हिवाळी अंक प्रकाशन!
मित्रहो, महिन्यापूर्वी "महाजालीय शारदीय अंक" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं. त्याच वेळी हा अंक साधारण नाताळच्या आसपास प्रसिद्ध करावा असंही मनात योजलेलं होतं; मात्र ह्या कल्पनेला आलेला उदंड प्रतिसाद आणि प्रकाशन कधी होणार? अशी सातत्याने होणारी विचारणा लक्षात घेऊन, वाचकांची उत्सुकता जास्त ताणून न .. धरता आम्ही हा अंक आजच प्रकाशित करत आहोत.
शारदीय अंक...हे खरं तर ह्या अंकाचं नाव नव्हतंच...तर तो एक अंकाचा प्रकार होता....जसा दिवाळी अंक.
आवाहना दरम्यानच्या चर्चेत ह्या अंकाचे नाव काय असावे....ह्याबद्दलही एकदोन सुचवण्या आलेल्या होत्या. प्रशांत मनोहरने....प्रकाशनाच्या दरम्यान शिशिर ऋतू असणार म्हणून त्याला ’शैशिरिय’ म्हणावे...असे मत मांडले, तर क्रान्तिने ’शब्दगारवा’ हे नाव सुचवले.
बराच विचार केल्यावर आम्ही असे ठरवले की..... अंक हिवाळ्यात प्रसिद्ध होतोय म्हणून.....हिवाळी अंक.. आणि म्हणूनच त्याला साजेसे क्रान्तिने सुचवलेले शब्दगाऽऽरवा हेच नाव आम्ही ह्या अंकासाठी निश्चित केलंय.
ह्या अंकात आपल्याला जुन्या-नव्या अशा सर्वांचे लिखाण वाचायला मिळणार आहे. ह्या अंकातील मान्यवर असे आहेत......
क्रान्ति, मदनबाण, माझी दुनिया, स्नेहाराणी, मनीषा भिडे, विनायक रानडे, कै. गीता जोगदंड, वैशाली हसमनीस, शशिकांत ओक, जयश्री अंबासकर, सुधीर काळे, अवलिया, नरेंद्र प्रभू, नरेंद्र गोळे , सुधीर कांदळकर, जयबाला परूळेकर आऽऽऽणि कांचन कराई(आदिती).
ह्या अंकाच्या संपादनात विनायक रानडे, माझी दुनिया आणि मदनबाण ह्यांनी मोलाचे साह्य केलेले आहे.
ह्या अंकातील सजावट आणि अंकाच्या मुखपृष्ठाचे काम विनायक रानडे ह्यांनी खूपच सुंदर पद्धतीने केलंय.
तेव्हा हा अंक आपल्यासारख्या दर्दी रसिकांच्या हवाली करत आहोत. वाचा आणि सांगा....कसा वाटला अंक.
कळावे,
आपला स्नेहांकित
प्रमोद देव
Comments
अभिनंदन - काही प्रश्न
श्री. प्रमोद देव
हिवाळी अंकाबद्दल अभिनंदन. अंक वाचून त्यावर मत देईनच. त्याआधी एक दोन प्रश्न पडले आहेत ते विचारतो.
मित्रहो, महिन्यापूर्वी "महाजालीय शारदीय अंक" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती.
इथले मागच्या दोन तीन महिन्यातले सर्व लेखन पाहिले. उपक्रमावर ही कल्पना आपण मांडलेली दिसली नाही. (आपण मांडलेली असल्यास व तसा दुवा दिल्यास माझी बिनशर्त माफी) तसेच मनोगतावरही वाचल्याचे आठवत नाही. मिसळपावावर वाचली होती आणि तिथे सविस्तर चर्चाही झालेली आठवते. त्यावरून जसे मनोगत, उपक्रमाचे दिवाळी अंक तसा हा मिसळपावाचा हिवाळी अंक असावा अशी कल्पना झाली. परंतु आज मिपाच्या मुख्य पानावर त्या अंकाला स्थान नाही त्यावरून हा नुसताच आंतरजालीय अंक असावा हे लक्षात आले.
माझा प्रश्न इतकाच आहे की जर या अंकाची चर्चा उपक्रम, मनोगतावर झाली नसेल, लेखन पाठवण्याचे आवाहनही या स्थळांवर केलेले नसेल तर प्रकाशनाची बातमी तरी इथे कशाला? चर्चा एकाच स्थळावर आणि प्रकाशनाची बातमी मात्र सर्व स्थळांवर हे योग्य वाटत नाही.
विनायक
खरं आहे!
विनायकराव,आपलं म्हणणं खरं आहे की ह्या अंकासाठीचे निवेदन मी फक्त मिपा,मायबोली आणि माझ्या जालनिशीवर केलेलं होतं...मात्र उपक्रम आणि मनोगतावर केलेलं नव्हतं. त्यामागे कोणतेही विशिष्ठ असे कारण नाही. खूप जास्त ठिकाणी जाहिरात केल्याने येऊ शकणारा जास्तीचा प्रतिसाद हा मला पेलवणार नाही हे एक वैयक्तिक कारण मी देऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कारण नाही. मिपा आणि मायबोलीवर मी जास्त काळ उपस्थित असतो...म्हणून कदाचित तिथे ते निवेदन दिलेलं होतं...असं फार तर समजू शकता.
आता, अंकाच्या प्रकाशनाबद्दल इथे अथवा अन्यत्र लिहिण्याचे कारण म्हणजे हा अंक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचावा....इतकाच मर्यादित आहे.
*****
हा धागा संपादकांना अनावश्यक वाटत असल्यास त्यांनी तो जरूर उडवावा.....माझी त्याबाबत कोणतीही तक्रार असणार नाही.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
व्वा !
शब्दगारवा अंक चाळला.
चांगला उपक्रम...! अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
अभिनंदन
अंक चाळला.
मांडणी लोभस आहे, आणि लेख-कविताही वाचनीय आहेत.
+१
हेच म्हणतो. अंक चाळला. आता निवांतपणे अंक वाचेन म्हणतो.
नवनवीन प्रकल्प करणार्या सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन.
अभिनंदन! परंतु,
हिवाळी अंकाच्या प्रकाशनाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन. परंतु, अंक खास वाटला नाही.
मांडणी ठीक आहे. धनंजय म्हणतात त्याप्रमाणे लोभस वगैरे वाटली नाही. शुद्धलेखनाच्या चुका, स्मायलींचा वापर, अकारण विरामचिन्हांचा उपयोग (जो वरील लेखातही दिसतो...............), लेखांचे जस्टीफिकेशन (याला मराठीत काय म्हणतात हे ठाऊक नाही.) केल्याने शब्दांमध्ये अकारण आलेली मोकळी जागा हे संपादकांना टाळता आले असते असे वाटते.
तरीही एका उपक्रमाला सुरुवात केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वेळेस यापेक्षा दर्जेदार अंक काढता येईल.
सध्या अंक चाळला आहे. नीट वाचल्यावर लेखांबद्दल प्रतिक्रिया देता येईल.
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व उपक्रमाला शुभेच्छा. एकंदर प्रियालींशी सहमत आहे.
सुधीर कांदळकर ह्यांचे दोन्ही लेख भरकन वाचले. आवडले.
शब्दऽऽऽगारवा वाचून हुडहुडी भरली
शब्दऽऽऽगारवा वाचून हुडहुडी भरली. मिपाच्या ह्या हिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अतिशय बटबटीत झाले आहे. थोडक्यात मिपाला अत्यंत साजेसे ! अभिप्राय/मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील अंकासाठी भरघोस भेच्छा !
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हा अंक मिपाचा नाहीये.
मिपाच्या ह्या हिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अतिशय बटबटीत झाले आहे. थोडक्यात मिपाला अत्यंत साजेसे ! अभिप्राय/मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद
हा अंक मिपाचा नाही तर तो पूर्णपणे एक स्वतंत्र अंक आहे हे मी स्पष्टपणे नमूद करतो. तेव्हा कृपया मिपाला ह्यात गृहित धरू नका. मी पूर्वी मिपावर अथवा अन्यत्र केलेल्या निवेदनात अथवा संपूर्ण अंकात तसा कुठेही उल्लेख नाहीये. तेव्हा कृपया गैरसमज नसावा. असलाच तर ह्या निवेदनाने तो दूर होईल ही अपेक्षा.
ह्या अंकाबद्दल आपली जी काही बरी/वाईट मतं असतील त्यांचे मात्र स्वागतच आहे. ती आपण खुशाल व्यक्त करावीत. इथेच नाही तर प्रत्यक्ष अंकात प्रतिक्रिया नोंदवून. तिथे प्रतिक्रिया देण्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नाहीये अथवा त्यात संपादनही केले जाणार नाही. आपल्याला हवी ती प्रतिक्रिया तिथे नोंदवू शकता.
इथल्या प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
.
देवाशप्पत विश्वास बसत नाही
शब्दगारवा हा पूर्णपणे एक स्वतंत्र अंक आहे, ह्यावर देवाशप्पत विश्वास बसत नाही. असो. हाती घेतलेले काम तडीस नेल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. ह्या वर्षीच्या उणिवा पुढच्या वर्षीच्या अंकात नसतील, ह्याबद्दल मी आशावादी आहे.
अवांतर
सुधीर काळे ह्यांचे ऑडियो विडियो द्यायला हवे होते. मी त्यांचा लेखनाचाच नव्हे तर गायनाचाही फॅन आहे.
काका दिलाने जवान आहेत!
त्यांचा सिगरेट सोडावरण्याचा लेख प्रेरणादायी आहे.
तुम्ही पुन्हा एकदा मिपाचे संपादक नाही आहात काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मस्त :)
'जबसे तेरे नैना' भारी म्हणताहेत काळे साहेब.
'जबसे दिवाना हुवा' 'जबसे बेगाना हुवा' इथं तर लैच जोर धरलाय त्यांनी. :)
हा तरी प्रतिसाद राहतो की नै कोणास ठाऊक ?
-दिलीप बिरुटे
अवांतर
अवांतर प्रतिसादांवरील सेन्सॉरशिप सध्या 'तिकडे' चालू आहे. इकडे नाही. :)
नितिन थत्ते
हिवाळी अंक
अंक वर वर चाळला. एखाद दुसरा लेख वगळल्यास पटकन लक्ष वेधून घेणारे अजून तरी काही दिसले नाही. अंक मिसळपावचा नसल्याचा खुलासा केल्याबद्दल आभारी आहे, कारण एकंदरीत अवतार बघून माझाही तसाच गैर समज झाला होता.
[संपादित]
असो. तुम्ही उत्साहाने पुढाकार घेऊन हा अंक काढलात तुमचे अभिनंदन आहेच. पुढचा अंक अजून सरस निघावा ह्या एकमेव उद्देशाने थोडा टीकेचा सूर लावला आहे. डोळ्यांदा आल्हाददायक वाटेल अशी रंग संगती जमली पाहिजे.
सस्नेह,
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
शुभेच्छा!
प्रमोदकाका,
हिवाळी अंक छानच झाला आहे. पण तुम्ही अंकासाठी स्वीकारलेले दिलेले लेखन हे लेखकांचे स्वत:चे असावे (कॉपी पेस्ट नसावे) असा आग्रह धरला होतात का? अंक चाळताना 'अवलिया' नावाने आलेले लेखन इतरत्र वाचल्या सारखे वाटत आहे. दुवा शोधतो आहे/सापडला की देईन(च).
तोपर्यंत अंकाला भरघोस शुभेच्छा!
(शुभेच्छूक) बेसनलाडू
इकडे कशाला?
[संपादित]
देव काकांच्या अंकाविषयीच मते लिहावीत.
नितिन थत्ते