भुर्जपत्र ते वेबपेज

भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला. ब्लॊगिंग च्या माध्यमातुन अनेक तरुण लोकांच्या पर्यंत पोहोचता आले. त्यांच्या पुस्तकाचे उत्तम परिचय ऒर्कुट कम्युनिटीवर झाले. ही नव्या युगाची देणगी असल्याचे त्यांनी नमुद केले. महेश घाटपांडे यांनी आम्ही म्रराठी हा अंक वेबसाईट स्वरुपात प्रथम आणल्यावर सुरवातीच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यानंतर जसा या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे संकेतस्थळाला भेट देणार्‍या लोकांची संख्या प्रचंड वाढल्याचे सांगितले. मिलिंद जोशींनी देहबोली ते भुर्जापत्राचा प्रवास कथन केला. पारंपारिक साहित्यातील जड शब्दांना कंटाळलेल्या लोकांना हा नवीन पर्याय मिळाल्याने साहित्यातील मक्तेदारी कमी होण्यात उपयोग झाल्याचे सांगितले. संध्या टांकसाळे यांनी या माध्यमामुळे वाचकांना आपले प्रतिसाद लगेच देता आले. यामुळे एखाद्या लेखावर प्रतिक्रिया एकदम शंभरात पोहोचल्याने हा लक्षणीय फरक दिसल्याचे सांगितले. उज्वला बर्वे यांनी आत्ताच्या पत्रकारितेतल्या माध्यमाला एक साचा असतो तो अभ्यासक्रमात शिकवला जातो. तशा प्रकारचे बंधन या इंटरनेटवरील माध्यमाला नसल्याने वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटत नसल्याचे सांगितले.

कार्यक्रम रंगत दार झाला. इंटरनेटवरच्या मराठी जगतात मराठीची मोडतोड होते असे म्हटले तर ती आताच्या माध्यमात देखील होते वाहिन्यांच्या माध्यमातुन पाहुण्यांचे 'अंगवस्त्र' हार श्रीफळ देउन सत्कार होतो हा किस्सा मिलिंद जोशींनी सांगितला. वर्तमान पत्रातील बातमीत 'भांगेत शेंदुर' भरला जातो. याचा किस्सा उज्वला बर्वे यांनी सांगितला. या नवीन माध्यमाच्या स्पर्धेत आशय व गुणवत्त्ता बाबत मापदंड लावायचे झाल्यास ते नवीनच ठरवावे लागतील. नेट वरील संगणकीय मराठीच्या प्रगतीसाठी लीना मेहेंदळे या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ब्लॊगर नी बहुमोल कामगिरी केली आहे याची नोंद चर्चेत घेण्यात आली. उपक्रम सारख्या मराठी संकेतस्थळावर चांगले उपक्रम चालतात तसेच मायबोली या जुन्या मराठी संकेतस्थळाची दखल घेतली गेली. नवीन येणार्‍या तंत्रज्ञानासोबत लेखन कसे बदलत जाते याचाही परामर्श घेतला. ब्लॊगिंग कसे असावे याबाबत महेश घाट्पांडे म्हणाले कि अमुक शैली असावी अमुक असु नये असे म्हणता येणार नाही वाचकांनी आवडले नाही तर वाचु नये.

कार्यक्रमात माध्यमाईटस या पत्रकारांनी एकत्र येउन केलेल्या गटातर्फे श्री गणेश पुराणिक हे रानडे इनिस्टीट्युट चे माजी पत्रकार विद्यार्थी व सध्या मुंबई महापालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम करणारे ब्लॉगर यांनी ब्लॉगिंग मराठीसंकेतस्थळ यावर सदीप व सविस्तर माहिती दिली. अनिल अवचटांच्या हस्ते औरंगाबादचे दांपत्य अंजली कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी यांच्या साहित्य संपदा डॊट कॊम दुवा या संकेत स्थळाचे उदघाटन झाले.लेखक, प्रकाशक यांनी या नवीन माध्यमाचा उपयोग करावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले मराठी मंडळी डॊट कॊम या मराठी ब्लॊगर्स कम्युनिटीच्या रात्री १० वाजुन ३ मिनिटांनी प्रस्थापित होणार्‍या संकेत स्थळाचे उदघाट्न पण याच कार्यक्रमात अनिल अवचटांच्या मुखी करण्यात आले. विक्रांत देशमुख यांनी पुण्यात झालेल्या ब्लॊगर्स मेळाव्याबद्दल माहिती दिली.
नेहमी प्रमाणे जालमित्रांसाठी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण आम्ही केले आहे. परंतु ईस्निप वर ४५ एम्बी ची फाईल १०० टक्के अपलोड झाल्यावर failed to upload file publish failed suspected copy right infringement upload denied असा संदेश येतो. पुर्वी ही येत होता नंतर कधी कधी जात असे. त्यामुळे आत्ता तो कार्यक्रम आपल्याला ऐकता येणार नाही दुसरी काही सोय असल्यास सांगा. (म्हणजे चकट फु.).

खुलासा- महेश घाटपांडे हे केवळ आडनाव बंधू आहेत

Comments

ऐका

कार्यक्रम ऐका

प्रकाश घाटपांडे

भुर्जपत्र ते वेबपेज

आपली उपक्रम ही नव्या युगाची देणगी पुन्याच्या क्कार्यक्रमाची माहीती देतो, हे काय कमी आहे. आपन खुप चागले काम करत आहात.
साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी याच्या बद्द्ल अधीक माहीती मीलेल का?
(सहज जाता जाता लीना मेहेंदळे या प्रशासकीय अधिकारी मुलच्या माझ्या गावाच्या आहेत.)

शैलु.

लीना मेहेंदळे

लीना मेहेंदळे यांचा प्रशासनाकडे वळून बघताना हा मला आवडलेला ब्लॉग त्यांचे अनेक ब्लॉग्ज आहेत.
प्रकाश घाटपांडे

लीना मेहेंदळे यांचे ब्लॉग

आपला लेख आवडला आणि लीना मेहेंदळे यांचे ब्लॉग वाचले.

माहितीबद्दल धन्यवाद्!

गौरी

भुर्जपत्र ते वेबपेज

साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी याच्या बद्द्ल अधीक माहीती मीलेल का?

शैलु

माहिती

प्रा. मिलिंद जोशी हे पुण्यातील अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत. त्यांची अभिरुची व छंद हे साहित्यिक क्षेत्रात आहेत. अधिक माहिती ही भाषणात ऐकायला मिळेल.
प्रकाश घाटपांडे

वा

वा.

जमलं की तुम्हाला मराठीत टंकायला !!!!!
:)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मिलिंद जोशी ह्यांच्याबद्दल अधिक माहिती

साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी याच्या बद्द्ल अधीक माहीती मीलेल का?
मिळेल की ! ही घ्या माहिती:

श्री. मिलिंद जोशी ह्यांना जाड भिंगांचा चष्मा आहे. पेप्रात त्यांच्या नावापुढे प्रसिद्ध विनोदी साहित्यिक असे लिहिलेले मी वाचलेले आहे. पेप्रात नाव येते म्हणजे थोडेफार प्रसिद्धही असावेत. साहित्यनिर्मितीही ते करीत असतात. कारण शेवट महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एक कुशल कारभारी आहेत. म्हणजे आता हे सांगायला नकोच की श्री. मिलिंद जोशी मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. मसापचे कार्यक्रम, उत्सव, संमेलने फार उत्साहाने आयोजित करत असतात. हा त्यांचा पैलू फार हृद्य आहे. (इथे मी हृद्य हे विशेषण का वापरले हे मला माहीत नाही.)

त्यांच्या साहित्यिकपणाबद्दल प्रश्नच नाही. पण विनोदीपणाबद्दल मात्र माहीत नाही. संत वाङ्मयापासून ते प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांपर्यंत कशावरही ते सराईतपणे लिहू-बोलू शकतात असे मी ऐकले आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भुर्जपत्र ते वेबपेज

प्रकाश घाटपांडे
प्रा. मिलिंद जोशी हे पुण्यातील अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत.

धन्यवाद.

नितिन थत्ते

जमलं की तुम्हाला मराठीत टंकायला !!!!!

कसच काय.. कापी पेस्त करतोय. पन लवकरच जमेल. मदत मीलत राहीलच. सध्या तरी सर्व लेख वाचतोय अगदी १ ते १.५ वर्श जुने सर्वे मस्त आहेत. मला उशीर झाल्यासारखे वातत होते. असो. बारकईने लक्ष आहे तुमचे.
सर्वाचे आभार.
शैलु.

बाप रे! ई!

मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे

बाप रे! ई! आंतरजालीय साहित्य विश्वाची एवढीच ओळख. छेछे! सपट (सपट की सपक?) महाचर्चावाल्या धाराप्रवाही बर्वेबाई व अनिल अवचटांविषयी आदर राखून म्हणावेसे वाटते आहे की हा कार्यक्रमच एकंदर बोगस. कोण लागून गेले हे टिकोजीराव! ह्या सगळ्यांना नाकारायला पाहिजेलाय. प्रकाशराव, हे सगळे केवळ तुमच्यामुळे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हॅहॅहॅ

नेटकर लोकांना कार्यक्रम तर ऐकायला मिळाला. साहित्य संमेलनात आता अनेक साहित्यिक उखाळ्यापाखाळ्या निघतील.मागे या संमेलनपुर्व संमेलनात माजी साहित्यसंमेलनच्या अध्यक्षांचा गप्पाचा कार्यक्रम झाला. मिलिंद जोशींनी त्यांना उखाळ्यापाखाळ्यांसाठि प्रवृत्त केले होते. अरुण साधु राजेंद्र बनहट्टी, म.द हातकणंगलेकर व द.मा मिरासदार त्या कार्यक्रमात होते. तो ऐकायला बहार आली असती सगळ्यांना. आमचा डिजीटल ध्वनीमुद्रकाचे सेल संपले होते. सेल साठी वीस रुपये खर्च करण्याचे जीवावर आल्याने मंडळींना कार्यक्रम ऐकवता येत नाही याचे दु:ख वाटते. असो.
सकाळची ही बातमी पहा.
त्यात द मां नी एक किस्सा सांगितला तो या बातमीत नाही. किस्सा असा कि
कुसुमाग्रजांना साहित्यसंमेलनासाठी अध्यक्ष म्हणुन निवडताना त्यावेळी अर्जाची प्रथा नव्हती पण. इतरांनी 'शिफारस ' म्हणुन केलेल्या त्यांच्या नावाला त्यांची सहमती आहे अशी सही करायची होती. कुसुमाग्रजांना तेही मान्य नव्हते. मग कॉन्टिनेंटल प्रकाशनाचे श्री कुलकर्णी यांनीच ती सही मारली व पत्र पुढे पाठवले. मात्र कुसमाग्रजांना ते माहित नव्हते व कुसुमाग्रज त्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले.
प्रकाश घाटपांडे

मिलिंद जोशी ह्यांच्याबद्दल अधिक माहिती

श्री. मिलिंद जोशी ह्यांना जाड भिंगांचा चष्मा आहे. पेप्रात त्यांच्या नावापुढे प्रसिद्ध विनोदी साहित्यिक असे लिहिलेले मी वाचलेले आहे. पेप्रात नाव येते म्हणजे थोडेफार प्रसिद्धही असावेत. साहित्यनिर्मितीही ते करीत असतात. कारण शेवट महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एक कुशल कारभारी आहेत. म्हणजे आता हे सांगायला नकोच की श्री. मिलिंद जोशी मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. मसापचे कार्यक्रम, उत्सव, संमेलने फार उत्साहाने आयोजित करत असतात. हा त्यांचा पैलू फार हृद्य आहे. (इथे मी हृद्य हे विशेषण का वापरले हे मला माहीत नाही.)

इतकी सविसस्तर माहीती ....हृदयापासुन आभारी.

शैलु.

 
^ वर