पुन्हा पुन्हा तेच तेच!

हे काय चालले आहे. तेच लेख तिकडेही आणि इकडेही.काहितरी नविन लेख इकडे वाचायला मिळ्तील ही अपेक्षा दिवसेंदिवस फोल ठरत आहे.
बाकी लेख अतिशय सुरेख आहेत.लगे रहो.

पूर्वी छापील नियतकालिकांत प्रसिद्ध केलेला मजकूर जसा दुसरीकडे प्रसिद्ध करता येत नसे किंवा संपादकांच्या पूर्वपरवानगीनेच करता येत असे तसेच काहीतरी जालावरील अशा संकेतस्थलांविषयीही धोरण ठरवले पाहिजे. अन्यथा माझ्यासारखा नवे काही वाचू पाहणारा वाचक सगळीकडे तेच लेख कॉपी पेस्ट (नकला आणि चिकटवा) बघून अगदी वैतागून जातो.
प्रत्येका संकेतस्थळाची काहीतरी वेगळी ओळख असली पाहिजे. अन्यथा केवळ् संकेतस्थळांचे पत्ते बदलताना दिसतात्, लेखक, लेख आणि त्याच्यावर प्रतिसाद देणारेही तेच ते ...तेच ते.

मी

लेखनविषय: दुवे:

Comments

तेच ते!

प्रत्येका संकेतस्थळाची काहीतरी वेगळी ओळख असली पाहिजे. अन्यथा केवळ् संकेतस्थळांचे पत्ते बदलताना दिसतात्, लेखक, लेख आणि त्याच्यावर प्रतिसाद देणारेही तेच ते ...तेच ते.

विंदांची 'तेच ते..' ही कविता आठवली! ;)

आपला,
(तोच तो! ) तात्या.

हा हा हा...

"हे काय चालले आहे?"
खल्लास सवाल! "मी" ची कमाल आहे!!

हा हा हा!!!

भूमिका

मी साहेब,
आपली तक्रार रास्त आहे की एकच साहित्य प्रत्येक संकेतस्थळावर वाचायला मिळते. माझ्या विचारान्ती याला काही कारणे अशी दिसतातः
१. बॅक अप- एका संकेतस्थळाचा सर्व्हर गेल्यास इ.इ. दुसरीकडे असावे म्हणून.
२. सुविधा- प्रत्येक संकेतस्थळावरील वेगवेगळ्या तांत्रिक सुविधांचा लाभ घ्यायच्या उद्देशाने. उदा. एखाद्याला एका संकेतस्थळ दर्जासाठी, दुसरे त्यावरील समुदायादी सोयींसाठी, तिसरे पी डी एफ साहित्य चढवण्याच्या सुविधेसाठी, तर आपली अनुदिनी 'आपला तो बाब्या' म्हणून प्रिय..
३. वाचकवर्ग- वेगवेगळ्या संकेतस्थळाच्या वाचकवर्गाची आपापली पसंती, गुणधर्म असतात आपले साहित्य विविध वर्गांच्या पसंती/नापसंतीला कसे आणि का उतरते हे पडताळून पाहण्यासाठी.
४. भावनिक लागेबांधे-एखाद्या संकेतस्थळावर आपले जास्त मित्रमैत्रिणी असल्यास तिथेपण.
५. निपक्षपातीपणा- सर्व मराठी संकेतस्थळांवर आपले साहित्य एकाच वेळी टाकून कोणा एका संकेतस्थळाविषयी 'फेव्हरीटीझम' न दाखवण्यासाठी.
६. जास्त 'पब्लिकशिट्टी'- जास्तीत जास्त संकेतस्थळावर आपले नाव परिचित व्हावे म्हणून.

आयुष्य तेच आहे!

मी साहेब एका कवियत्रीने तिच्या गजलेत म्हटलेलेल आहे.....

आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे!

आपल्या आयुष्यात तरी काय आहे? रोज तेच तेच करायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत रोजचा तोच दिनक्रम! तेव्हा हे सगळे असेच चालणार! त्याची तक्रार न करता त्यातूनच काही तरी मार्ग काढायचा असतो! बघा जमतंय का!

तेच ते असले तरीही

तेच ते असले तरीही प्रत्येकाचे मत इथे आणि तिकडे वेगळे असू शकते. किंवा जे नविन सभासद आहेत त्यांच्यासाठी तेच ते नविन असणार.
तरीही वाटते कि तेच तेच् परत येथे नको. अरे बापरे म्हणजे आपली विचार शक्ती किती पटिने वाढणार .बहुधा या संकेतस्थळाचा हाच उद्देश दिसतो.
आपला
कॉ.विकि

तरीही....

'मी' चे विचार मला पटले. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर मी एका संकेतस्थळावर प्रसिद्ध् झालेले माझे लिखाण दुसरीकडे चिकटवणे टाळणार आहे. विदागारात अडचणी आल्यास बॅक अप म्हणून आपले लिखाण आपल्या अनुदिनीवर ठेवता येईलसे वाटते.
सन्जोप राव

हां हां! ;)

विदागारात अडचणी आल्यास बॅक अप म्हणून

हां हां, म्हणजे विदागाराला अपघात का काय ते म्हणतात तेच ते ना? ;)

आपला,
(फाजील!) तात्या.

:)

:)
पल्लवी

प्रतिसादही तेच तेच

लेख सोडा आता त्याच लेखांना दिलेले तेच तेच प्रतिसादही वाचले. त्याच त्याच गोष्टी जागा मिळेल तिथे कॉपी पेस्ट करू नये असा काही कायदा तर नाही, परंतु तेच तेच वाचून आणि पाहूनही वैताग येतो, वाचकांवर् कृपा करावी इतकीच विनंती.

 
^ वर