मुतालिकला काळे फासले हे योग्यच झाले का?
अखेर युवक काँग्रेसच्या गुंड मुलांनी श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकच्या तोंडाला काळे फासले. हा प्रमोद मुतालिक तोच ज्याच्या श्रीराम सेनेने गेल्या वर्षी व्हॅलंटाइन डेला धुडगूस घातला होता. वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर श्रीराम सेनेचे गुंड तरुण मुलांना आणि मुलींना मारहाण करताना अख्ख्या भारताने बघितले होते. पण आज मुतालिकचे मतपरिवर्तन झालेले दिसले. अर्थात तोंडाला काळे फासले गेल्यावर. आज त्याला लोकशाहीची आठवण आली. आज त्याने गुंडागिरी कल्चरचाही धिक्कार केला.
प्रमोद मुतालिकला काळे फासणे योग्य की अयोग्य? हिंसेचा विरोध हिंसेनेच करायला हवा काय?
मुतालिकसारख्यांना धडा शिकवण्यासाठी आक्रमक होणे गरजेचे आहे काय? येत्या काळात अशा चकमकी वाढतील असेही तुम्हाला वाटते काय?
ह्या घटनेची अशी चर्चा करण्याचे कारण म्हणजे आज माझ्या एका मित्राला ह्या घटनेने एवढा आनंद झाला की त्याने चक्क पेढे वाटले.
त्याची मानसिकता 'गांधीवधा'नंतर पेढे वाटणाऱ्यांच्या मानसिकतेपेक्षा वेगळी आहे काय?
Comments
भारत सरकारने
कल्पना नाही
जर एखाद्यावर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा दिली असेल आणि गुन्हेगार ठरवले असेल तर त्याची भलावण करणे बेकायदेशीर का नाही असा प्रश्न आहे. उद्या कसाबची जयंती-पुण्यतिथी साजरी केली तर चालेल का असाही प्रश्न पडला.
मान्य आणि ते उघडपणे केलेले मतप्रदर्शन खटकते ते सांगण्याचेही आहेच.
बाकी तुमचे म्हणणे खरे आहेच. नथुरामची भलावण करणार्यांनी अफझलखानाचीही भलावण करण्यास हरकत नसावी. ह. घ्या.
ह्या दोन बाजू कोणत्या
थोडक्यात काय, शोधल्यास दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका असणारी (डिवाइजिव) अशी अनेक उदाहरणे सापडतील.
ह्या दोन बाजू कोणत्या ते सांगावे?
अफजलखानाची 'केस' ह्या चर्चेत आल्यामुळे आश्चर्यचकित झालो आहे. मुतालिक अफजलखानाच्या पुण्यतिथीला दरवर्षी प्रतापगडावर जात असतात का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अयोग्य...
>>अखेर युवक काँग्रेसच्या गुंड मुलांनी श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकच्या तोंडाला काळे फासले.
युवक काँग्रेसमधे गुंड आहेत याला काही आधार आहेत का ? तसे असेल तर संदर्भ द्यावेत. नसेल तर विधान बदलावे असे वाटते.
>>प्रमोद मुतालिकला काळे फासणे योग्य की अयोग्य?
अयोग्य आहे. विचारांचा विरोध विचारांनी केला पाहिजे. शारिरीक बळाचा आणि अपमानास्पद वागणूक देणे हा त्यावरील उपाय नाही. अशी वागणूक देणार्यांचा आपण निषेध केला पाहिजे.
>>हिंसेचा विरोध हिंसेनेच करायला हवा काय?
नाही. क्रांती केवळ तलवारीनेच होते असे नाही, तर विचारांनी डोके बदलणे म्हणजे क्रांती होऊ शकते. तेव्हा विचारंनी समूहमाणसाची मानसिकता बदलली पाहिजे. हिंसा त्याचे उत्तर होऊच शकत नाही.
>>पेढे वाटणाऱ्यांच्या मानसिकतेपेक्षा वेगळी आहे काय?
पेढे वाटणार्यांच्या मानसिकतेबद्दल काय बोलायचे ? कोणत्या गोष्टीचे कोण कसे समर्थन करेल आणि कोणत्या गोष्टीचा कोणाला आनंद होईल याचा काही नेम नाही. तेव्हा त्याबद्दल बोलण्याचे धाडस आमच्यात तरी नाही.
-दिलीप बिरुटे
गांधीवध आणि पेढे
प्रमोद मुतालिक हे मूळचे मराठी असून, गांधी 'वध' करणार्या नथुराम गोडसेंचे निस्सीम चाहते आहेत असे कळते. त्यांचा जन्म १९६३ चा असल्याने हत्येनंतर पेढे वाटण्यात त्यांचा सहभाग नसला तरी नथुरामांच्या पुण्यतिथीला पुण्यात दरवर्षी ते हजर असतात.
हिंसा हा अपवाद
अयोग्य. त्यापेक्षा त्याच्याच घरासमोर आर्चिज शॉप चालु करणे / खास व्हॅलेंटाईन डेचा कार्यक्रम आखणे जास्त सयुकीक झाले असते.
ह्याचे उत्तर परिस्थितीनूसार आहे. हिंसा हा अपवाद हवा. नियम नव्हे.
होय. परंतू आक्रमण हे अहिंसक पद्धतीनेही करता येते. अहिंसेचा अर्थ अनाक्रमण / प्रतिकार न करणे नव्हे!
दुर्दैवाने होय
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
गेट वेल सून
सर्वांनी मिळून त्यांना गुलाब आणि गेट वेल सून (की यू आर माय वॅलेंटाईन -आई गं!) अशी कार्डे पाठवून वात आणायला हवा. ;-) मारामार्या करून बीपी वाढवून घेण्यापेक्षा अशा कॢप्त्या करून गंमत आणणे योग्य ठरेल.
सहमत आहे :)
सर्वांनी मिळून त्यांना गुलाब आणि गेट वेल सून (की यू आर माय वॅलेंटाईन -आई गं!) अशी कार्डे पाठवून वात आणायला हवा. ;-) मारामार्या करून बीपी वाढवून घेण्यापेक्षा अशा कॢप्त्या करून गंमत आणणे योग्य ठरेल.
सहमत आहे, चांगला मार्ग...! :)
-दिलीप बिरुटे
'जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात' ओळखा पाहू कोणाच्या ओळी असतील ह्या ? :)
हे करून झालं...
लोकांनी त्यांना 'पिंक चड्डी' हजारांनी पाठवल्या होत्या. आता 'फेअर अँड लव्हली' पाठवायचा विचार आहे असे ऐकले...कितपत उपयोग होईल कोण जाणे.
कशाचा?
आता 'फेअर अँड लव्हली' पाठवायचा विचार आहे असे ऐकले...कितपत उपयोग होईल कोण जाणे.
कशाचा? फेअर अँड लव्हलीचा? त्याने तोंडाला काळे फासले असे तरी निदान म्हणता येणार नाही. :-)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
सहमत
ऋषिकेशच्या प्रतिसादाशी सहमत.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)