लाइफ इज फॉर शेअरिंग

ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरातीचे वेगवेगळे मार्ग कंपन्या नेहमीच शोधत असतात. टी-मोबाईल कंपनीने नुकतीच एक मजेदार शक्कल लढवली. लिव्हरपूल स्ट्रीट या लंडनमधील अतिशय गजबजलेल्या स्थानकावर १५ जानेवारी २००९, सकाळी ११ वाजता गर्दीच्या वेळी ४०० प्रशिक्षित डान्सर्स सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून गेले. अचानक मोठ्या आवाजात गाणे सुरु झाले. लोकांमध्ये मिसळलेल्या डान्सर्सनी शिकवल्याप्रमाणे नाच सुरू केला, हळुहळू स्टेशनवरील प्रवासीही त्यात सामील झाले आणि थोड्याच वेळात लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनचा हॉल नाच गाण्यात बुडून गेला.

'लाइफ इज फॉर शेअरिंग' या नव्या योजनेच्या प्रसिद्धीसाठी टी-मोबाईलने ही शक्कल लढवली होती. या दोन-अडीच मिनिटांच्या "लाइव्ह" जाहिरातीत आठ गाणी वाजवली, दहा छुपे कॅमेरे स्टेशनवर ठिकठिकाणी लावले होते. या प्रयोगात 'रिटेक'ची सोय नसल्याने आठ आठवडे जोरदार प्लॅनिंग केले गेले. १०,००० ऑडिशन्समधून ४०० लोक निवडले. दोन दिवस आधी रात्रीच्या वेळी रंगीत तालीमही झाली.

मूळ जाहिरात इथे पाहा.

ही जाहिरात कशी बनवली त्याचा व्हिडिओ इथे आहे.

Comments

मस्त !

टी-मोबाईल कंपनीची कारागिरी आवडली !
आपल्याकडे व्हीटीला असा प्रयोग कोणीतरी केला पाहिजे :)

साहेबाच्या

साहेबाच्या देशात झाले की आपल्याकडे झालेच पाहिजे. आपण आपले असे काही करावे असे वाटत नाही का? साहेबाकडे झाल्यावर लगलेच आपल्याकडे व्हावेसे वाटते. असो, जाहिरात ही ६५ वी कला आहे मान्यच ;) .

कल्पना

साहेबाच्या देशात झाले की आपल्याकडे झालेच पाहिजे. आपण आपले असे काही करावे असे वाटत नाही का? साहेबाकडे झाल्यावर लगलेच आपल्याकडे व्हावेसे वाटते.

खरं आहे ! पण आपल्याला अशा भन्नाट कल्पना सुचत नाही. सुचतही असतील म्हणा, पण तितका पैसा, वेळ, मेहनत...याचाही विचार करावा लागेल आणि शॉर्ट कटच्या काळात हे जरा अवघड काम वाटते ! आपल्याकडे काही प्रतिभेची कमी नाही, मगर उसे दुनिया के सामने आने मे वक्त लगता है ! :)

-दिलीप बिरुटे

अरे व्वा!

व्हिडीओ आवडला. आजीबाई छान नाचत आहेत.
आपल्याकडे असे करु नये मात्र. लोकांनी उत्स्फूर्तपणे नाचण्यात सामील होण्याऐवजी कलाकाराचा नाचताना एखाद्याचा धक्का लागला तर तिथे दंगल सुरु होण्याची जास्त शक्यता आहे असे वाटते. :-)

(अंगण वाकडे असलेला)सौरभ.

==================

:))

हा शक्कल आवडली... खूप भारी!!!!!!!!!!!!!!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

वा!

जाहिरात मस्त आहे, समूहाच्या मानसशास्त्राचा कल्पक उपयोग करून घेतला आहे. बाकी दादर स्टेशनच्या ४ नं. फलाटावर संध्याकाळी विरारची वाट बघत असताना 'कोंबडी पळाली'वर चार-एकशे लोकांनी एकदम नाचायला सुरूवात केली तर काय होईल, याचा कल्पनाविस्तार फार रंजक होईल ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मस्त

कल्पना चांगली आहे. (ही कोण?) लोकांना आवडलेली दिसते.
खरे तर हे आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वापार होत आले आहे. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये हिरो-हिरूणींनी त्वांड जवळ आणले की कट टू झाडावरची फुले आणि मग गाणे.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

फक्त गाणेच नाही

खरे तर हे आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वापार होत आले आहे.

फक्त गाणेच नाही तर कोरसमध्ये अचानक ५-५० जण येऊन गाणे आणि नायक-नायिकेच्या मागे नाचणे होत असतेच. कदाचित, ही आयडीया हिंदी चित्रपटांवरूनच ढापली असेल. (मेरा भारत महान.. आणि भारतीय संस्कृती त्याहूनही महान...सर्व काही भारतातच सर्वप्रथम निर्माण होते यावर आमचा विश्वास आहे.)
ह. घ्या.

बाकी, जाहिरात मस्तच. कल्पकतेचे कौतुक वाटले.

 
^ वर