्या विकास साठीच का? आबा पाटील सहकार क्षेत्रात भार्ष्ट्रचार करणाऱ्या नेत्यांवर आपण अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा का करत नाही?.नाही तरी आपले सरकार लहानसहान करणा साठी commom man वर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा करतेच न? का भार्ष्ट्राचार करणे हा गुन्हा नाही ?

Comments

त्रागा

वाचून मौज वाटली.

असो. लोकशाहीत कुठलाच आरोप अजामीनपात्र असू नये असे वाटते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

ह्म्म्म्

असे कायदे करून भ्रष्टाचार कमी होईल का / झाला आहे का हा चर्चेचा विषय ठरावा

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर