विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`
प्रेषक प्रकाश घाटपांडे (गुरू, 09/03/2009 - 07:07)
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा


परत परत नाडी
+१
घाटपांडे साहेब
तुम्ही या नाडीच्या मानसिक अडगळीवर उगीच कशाला वेळ घालवता आहात? या नाडी पुस्तकाला फक्त एकच जागा योग्य वाटते. ती म्हणजे कचर्याची टोपली
मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.
चन्द्रशेखर
पुन्हा
बहुतेक वेळा कोळिष्टके झाडण्याचे काम पुन्हा पुन्हा न कंटाळता करावेच लागते. घाटपांडेसाहेबांच्या चिकाटीला सलाम.
कालापव्यय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांचा लेख उत्तमच आहे.विषयाची मांडणी तर्कशुद्ध आहे. या विषयावर काही वाचण्याची इच्छा नव्हती.पण श्री.प्रकाश घाटपांडे यांच्या लेखातील दोन वाक्ये वाचली आणि पुढचे इतके पकड घेणारे वाटले की ते अपरिहार्यपणे वाचतच गेलो.
मात्र या विषयावर वाचणे/लिहिणे म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया दवडणे होय असे श्री.चन्द्रशेखर म्हणतात ते अगदी खरे आहे.
श्री.शशी ओक लिहितातः" नाडी-भाकिते हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञानी महर्षींनी प्रत्येक माणसाचे भाकित कूटलिपीत ताड-पट्टीवर कोरून लिहिलेले आहे, इतकेच नव्हे तर त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नांव हे सुद्धा कोरून ठेवलेले आहे,"
यावरूनच नाडीभविष्य विषयाची निरर्थकता दिसून येते.विशेषतः शेवटचे विधान..." त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नांव हे सुद्धा कोरून ठेवलेले आहे" हे ज्यांना खरे वाटू शकते "ते के न जानीमहे|" काही माणसे बुद्धिमान आणि चिकित्सक असतात. काही श्रद्धाळू असतात.काही भोळसट असतात.हे समजू शकते.पण आपल्या वडिलांचे आणि आपले नाव कोणीतरी आधीच कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे हे ज्यांना खरे वाटू शकते त्यांना काय म्हणावे!! श्रद्धा,श्रद्धा म्हणून किती असावी काही सीमा? नाडी भविष्याविषयी थोडे फार माहिती होते पण त्यांत इतका वेडपटपणा असेल असे वाटले नव्हते.
वा .. फार छान लेख आहे.
वा .. फार छान लेख आहे.
आजवर नाडीबद्द्ल उपक्रम आणि मिपावर इतके सारे लेख आले पण् मला प्रथमच नाडी भविष्यकथनाची पूर्ण माहिती करुन देणारा लेख वाचायला मिळाल्याचे समाधान वाटले.
--लिखाळ.
नाडीभविष्य-
भोंदूंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या सहकारी तत्वावर ही रेडीमेड भाकितांची दुकाने जोरात चालत असतात.
ह्याला जीवन ऐसे नांव ! तथापि हे एक चिरंतन सत्यच राहणार, असे सांगण्यासाठी देखील भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही .
रेडीमेड भाकित
पूर्णपणे सहमत आहे