ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य (स्मरण सुविधा)

सृष्टीलावण्या यांच्या या प्रतिसादातील एका मुद्द्याचा विस्तूत (?) परामर्ष

>> छाहरी हा इनपुट एडिटर सुमारे १००० पूर्वटंकित शब्द लक्षात ठेवतो. पहिले अक्षर दाबले की दर्शविलेल्या शब्दांवर पटकन् माऊस नेऊन आपल्याला हव्या त्या शब्दावर टिचकी मारायची की तो शब्द पूर्ण होतो.

अशा प्रकारची मदत ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये फार पूर्वीपासून उपलब्ध आहे.

Auto correct option

टूल्स मेन्यूमधील ऑटो करेक्ट या पर्यायातील स्वयंसुधारणेसारखी "स्मरण सुविधा" उपलब्ध आहे ना याची खात्री करून घ्या.
Tools – AutoCorrect – Word Completion Tab - Enable Word Completion

"केल्या" शब्द टाईप केल्यावर "केल्याप्रमाणे" हा शब्द आपोआप सुचविला जातो. जर हा शब्द बरोबर असेल तर एंटर की एकदा दाबली की काम झाले. उजवा हात प्रत्येक शब्दागणिक कळफलकावरून माऊसकडे न्यावा लागत नाही.

word_completion

कंट्रोल एंटर या दोन की एकदम दाबल्या की "केल्या" या शब्दावरून तयार होणारे इतर शब्द (केल्याप्रमाणे केल्याबरोबर केल्यावर) एकामागून एक दिसू लागतात आणि जो योग्य शब्द असेल त्या शब्दावर एंटर की देण्याचेच काम बाकी राहाते.

आपण जर "शो एज टूलटिप" हा ओप्शन सिलेक्ट केला असेल तर "उल्ले" हा शब्द टंकित केल्याबरोबर "उल्लेख" हा शब्द पिवळ्या टूल टिपच्या माध्यामातून त्या शब्दापुढेच दिसू लागतो. एंटर की टाईप केल्याबरोबर हा शब्द पूर्ण होतो.

tooltip

ओपन ओफिस हजार नव्हे तर हजारो शब्द लक्षात ठेवतो. आपण टाईप करून सेव्ह करीत असलेल्या फाईल्समधूनच तो ही शब्दसंपदा जमा करत जातो. स्पेलचेकचे ऍड ऑन आपण वापरत असाल तर फक्त शुद्ध शब्द लक्षात ठेवण्याचे पथ्यही तो पाळतो. इतकेच नव्हे तर कोणते शब्द त्याच्या आठवणीत आहेत ते आपल्याला पाहता येतात आणि त्यातून नको असलेले शब्द काढूनही टाकता येतात.

१५० एम. बी. ओपन ऑफिसच्या मानाने छाहरीचा आकार अगदी मामूली आहे हा महत्त्वाचा फरक मान्य केला तरी मी ओपन ऑफिस वापरण्याचा सल्ला देईन. कारण ओपन ऑफिस मायक्रोसॉफ्ट वर्ड पेक्षा उजवे आहे.
१) वर उल्लेख केलेल्या स्मरण सुविधेचा फायदा इंग्रजी टंकलेखन करताना देखील होतो.
२) कोणतीही फाईल पी.डी.एफ़. स्वरूपात साठवणे शक्य आहे. जे वर्डमध्ये नाही.
३) वर्ड वारंवार बंद पडत असेल तर ती फाईल रायटरमध्ये सहजगत्या उघडली जाऊ शकते. काम अडत नाही.
४) हेडर / फूटर, कोलम बनवणे, फाईंड - रिप्लेस या गोष्टी रायटरमध्ये खूपच सोप्या आहेत. (गेली ८ – १० वर्षे वर्ड वापरून / इतरांना शिकवून मगच मी हे विधान करत आहे.)

वरील मजकूर बराहा युनिकोड २.० च्या मदतीने ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये वर उल्लेख केलेल्या ऑटो करेक्टचा पुरेपूर उपयोग करीत टंकित केला आहे.

Comments

धन्यवाद

दोन गोष्टींसाठी.

१) माझ्या म्हणण्याची सविस्तर दखल घेतलीत म्हणून
२)

कोणतीही फाईल पी.डी.एफ़. स्वरूपात साठवणे शक्य आहे. जे वर्डमध्ये नाही.

साधारण अनुभव असा असतो की युनिकोड डॉक्युमेंट पीडीएफ ला कन्व्हर्ट होताना जंक स्क्रिप्ट येते. बरोबर कन्व्हर्जन कधीच होत नाही. तो प्रश्न आपण दूर केल्याबद्दल धन्यवाद.

ओपन ऑफिस टाकायला हवे खरे.
--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

स्क्रीनशॉट्स

संबधित स्क्रीनशॉट्स खाली दिलेल्या पत्त्यावर पाहाता येतील. काही कारणाने मला वरील लेखातील फोटो दिसत नाहीत.
http://tinyurl.com/upakram

 
^ वर