नामस्मरणाची ताकद व चमत्कार.

नामस्मरणाची ताकद व चमत्कार.

“तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो”
श्री महाराज (सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)

श्री महाराजांचे चरित्रात व प्रवचनातून वरिल बोधवाक्य अनेकवार वाचले होते पण त्याची प्रचिती कालच पाहिली त्याबत थोडस लिहाव असं मनात आल म्हणून ……

ज्याचेबाबत हे लिहावयाचे आहे त्याचे नांव वगळून थोडक्यात….

माझा एक मावसभाउ आहे वय साधारण ४६, तो मुंबईत एका सहकारी बॅंकेत नोकरिला होता, राहला स्वतःची जागा होती, पण पहिल्यापासून आवड राम नामची. श्री महाराजांचा अनुग्रहित. पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार. बॅंकेच्या नोकरित मन रमत नव्हतं म्हणून १९९६ साली पत्निला पत्नीला एक दिवस सांगितल कि माझी इच्छा फक्त रामनाम घेण्याची आहे माझ मन नोकरित रमत नाही मला अस वाटतं कि जर आपण आपल्या गांवी जाउन राहिलो तर आपली एक एकराची छोटीशी नारळ – पोफळीची बाग आहे आपल्याला चैनीत राहता येणार नाही पण अन्नाला कमी पडणार नाही. माझी इच्छा आहे कि आपण तेथे जाउन रहावे पण तुझी परवानी मनापासून असेल तरच आपण हा निर्णय घेउया. तेथे गेल्यावर मी पैसे मिळवण्यासाठी नोकरि वगैरे काहि करणार नाही. तुला दुध काढण्यापासून सारे करावे लागेल मी बागेत जरुपुरतेच लक्ष घालिन. तू शांतपणे पुर्ण विचार करुन तुझा निर्णय सांग माझी कोणतिहि जबरदस्ती नाही. पत्नीचे बालपणापासूनचे सारे आयुष्य मुंबईतच गेलेले पण ती तयार झाली आणि हा सदगॄहस्थ बॅंकेतिल १०-१२ वर्ष झालेली नोकरि सोडून गावी (एक छोटस तालुक्याचे ठिकाण आहे) पत्नी मुलासह गांवी निघून आला. घरि आधिच आई-वडिल होतेच त्यात या तिघांचे आगमन झाले. आर्थिकस्थीति बेतासबात पण त्याचे कोणालाच वैषम्य नाही. चेह-यावर सदैव समाधान. आल्यागेल्याचे अगदि अगत्याने करणार आणि त्यामुळे घरि कायमच पाहूण्यांची ये – जा चालूच आलेल्या प्रत्येकालाच जाताना जड जावे त्यामुळे तो परत परत येणार. त्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.

१९९६ ते २००२ पर्यंत “श्रीराम जयराम जय जय राम” या मंत्राचा माळेवर मोजून केलेला एक कोटीचा जप झाला. २००२ साली गोंदवल्यात जाउन १३ कोटी जपाचा संकल्प सोडला पुर्वीचा एक कोटी जप रामर्पण केला. तेथपासून २१ जून २००९ पर्यंत नविन दोन कोटी जप माळेवर करुन झाला. हा जप करणा-याना माहित आहेच कि एक तासात ३ हजार जप होतो. प्रपंचात राहून जप करणे किती कठि़ण असतं हे वेगळ सांगायला नको.

काल दुपारी जेवायला घरि आलो व जेवल्यावर नेहमीप्रमाणे थोडावेळ वामकुक्षी घेत होतो तोच भ्रमणध्वनी वाजला माझ्या त्याच गावातिल एका समाधानी ग्राहकाने सांगितले कि नुकताच त्याचा एक व्यवहार झाला आहे व काहि रक्कम दिर्घ मुदतिसाठी गुंतवावयाची आहे त्यासंबंधी त्याला माझेशी सल्लामसलत करुन निर्णय घ्यावयाचा होता कालची सायंकाळ मोकळीच होती म्हणून लगेच भेटावयाचे ठरले. माझ आफिसचे काम उरकून मी मार्गस्थ झालो सायंकाळी ५ ते ८ पर्यंत कामाची चर्चा आटोपली. त्याच गावात माझा तो मावसभाउ रहात असल्यामुळे व त्याचेकडे ६ महिन्यात गेलेलो नसल्यामुळे मिटिंगनंतर त्याचे घरि गेलो भोजन वगैरे आटोपल्यावर गप्पा मारत बसलो होतो.

माझ्या मावसभावाचा मुलगा यंदाच १० वी पास झाला होता तेव्हा त्याचे फोनवर अभिनंदन करताना मी त्याला विचारले होते की कॉलज प्रवेशावेळी तुला काही मदत हवी असली तर निःसंकोचपणे सांग तेव्हा तो म्हणाला होता कि नकोय सोय झालेली आहे आत्ता फोनवर सांगत नाही तू प्रत्यक्ष आल्यावर सांगतो. अर्थात काल तो विषय निघाला. आम्ही दोघे मावसभाऊ व गुरुबंधू आणि एक वेगळीच नाळ जुळलेली असल्यामुळे आमच्यात नेहमिच मोकळेपणाने चर्चा होते. मी त्याला विचारले आता सांग तुला मुलाचे कॉलज प्रवेशावेळी जवळपास १५ हजार रुपये लागले तसेच यापुढे त्याचे रहाणे जेवणे वगैरेसाठी दर महा ३ हजार रुपये खर्च येणार आहे तुला हे कस काय जमणार कारण तुला नियमित असे काहिच उत्पन्न नाही त्यानंतर त्याने जे सांगितले ते त्याच्याच शब्दातः

काय सांगु तुला महाराजांची लिला अगाध आहे थांब त्यानी काय चमत्कार केला ते तुला दाखवतोच असे म्हणून त्याने एक चिठी माझ्या कडे दिली व म्हणाला वाच. चिठीत लिहिले होते कि सोबत काहि रक्कम रामनाम घेत असतानासुध्दा काहि वेळा पैशाची गरज हि लागतेच म्हणून पाठवली आहे कॄपया त्याचा स्वीकार करावा. अरे एक दिवस सकाळिच माझे दारात एक गॄहस्थ माझीच चौकशी करत हजर झाले व नागपूरहून श्री ….. यानी हि चिठी तुम्हाला दिली आहे असे म्हणून एक उघडे पाकिट माझ्या हातात दिले ते मी तू आत्ता बसलायस त्याच झोपाळ्यावर ठेवले व त्यांचेशी बोलता बोलता घरभर फिरत फिरत माडिवर महारांजाची खोली दाखवून खाली आलो तर आई म्हणाली अरे त्या पाकिटात बघितलस का ५ हजार रुपये आहेत मी त्या गॄहस्थाना विचारले तुम्हाला माहित आहे का तर ते म्हणाले हो आणि चहापाणी घेउन ते गॄहस्थ निघून गेले. त्यानंतर एक मनी आर्डरची पावती त्याने माझेकडे दिली एका अन्य व्यक्तिने ३ हजार रुपये पाठविले होते. आता हे दोघेह तसे अपरिचित त्यानी हे असे ८ हजार दिले, मे महिन्यात हिची बहिण १५ दिवस आली होती तिने जाताना मुलाला ५ हजार दिले होते आणि ८ दिवसापूर्वीच आमचे शेजारी पुर्वी नोकरीनिमित्त रहाणारि व्यक्ति ८ दिवस आमचेकडे रहायला आली होती तिने जाताना अडिच हजार मुलाचे हातात दिले. या सगळ्यात मिळून मुलाचे कॉलेज प्रवेशाचे भागले. आणि पुढे ऐक परवा मुलाची नविन गावी सर्व व्यवस्था करुन आलो आणि सास-यांचा फोन आला तुमचा मुलगा तो माझा नातू आहे व त्याचेसाठी मला काहितरि करायचे आहे तेव्हा मी जिवंत असेपर्यंत त्याचे खर्चासाठी मी दरमहा ३ हजार रुपये पाठवणार आहे तेव्हा नाहि म्हणू नका.

आणि मी काहि क्षण पुतळा झालो अंगावर रोमांच उभे राहिले श्री महाराजानी वर पहिलेच लिहिलेले वचन असे पाळले होते.

यात एक संकेत म्हणून कोणाचाच नामोल्लेख केलेला नाही आवडत्या नामाचा एक विलक्षण अनुभव म्हणून फक्त येथे लिहिला.

Comments

बुवा

हा! हा! हा!

आस्तिकांना जसे आपल्या बुवांवर चिखलफेक आवडत नाही तसेच नास्तिकांनाही त्यांच्या बुवांवर झालेली आवडत नाही, वाटतं!
आपला
गुंडोपंत

अप्रस्तुत

ज्या लोकांचा लेखामधल्या विषयाशी बादरायण संबंध जरी जोडता आला तरी, आपण आपले हात आणि त्यांचे कपडे चिखलाने माखून घ्यायला माझी कांही हरकत नाही कारण मी कोठल्याच 'बुवा'ची पूजा बीजा करत नाही. पण आपल्या मनातले गरळ उगाचच इकडे तिकडे पसरवत राहणे चांगले नाही, असे निदान मला वाटते.

आरर!!

च्या मारी!
एकच वाक्य पण चांगलाच झोंबलेलं दिसतंय रे....
;))))

असो,
कविता केली पाडगावकरांनी,
प्रसिद्ध केली पाडगावकरांनी,
येथे दिली ज्यो.टी.शि. घाटपांडे यांनी (विचारून दिली होती का हो....???? येतील ना ते तुमच्या घरी एखादा करार घेवून ;) )
मी फक्त विचारले 'ते' हेच का तर लगेच चिखलफेक?
अजबच की राव तुम्हा बिनबुवा वाल्यांचे जग...

आपल्या मनातले गरळ उगाचच इकडे तिकडे पसरवत राहणे चांगले नाही, असे निदान मला वाटते.

हेच मी ही म्हणतो!! !
खरं आहे, सहमत आहे, सूज्ञांनी आचरणात आणले पाहिजे.

बाकी चालायचेच...!

आपला
गुंडोपंत गावंढळ!

होहोहोहोहो !!!!!!!!

प्रेषक गुंडोपंत (शनि, 07/04/2009 - 23:01

परंतु एके काळी योगासनांनाही विरोध करणार्‍यांच्या कुळीतील हे लोक आहेत हे विसरू नका आणि यांच्या विचारांवर भरवसा ठेवू नका, आकरण ते कधी बदलतील हे त्यांचे त्यांनाच माहित नसते. उदा. मंगेश पाडगावकरच घ्या ना! एके काळी बुवाबाजी ला विरोध करणारे नवा करार चे भाषांतर करून ' आत्मिक समाधान' मिळवतात. तेंव्हा त्यांच्या मागे गेलेले होते त्यांचे आता काय? ज्या सो कॉल्ड नारळीकरस्कूल चे हे लोक आहेत, ते स्वतः 'कल्पना सूचण्यासाठी' म्हणे विष्णु पुराण वाचतात!

प्रेषक गुंडोपंत (शनि, 07/04/2009 - 22:45)
अच्छा!
ख्रिश्चन धर्मातील
"नवा करार" चे मराठी भाषांतर करून लोकसत्ता मध्ये बोलतांना आत्मिक समाधान मिळाले असे म्हणणारे हेच ते मंगेश पाडगावकर नाही का?

हं! चालायचेच! पश्चिमे कडून आलेले (बायबल सकट) सर्व चांगले मानणार्‍यांचे तण वाढले आहे, त्यातलेच हे ही एक झुडूप असावे!

हे सगळे मिळून फक्त एकच वाक्य आहे बरं का!!!
हहह ...हाहाहा... हिहिहि.....

नारळीकरांचं नाव आम्ही नाही काढलं बरं!!!
हीहीही... हुहुहु... हूहूहू.....

आधी मिरच्या कुणाला बरं झोंबल्या? आणि आता तरी थयथयाट कोण करत आहे?
हेहेहे... हैहैहै... होहोहो!!!!!!!!!!!

आपल्या बुवाचे

माझी वरील वाक्ये येक्दम करेट आहेत आणि माझीच आहेत!

(जमलं! जमलं! अजून एखाद्या कराराचे भाषांतर जमेल की नाही त्याची कल्पना नाही, पण दुसर्‍याची वाक्य शोधायला जमायला लागले आहे. बक अप! प्रयत्नाने यश मिळते!)

तुम्ही कशाला नारळीकरांचे नाव काढाल हो?

आयुष्यभर ज्याच्या विचारांमागे आपले विचार या भ्रमात गेलो,
त्या आपल्याच बुवाला कोण बदनाम करेल हो?

आणि पाडगावकरांचे तुम्हाला झोंबण्याचे काही विषेश कारण?

त्यांनी बुवाबाजीच्या विरोधात कविता केली नाही का?
ती आमचे परम मित्र घाटपांडे साहेब यांनी येथे दिली नाही का?
शिवाय त्यांनी नवा करार चे भाषांतराने केले नाहिये का?
भाषांतरा नंतर लोकसत्ताला मुलाखत घडवून आणली नाही का?
त्यात असे विधान केले नाही काय?

हे सगळे असे घडले.

मी फक्त इतकेच विचारले होते की, की ते बुवाबाजी च्या विरोधातील पाडगावकर आणि नवा करार च्या भाषांतराने आत्मिक समाधान मिळवणारे पाडगावकर एकच काय?
आता सरळ सरळ त्यांच्याच लिखाणात विरोधाभास दिसतो.
हा लिखित स्वरूपात असलेला विरोधाभास दाखवून दिला की झाली चिखलफेक?

बहुदा यात तुम्हाला तुमचा पोपट झाला असे वाटले असावे.
पण म्हणून माझ्यावर कशाला खवळता?

असो, काहींचे छुपे बुवा काहींचे उघड!
बहुदा खाई त्याला मळमळे!

आपला
गुंडोपंत

हलकट नालायक, चिखलफेक्या

तारतम्य

अशा वेळी मौन बाळगण्याचे तारतम्य (पळपुटेपणा) आम्ही दाखवतो असे गुंडोपंत वेगळ्या भाषेत म्हणतात. ते खरे देखील आहे. आमचे सोपे म्हणणे म्हणजे
१) श्रद्धेचा अतिरेक टाळावा
२)अश्रद्धेचा अतिरेक टाळावा
श्रद्ध ही आत्मिक बळ देत हे आम्हाला मान्य आहे.आता आमच्यात ती निर्माणच होत नाही त्याला आम्ही काय करावे? जगदंब जगदंब!
प्रकाश घाटपांडे

अरे वा!

ओहो!

अशा वेळी मौन बाळगण्याचे तारतम्य

हा हा हा!!!
भारी शब्दांचे खेळ करता साहेब, गरीबा बरोबर!

१) श्रद्धेचा अतिरेक टाळावा

क्या बात कही! एक्दम बरुबर!

२)अश्रद्धेचा अतिरेक टाळावा
आरं तिच्या हे बी बरुबर!

म्हंजी या दोन्हीच्या कुटं तरी मदी लटकावं आसं?
म्हंजी फकस्त शिलेक्टिव्ह श्रद्धा ठिवायची आसं?

आवो ही शिलेक्शन प्रोशिजरच तर लाय आवगड आसती द्येवा!
येकादी ठोकर बसली का मंग नीट सरळ येत्यात समदे शब्द.

श्रद्ध ही आत्मिक बळ देत हे आम्हाला मान्य आहे.

'आता' आम्हाला मान्य आहे असे म्हणायचे होते का हो साहेब?

आपला
गुंडोपंत

 
^ वर