मराठी पाऊल अडते कुठे !

`मोडेन पण वाकणार नाही’, असा मराठी बाणा असलेला मराठी माणूस स्वाभिमान गहाण टाकून दिल्लीकरांची माफी मागतो, तेव्हा स्वाभिमानी मराठी माणसाला मान खाली घालावीशी वाटते. नारायण राणे यांनी `जय महाराष्ट्र’ व `स्वाभिमान’ या दोन शब्दांचे अर्थ बदलण्याचे महत्कार्य केले. शिवसेनेत अपमान होतो, म्हणून `स्वाभिमान’ दुखावलेले राणे काँग्रेसमध्ये म्हणजे अगदी भिन्न विचारसरणीच्या ........

अधिक येथे वाचा

आणि आपले मत काय ते लिहा

Comments

राणे

राणे जाणे येणे या बद्दल काय लिहिणे?






खरे आहे

राणे जाणे येणे या बद्दल काय लिहिणे?

जर "वानराचा नर आणि नराचा नारायण होणे" ही सामाजीक आणि सांस्कृतिक उत्क्रांती समजले तर या संदर्भात ज्या पद्धतीने राणे साहेब टोप्या पाडत आहेत आणि उड्या मारत आहेत त्यामुळे, "नारायणाचा पुन्हा डायरेक्ट वानर" झाला की काय असे वाटते...

वेगात निघाल्यावर घात...

विषय राणेंचा असेल तर त्यांनी घेतलेला निर्णय चांगलाच. राजकारण करणार्‍यांनी स्वाभिमान बाळगला पाहिजे. मोडेन पण वाकणार नाही अशी भुमिका घेतली पाहिजे. आपण माणसं या राजकारणी लोकांकडून वाजवीपेक्षा अपेक्षा करतो तेव्हा आपल्याच पदरी निराशा येते. बोटावर मोजता येतील अशी स्वाभिमानाची इतिहासात कदाचित काही उदाहरणे असतीलही. पण मराठी माणूस दिल्लीकरांपुढे हुजरेगिरी करतो कारण त्यांची सत्ता आहे. आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा इतरांना मान्य करावा लागतो. नाही केला तर त्याला बाहेर जावे लागते. आणि बाहेर जावूनही त्याचे इतके अस्तित्व नसते की तो दिल्लीकरांना आपल्यापुढे नतमस्तक करु शकतो. समजा उद्या मराठी माणूस म्हणुन शरद पवारांना पंतप्रधान करायचे ठरले तर महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे मराठी खासदार एक मराठी माणूस म्हणून त्यांच्या बाजूने राहतील का ते सांगा ? पाहू मराठी माणसाला मराठी माणसाचे तरी कौतुक आहे का ?

जर तर

जर तरच्या गप्पा कशाला? शरद पवारांना पंतप्रधान कसे करायचे ते सांगा. मग मतभेद वगैरे पुढचा मुद्दा. ते बाजुला ठेवता येतील मराठीसाठी. पण मुळात त्यांना पंतप्रधान का करायचे आणि कसे करायचे ते सांगा मग आपण पुढची चर्चा करु. म्हणजे कसे जे मुद्दे त्यांना पंतप्रधान करण्यासाठी आडवे येतील त्यांचा विचार करु आपण आणि ते एक मराठी माणूस म्हणून.






गप्पा मारायला हरकत..

शरद पवारांचे (राकॉचे) जास्तीत जास्त धरले तरी पंधरा खासदारांच्या वर संख्याबळ जाणार नाही. आणि पंधरा खासदारांच्या भरवशावर पंतप्रधानांचे स्वप्न त्यांनाही पडत नसेल. तेव्हा थोडा वेळ या गप्पाच समजू. पण गप्पा मारायला तरी काय हरकत आहे.
राजकारणात काहीही होऊ शकते ? एक फार्म्युला असा आमच्या डोक्यात घोळतोय. काँग्रेस सोडून रॉकॉच्या मित्र वाटणार्‍या पक्षांनी ( घोडाबाजार करुन का होईना ) एकत्र यायचे आणि पवार साहेबांना नेता करायचे ? ( बाकी अनेक मोठे नेते पडलेले असतांना त्यांनाच का निवडायचे असा प्रश्न विचारु नका ) सहमतीच्या राजकारणाचा चान्स घेऊन पाह्यला काय हरकत आहे, जमेल का ?

गप्पा

अहो, या गप्पा काही राज्यातले स्वतःला राष्ट्रीय समजणारे अनेक पक्षांच्या नेत्यांचे समर्थक मारत आहेत. अशानेच तर या लोकसभेचे वाटोळे झाले आहे. खरतर पंतप्रधान कोण हा एक नवा चर्चा विषय सुरु करायला काही हरकत नाही.






चुकीचा पायंडा

वेमीत्८५

अवांतर होत असेल तर माफ करा, परंतु ज्या पद्धतीने आपण अर्धा लेख येथे टाकून उर्वरित लेख वाचण्यासाठी वाचकांना अन्य ठिकाणी निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे तो योग्य वाटत नाही. कृपया संपुर्ण लेख येथे टाकावा ही विनंती.

जयेश

मला वाटते

ज्या लेखाचा दुवा दिला आहे तो लेख वेमित् यांचा नाही. इतरांचे लेख इथे सरळसरळ कॉपी-पेस्ट करण्याबाबतही अनेकांचे आक्षेप होते, जे मला योग्य वाटतात. उपक्रमांनीही याबाबत इतरांचे लेखन येथे कॉपीपेस्ट होऊ नये असे म्हटले होते असे वाटते. चू. भू. दे. घे. (नक्की कोणत्या लेखात ते आठवत नाही) त्यामुळे अशा परिस्थितीत लेखक जे करतो आहे ते ठिक वाटते. जर लेख वरील लेखकाचाच असेल तर तो संपूर्ण लेख येथे देणे योग्य आहेच.

अवांतरः लेखकाच्या दुव्यामुळे बर्‍याच दिवसांनी त्या संकेतस्थळावर जाऊन काल निर्भे़ळ विनोदाचा आनंद घेऊ शकल्याबद्दल मी त्यांच्या दुव्याची आभारी आहे. ;-)

'फीड रीडर'

बहुतेक माझ्या मांडण्यात थोडी चूक झाली. इथे माझा आक्षेप उपक्रमाला 'फीड रीडर' सारखे स्वरुप देण्याला होता. स्पष्टच म्हणायचे तर 'त्या संकेतस्थळावर' ट्रॅफिक वळविण्याचाच उद्देश वाटला. प्रस्तुत लेखकाने जर वरील विषया संदर्भात स्वतःच्या शब्दांत किमान चार ओळी तरी लिहून मग संदर्भादाखल 'त्या संकेतस्थळाचा' दुवा दिला असता तर गोष्ट निराळी असती.

जयेश

मीसुद्धा!

अवांतरः लेखकाच्या दुव्यामुळे बर्‍याच दिवसांनी त्या संकेतस्थळावर जाऊन निर्भेळ विनोदाचा आनंद घेऊ शकल्याबद्दल मी त्यांच्या दुव्याची आभारी आहे.
मीदेखील.---वाचक्‍नवी

मराठी पाऊल

या संदर्भात शुभदा चौकर यांचा हा लेख वाचल्याचे कुणी लिहिले नाही.--वाचक्‍नवी

तीन ट्रेलरे

मराठी चित्रपटवाल्याकडे पैसा आलेला दिसतोय. :))

कशाला उद्याची बात - रिमिक्स (मराठी चित्रपट- मेड इन चायना)

उलाढाल ट्रेलर

मी शिवाजीराव भोसले बोलतोय ट्रेलर


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा!

मराठी सिनेमा आता गद्धेपंचविशीत आलेला दिसतोय्! यापूर्वी मराठी चित्रपटाचा ट्रेलर काढल्याचे ऐकिवात नव्हते. संख्या वाढली की दर्जा ढासळण्याची भीती असते. असल्याही सिनेमांना उदंड प्रेक्षक मिळोत,ही सदिच्छा.
(उलाढाल हा हिंदी ढालची कॉपी वाटतो आहे, निदान शेवट तरी. )--वाचक्नवी

 
^ वर