देण्यातला आनंद!

देण्यातला आनंद!

सध्या दूरदर्शनवर 'जॉय ऑफ विक' ची जाहिरात बर्‍याच वेळा दाखवली जाते. ती जाहिरात बघतांना शाळेत शिकलेल्या एका कवितेतली ही 'घेता घेता एक दिवस देण्यार्‍याचे हातच घ्यावे' ओळ आठवली. त्याच बरोबर 'देण्यातला आनंद' काय असतो ह्याचे नकळत झालेल्या संस्काराच्या आठवणींचा बांध फूटला.
काही अपेक्षा न करता काम करत जायचे. जेवढे देता येईल तेवढे देत जायचे. देतांना चांगल्याच गोष्टी द्यायच्या. असो.

मागच्या आठवडयात ३+३+३, म्हणजे ३ दिवस सुट्टी + ३ दिवस काम + ३ दिवस सुट्टी! मधले ३ दिवस मी सुट्टी घेतली होती. त्यामुळे चांगली सलग ९ दिवसांची सुट्टी मिळाली. सुट्टीवरून परत आल्यावर ऑफिसमध्ये 'जॉय ऑफ गिव्हिंग' साठी ५, ६ आणि ७ ह्या तारखा आहे आणि तुम्ही काय काय देऊ शकता ह्याची माहिती दिलेला ईमेल आलेला होता.त्यात नविन-जुने कपडे आणि शाळेतल्या मुला मुलींन साठी लागणारे लिखाणाचे साहित्य ह्या गोष्टिंचा समाविष्ट केला होता. ह्या आपण दिलेल्या वस्तूंचे काय करणार ह्याची माहितीपण दिली होती. ह्या वस्तू एका सेवाभावी संस्थेला देणार होते आणि ती संस्था गरजू वक्तींना त्या वस्तू देणार होते.

मी पण काही कपडे काढले जे मला देता येणार होते असे. हे कपडे बाजूला काढतांना बरीच मनाची घालमेल होत होती. हा कपडा चांगला आहे पण आता होत नाही म्हणून बरेच दिवस कपाटात तसाच पडलेला आहे. कपड्यात गुंतलेले मन बाजूला केले आणि 'देण्यासाठी' कपडे बाहेर काढले.

नंतर लेखन सामुग्री बाहेर काढली. लक्षात आले न वापरातले बरेच पेन, पेन्सिल आहेत.

ह्या सगळ्या वस्तू एकत्र केल्या आणि ऑफिसमधे ठेवलेल्या एका मोठ्या डब्बात ठेवल्या.

बर्‍याच चांगला प्रतिसाद ह्या 'जॉय ऑफ गिव्हिंग'ला मिळाला होता.

काही दिवसांपूर्वि बिल क्लिंटनचे 'गिव्हिंग' हे पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी 'गिव्हिंग' बद्द्ल बरेच मुद्दे चांगल्या प्रकारे मांडले होते. म्हणेज मला ते पटले होते. 'Unique global giver is world Bicycle Relief' बद्द्लची माहिती वाचली त्यावेळेसच मला एक ई-मेल आला मुंबईचे काहीजण जून्या सायकली गोळा करतात आणि आदिवासी पाड्यांवरच्या मुला-मुलींना देतात. जुन्या सायकली दुरूस्त करण्याची जबाबदारी त्या गोळा करणार्‍या मुलांचीच. माझ्याकडे सायकल नसल्या कारणाने ह्या प्रकल्पात भाग घेता आला नाही, फक्त आलेला ईमेल 'फॉरवर्ड' करण्याचेच काम केले. विकत घेऊन देता येण्यासारखे होते! पण नाही केले. असो.

सध्या निवडणूकेचे चांगलेच जोरात वारे वाहात आहे. पुढारी मंडळी बरेच काही 'देत' आहे. त्याबद्द्ल्यात आपले 'अनमोल मत' मागत आहे. हे मत आपण आपल्यापरीने कोणाच्या आश्वासनांना बळी न पडता योग्यरित्या द्याल हीच अपेक्षा!

आणि मत 'देण्यातला आनंद' मिळवा!!

Comments

चांगले स्फूट

आपले स्फूट चांगले आहे. पण त्यामुळेच त्यात "प्रतिसाद" देण्याचा आनंद मिळत नाही आहे. ;) कारण तसा आनंद मिळण्यासाठी काहीतरी वाद निर्माण व्हावा लागतो. म्हणूनच (हे लिहीत असताना) ११६ वाचने झालीत (किमान १०० युनिक) पण प्रतिसाद नाहीत... :-(

असो थट्टा सोडून द्या. मात्र गिव्हींग हे पुस्तक वरवर वाचले असल्याने पूर्ण लक्षात नाही. मात्र त्यातील मूळ मुद्दा गिव्हींगचा कुठल्यान कुठल्या रुपाने प्रत्येकाने पाळावा असे नक्की वाटते.

खरेच का?

"प्रतिसाद" देण्याचा आनंद मिळत नाही आहे. ;) कारण तसा आनंद मिळण्यासाठी काहीतरी वाद निर्माण व्हावा लागतो.

असे खरेच असते का? मुद्दा नाही पटला! आणि आपले विचार सगळ्यांना पटतीलच असे काही नाही आहे. (ह. घ्या.)

सारांश

गिव्हींग हे पुस्तक सारांश म्हणून वाचायला चांगले आहे. जागतिक पातळीवर भारतीयांच्या कार्याची घेतलेली दखल विशेष लक्षात राहाते.

कोणाला काही द्यायचे म्हटले की आपल्याला सर्वात आधी पैसा, अन्न ह्या गोष्टी आठवतात. ह्या खेरीज वेळ, कला, माहिती, आपण केलेल्या कामाची पद्धत वैगरे पण महत्वाचे असते.

नक्कीच उपयुक्त!

कित्येक गोष्टी पुनर्वापरात आपण आणू शकतो. आपल्या नात्यात-मित्रमंडळीतही मुलांचे लहान झालेले पण उत्तम अवस्थेतले कपडे, वयानुरुप मागे पडलेली चांगली खेळणी अशा कित्येक वस्तू बरीच भावंडे/मित्र वापरतात. आम्ही स्वतः हा प्रकार नियमितपणे अमलात आणतो.

चतुरंग

स्वारी

तिकडे दंगल चालू होती त्यामुले ह्या लेखाकडे दुर्लक्ष झाले. स्वारी.
मी परदेशात असताना बरीच पुस्तके जमवली होती. येताना ती एका लायब्ररीला देउन आलो, काही मित्रमैत्रिणींना दिली. त्याची आठवण झाली.

छान

परदेशात आपण आवडल्या म्हणून आणि गरज म्हणून् वस्तू विकत घेत असतो. भारतात परत येतांना सगळ्याच वस्तू बरोबर आणता येत नाही.

रेड क्रॉसच्या डब्बात कपडे टाकायची सोय वापरतांना बरे वाटले होते. निदान आपण टाकलेले कपडे कोणाच्या तरी उपयोगात येणार आहेत ह्याची कल्पनाच छान वाटते.

भांड्यांची विल्लेव्हाट लावतांना बरेच कष्ट घ्यावे लागले होते.

छान स्फुट

स्फुट आवडले.

जमलेल्या वस्तू देताना मला त्रास होत नाही तितका जमवताना होतो. (हे पाचवे बॉलपेन मला गरजेचे आहे की नाही?...)
पण घरी येताच मोकळेमोकळे वाटते. बहुतेक गोष्टी आडगळच असतात. दुसर्‍या कोणाच्या उपयोगी आल्यात तर उत्तम!

देण्यातला आनंद कोणाला मिळतो?

माणसाच्या परिपक्वतेनुसार त्याच्या आनंदाच्या कल्पना बदलतात. अपरिपक्व माणसाचा आनंद वस्तू जमवण्यात असतो तर परिपक्व माणसाला "आपण परिस्थिति बदलू शकतो " या साक्षात्काराचा आनंद होतो. देण्यामुळे लाभधारकाची चिंता कमी होते. लाभधारक देणार्‍याच्या परिस्थितीचा भाग असल्यामुळे देणार्‍याच्या परिस्थितितील तणाव काही अंशी कमी होतो. येथे देणार्‍याला आपण प्रतिकूल (चिताजनक तणावपूर्ण) परिस्थिति अनुकूल (तणावरहित) करू शकलो हा अनुभव येतो ज्याचा त्याला आनंद होतो.

देऊ देत की!

पुढारी मंडळी बरेच काही 'देत' आहे.

देऊ देत की! त्यांना नको का 'देण्यातला' आनंद मिळायला? मग पुढली ५ वर्ष ते देण्याऐवजी 'घेणारच' आहेत! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रतिसाद

प्रतिसादासाठी सर्वांचे आभार.

आणखी एक

सर्वच विमानतळांवर एक पारदर्शक पेटी असते. यात तुम्ही कुठल्याही देशाची नाणी, नोटा टाकू शकता. हे पैसे चॅरिटीला देण्यात येतात.(मी मागच्या वेळेला पांडा वाचवण्याच्या मोहिमेला दिल्याचे आठवते.) बहुतेकवेळा परदेशप्रवासानंतर राहिलेल्या चिल्लरचे काय करायचे असा प्रश्न असतो. त्यासाठी ही चांगली सोय आहे.

---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

 
^ वर