काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी...

लेखनविषय : गीतसंगीत, चित्रपट.
लेखनप्रकार : आस्वाद, स्फूट.

डिस्क्लेमर : आम्हाला आवडलेली काही गाणी, त्यांचे शब्द, चाल, संगीत, गायकी इत्यादी बाबतीत काही आस्वादात्मक/माहितीपर भाष्य करण्याच्या हेतूने ही स्फूट वजा लेखमालिका आम्ही येथे सुरू करत आहोत. हे लेखन उपक्रमाने उपरोक्त नेमून दिलेल्या लेखनविषय आणि लेखन प्रकाराशी सुसंगत असेल याची आम्ही अर्थातच काळजी घेऊ. हे लेखन अन्य एका मराठी संस्थळावर मुखपृष्ठ स्वरुपात प्रकाशित झालेले असेल अथवा नसेलही! परंतु कॉपीपेस्ट स्वरुपात असले तरी ते लेखन अर्थातच आमचे असेल. या निमित्ताने संगीत विषयक आस्वदात्मक असा एक स्फूटसंग्रहच उपक्रमावर व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही इथे म्हटल्याप्रमाणे येत्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हिंदुस्थानी रागदारी संगीतातील काही बंदिशींविषययीही उपक्रमावर एक लेखमालिका आम्ही सुरु करत आहोत..


आमार श्वप्नो तुमी..

आमार श्वप्नो तुमी..

आनंद आश्रम चित्रपटातलं संगीतकार श्यामल मित्राचं एक अतिशय सुरेख गाणं!

याच गाण्यावरून हिंदीतल्या सारा प्यार तुम्हारा.. ह्या सुरेख प्रेमगीताचा जन्म झाला. बंगाली सिनेसंगीतातून मूळ चाल तशीच ठेऊन काही गाणी हिंदी सिनेसंगीतात घेतली गेली आहेत, त्यापैकी हे एक गाणं. मूळ बंगाली गाणं ऐकल्यावर त्याच चालीतलं हिंदी गाणं ऐकायलाही तेवढंच छान वाटतं! :)

टिपिकल बंगाली चाल. गाण्याच्या हिंदीकरणात चाल जरी तीच ठेवली असली तरी हिंदी गाण्याचे शब्द इतके सुंदर आहेत की ती कुठेही नक्कल वाटत नाही. गाण्याची चाल, शब्द, सुरेख शर्मिला आणि देखणा अभिनेता उत्तम कुमार यांचा सहजसुंदर अभिनय, गाण्याचं चित्रिकरण या सर्वच गोष्टी जमून आल्या आहेत आणि गाणं सर्वांगसुंदर झालं आहे!

आशाताई आणि युगगायक किशोरकुमार गांगुली यांनी अर्थातच या गाण्याचं सोनं केलं आहे हे वेगळं सांगातला नको. मराठमोळ्या आशाताई जेव्हा 'आमार श्वप्नो तुमी' गातात तेव्हा त्या कुठेही 'मराठी' वाटत नाहीत हे विशेष! या मागे त्यांचा अभ्यास आणि कलेशी असलेली कमालीची प्रामाणिकताच दिसून येते! गवैय्यांचे गवैय्ये असलेल्या किशोरदांबद्दल वेगळं काय बोलायचं?

'चमकी मेरी किस्मत की रेखा,
इन नैनो के काजल मे!'

ह्या ओळी ऐकल्यावर किशोरदा ही काय चीज आहे हे गायकी जाणणार्‍या कुणालाही सहज कळून यावं!

-- तात्या अभ्यंकर.

Comments

दुवा..

आम्ही इथे म्हटल्याप्रमाणे येत्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हिंदुस्थानी रागदारी संगीतातील काही बंदिशींविषययीही उपक्रमावर एक लेखमालिका आम्ही सुरु करत आहोत..

मूळ लेखात दुवा द्यायचा राहिला. सबब, आता देत आहोत!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

आवडले.

लिखाण आधीच एका आवडत्या मराठी साईटवर (मायबोली डॉट कॉम नव्हे ! ) वाचले होते आणि तिथेही आवडलेलेच होते. गाण्यात सुखी संसाराचे स्वप्न आहे असे मला वाटले. ("हम और पास आएंगे , हमे और पास कोई लाएगा" ) मूळ बंगाली चालीवरचे हिंदी शब्दही चपखल वाटले. अशीच इतर बंगाली चालींवरून आलेली हिंदी गाणी सुद्धा आठवतात (उदा. ना , जिया लागे ना , ओ सजना बरखा बहार आयी.) गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या धाकल्या मंगेशकरांनीही आपल्या चालीत बंगालीत नेल्या आहेत. तिन्ही सांजा सखे मिळाल्या वरचे बंगाली गाणे केवळ स्वर्गीय वाटते !

प्रस्तुत गाण्यात कुठल्या रागाचा (दूरान्वयाने) संबंध आला आहे का ?

दुवा

गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या धाकल्या मंगेशकरांनीही आपल्या चालीत बंगालीत नेल्या आहेत. तिन्ही सांजा सखे मिळाल्या वरचे बंगाली गाणे केवळ स्वर्गीय वाटते !
----------- तिन्हीसांजा वरच्या बंगाली गाण्याचा दुवा मिळू शकेल का? ऐकायची इच्छा आहे.

वा

मिसळपावावर मुखपृष्टावरचे लेख काही काळानंतर दिसेनासे होतात - आता ते लेखमालिका म्हणून इथे सापडतील.

आशाताई तर माझ्या आवडीच्या आहेत. सुंदर गाण्याचा आस्वाद घेतल्याबद्दल धन्यवाद.

उपक्रमावर

उपक्रमावर हे लेखन वाचता येईल याचा आनंद झाला. इतर संकेतस्थळांविषयी कल्पना नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

टिपिकल् बंगाली

टिपिकल बंगाली चाल म्हणजे काय ?

बंगाली म्हणजेव् "रोबिंद्रोशोंगीत" म्हणायचे आहे काय ?

बंगाली आणि मराठी चालींत काय फरक आहे ?

--- उपक्रमी

असेच काहीसे..

बंगाली म्हणजेव् "रोबिंद्रोशोंगीत" म्हणायचे आहे काय ?

असेच काहीसे. रोबिंद्रोशोंगीताचाच प्रकार आहे. परंतु त्या संगीताबद्दल मला पुरेशी माहिती नसल्यामुळे मी खात्रीने तसे म्हणू शकत नाही. म्हणून 'टिपिकल बंगाली' हे शब्द वापरले आहेत.

जाणकारांनी अवश्य प्रकाश टाकावा.

आपला,
तात्या मुखर्जी.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पारखी नजरेला सलाम. नतमस्तक.

रोबिंद्रोशोंगीताचाच प्रकार आहे.

हे साधे सिनेमाचे गाणे नसून रोबिंद्रोशोंगीताचाच प्रकार आहे ही नवीनच माहिती मिळते आहे. हा तर कुणाला नझरुलगीतीचाच प्रकार वाटू शकला असता. खेचराच्या पारखी नजरेला सलाम. नतमस्तक.

रवींद्रनाथांनी खास बंगाली चित्रपटांसाठीही गीते लिहिलेली दिसतात. रवींद्रनाथांप्रमाणेच नझरुल इस्लाम ह्यांनीही उत्तमकुमारसाठी गाणी लिहिली असावीत, असे वाटते. जाणकारांनी यादी द्यावी.

(अभद्र) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कॉपी पेस्ट

एखाद्य वैयक्तिक मालकीच्या संकेतस्थळावरील मुखपृष्ठ जसेच्या तसे दुसरीकडे स्वतंत्र लेख म्हणून देण्याचे प्रयोजन कळाले नाही. एकत्र संग्रह करावा असा मानस असेल तर तो मूळ संकेतस्थळावरही करता येईल. इतरत्र प्रसिद्ध झालेले लिखाण 'उपक्रम'वर प्रसिद्ध करु नये असे 'उपक्रम' चे धोरण आहे की नाही याविषयी कल्पना नाही, पण ते तसे करु नये अस एक शिष्टाचार रुढ व्हावा. यापूर्वी असे प्रकार इतर संकेतस्थळांवर झाले आहेत. (माझेही काही लेख पूर्वी मी एकाच वेळी दोन ठिकाणी व माझ्या अनुदिनीवर प्रकाशित केले आहेत) पण 'पुन्हा पुन्हा तेच तेच' वा तत्सम नावाच्या डोळ्यांत अंजन घालणार्‍या लेखानंतर असे प्रकार कमी झाले आहेत.
सन्जोप राव

हा लेख का?

मला वाटते तो लेख हा असावा. http://mr.upakram.org/node/116


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रयोजन

इतरत्र प्रसिद्ध झालेल्या लिखाणाबद्दलचा मुद्दा नेमका याच लिखाणाच्या संदर्भात का उठवला जावा ? अशी तर कित्येक उदाहरणे आहेत. काही तर अगदी काल-परवाची.

उदा. हा दुवा पहा आणि हा दुवा पहा.

सभ्य लोकांची सर्व मराठी संकेतस्थळे ही आम्हा मराठी जनांना सारखीच आहेत. परवा मी सुद्धा "भिन्न" या पुस्तकाबद्दल दोन स्थळांवर लिहिले. दोन्ही ठिकाणी मला "या पुस्तकाबद्दल लिहिल्याबद्दल आभार" या अर्थाचे प्रतिसाद आलेत. काही लोकांनी व्य. नी पाठवून हे पुस्तक परदेशात मिळेल किंवा कसे याबद्दल लिहिले आहे. शेवटी चांगल्या लिखाणाचा उद्देश जास्त जास्त लोकांपर्यंत पोचावे असासुद्धा असला पाहिजे. मला वाटते "प्रयोजनच काय ?" या प्रश्नाला हे उत्तर योग्य आहे.

असो..!

इतरत्र प्रसिद्ध झालेल्या लिखाणाबद्दलचा मुद्दा नेमका याच लिखाणाच्या संदर्भात का उठवला जावा ?

असो...! :)

मुक्तराव, या संदर्भात उपक्रम प्रशासनाव्यतिरिक्त अन्य कोण काय म्हणतं, हे आमच्याकरता गौण आहे! अन्य किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्हाला सवड नाही..!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

याच लिखाणाच्या संदर्भात का?

इतरत्र प्रसिद्ध झालेल्या लिखाणाबद्दलचा मुद्दा नेमका याच लिखाणाच्या संदर्भात का उठवला जावा ?

तशी ह्या वादात पडण्याची आमची इच्छा नाही. (आपला वेळ हा वादविरहीत माहितीपूर्ण लेखनात सत्कारणी लावावा अशी उपक्रमपंतांची आम्हाला शिकवण आहे.)

तसेच कुणी कुठे काय लिहावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असे आमचे सुरुवातीपासुनच मत आहे.

पण..

सदरहू लेखकाचे लेखक श्री.तात्या ह्या विचाराशी असहमत असताना बर्‍याचदा पाहिलेले आहे. एका संकेतस्थळावरील लेखन दुसर्‍या स्थळावर लिहिणे म्हणजे, एकिकडचे उष्टे दुसरीकडे टाकण्यासारखे आहे अशी त्यांची कडवी मते आमच्या वाचनात आली होती. तशी ती अनेकांच्या आली असावीत. त्यामूळे ते स्वतः जेव्हा आपलेच लेखन एका स्थळावरुन दुसर्‍या स्थळावर टाकत आहेत तेव्हा काहीजणांना हे विसंगत वाटणे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळेच नेमका याच लिखाणार हा मुद्दा उपस्थित झाला त्यात आम्हाला तरी आश्चर्य वाटले नाही.

खुलासा..

आमचीही या वादात पडण्याची इच्छा नव्हती परंतु आता कोलबेरपंतानी विषय काढलाच आहे तेव्हा खुलासा करतो..

एका संकेतस्थळावरील लेखन दुसर्‍या स्थळावर लिहिणे म्हणजे, एकिकडचे उष्टे दुसरीकडे टाकण्यासारखे आहे अशी त्यांची कडवी मते आमच्या वाचनात आली होती.

अगदी सहमत आहे, आमचे वरील मत आजही कायम आहे. परंतु इतर लेखनात आणि सदरच्या स्फुटात एक महत्वाचा फरक आहे. तो असा की ज्या संस्थळावर हे लेखन मुखपृष्ठ स्वरुपात प्रकाशित होते त्या स्थळावर ते एक-दोन दिवसांच्या वर रहात नाही, तेथून ते शब्दश: नष्ट केले जाते. दुसरा एक महत्वाचा फरक असा की तेथे हे लेखन मुखपृष्ठ स्वरुपात येते, लेख-स्वरुपात येत नाही. त्यामुळे ते वाचून कुणाला त्यावर काही प्रतिक्रिया लिहायच्या झाल्यास तशी सोय तेथे नाही! आता अगदी आमार श्वप्नो चेच उदाहरण घ्या. या क्षणीही हे लेखन तेथे मुखपृष्ठ स्वरुपात आहे. परंतु तेच लेखन येथे लेख-स्वरुपात असल्यामुळे त्याच्याशी निगडीत येथे काही चर्चा होऊ शकली, काही कलाप्रिय लोकांनी त्यावर सुसंगत अभिप्राय लिहिले! जे आमच्याकरता अर्थातच महत्चाचे आहेत!

शिवाय येथून ते लेखन नष्ट न होता येथे ते लेखमलिकेच्या/स्फूटमालिकेच्या स्वरुपात कायमस्वरुपी जतनही केले जाईल, हाही मुद्दा आहेच!

असो..

आम्ही आमच्या वकुबाप्रमाणे शक्य तो खुलासा केला असून आमच्याकरता हा विषय संपला आहे. येथून पुढे या विषयाशी निगडीत कोणतीही चर्चा ही 'अवांतर' मानली जावी आणि येथून अप्रकाशित केली जावी अशी आमची उपक्रम प्रशासनाला विनंती आहे..!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

थांबवा रे लेको

इतरत्र प्रसिद्ध झालेले लिखाण 'उपक्रम'वर प्रसिद्ध करु नये असे 'उपक्रम' चे धोरण आहे की नाही याविषयी कल्पना नाही, पण ते तसे करु नये अस एक शिष्टाचार रुढ व्हावा. यापूर्वी असे प्रकार इतर संकेतस्थळांवर झाले आहेत.
असहमत. एकच लिखाण शक्य तितक्या संस्थळांवर प्रसिद्ध झाले पाहिजे. उपक्रम, मिपा, मनोगत, मायबोली प्रत्येक संस्थळाचा एक वाचक वर्ग आहे. लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे महत्वाचे.

सभासदांनी जुने हिशेब चुकते करण्यासाठी कुठल्याही संस्थळाचा उपयोग करु नये. उलट झाले गेले विसरुन जाउन हातात हात घालुन पुढे पुढे चालावे. पवार आणि ठाकरे एकत्र येतात हो तुम्हाला न यायला काय झाले.

व्वा तात्या व्वा !

आमार श्वप्नो तुमी..तले शब्द काही कळले नाही पण बंगाली गाण्याची चाल ऐकल्यानंतर, सारा प्यार तुम्हारा मैने बांधलिया है आचल मे ऐकायला मजा आली. अर्थात अशी गाणी शोधायची त्याची ओळख करुन द्यायची ,बोले तो त्यालाही अभ्यास लागतो आणि तो आपल्याकडे आहेच. तेव्हा, आपल्याला आवडलेली काही गाणी, त्यांचे शब्द, चाल, संगीत, गायकी यावर माहितीपूर्ण लेखन वाचायला मजा येईलच....! शुभेच्छा आहेच.


अवांतर : आमच्या प्रतिसादाच्यावर एक सहमतीचा प्रतिसाद अजून कसा आला नाही बरं...?

-दिलीप बिरुटे

आता

आता ही तक्रार राहिली नसावी!
सन्जोप राव

आभार..

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार..

आम्ही अन्य संस्थळाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केलेले लेखन इथे स्फूट स्वरुपात प्रकाशित करण्याचा आमचा मानस यापुढेही राहील! अर्थात असे लेखन इथे रहावे किंवा नाही याबाबत काय तो निर्णय घेण्यास उपक्रम प्रशासन समर्थ आहेच! आणि उपक्रमाचा एक सभासद या नात्याने आम्हाला तो निर्णय अर्थातच शिरोधार्य असेल!

हे लेखन प्रसिद्ध होऊन आता जवळ जवळ १२ तास पूर्ण होत आले आहेत तरी अद्याप आमचे लेखन जसेच्या तसे इथे आहे. सबब, या संस्थळाच्या प्रशासनाची आमच्या ह्या स्फूटलेखनाच्या उपक्रमाला हरकत नाही/नसावी असे वाटते!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

चांगला उपक्रम

छान छोटा लेख.

अजुन येउ दे.

हेच् म्हणते.

खरंच चांगला आहे हा उपक्रम.
सुंदर रसग्रहण. तुमच्याकडून अशाचप्रकारच्या लेखानाची अपेक्षा आहे.
अजून लेखांच्या प्रतिक्षेत.

प्राजु

वा!

सुरवात आवडली.. पुढील स्फुटाच्या प्रतिक्षेत
वरदाताईंप्रमाणे मलाहि बंगाली गाण्याबद्दल उत्सुकता आहे.. दुवा मिळेल काय?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

तिन्ही सांजा - बंगाली गाणे

लताबाईंच्या तोंडच्या गाण्याची एम्पी३ मला मिळाली नाही ऑनलाईन. दुसर्‍या एका बंगाली बाईंनी गाईलेले हेच गाणे मात्र मिळाले.

http://www.youtube.com/watch?v=qViLjov_6qM

चाल

हम्म! जसेच्या तसे आहे.

ह्याला चाली 'उचलणे' म्हणता येणार नाही का?

इथे यारा सिली सिलीची चाल पण इथे ऐकायला मिळेल तेव्हाही असेच वाटले होते.

खरे आहे..

मात्र प्रस्तुत बांगला गाणे हे मराठी गाण्यानंतर अनेक दशकांनी बांधले गेलेले आहे. धाकल्या मंगेशकरांनी असे रिसायकलींग बरेच केलेले आहे. ..

कोणी बांधले?

हे मराठी गाण्यानंतर अनेक दशकांनी बांधलेले बंगाली गाणे कोणी बांधले आहे? तेही धाकल्या मंगेशकरांनीच बांधले आहे का? तसे असल्यास उचलेगिरी म्हणता येणार नाही बहुतेक, पण दुसर्‍या कोणी बांधले असल्यास मात्र उचलेगिरीच ठरेल.

यारा सिली सिली वगैरे गाणी प्राचीन लोकगीतांवर आधारित असल्यामुळे त्या चाली उचलेगिरीतून बहुतेक मुक्त असाव्यात.

धाकल्या मंगेशकरांनी चालींचे रिसायकलिंग केलेले आहे हे खरेच. वितरी प्रखर तेजोबल च्या चालीवर गगन सदन तेजोमय, काजळ रातीनं ओढून नेलाच्या चालीवर कोणतेसे हिंदी गाणे आहे वगैरे. मात्र वितरी प्रखरची मूळ चाल धाकल्या मंगेशकरांची नसावी असे वाटते. कोणाची आहे, कल्पना नाही.

तिलककामोद..

यारा सिली सिली वगैरे गाणी प्राचीन लोकगीतांवर आधारित असल्यामुळे त्या चाली उचलेगिरीतून बहुतेक मुक्त असाव्यात.

सहमत. आणि आमच्या मते उचलेगिरी करायलाही हरकत नाही परंतु ती कशी केली गेली आहे, त्या उचलेगिरीतून जी निर्मिती झाली ती देखील तेवढीच सुंदर आहे किवा नाही, हे पाहणे महत्वाचे!

वितरी प्रखर तेजोबल च्या चालीवर गगन सदन तेजोमय,

असहमत. वझेबुवांच्या 'प्रथम पुरुख नारायण' या तिलककामोदमधल्या बंदिशीवरून सदर गाणे बांधले आहे अशी आमची माहिती आहे! ही उचलेगिरीच आहे परंतु आम्ही वर म्हटल्याप्रमाणे त्या उचलेगिरीतून निर्मिती काय झाली, कशी झाली हे पाहणे महत्वाचे. गगन सदन तेजोमय हे गाणे इतके सुरेख बनले आहे की गुरुवर्य हृदयनाथ मंगेशकरांवर उचलेगिरीचा आरोप आमच्या मते तरी ठेवता येणार नाही, तसा तो ठेवणे योग्य होणार नाही!

अजून एक महत्वाचा मुद्दा -

लोकगीतांवर आधारित असल्यामुळे त्या चाली उचलेगिरीतून बहुतेक मुक्त असाव्यात.

सहमत आहे. लोकगीतांच्या बाबतीत 'उचलेगिरी-मुक्त' ही जी सूट दिली गेली आहे, तीच सूट आम्ही हिंदुस्थानी अभिजात रागदारी संगीताबाबतही गृहीत धरू. उदाहरणच जर द्यायचे झाले तर एकट्या यमन रागावर आधारीतच अनेक गाणी बांधली गेली आहेत. मग त्या सार्‍या गाण्यांनाही 'उचलेगिरी' म्हणावे लागेल जे आमच्या मते अर्थातच चुकीचे असेल!

जाता जाता -

'प्रथम पुरुख नारायण' ही तशी तिलककामोदातील अप्रसिद्ध बंदिश. त्या मानाने 'तिरथको सब करे' आणि सूरसंगत राग विद्या संगीत प्रमाण' या प्रसिद्ध आणि सर्रास गायल्या जाणार्‍या बंदिशी!

असो..

आपला,
(गाण्या-बजावण्यातला!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लाल सलाम

लाल सलाम या चित्रपटातली अनेक गाणी मंगेशकरांनी जुन्या चालींवरच रचली आहेत. उदाहरणादाखल हे एक पाहा.

http://www.youtube.com/watch?v=E6epnrTpK7I


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

"वितरी प्रखर"

"दूरे आकाश शामियाना" या "तिन्ही सांजा सखे मिळाल्या"वरील बांगला गाण्याचे सीडीवरील क्रेडीट् हृदयनाथांचेच असल्याचे मला आठवते.

"वितरी प्रखर तेजोबल"चे संगीत दीनानाथांचेच असावे (चूभूद्याघ्या ) ते दीनानाथांनी सर्वप्रथम गाईले हे १००% !

बाय द वे , "वितरी प्रखर तेजोबल " हे गाणेसुद्धा दीनानाथांचे गुरु पं. वझेबुवा यांच्या "प्रथम पुरुष नारायण" या मूळ बंदिशीवरून घेतलेले आहे !

"काजळ रातीनं ओढून नेला" = "खुदसे बातें करते रहना" (माया मेमसाब)

तात्या आणि माझे क्रॉस-पोस्टीन्ग् झाले ! :-)

पुरुष नव्हे, पुरुख!

"प्रथम पुरुष नारायण" या मूळ बंदिशीवरून घेतलेले आहे !

'पुरुष' नव्हे, 'पुरुख' असा शब्द आहे अशी आमची माहिती आहे. असो, एकदा केव्हातरी या बंदिशीबद्दल आणि तिलककामोदबद्दल इथे उपक्रमावरच लिहू..

आपला,
(कामोद, तिलककामोद, कामोदनट या तिन्हींचा प्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लेख आणि प्रतिसाद

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. :-)

देखणा अभिनेता उत्तम कुमार

देखणा या शब्दाशी किंचित असहमत आहे.

सापडले !!

http://tw.soundpedia.com/listen/Lata+Mangeshkar/Dure+Akash+Samiyanae

(नक्की कळवा कसे वाटले ते :) )


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ह्म्म

याच चर्चेमुळे वादळ वारं, मी डोलकर,मेंदीच्या पानावर, जीवलगा, मोगरा फुलला वगैरे सापडले. ऐकून करमणूक झाली.

काही प्रश्न

लेखन (डिस्क्लेमरसह) वाचून काही प्रश्न विचारावेसे वाटले.

  1. डिस्क्लेमरमध्ये आमचे,आम्ही असे काही अनेकवचनी शब्द आले आहेत. ही लेखमालीका अनेक लेखक लिहिणार आहेत का? की अनेक आयडी असलेले एकच व्यक्तिमत्व?
  2. येथे हिंदुस्थानी रागदारी संगीत असा शब्द प्रयोग वाचला. रागदारी संगीताचे असे धर्म/राष्ट्रवादी काही प्रकार आहेत का? जसे पाकिस्तानी, बांग्लादेशी. चीनी, अफगाणी, श्रीलंकी, आफ्रिकी इत्यादी रागदारी संगीत?
  3. गाण्याची मुळप्रत आणि नक्कल यात काय फरक असावा?
  4. गाणे आवडण्यासाठी गायनाची जाण असणे गरजेचे आहेच का?
  5. किशोर कुमारांना सुरुवातीचा काही काळ गायक म्हणून हिणवले जायचे ते खरे आहे काय?

बाकी या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर या लेखमालेचा आणि उपक्रमाच्या धोरणांचा माहितीपुर्ण लेखनाचा हेतु साध्य होईल असे वाटते.






सर्व संकेतस्थळांवर

सर्व संकेतस्थळांवर तेच तेच लेख पुन्हा पुन्हा वाचण्याचा कंटाळा येतो बॉ! याची दखल लेखकांनी घेतली तर बरंच आहे. संकेतस्थळाची धोरणं असं काही म्हणत नसावीत.

लेख चांगला आहे. उपक्रमासाठी "खास" काही येऊ दे, मिसळपावावर त्याचा दुवा देता येईल.

-राजीव.

आभार/उत्तरे...

सर्व वाचकांचे पुन्हा एकवार आभार..

गाण्याची मुळप्रत आणि नक्कल यात काय फरक असावा?

मूळ गाण्याची चाल वापरून केलेलं नवं गाणं हे चाल जरी तीच असली तरी त्याचे शब्द आणि गायकी ह्या बाबतीत अव्वलच् असले पाहिजे. तरच एक चांगलं गाणं जन्माला येईल, अन्यथा ती केवळ एक नक्कलच राहील.

गाणे आवडण्यासाठी गायनाची जाण असणे गरजेचे आहेच का?

नाही.

अर्थात, गाण्यातली एखादी स्वरावली उलगडून पाहायची असेल तर स्वरज्ञान असणे आवश्यक आहे. गाण्यात जर एखाद्या रागाच्या किंवा एकापेक्षा अधिक राग वापरले असतील त्या रागाच्या वापरलेल्या विविध फ्रेजेसची,मेलडीजची मौज अनुभवायची असेल तर विविध रागांची माहिती असणे केव्हाही चांगलेच! तालाचे ज्ञान असेल गाण्यातल्या लयीचा आनंद निश्चितच द्विगुणीत होतो/होऊ शकतो..

किशोर कुमारांना सुरुवातीचा काही काळ गायक म्हणून हिणवले जायचे ते खरे आहे काय?

कल्पना नाही!

लेख चांगला आहे. उपक्रमासाठी "खास" काही येऊ दे, मिसळपावावर त्याचा दुवा देता येईल.

धन्यवाद. वर म्हटल्याप्रमाणे येत्या गुढीपाडव्यापासून एक लेखमालिका सुरू करत आहोत, ती खास उपक्रमाकरताच असेल. अन्य संस्थळांवर आम्ही ती प्रकाशित करणार नाही! अर्थात, आमचा ब्लॉग हा अपवाद!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सर्व

सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असती तर आनंद झाला असता. :) बाकी नकलेचे उत्तर फारसे पटले नाही. चॅनेल्सवर म्हटली जाणारी गाणी हि नक्कलच नाहीत काय? असे कार्यक्रम पुर्णपणे नव्या गाण्यांचे असे वाटत नाही का?
आशा, लता यांनी सुद्धा नकला केल्या आहेत असे ऐकले आहे. ते खरे आहे काय?






 
^ वर