१५ ऑगस्ट आणि तिरंगा
१५ ऑगस्ट २००९ हा भारताचा ६२वा स्वातंत्र्यदिवस होता. ह्या वर्षी महाराष्ट्रात 'स्वाईन फ्लू' चा खूप प्रभाव पडल्यामुळे स्वातंत्र्यदिवस थोडक्यात साजरा केला. पण उत्सव म्हणून साजरा झाला नाही.
१५ ऑगस्ट आणि तिरंगा म्हटले की भारत देश, असे भारतवासियांच्या आणि इतर देशातल्या लोकांच्या नजरे समोर येते. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिवस म्हणून तर तिरंगा हा राष्ट्रीयध्वज म्हणून.
काँगोचे प्रजासत्ताक (किंवा काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे.
भारता सारखेच काँगोचे प्रजासत्ताक हा देश १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करतो. फ्रांस ह्या देशाकडून १९६० साली त्यांना स्वातंत्र्य मिळाले.
तिरंगा म्हणजे ३ रंग असलेला राष्ट्रीयध्वज.
भारताचा तिरंगा हा २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगिकारला गेला. भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. गडद भगवा रंग सगळ्यात वरती, मध्यभागी पांढरा व खालच्या भागात हिरवा रंग, पांढर्या रंगावर मध्यभागी निळ्या रंगात अशोकचक्र, अशी आपल्या तिरंग्याची रचना केलेली आहे. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. त्याचा वापर कसा करायचा ह्याचे नियम भारतीय सरकारने तयार केलेले आहे.
गडद भगवा रंग हा त्यागासाठी वापरला आहे. पांढरा रंग प्रकाश, सत्येची वाट दर्शवण्यासाठी वापरला आहे. हिरवा रंग हरित झाडे व शेती ज्यावर भारतीयांचे जीवन अवलंबून आहे हे दर्शवण्यासाठी वापरला आहे. अशोकचक्र हे ह्या ध्वजाखाली राहणार्या भारतीयांनी सत्येची कास धरावी हे दर्शवण्यासाठी वापरले आहे.
भारताचा तिरंगा हा तीन रंगाच्या पट्ट्यात आहे व अशोकचक्र हे निळ्या रंगात. तसे पाहिलेतर ध्वजात ४ रंग वापरले आहे. पण मुख्य ३ रंगाचे पट्टे आहे म्हणून ह्याला तिरंगा म्हणतात.
भारताच्या राष्ट्रध्वाजाचे रंग कोणकोणत्या देशांच्या ध्वजात वापरले जातात? ह्याचे मला कुतूहल होते. ही माहिती मिळवतांना बरीच रंजक माहिती माझ्या हाती आली.
असे तीन रंगाच्या पट्ट्याचे ध्वज बर्याच देशांचे आहे. ९६ देशांचे राष्ट्रध्वज हे तिरंगा ह्या प्रकारात मोडतात.
काही ध्वजांवर आडवे तर काही ध्वजांवर उभे पट्टे आणि काहींच्या ध्वजावर ३ रंगाचे पट्टे आणि त्या देशांचे राष्ट्रप्रतीके रेखाटली आहेत.
आयरलॅंड, कोट दि आईव्होर (पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) आणि नायजर ह्या देशाच्या ध्वजावर वापरलेले रंग हे भारताच्या ध्वजावर वापरलेल्या रंगाचे आहेत.
flag of ireland |
आयरलॅंड (Ireland) ह्या देशाच्या ध्वाजात भारताच्या ध्वजाचे तीन रंग वापरले आहेत. भगवा, पांढरा आणि हिरवा. ह्या तीन रंगाचे उभे पट्टे आहेत. खर्या अर्थाने हा तिरंगा म्हणता येतो कारण त्यात तीन रंगाच्या पट्ट्यांशिवाय इतर रंगाचा वापर केलेला नाही.
ध्वज लावण्याच्या काठीच्या जवळचा रंग हिरवा , नंतर मध्यभागी पांढरा आणि त्या नंतर बाहेरच्या बाजूला भगवा रंग वापरला आहे. १:२ असे उंची व लांबीचे प्रमाण आहे.
ह्या ध्वजावरिल हिरवा रंग गाएलिक (Gaelic) मूळ आयरलॅंडवासीयांच्या संस्कृतिचे प्रतीक म्हणून वापरले आहे. भगवा रंग विल्यम तिसरा, इंग्लंड (William of Orange ) ला मान देणार्यांसाठी. पांढरा रंग शांततेसाठी (lasting truce) वापरला आहे.
१९१९ सालापासून हा ध्वज अस्तित्वात आहे.
कोट दि आईव्होर:
Ivory coast |
कोट दि आईव्होर (पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजात उभे भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगाचे पट्टे आहेत. भगवा रंग जमिन, सवन्नाह ( savannah) चे पिकं दर्शवण्यासाठी केला जातो. सवन्नाहचे पिकं उत्तर भागात होते. पांढरा रंग शांततेसाठी वापरला जातो. हिरवा रंग आशा व देशाच्या दक्षिणेकडील जंगल दर्शवण्यासाठी केला जातो.
फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधिपासून ह्या ध्वज १९५९ सालापासून अस्तित्वात आहे.
आयरलॅंड व कोट दि आईव्होर ह्यांच्या देशाच्या ध्वजा मधल्या हिरव्या व भगव्या रंगांच्या क्रमामध्ये अदला बदल आहे.
flag of Niger |
नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.
नायजर हा जगातील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या देशाच्या ध्वजात भगवा, पांढरा व हिरव्या रंगाचे सारख्या प्रमाणातले आडवे पट्टे आहेत. पांढर्या रंगावर देशाचे गोलाकार राष्ट्रीय प्रतीक रेखाटले आहे.
नायजर सरकारने ध्वजात वापरलेल्या रंगाचे अर्थ सांगीतली नाहीत. सर्वसामान्य नागरिकांनी काढलेले त्याचे अर्थ सगळ्यांनी मान्य केले. वरचा भगवा रंग हा देशाच्या उत्तरेतील साहारा वाळवंटाचे प्रतीक आहे. मधला पांढरा रंग स्वच्छतेचे (purity ) प्रतीक आहे. खालचा हिरवा रंग आशा आणि देशाच्या दक्षिणेकडील हरित प्रदेशाचे प्रतीक आहे. मधल्या पांढर्या पट्ट्यावरिल भगव्या रंगाचा भरीव गोल हा सूर्य किंवा स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
फ्रांसपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून १९५९ साला पासून हा ध्वज अस्तित्वात आहे.
ध्वजात वापरलेल्या भगवा आणि हिरव्या रंगाच्या छटा देशा प्रमाणे वेगवेगळ्या आहेत.
color code |
Comments
चांगले संकलन
चांगले संकलन
भारतीय ध्वज व इतर ध्वजांतील "ऑरेंज"रंगछटाच वेगळ्या नाहित तर त्या रंगांना वेगळी नावेच आहेत. इतर ध्वजांत आहे तो "नारंगी"(ऑरेंज) रंग आपल्याकडे आहे तो "केशरी / भगवा"(सॅफरन्) रंग!
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
वेगवेगळे तिरंगे
छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
माहीती आवडली
माहीती आवडली.
आणखी तिरंगे
मायामी शहराचे अधिकृत निशाण असलेला तिरंगा भारताच्या तिरंग्याशी बर्यापैकी मिळताजुळता आहे.
अवांतर: स्वातंत्र्यपूर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा तिरंगा आणि भारताचा तिरंगा यांतील साधर्म्य आणि नाते तपासल्यास उद्बोधक ठरावे अशी शंका आहे. स्वातंत्र्यपूर्व चरखाधारी तिरंग्यापासून ते आजच्या हस्तमुद्राधारी तिरंग्यापर्यंतच्या काँग्रेसच्या तिरंग्याच्या वाटचालीचा आढावाही (घेता आल्यास) रोचक ठरावा.
सहमत
आहे. रोचक माहितीबद्दल अनेक आभार.
यावर थोडीशी माहिती स्वदेस चित्रपट पाहिल्यावर मिळाली होती पण तेव्हा आमचे लक्ष हिरूणीकडे होते. :प्
----
सलाम कोणी करावा
राष्ट्रगीत जाताना कोणी सलाम करावा या विषयी काही लेखी सूचना आहेत का?
धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह
आयर्लँड गणपती
आयर्लँडचे गणपती
भारतीय तिरंगाकार - पिंगली वैंकयाचे पोष्टाचे तिकीट
भारतीय पोस्टाने १२.०८.२००९ ला काढलेले पिंगली वैंकयाचे पोष्टाचे तिकीट
छान
चरख्याऐवजी अशोकशक्र लावायचे ठरल्यावर मोहन गांधी बरेच रुसले होते. अखेरीस नेहरूंनी वगैरे समजूत काढल्यावर बापूंनी नाराजीने अशोकचक्र मान्य केले असा इतिहास आहे...
असो, बाकी लेख छान आहे हो!
आपला,
(तिरंगाप्रेमी) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
भारतीय तिरंग्याचा विकास
भारतीय तिरंग्याचा विकास
१९२१ साली अखिल भारतीय कांग्रेस कमेटी ने एक ध्वज वापरायला सुरूवात केली होती. पिंगली वैंकैयाने हा ध्वजचा आराखडा तयार करून गांधीजींना दिला होता. हा ध्वज लाल आणि हिरव्या अशा दोन रंगात होता. लाल रंग हिंदूचे प्रतिक तर हिरवा रंग हा मुस्लिम समूदायाचे प्रतिक म्हणून वापरण्यात आला होता. त्यावेळी गांधीजींनी भारतातल्या इतर धर्माच्या लोकाचे प्रतिक म्हणून पांढरा रंग वापरायला सांगितले होते. त्यामूळे त्यात पांढर्या रंगाची पट्टी आणि राष्ट्राची प्रगति दाखवण्यासाठी चालता चरखा दाखवायचा असे गांधीजींनी आदेश दिले होते.
१९३१ मध्ये ध्वज भारतीय राष्ट्रीय सेनाने चे चिह्न बनले होते. १९३१ हे भारतीय ध्वजच्या इतिहासातले महत्वाचे वर्ष ठरले होते. ह्या तिरंग्या ध्वजाला आपल्या राष्ट्रीय ध्वजात स्विकारयचे असेल तर त्यात बदल करावा लागेल असा एक प्रस्ताव पूढे आला. ज्यात लाल एवजी केशरी रंग वापरायचा, पां ढ र्या रंगाच्या मध्ये गांधी जींचे चालत्या चरख्याचे चित्र दाखवायचे आणि हे स्पष्ट केले होते की ध्वजात वापरलेल्या रंगाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही.
सध्याचा भारताचा तिरंगा २२ जुलाई १९४७ ला मुक्त भारतीय राष्ट्रीय ध्वजच्या स्वरूपात स्विकारला गेला होता. स्वतंत्रता मिळाल्यानंतर ह्या ध्वजाचे रंग आणि त्यांचे महत्व तसेच राहिले. फक्त आधिच्या ध्वजातले चालत्या चरख्याची जागा सम्राट अशोकाच्या धर्म चक्राने घेतली होती. अशा प्रकारे भारतीय कांग्रेस पार्टी च्या तिरंगा ध्वजाने शेवटी स्वतंत्र भारताच्या तिरंगा ध्वजाची जागा घेतली.
विकास?
इथे 'विकास' हा शब्द बघून हसू आले. 'विकास' म्हटले की नेहमीच असे का होते? कधी तर मी भीषण (सिंहासनमधल्या निळू फुलेंच्या शेवटच्या सीनसारखे) हसतो. का? जीएंची रात्र झाली गोकुळी ही कथा आठवते.
"उजाडलं आई?" हा कृष्णाचा प्रश्न कृष्णाची सारी वेदना व्यक्त करून ह्रदय कापीत जातो. अशी ही ह्रदय पिळवटून काढणारी कृष्णाची आणि त्याच्या गोकुळाची कहाणी. असे कोट्यवधी कृष्णा महान सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या भारत-भूमध्ये केविलवाणे जीवन निमूटपणे जगत आहेत. स्वातंत्र्य आले, योजना आल्या आणि गेल्या, कार्यक्रम आले, राबताहेत, पण कृष्णा आहे तिथेच आहे. रात्र संपून उजाडण्याची वाट पहात आहे. केशरी रंगाची दाट खीर....
असे धनंजय आचार्य ह्यांनी उगीच म्हटलेले नाही आणि मला केशरी रंगाची दाट खीर आवडते. त्यात थोडे काजू-किसमिस असल्यास सोन्याहून पिवळे!
असो.
'डेवलपमेंट' ह्या अर्थाने विकास हा शब्द वापरला आहे का? झेंड्यांची प्रथा कुठून सुरू झाली हे सांगता येईल? मला वाटतं ही अतिशय आदिम प्रथा असावी. दक्षिण भारतात तर प्रत्येक कबिल्याची अशी झाडे (झेंड्याऐवजी) असत म्हणे. शत्रूचे झाड उपटल्यावरच संपूर्ण पराभवावर शिक्कामोर्तब होत असे. ह्यावर उपक्रमाचे व्यासंगी सदस्य प्रकाश (घाटपांडे नाही) पाडतीलच. वाट पाहतो आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शिक्कामोर्तब
झाड उपटलेलं नसलं तरी झाडावर काही भूभू विजयाचा शिक्कामोर्तब करतात. ह्यावर उपक्रमाचे व्यासंगी सदस्य प्रकाश (घाटपांडे असले तरी) पाडतील.
मानवेतर प्राण्यांतही झेंड्यांची प्रथा असते का?
-राजीव
खांबांना विसरलेले दिसता !
तुम्ही खांबांना विसरलेले दिसता!
आपला टापू निश्चित करण्यासाठी मानवेतरांत अशी प्रथा असू शकते. कुठल्याही उभ्या पृष्ठभागाचा (वर्टिकल सर्फेस) ह्यासाठी उपयोग होऊ शकतो.
वाचा:
ह्याउप्पर नक्कीच उपक्रमाचे व्यासंगी सदस्य अधिक प्रकाश (घाटपांडे असले नसले तरी) पाडू शकतील.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"