धर्मनिरपेक्ष भारत आणि भारतात आश्रय?

नमस्कार मंडळी,
आपला हा महान भारत देश धर्म निरपेक्ष आहे. हे आता इथल्या प्रत्येक धर्माच्या भारतीयाला माहित आहे. सर्वात अलिकडच्या मिरजच्या धार्मिक दंग्यात आपण कसे धर्म निरपेक्ष आहोत हे दिसलेच. युट्युबवरच्या खालील ध्वनिचित्र फितीमध्ये एक नमुना आहेच.

पण आज मटामध्ये पाकमधील ५ हजार हिंदू भारतात! हि बातमी वाचली आणि जोरदार धक्काच बसला? हे चक्क आपल्या येथे घडते आहे यावर विश्वासच बसेना. असे का घडले हे काही कळेना. हे मान्य आहे की आमच्या बांग्लादेशातील हजारो-लाखो मुस्लिम बांधवांना आम्ही गेले कित्येक दशके आश्रय देत आहोत. सर्वधर्म प्रिय भारतीयांना याची सवयच आहे. पण आपल्या लाडक्या पाकिस्तानातुन चक्क हिंदूंनी घुसखोरी करावी? त्यांना कोणी सांगितले की भारतात आश्रय घ्या म्हणून? त्यांना हे माहित नाही काय की भारत हा एक धर्म निरपेक्ष देश आहे आणि येथे त्यांना हिंदू धर्माच्या नावाखाली संरक्षण मिळणार नाही? त्यांना हे माहित नाही काय की भारतात आश्रय घेण्यासाठी हिंदू असून चालत नाही? हे म्हणजे अतिच झाले. सरकार काय करते आहे?
हि बातमी वाचून अनेक प्रश्न पडले. त्याची समाधान कारक उत्तरे काही केल्या मिळेनात. तुम्हाला पडतात का हे प्रश्न? तुमच्याकडे आहेत का त्यांची समाधान कारक उत्तरे?

  1. पाकिस्तानातून हिंदू भारतात का येत आहेत? हा तर धर्म निरपेक्ष देश आहे. भारतात येण्यामागे त्यांची काय मानसिकता असावी?
  2. या लोकांना भारताने आश्रय द्यावा का?
  3. केले धर्मांतर तर केले. काय फरक पडतो? जगणे महत्वाचे आहे. धर्म हा शेवटी एक लेबल आहे. नाही का?
  4. भारतात हिंदू म्हणून प्रवेश केला तो केला. जातीचे काय? येथे त्याला देखील महत्व आहे.
  5. या हिंदूंना अटक करून तुरुंगामध्ये टाकावे काय? काय माहिते हा पाकिस्तानचा नवा डाव असायचा.
  6. या लोकांना पृथ्वीतलावर दुसरा कोणता देश नाही मिळाला काय? जरा चौकशी तरी करायची की भारतात जगणे खरच सुसह्य आहे का?
  7. समजा जगभरतात असा हिंदूंचा छळ होऊ लागला तर ते भारताकडे धाव घेतील काय? त्यामुळे भारताच्या सर्व व्यवस्थांवर ताण पडून या व्यवस्था कोलमडून भारतात अस्थिरता माजेल काय? या मागे काही आंतरराष्ट्रीय हात असावा काय?

तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित असतील अथवा काही विचार असतील ते येथे मांडावेत. अथवा असेच काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मांडावेत.

निवेदन : भारत या धर्मनिरपेक्ष आणि संसदिय लोकशाहीच्या देशात आशा आहे की असे प्रश्न विचारता यावेत. तसेच हे प्रश्न विचारण्या मागे कोणताही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा चर्चा प्रस्तावकाचा हेतू नाही. आपल्या भारत भूमीची काळजी हा एकमेव हेतू या चर्चेमागे आहे.

Comments

व्यंग्योक्ती आहे इतपत कळले

व्यंग्योक्ती आहे इतपत कळले मात्र व्यंगोक्तीतून नेमका येणारा अर्थ मात्र कळली नाही.

भारतातले मूलभूत कायदे धर्मनिरपेक्ष आहेत. (नागरी कायदा - "पर्सनल लॉ" - यासाठी अपवाद कसा वगैरे, याविषयी न्यायालयाने, आणि भारताचे पूर्वीचे कायदेमंत्री डॉ. आंबेडकर यांनी विस्तृत चर्चा केलेली आहे.)

भारतातील नागरिक वेगवेगळे धर्म पाळतात. काही लोक धर्म बदलतात. बहुसंख्य लोक बदलत नाहीत, वगैरे. याबाबत स्वातंत्र्य आहे - इतपत काय कायद्याचा संबंध.

भारतात लोक भांडतात आणि हिंसा करतात. कुठल्याही दंगली भारतात कायदेशीर नाहीत. त्यामुळे दंगलींच्या बाबतीत कायदा-सुव्यवस्था यंत्रणा शिथिल असल्याचा दोष असला तरी, धर्मावरून दंगल होण्याचा संबंध वैयक्तिक/सामूहिक वैमनस्याचा आहे. कोणाच्या मनात धार्मिक आकस आहे, ते धर्मनिरपेक्ष कायद्याच्या हद्दीच्या बाहेर आहे. (भारतातील कित्येक लोकांना शेपूची पौष्टिक भाजी नावडती आहे, याचा भारताच्या भाजी-निरपेक्ष कायद्याशी काय संबंध? भारत पालेभाजी-स्वातंत्र्यवादी आहे की नाही अशी गंभीर चर्चा किंवा व्यंग्योक्ती काहीही समजण्यासारखी नाही. हां - आता कोणी शेपूची शेते नासवू लागले, तर कायद्याचा प्रश्न येतो.)

असे असताना वरील प्रश्न गंभीरपणे किंवा व्यंग्योक्तीने कसे लागू होतात, हे मला मुळीच कळत नाही.

विस्थापित लोक जिथून विस्थापित झाले (भारतावेगळा देश - पाकिस्तान), तिथे त्यांच्यावर धर्माच्या कारणाने जुलूम झाला याचा भारताच्या कायद्याच्या धर्मनिरपेक्ष असण्याशी संबंध काय आहे? संयुक्त राष्ट्रांचा आश्रितांबाबत आंतरराष्ट्रीय कायदा भारताला मान्य आहे, भारत तो कायदा लागू करेल. (यात साधारणपणे रेफ्युजींना आश्रय दिला जातो. व्याख्या अपवाद वगैरे कायद्याच्या भाषेत दिलेले आहेत.) हा कायदा लागू करण्याचे भारताने मान्य केले, त्याचाही भारतीय कायदा धर्मनिरपेक्ष असण्याशी काय संबंध आहे, ते कळले नाही.

जे लोक "सर्वधर्मप्रियता" किंवा "भारताची धर्मनिरपेक्षता" अशा संकल्पना वापरतात, त्यांना "पाकिस्तान लाडका" आहे, अशी काही लेखकाची व्यंग्योक्ती आहे, की लेखकाचे गंभीर मत आहे?

लेखाचा रोख नीट न समजल्यामुळे संभ्रमात आहे.

मी सुद्धा

धनंजय,
मी सुद्धा संभ्रमात आहे म्हणून तर चर्चा करायची आहे. धर्म आणि शेपूच्या भाजीची तुलना कळली नाही.
चर्चा टाकण्यासाठी मिरजच्या दंगलीचा लांबून घेतलेला अनुभव हे कारण असावे कदाचित. मी वर लिहिल्या प्रमाणे त्या पाकिस्तानी हिंदूंची भारतात येण्याची मानसिकता काय असावी हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. भारत हा काही एकमेव देश नाही जिथे त्यांनी यावे. भारतात येण्यामागे धर्म हे कारण आहे असे वरवर दिसते आहे आणि भारतात धर्मनिरपेक्ष कायदा/सरकार आहे.
शांतपणे विचार केला आणि असे मानले की जगात पसरलेले हिंदू आश्रयासाठी भारतात परत येऊ लागले तर येथे ताण पडेल हे सत्य आहे. मग फक्त धर्म या कारणा खातर भारताने असे किती जणांना आश्रय द्यावा. आज एकाच मुस्लिम देशातुन आले आहेत. उद्या अनेक मुस्लिम/ख्रिश्चन देशांमधुन येऊ शकतात. त्याचा विचार होणे गरजेचे आहे असे मला वाटते. हा लेख नाहीच. चर्चा आहे. म्हणाल तर व्यंगोक्ती आहे म्हणाल तर गंभीर मुद्दे आहेत.
चर्चा पुढे गेल्यास (?) अनेक चांगले मुद्दे येतील असे वाटते.


विस्थापितांना आश्रय बहुधा आंतरराष्ट्रीय कायद्याखाली दिला

भारताने विस्थापितांना आश्रय बहुधा (भारताला मान्य आलेल्या) आंतरराष्ट्रिय कायद्याखाली दिला असावा. हिंदू म्हणून दिला नसावा. मटा मधल्या बातमीतून नीट कळत नाही.

(पाकिस्तानातील आश्रितांसाठीचे विशेष कायदे बहुधा १९४७ च्या आसपास लागू होते - त्यानंतर किती वर्षांसाठी ते नीट आठवत नाही. हे कायदे बहुधा धर्मनिरपेक्ष होते, पण बहुतांश हिंदूंनी फायदा घेतला. शिवाय मोठ्या प्रमाणात शिख. थोडेफार ख्रिस्ती, पारशी असतील.)

इदी अमीनने आफ्रिकेतून हकलल्यानंतर बहुतेक भारतीय वंशाचे लोक (त्याने हिंदू-मुसलमान भेद केला नाही - ८०,००० घालवले) भारतात आले नाहीत. आजूबाजूचे आफ्रिकी देश, कॅनडा, यूके, यूएस येथे गेले.

मला वाटते, जुलूम असह्य झाल्यावर पळून कुठे जायचे, त्याबद्दल लोकांवर भौगोलिक आणि सांस्कृतिक बंधने असतात. तमिळ रेफ्युजी बहुसंख्य हिंदू होते, तरी काही लहान प्रमाणात मुसलमान, ख्रिस्ती देखील होते. तिथे त्यांना तमिळनाडूशी भौगोलिक आणि सांस्कृतिक जवळीक होती.

मला वाटते, या मुद्द्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते, पण भारताची घटनात्मक धर्मनिरपेक्षता या चर्चेत पूर्णपणे अवांतर आहे. भारतात बहुसंख्य हिंदू असल्यामुळे आजूबाजूच्या देशातल्या हिंदू लोकांना भारताबद्दल सांस्कृतिक आणि भौगोलिक जवळीक वाटते, हा मुद्दा अवांतर नाही.

(शेपूच्या भाजीचा मुद्दा असा - लोकांच्या मानसिकतेचे स्वातंत्र्य आहे. त्याच्याबद्दल घटना उदासीन आहे. कायदा धर्मनिरपेक्ष, गोरेपणा-निरपेक्ष, डावखुरेपणा-निरपेक्ष, वगैरे, आहे. त्याच प्रमाणे भाजीची-आवड-नावड-निरपेक्ष. त्याचा असा अर्थ नाही की लोक स्वतःहून धार्मिक द्वेष करत नाहीत, फक्त गोरीच बायको हवी असे मनात ठेवत नाहीत, डाव्या हाताने खाणार्‍या मुलाला उजव्या हाताने खायला सांगत नाहीत... या सर्व बाबतीत कायद्याला देणेघेणे नसते. माझ्या आईने मला, माझ्या भावाला उजव्याच हाताने जेवायला सांगितले. त्यामुळे भारतात कायदा उजवेखोर-डावेखोर भेद करतो, असा विचारही मनात येत नाही. त्याच प्रमाणे कोणी धर्मद्वेष्टा/धर्ममार्तंड भेटला, तर "भारताचा कायदा धर्मनिरपेक्ष आहे" हा विचार गैरलागू आहे. पण समाजात हिंसा थांबवणे, आणि सुव्यवस्था राखणे, याबाबत कायदे आहेत. मग कोणी कन्नड-तमिळ लोक बेंगळुरात जुंपले आहेत, की हिंदू-मुसलमान मिरजेत, कायद्याला व्यवस्था राखण्याची दखल घ्यावी लागते. मग भारतीय घटना कायदा कन्नड-विरुद्ध-तमिळ-भाषा-निरपेक्ष आहे, धर्म-निरपेक्ष आहे, हे ना इथे ना तिथे - पूर्णपणे अवांतर.)

जरूर

मला वाटते, या मुद्द्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते,

जरुर.
आफ्रिकेच्या माहिती बद्दल धन्यवाद. खरतर या चर्चेला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे काय अवांतर हे ठरवणे जरा अवघडच आहे.


महत्वाचा मुद्दा

मला वाटते, जुलूम असह्य झाल्यावर पळून कुठे जायचे, त्याबद्दल लोकांवर भौगोलिक आणि सांस्कृतिक बंधने असतात. तमिळ रेफ्युजी बहुसंख्य हिंदू होते, तरी काही लहान प्रमाणात मुसलमान, ख्रिस्ती देखील होते. तिथे त्यांना तमिळनाडूशी भौगोलिक आणि सांस्कृतिक जवळीक होती.

हाच महत्वाचा मुद्दा आहे. बांग्ला देशातील लोकांना भारत 'जवळचा' वाटतो. पाकिस्तान नाही. हा मुद्दा मानसिक सुरक्षितता या गोष्टीशी पण निगडीत आहे. इथे ही त्यांच्यावर जुलुम् झाला तरी तुलनात्मक दृष्ट्या त्यांना तो न्याय्य वाटतो.
प्रकाश घाटपांडे

पाकिस्तानच

बांग्लादेशला बांग्लादेश आपण समजतो. तत्वः तो पाकिस्तानच आहे. बांग्लादेशी भारताच्या आश्रयाला येतात हे आपले माझे मत. आपण त्यांना मज्जाव करत नाही म्हणून आश्रय म्हणायचं. इथे त्यांच्यावर जुलूम होत असल्याची काही उदाहरणे आहेत का?


बरोबर वाटते

भारताने विस्थापितांना आश्रय बहुधा (भारताला मान्य आलेल्या) आंतरराष्ट्रिय कायद्याखाली दिला असावा. हिंदू म्हणून दिला नसावा. मटा मधल्या बातमीतून नीट कळत नाही.

धनंजयच्या वरील विधानातील दुसरा मुद्दा (हिंदू म्हणून...) पटतो. मात्र पहीला मुद्यासंदर्भात,थोड्याफार् माहीतीवर आधारीत (आत्ताच जवळून पहात असलेल्या एका कम्युनिटीच्या माहीतीवरून), तसे नसावे असे म्हणावेसे वाटते.

मला वाटते ते (पर्याय नसल्याने) बेकायदेशीर स्थलांतरीत म्हणून भारतात रहात असतील. नंतर त्यांना जरी पकडले तरी दुर्लक्ष केले जात असावे. जेंव्हा राजकीय/धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने विस्थापन होते तेंव्हा आंतर्राष्ट्रीय कायदा पाळणे सहजा एकदम होत नसावे. त्यात आंतर्राष्ट्रीय संघटना आणि इतर अनेक देश सहभागी होवून वाटून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. (अधिक माहीतीसाठी या संदर्भात वेगळा लेख लिहावा लागेल. )

अधिक

अधिक माहीतीसाठी या संदर्भात वेगळा लेख लिहावा लागेल.

वा वा!! लिहा.. वाट पहातो.


सरकारचा मिंधेपणा...

मुसुलमान मंडळी चक्क पोलिसांच्या गाडीवर चढून त्यांच्या हिरव्या चिंध्या फडकवताहेत आणि बाजूलाच तो इनिसपेक्टर काहीही न करता नुसताच उभा आहे हे संतापजनक आहे. पोलिसांच्या गाडीवर चढून हिरव्या चिंध्या फडकवणे हा जणू,

'आम्ही सरकारच्या नाकावर टिच्चून आमची धर्मांधता दर्शवून देणार, आमचे झेंडे (पक्षी : हिरव्या चिंध्या!) नाचवणार परंतु सरकार आमच्या समाजाचे मिंधे असल्यामुळे ते आमचे काहीच वाकडे करू शकणार नाही!'

असा संदेशच आहे!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

कायदेशिर प्रश्न

अहो तो एकटा इन्सपेक्टर एवढ्या गद्रीला काय करणार.

एक कायदेशिर प्रश्न : पोलिसांच्या गाडीवर चढून हिरव्या झेंडा फडकवणे हा गुन्हा आहे काय ?

असावा!

पोलिसांच्या गाडीवर चढून हिरव्या झेंडा फडकवणे हा गुन्हा आहे काय ?

असावा!

कुठलेही झेंडे फडकवण्यास - निदर्शनं करण्यास, बंदोबस्तास असलेल्या पोलिसांच्याच वाहनाचा उपयोग करणे हा माझ्या अंदाजाप्रमाणे गुन्हाच असावा. कायदेतज्ञांकडून अधिक खुलासा होऊ शकेल...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

धर्मनिरपेक्षता आणि भारत

धर्म आणि रीलिजन या दोन शब्दांमध्ये मूलभूत फरक आहे. आणि हे दोन शब्द समानार्थी नाहीत. तद्वतच, सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द समानार्थी नाहीत.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा पोलीसांचा धर्म आहे.. धर्माचा उपयोग अशा संदर्भात केला जातो.

सेक्युलरीझम म्हणजे शासन आणि रीलिजन चा संपूर्ण घटस्फोट. शासन करणे हाच सरकार चा धर्म आहे. आणि तो धर्म भारत सरकार पाळत आहे.

सर्व मोक्षमार्गांविषयी समान दृष्टी ही भारताची नीती आहे. ह्या नीतीला सेक्युलरीझम म्हणता नाही येणार. तसेच भारताला धर्मनिरपेक्ष पण म्हणता नाही येणार.

रीलीजन ही संकल्पनाच मुळी अभारतीय आहे, आणि म्हणुनच या संकल्पनेशी तडजोड करतांना हिंदुंची तारांबळ उडते आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण होतात.

उलट

सर्व मोक्षमार्गांविषयी समान दृष्टी ही भारताची नीती आहे. ह्या नीतीला सेक्युलरीझम म्हणता नाही येणार. तसेच भारताला धर्मनिरपेक्ष पण म्हणता नाही येणार.

धर्मनिरपेक्षता ही भारताची नीती आहे. सर्वधर्मसमभाव हा नास्तिकांवर अन्याय होईल. तसा भारतीय कायद्यांत (अजून) नाही.

डार्विनचे पुस्तक छातीशी धरणारे कोणी आत्मघातकी दहशतवादी पाहिले आहेत का? -- David Nicholls

नास्तिकता

नास्तिक म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे आपल्याला?

नास्तिक या शब्दाचा अर्थ म्हणजे असे लोक जे "वेद-वाक्य" प्रमाण मानीत नाहीत. वेद-वाक्य प्रमाण मानणरे लोक आस्तिक म्हणवतात.

माझ्या मते तुम्हाला "निरिश्वर-वाद" म्हणायचे आहे..

निरिश्वरवाद हा आस्तिक आणि नास्तिक, दोन्ही विचारधारांमध्ये सापडतो.

निरिश्वरवादी आस्तिक मार्ग म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मिमांसा. या मार्गांमध्ये ईश्वर हे गृहितक अमान्य करण्यात आलेले आहे. ईश्वरवादी आस्तिक मार्ग म्हणजे उत्तर मिमांसा, वेदांत, तंत्र. "योग" या मार्गाला केवळ एका श्लोकामुळे इश्वरवादी म्हणता येइल, एरवी योग आणि ईश्वर यांचा संबंध फारसा नाही. भक्ती वगैरे द्वैत वेदांत या मार्गाचे अंग आहे. वेदांत हे अद्वैत, विशिष्टद्वैत, आणि द्वैत या तीन उपशाखांमध्ये विभागलेले आहे.

निरिश्वरवादी नास्तिक मार्ग म्हणजे बौद्ध, जैन, आजीविक, चार्वाक इत्यादी.. इश्वरवादी नास्तिक मार्ग म्हणजे शीख. हे सगळे "मोक्ष-मार्ग" आहेत. आयुष्यातील धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांशी या मार्गांचा फारसा संबंध येत नाही.

मुसलमानांनी आस्तिक-नास्तिक सरसकट सर्व लोकांना हिंदू म्हणून ओळखले. ईंग्रजांनी सर्व आस्तिक मार्गांना "हिंदूईझम" या नावाखाली विभागले.

भारतीय दृष्टीकोनातुन जर पाहिले तर हे सगळे मोक्ष-मार्ग आहेत, जी अत्यंत वैयक्तिक बाब आहे.

आयुष्याच्या धर्म-अर्थ-काम-मोक्ष, या ४ पुरुषार्थां पैकी धर्म आणि अर्थ, हे दोनच अंगे शासनाच्या हस्तक्षेपाखाली येतात. त्यामुळे तसे पाहिले तर भारतीय जीवनपद्धती वस्तुतः "सेक्युलर" आहे. हा सगळा घोळ "हिंदुईझम" या सापेक्षतः नवीन प्रक्षिप्ता मुळे घडला आहे. आणि याला कारणीभूत इस्लामची चुकीची ओळख, होय. सांख्य, योग, बौद्ध, शैव, वैष्णव सारखा इस्लाम काही फक्त एक "मोक्ष-मार्ग" नाही. इस्लाम वस्तुतः एक सामाजिक आणि राजकीय विचारधारा आहे जी "ईश्वर" या संकल्पनेचा उपयोग केवळ सोयीपूरता करते. ती "सोय" म्हणजे मध्ययुगीन अरेबियातील लोकसंग्रह. "ईश्वराच्या" नावाखाली मुहम्मदाने संग्रहित केलेल्या अरब लोकांची socio-political doctrine म्हणजे इस्लाम.

पश्चिम आशिया मध्ये उद्भव पावलेले सगळे "religions" हे असेच socio-political doctrine आहेत. आणि या doctrine मध्ये मोक्ष-मार्ग, कर-व्यवस्था, विवाह-व्यवस्था, लोकांच्या लैंगिक आवडी, आध्यात्मिक कल, युद्ध-नियम, penal-code, लोकांनी कपडे कसे घालावे, काय खावं, काय खाऊ नये, कुठल्या दिशेला तोंड करून मल-मुत्रविसर्जन करावं, हे सर्व काही ईश्वर ठरवितो त्याच्या प्रेषिता द्वारे. म्हणुन मध्ययुगीन युरोप मध्ये रेनेझांस काळात "सेक्युलारिझम" प्रचलित झाल, ज्यात ईश्वर फक्त मोक्ष-मार्गापुरता मर्यादित केला गेला.

आपल्याकडे ही व्यवस्था बेसिकली अशीच आहे. जो पर्यंत राष्ट्र, राष्ट्रातील प्रत्येक समाज, समाजातील प्रत्येक व्यक्ती आपला धर्म पाळत आहे, आणि धर्माला अनुसरुन अर्थार्जन करीत आहे, तो पर्यंत शासनाला लोकांच्या मोक्ष-मार्गामध्ये ढवळाढवळ करण्याचा काडीमात्र सुद्धा अधिकार नाही. धर्म म्हणजे व्यक्ती आणि समष्टी च्या विकासासाठी सर्वानुमताने ठरविण्यात आलेले नियम. आधुनिक काळात प्रचलित धर्म-शास्त्र म्हणजे भारताचे संविधान. संविधानाचे पालन करणारी प्रत्येक व्यक्ती धार्मिक आहे. पुर्वीच्या काळात देश-कालमाना प्रमाणे नियम ठरविण्यात आलेले होते. उदा. मनुस्मृती, वाजसनेय स्मृती, मेधातिथी स्मृती इत्यादी. यामुळे धर्मनिरपेक्षता, हा शब्दच मुळी अर्थहीन आहे.

असो, तर पंथनिरपेक्षता ही भारताची अनादी काळापासुन चालत आलेली नीती आहे. या नीतीचे सर्वात घाण आणि विकृत रूप म्हणजे आधुनिक भारतातील "सेक्युलारिझम".

व्याख्या बदलतात

हल्ली मोक्ष मार्गालाच धर्म म्हणतात. त्याचप्रमाणे निरीश्वरवाद्यांनाच नास्तिक म्हणतात. म्हणून मीही त्याच अर्थाने हे शब्द वापरले आहेत.

इस्लाम काही फक्त एक "मोक्ष-मार्ग" नाही.

हिंदुइझमही नाही. जेव्हा मोक्षप्राप्तीसाठी कोणतीही ऐहिक कृती केली जाते तेव्हा त्यावर शासनाचे लक्ष आवश्यक असते. ते "जो पर्यंत राष्ट्र, राष्ट्रातील प्रत्येक समाज, समाजातील प्रत्येक व्यक्ती आपला धर्म पाळत आहे, आणि धर्माला अनुसरुन अर्थार्जन करीत आहे, तो पर्यंत शासनाला लोकांच्या मोक्ष-मार्गामध्ये ढवळाढवळ करण्याचा काडीमात्र सुद्धा अधिकार नाही." या नियमानुसारच आहे.

धर्म म्हणजे व्यक्ती आणि समष्टी च्या विकासासाठी सर्वानुमताने ठरविण्यात आलेले नियम.

मला गोहत्याबंदी, दारूबंदी ची मार्गदर्शक तत्त्वे नको आहेत तर समान नागरी कायदा सक्तीचा हवा आहे.

पंथनिरपेक्षता ही भारताची अनादी काळापासुन चालत आलेली नीती आहे.

आँ!

या नीतीचे सर्वात घाण आणि विकृत रूप म्हणजे आधुनिक भारतातील "सेक्युलारिझम".

'सर्वात' हा शब्द वगळता मान्य.

व्याख्या आणि प्रोब्लेम्स

माझ्या मते या व्याख्या थोपल्या गेल्या आहेत भारतीय समाज-मानसावर. बदललेल्या या व्याख्यांमुळेच भारतीय समाजाला काही परकीय रीलीजन्सना सामाउन घेण्यात यश आले नाही. जसे भारतीयांनी ग्रीकांना, शकांना, कुशाणांना, हुणांना आणि तत्सम इतर परकीयांना भारतीय संस्कृतीत सामाउन घेतले, तसे काही कारणांमुळे ईस्लाम आणि ख्रिस्त-पंथाला सामाउन घेण्यात अपयश आले आहे (आतापर्यंत). ईंग्रजांनी थोपलेल्या ह्या व्याख्या, त्या कारणांपैकी एक कारण आहे. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. शब्दांच्या व्याख्या जश्या होत्या तश्या जर वापरल्या तर प्रश्न फार सोपा होतो. साम्-दाम्-दंड-भेद, येनकेनमार्गेण जर ईस्लाम् आणि ख्रिस्त-पंथीयांना जर हे शब्द पटवून दिले, तर त्यांना हे समजणे सोपे होइल की भारताशी एकरूप होणे म्हणजे "रीलीजन भ्रष्ट होणे" नाही. हव्या त्या मोक्षमार्गाचे पालन करण्याची मुभा भारतीय विचारदर्शनात आणि आचरणात वेदकाला पासून आहे. व्यवहार-धर्म आणि मोक्षमार्ग यांची संपूर्ण विभागणी म्हणजेच "सेक्युलरीझम्".

गोहत्याबंदी, समान-नागरी कायदा वगैरे गोष्टी "डीटेल्स्" आहेत. संविधानात हव्या त्या सुधारणा करण्याचा अधिकार जनतेला संविधानानेच दिला आहे. पण त्यासाठी "लोकसंग्रह" होणे आवश्यक आहे. आणि सर्व मोक्षमार्ग पाळणार्‍या सामान्य जनतेला ह्या खर्‍या व्याख्या जर पटवून देण्यात आल्या तर या दोन गोष्टीच काय तर इतर अनेक गोष्टी ठीक करता येतील.

कसे?

भारतीय समाज-मानसावर. बदललेल्या या व्याख्यांमुळेच भारतीय समाजाला काही परकीय रीलीजन्सना सामाउन घेण्यात यश आले नाही.

नुसते शब्दांचे अर्थ बदलून काय फरक पडला? सर्वांनी कोणतीही एकच व्याख्या वापरली की झाले!

त्यांना हे समजणे सोपे होइल की भारताशी एकरूप होणे म्हणजे "रीलीजन भ्रष्ट होणे" नाही.

जुने शब्दच का हवे? त्या संकल्पना नव्या शब्दांतही मांडता येतात.

हव्या त्या मोक्षमार्गाचे पालन करण्याची मुभा भारतीय विचारदर्शनात आणि आचरणात वेदकाला पासून आहे.

पालन हा शब्द आला की त्यात भौतिक कृतींचा समावेश होतो. त्यामुळे मोकाट मुभा नसते. हल्लीचे कायदे मला योग्य वाटतात. पण पूर्वी रास्त मुभाही नव्हती. रामाने शंबूकाला मारले अशी कथा आहे.

व्यवहार-धर्म आणि मोक्षमार्ग यांची संपूर्ण विभागणी म्हणजेच "सेक्युलरीझम्".

हो. पण ही संकल्पना भारतीय नाही.

संविधानात हव्या त्या सुधारणा करण्याचा अधिकार जनतेला संविधानानेच दिला आहे. पण त्यासाठी "लोकसंग्रह" होणे आवश्यक आहे.

५५२ लोकांच्या संग्रहापेक्षा काळे डगले घातलेल्या तिघांच्या बेंचला अधिक अधिकार आहेत, ते तसेच असावेत आणि त्यांच्याकडूनच मला अधिक आशा आहे.

अमान्य

५५२ लोकांच्या संग्रहापेक्षा काळे डगले घातलेल्या तिघांच्या बेंचला अधिक अधिकार आहेत, ते तसेच असावेत आणि त्यांच्याकडूनच मला अधिक आशा आहे.

अमान्य.

न्यायालये निर्णय देताना घटनेचा / कायद्याचाचा आधार घेतात. आणि घटनेत अथवा कायद्यात बदल करण्याचा अधिकार हा केवळ लोकप्रतिनिधींनाच आहे. त्या दृष्टीने पाहता, विधीमंडळे ही न्यायालयापेक्षा अधिक अधिकार असलेली ठरतात आणि लोकशाहेत तेच अपेक्षित आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अमान्य

कायदे, त्याचप्रमाणे घटनेतील तत्त्वे हे सारे न्याय्य, विवेकी, असल्याचे न्यायालयाला पटले पाहिजे. पेकिंग ऑर्डर मध्ये न्यायालय वर आहे हे खूप चांगले आहे.
'घटनेत बदल करण्याइतके बहुमत' हे दिवास्वप्न आहे हा बोनस.

काही मुद्दे

>>पेकिंग ऑर्डर मध्ये न्यायालय वर आहे हे खूप चांगले आहे.
असहमत. निवडून न येणारी कुठलीही व्यक्ती/संस्था निवडून येणार्‍या व्यक्ती/संस्थांपेक्षा वर असू नये. सध्या काळे डगलेवाले स्वत्;ला ५५३ लोकांच्या संग्रहापेक्षा वर समजतात ते चुकीचे आहे. काळे डगलेवाल्यांना ५५३ लोकाची कृती (लोकांनीच ठरवलेल्या) घटनेनुसार आहे की नाही एवढेच तपासण्याचा अधिकार आहे. घटनेतील तत्त्वे न्याय्य आहेत की नाहीत हे न्यायालयाला पटवून देण्याची कोणतीही गरज नाही. कायदे (आणि त्यांचा लावलेला अर्थ) घटनेतील तत्त्वाप्रमाणे आहेत एवढेच न्यायालयाला पटवणे आवश्यक आहे.

@समान नागरी कायदा.
समान नागरी कायद्याला तोंडी पाठिंबा द्यायला माझी हरकत नाही. पण त्यातील डिटेल्स कळल्याशिवाय पूर्ण मनापासून पाठिंबा नाही. उदा. आजच्या असमान कायद्यानुसार मी कमावलेल्या संपत्तीचा विनियोग, दान, वारसनेमणूक करण्यासाठी मला कुणाची परवानगी लागत नाही. उद्याच्या समान नागरी कायद्यात तशी परवानगी लागणार असेल तर माझा अशा समान नागरी कायद्याला विरोध असेल.
उद्याच्या समान नागरी कायद्यानुसार हिंदू पुरुषांना दोन, तीन किंवा चार बायका करण्याची परवानगी असेल तर मला तो समान नागरी कायदा नको आहे. उद्याच्या स ना का नुसार घटस्फोटाची सोय काढून घेतली गेली असेल तर तो कायदा मला नको आहे.
(अवांतर: एवढी एक्सेप्शन काढल्यावर स ना का ला तोंडी पाठिंबा हे ढोंग ठरेल काय?)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

असहमत

निवडून न येणारी कुठलीही व्यक्ती/संस्था निवडून येणार्‍या व्यक्ती/संस्थांपेक्षा वर असू नये. सध्या काळे डगलेवाले स्वत्;ला ५५३ लोकांच्या संग्रहापेक्षा वर समजतात ते चुकीचे आहे. काळे डगलेवाल्यांना ५५३ लोकाची कृती (लोकांनीच ठरवलेल्या) घटनेनुसार आहे की नाही एवढेच तपासण्याचा अधिकार आहे. घटनेतील तत्त्वे न्याय्य आहेत की नाहीत हे न्यायालयाला पटवून देण्याची कोणतीही गरज नाही. कायदे (आणि त्यांचा लावलेला अर्थ) घटनेतील तत्त्वाप्रमाणे आहेत एवढेच न्यायालयाला पटवणे आवश्यक आहे.

मी सद्य स्थितीचे वर्णन केले. काय 'असणे' चांगले यावर वाद शक्य आहे.

@समान नागरी कायदा.
समान नागरी कायद्याला तोंडी पाठिंबा द्यायला माझी हरकत नाही. पण त्यातील डिटेल्स कळल्याशिवाय पूर्ण मनापासून पाठिंबा नाही. उदा. आजच्या असमान कायद्यानुसार मी कमावलेल्या संपत्तीचा विनियोग, दान, वारसनेमणूक करण्यासाठी मला कुणाची परवानगी लागत नाही. उद्याच्या समान नागरी कायद्यात तशी परवानगी लागणार असेल तर माझा अशा समान नागरी कायद्याला विरोध असेल.
उद्याच्या समान नागरी कायद्यानुसार हिंदू पुरुषांना दोन, तीन किंवा चार बायका करण्याची परवानगी असेल तर मला तो समान नागरी कायदा नको आहे. उद्याच्या स ना का नुसार घटस्फोटाची सोय काढून घेतली गेली असेल तर तो कायदा मला नको आहे.
(अवांतर: एवढी एक्सेप्शन काढल्यावर स ना का ला तोंडी पाठिंबा हे ढोंग ठरेल काय?)

"धर्म 'सर्वानुमते' ठरतो आणि आजचा धर्म घटना आहे" या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी मी स.ना.का. विषयी माझे 'मत' सांगितले, इतकेच.

 
^ वर