जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर
जॉन स्टुअर्ट |
इराक अफगाणिस्तानातील युद्धे, जागतिक मंदी या हल्ली नेहमी चर्चेत असणार्या विषयांबरोबर प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्यात एका वेगळ्याच 'युद्धाची' बातमी तेजीत होती. जॉन स्टुअर्ट विरुद्ध सीएनबीसी, जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर, जॉन स्टुअर्ट विरुद्ध प्रसारमाध्यमे अश्या बर्याच वेगवेगळ्या दृष्टीकोनातून यावर बरीच चर्चा आणि विचारमंथन होत आहे.
हे सगळे सुरू झाले जेव्हा ४ मार्च च्या 'डेली शो' कार्यक्रमात जॉन स्टुअर्ट ने रिक सँटेली या सीएनबीसी च्या वार्ताहरावर आणि सीएनबीसीच्या विश्वासार्हतेवर (CNBC Gives Financial Advice) आणि शेअरमार्केटला सरकारच्या कामगिरीची एकमेव कसोटी मानण्यावर(The Dow Knows All) टीका केली. या कार्यक्रमादरम्यान जिम क्रेमर या आणखी एका सीएनबीसी विश्लेषकावर टीका केली होती.
क्रेमर आणि जॉन स्टुअर्ट |
सीएनबीसीने यावर अधिकृतरीत्या काही टिप्पणी केली नाही पण जिम क्रेमर ने एका संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखात आपली काही वाक्ये 'आउट ऑफ काँटेक्स्ट' वापरली गेल्याचा आरोप केला. त्याला ९ मार्चच्या डेली शो मध्ये (In Cramer We Trust) जॉन स्टुअर्टने उत्तर दिले.
जिम क्रेमर ने इतर काही कार्यक्रमात जाऊन जॉन स्टुअर्टवर टीका करण्याची संधी सोडली नाही. १० मार्चच्या डेली शो मध्ये जॉन स्टुअर्टने त्याला पुन्हा उत्तर दिले.(Basic Cable Personality Clash Skirmish '09 )
या छोट्या वादात इतर वाहिन्यांनी भर घालून त्याला प्रतिष्ठेची लढाई बनवली. (Jim Cramer Battle) आणि १२ मार्चच्या डेली शो मध्ये पाहुणा म्हणून जिम क्रेमर येणार अशी घोषणा जॉन स्टुअर्ट ने केली.
१२ मार्चला जे काही झाले ते प्रसारमाध्यमात आणि ब्लॉग/आंतरजाल विश्वात येते कित्येक दिवस चर्चिले जाईल हे नक्की. या चर्चेची संपादित आणि असंपादित चलचित्रे उललब्ध आहेत.
संपादित - भाग १, भाग २, भाग ३
असंपादित - भाग १, भाग २, भाग ३
या घटनेविषयी आणि यातून उभ्या राहिलेल्या प्रश्नांविषयी आपल्याला काय वाटते?
-------
संदर्भ -
डेली शो चे अधिकृत संकेतस्थळ - http://www.thedailyshow.com/video/videos.jhtml
जॉन स्टुअर्ट विकी पान - http://en.wikipedia.org/wiki/Jon_Stewart
या वादासंदर्भातील विकी पान - http://en.wikipedia.org/wiki/Jon_Stewart%27s_2009_controversy_with_CNBC
Comments
फार संक्षेपात आहे हो!
वा!!
बर्याच दिवसांनी स्वतः शशांकचा लेख!
क्या बात है!
पण आपले लिखाण फार फार संक्षेपात आहे हो!
आधी फित पाहायला आमचे जाल चालतच नाही धड!
मधे मधे अडकते.
त्यामुळे तुम्ही वाद आणि त्यावरचे प्रवाद या विषयी जरा विस्ताराने लिहिले असते तर काही तरी
कळले असते, असे म्हणतो.
आपला
गुंडोपंत
थोडी अधिक माहिती
कर्जप्रकरणांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य लोकांना मदत करण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयावर रिक सँटेली ने सीएनबीसीवरील एका कार्यक्रमात सडकून टीका केली. वॉलस्ट्रीटवरील बड्या धोंडाना वाचवण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च केलेले असताना रिक सँटेलीने सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणार्या पैश्यावर टीका करावी यावर जॉन स्टुअर्ट ने आपल्या खास शैलीत टीका केली आणि त्यात अर्थकारणविषयक वाहिन्या/पत्रकार/तज्ज्ञ, सीएनबीसी आणि शेअर निर्देशांकाला प्रशासनाच्या कामगिरीचा एकमेव निकष मानण्याच्या प्रवृत्तीवरही टिप्पणी केली. त्यात एका तुकड्यात जिम क्रेमर, जो सीएनबीसी वर एक शेअरबाजारविषयक कार्यक्रम चालवतो त्याच्यावर टीका केली होती.
क्रेमरने आपली वाक्ये 'आउट ऑफ काँटेक्स्ट' घेतल्याचा आरोप केल्याचे वर चर्चाप्रस्तावात आले आहेच. तसेच इतरत्रही त्याने जॉन स्टुअर्ट हा फक्त एक विनोदवीर, 'कमिडियन' आहे अशी खिल्लीही उडवली. (काही विश्लेषकांच्या मते ही क्रेमरची घोडचूक होती, सीएनबीसी वर केलेल्या हल्ल्याला व्यक्तिगत घेऊन जॉन स्टुअर्टला अंगावर घेणे त्याला नडले.)
पुढच्या भागात जॉन स्टुअर्टने क्रेमरला बरोबर धारेवर धरले. क्रेमरने काय काय विश्लेषण केले होते आणि नेमके त्याच्या उलट कसे काय झाले याची कुंडलीच जॉन स्टुअर्ट ने मांडली. इतर वाहिन्यांनी स्वाभाविकपणे यात आणखी रंग भरले आणि क्रेमरने अखेरीस जॉनच्या शो मध्ये पाहुणा म्हणून जाण्याचे मान्य केले! (रिक सँटेलीलाही जॉनच्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून येण्याचे आमंत्रण मिळाले होते पण त्याने ऐनवेळी यायचे टाळले)
क्रेमर गुरुवार १२ मार्च २००९ रोजी डेली शो मध्ये आला. त्याला वाटले असावे थोडीफार टीका, टपल्या, थोडी गंमत जंमत होईल, पण नेहमीपेक्षा गंभीर जॉन स्टुअर्टने वाहिन्यांची आणि त्यावरील निवेदकांच्या बेजबाबदार वर्तणुकीची पुराव्यासह चिरफाड केली.
याहून अधिक लिहायला मला नक्कीच आवडले असते पण याचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात पाहण्यात आणि ऐकण्यात जास्त मजा आहे त्यामुळे शक्य होईल तसे हे व्हिडिओ पाहावेत. ज्यांना हे लगेच पाहणे शक्य नाही (कार्यालयात असल्यामुळे वगैरे) त्यांच्यासाठी शेवटच्या चर्चेचे ट्रान्स्क्रिप्ट इथे मिळेल.
मस्त
चर्चा विषय मस्त आहे... जॉन स्टुअर्टने जिम क्रेमरला पार उघड्यावर आणले. या संदर्भात वेळ मिळाल्यास अधिक लिहीन मात्र एकच टिपण्णी करू इच्छितो:
सध्या अमेरिकेत स्टिम्युलस पैसे कसे देयचे, कोणाला देयचे यावरून जोरजोरात चर्चा चालू आहे. त्यात ओबामा मोठ्ठे सरकार तयार करत आहे, तो डाव्या विचारांचा आहे, उद्योगांचे म्हणणे आहे की, "मुझे तुमसे सबकुछ चाहीये, (पण ते घेतल्यावर) मुझे मेरे हाल पे छोड दो" म्हणजे एआयजीने शंभर बिलीयन्सच्या जवळपास कंपनी बुडते म्हणून पैसे घेतलेत आणि अजूनही घेणार आहे. त्यातील १६५ मिलीयन्स त्यांना त्यांच्या वरीष्ठ अधिकार्यांना ज्यांच्या निर्णयप्रक्रीयेमुळे ते गोत्यात आले, त्यांना बोनस म्हणून देयचे आहेत...वर वॉलस्ट्रीटवरील तज्ञ सांगणार ओबामा कसा चूक आहे म्हणून...
माझे यावर एकच म्हणणे आहे. ओबामा येण्याआधी बरेचे काही "प्रो-बिझिनेस" करून पाहीले पण जमले नाही. इकॉनॉमी गोत्यातच जात राहीली... आता त्याला करून पाहूंदेत. त्याचे बरोबर ठरते की चूक ते काळ ठरवणार आहेच आणि तेही नजीकच्या भविष्यात कारण अशी अर्थ अवस्था जास्तकाळ चालू शकणार नाही... मात्र त्याला "ज्ञान" शिकवणार्या बिझिनेस ऍनॅलीस्टस्, एक्सपर्ट्स वगैरेचा नैतिक हक्क केंव्हाच गेला आहे असे वाटते, त्यांनी आता गप बसावे...
"जॉन स्टूअर्ट वि. जीम क्रेमर" ही त्या हिमनगाच्या टोकावरील दोन विदुषकांच्या चाळ्याची गोष्ट आहे.
व्हाइट हाउस मध्येही
याच्याशी सहमत नाही. जॉन स्टुअर्टला विदुषक किंवा कॉमेडियन म्हणून नजरेआड करता येणार नाही. लोकांवरील विशेषतः तरुणांवरील त्यांचा प्रभाव बराच आहे आणि त्याचा अभ्यासही चांगला आहे. उदाहरणादाखल नुकतीच झालेली जो नोसेराची मुलाखत पाहा.
आणि व्हाइट हाउसवरही क्रेमर पुराण लोकप्रिय झाले आहे :)
तसा उद्देश नव्हता
जॉन स्टुअर्टला विदुषक किंवा कॉमेडियन म्हणून नजरेआड करता येणार नाही.
माझ्या म्हणण्याचा तसा उद्देश नव्हता. तो विनोदवीर आहे म्हणून त्याला विदुषक म्हणले मात्र क्रेमरचे चाळे मात्र खरेच विदुषकी वाटले. त्या दोहोंना एकाच वाक्यात गोवल्याने माझ्याकडून गल्लत झाली...
चर्चा वाचायला आवडेल ...
शशांकने मांडलेला संक्षेपातील गोषवारा वाचुन सविस्तर चर्चा आणि त्यातले मुद्दे जाणुन घ्यायची इच्छा झाली आहे.
ह्यावर इतर उपक्रमींची मते वाचायला आवडेल ...
अजुन जरा विस्तराना येऊद्यात, आम्ही वाचतो आहोत.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
मस्त!
वा! आमच्या अतिशय आवडत्या स्टुअर्टकाकांवर लेख टाकल्याबद्दल शशांकरावांचे अनेक आभार.
आम्ही गेली काही वर्षे हा कार्यक्रम न चुकता नेमाने बघत असल्याने हे सगळे आम्हाला लाइव्ह बघायला मिळाले. स्टुअर्टने पुर्वी एकदा टकर कार्लसन नावाच्या वृत्त निवेदकावर त्याच्याच 'क्रॉसफायर' नावाच्या कार्यक्रमात असाच हल्ला चढवला होता. तो भाग लोकांनी इतका डोक्यावर घेतला की टकर कार्लसनची सी एन् एन् वरुन हकलपट्टी होउन त्याला एम् एस् एन् बी सी वर जावे लागले. त्या प्रसंगाची आठवण करुन देणारा राडा ह्यावेळेला पुन्हा घडला आणि त्यात बळी गेला तो क्रेमरचा. :)
क्रॉसफायर
हो हो. तो कार्यक्रम भन्नाट होता. यूट्यूबवर पाहा. टकरची जळजळ पुन्हा वर आली आहे. (दुवा) :)
सीएनबीसीचे काय? :)
आभार
दुवे आणि माहितीबद्दल आभार. हा गोंधळ माहिती नव्हता. एकूणातच सध्या जी एकेक प्रकरणे उघडकीला येत आहेत ती पाहून थक्क होणेच बाकी आहे. मॅडॉफ प्रकरण हे त्यातले लेटेष्ट.
सध्या बॉम्बार्डियर्स वाचतो आहे, य व्या वेळेला. पहिल्यांदा दहा एक वर्षांपूर्वी वाचले होते तेव्हा विनोदासाठी अतिशयोक्ती केली आहे असे वाटत होते. पण आत्ताची परिस्थिती बघता ही सत्यकथा आहे असे वाटू लागले आहे. (पुस्तकांची यादी करणार्यांनी या पुस्तकाची जरूर भर घालावी.) यातला एक उतारा इथे देण्याचा मोह आवरत नाही.
"The economy remained soft, interest rates kept going lower, and the salespeople kept making money. They disguised it all with numbers. They bought and sold money, and every year the Fed pumped more money into the economy for them to buy and sell. They paid for the money they had bought with money they had sold. They paid for little bit of long-term money with a lot of short-term money. They paid for a little bit of low-risk money with a lot of high-risk money. The savings and the loans, which tried to play along, were taken to the cleaners and had their eyes ripped out and were made to swallow, then they went on credit hold until the government bailed them out. Money had a direction, and a speed, and an acceleration."
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
सॉफ्ट टार्गेट्
मला असे वाटते की सध्या स्ट्युअर्टसारख्यांची चलती आहे यात काहीही आश्चर्य नाही. पूर्वी कॉमेडी सेंट्रल सारख्यांकडे बुश आणि इतर कॉन्झर्व्हेटीव्ह्स् शिवाय फार कच्चा माल नसायचा. पॅलिनच्या वेळी त्यांना नवे टार्गेट मिळाले. ही सगळी टार्गेट्स् अंडी फेकण्यासारखी होतीच आणि स्ट्युअर्ट्-कोलबेर- इतर लेट नाईट् होस्ट्स् -सॅटर्डे नाईट् लाइव्ह या सगळ्या लोकांनी त्याची यथेच्छ थट्टा उडवली.
सध्याची परिस्थिती अशी की तुम्ही एखादा डर्टी बॉंब बनवा आणि कुठल्याही अविवक्षित टार्गेटवर टाका. जिथे कुठे पडेल त्यावर दोषारोपण करणे सोपे आहे. सध्याच्या आर्थिक संकटाचे धागेदोरे ग्रीनस्पॅन-क्लिंटन पासून सुरू होतात. जबाबदारी कुणालाच झटकता येत नाही : कॉंग्रेस , दोन गव्हर्नमेंट्स्, सरकारी तिजोर्या राखणारे आणि अर्थधोरणे निश्चित करणारे अधिकारी , आर्थिक बातमीदार/सल्लागार , सामान्य गुंतवणूकदार , कर्जे देणार्या ब्यांका , घरे विकणारे , विकत घेणारे , दलाल .... आता यातून कोणाला वगळायचे ?
त्यामुळे स्ट्युअर्ट , बिल मार यांच्या गुहेत आपणहून सध्या जाणे हाच मूर्खपणा आहे. लोकांना सुद्धा कुणाचा तरी बळी जाताना पहाणे सध्याच्या परिस्थितीमधे आवश्यकच होऊन बसले आहे. (गैरसमज नको : स्ट्युअर्ट यांचा शो मनोरंजक असतो असे मलाही वाटते ! ) त्यामुळे , क्रेमर यांच्याबद्दल कसलीही सहानुभूती नाही ; पण स्ट्युअर्ट यांच्यासारखे लोक आहे त्या परिस्थितीमधे आपापले रेटींग्स् वाढवून घेत आहेत हेही खरे.
हं
त्यात चुकिचे काहीच नाही.
स्टुअर्ट सारखे (संधीसाधू) लोक आपल्या तुंबड्या भरुन घेत आहेत असा काहीसा वास ह्या विधानातून आल्याने हा प्रतिसाद
हम्म
या परिस्थितीला बरेच लोक जबाबदार आहेत हे खरे. मात्र सीएनबीसीला त्यांची जबाबदारी झटकता येणार नाही. स्टुअर्टचा हा मुख्य मुद्दा होता असे वाटते. दुसर्या एका चित्रफितीमध्ये म्हटल्याप्रमाणे एका कॉमेडियनने अर्थव्यवस्थेचे योग्य विश्लेषण करावे आणि एका फायनॅन्शियल जर्नलिस्टने विनोद करावेत ही इथली खरी शोकांतिका आहे असे वाटते.
इथे दीवार आठवतो. "दूसरों के पाप गिनानेसे अपने खुद के पाप कम नही हो जाते." क्रेमर आणि सीएनबीसीच्या बाबतीत हे म्हणता येईल असे वाटते.
---
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
ए आय् जी
बुडणार्या ज्या कंपनीने सुमारे १५० बिलियन कर्जाऊ घेतले आहेत त्यानीच आपल्या अधिकार्यांना सुमारे १२० मिलियन्स् खैरातीत दिलेले आहेत..... मागील पानावरून पुढे चालू...
सीमारेषा
हल्ली विनोद आणि सत्य परिस्थिती यातील सीमारेषा धूसर झाल्याचे वारंवार जाणवत आहे.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
फायनली
अशा प्रकारच्या बोनसवर ९०% कर लागू करण्याचा कायदा मंजूर झाला आहे.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.