लोकशाहीची कसोटी

चार नोव्हेंबर जसजसा जवळ येतो आहे तसतसे लोकशाहीचा कटोसीचा क्षण जवळ येतो आहे असे  म्हणण्यास वाव आहे. चार नोव्हेंबरला जगातील सर्वात महत्त्वाच्या निवडणुकीतील शेवटचे मत पेटीत बंद होणार आणि बुशचा वारसा कोण चालवणार ह्याचा एकदाचा निकाल लागणार आहे. अमेरिका तुम्हाला अवडो ना आवडो येउ घातलेली निवडणुक ही जगातील सर्वात मोठी निवडणुक आहे हे निर्विवाद. अमेरिका शिंकली की अवघ्या जगाला सर्दी होते हे सध्याच्या जगातील कोणत्याही शेअर निर्देशकाचे गेल्या १-२ आठवड्यातील आकडे पाहिल्यास दिसुन येईल.

लोकशाहीवर पद्धतीवर नेहमी होत असलेली टीका म्हणजे 'बहुमताला अक्कल नसते' हा (बहुतांशी लोकांचा?) समज. ह्या निवडणुकीत समोरा समोर उभे ठाकले आहेत ओबामा/बायडन आणि मकेन/पेलीन. ओबामा एकिकडे आपल्या वादविवाद आणि संभाषण कौशल्यातुन हार्वर्ड सारख्या विद्यापिठातुन घेतलेले शिक्षण सार्थ ठरवतो आहे तर दुसर्‍या बाजुला सेराह पेलिन बाई आपली बौद्धीक दिवाळखोरी ह्या ना त्या कारणाने प्रसार माध्यमांसमोर मांडत आहेत. त्यांचे यू ट्यूब वरील मुलाखतीवरील बरेचसे तुकडे पाहुन मला तरी काही महिन्यांपूर्वी नेटवर (अति)प्रसिद्ध झालेल्या मिस टीन साउथ कॅरोलायनाची आठवण होते. 

आता चार नोव्हेंबरला पाहुया बहुमत विजयाची माला सभाचतुर ओबामाला&nbsp घालते, की महान पेलीन बाईंना सोबत घेउन लढणार्‍या मकेनला. लोकशाहीची खरी कसोटी आहे खरी!       

तोपर्यंता पहा व्हिडिओ : सेराह पेलीन ह्यांचे अमेरिकेतील प्रमुख वर्तमान पत्रांविषयीचे ज्ञान.

Comments

हम्म!

झाले आहे असे खरे.
मला नेहमी अमेरिकन लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीचे कुतुहल वाटत आले आहे. नक्की काय त्यांना हलवते ते कळण्यापलिकडचे आहे. निवडणुकीच्या निकालांची वाट पाहणे एवढेच सध्या हातात आहे.

गोर आणि बुशच्या वेळची निवडणूक अजूनही आठवते. बुशला निवडून देऊन लोकांनी अमेरिकेची जी दिशा आहे ती ठरवली आहे ती इतकी महागात पडलीच शेवटी तरी अजून मॅकेन आणि पेलन कॅम्पाला सांभाळून घेणारे लोक आहेतच.

बाकी मॅकेनने तिला घेऊन चांगली चाल खेळली आहे. आता या सर्वाचा परिणाम पुढच्या मंगळवारी कसा दिसतो ते पहायचे..

उत्सुकता

कुमार केतकरांच्या आय ऑन अमेरिका ही 'आय इन अमेरिका' करून लिहिलेली मालिका वाचून या विलेक्शनबद्दल अंमळ उत्सुकता निर्माण झाली आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बिनडोक

मुर्ख सुमार शेतकरांच्या आय ऑन अमेरिका ही 'आय इन अमेरिका'
ही भंपक मते मांडणारी मालिका आहे.

अगदी दिवस वाईट गेला तर मी खो खो हसायला काहीतरी मिळावे म्हणून वाचत असतो.

दिवस चांगलाच असेल तर मी त्या वाटेलाही जात नाही.

या शिवाय राजा पटवर्धन नामक एक नमुना, लोकसत्ता मध्ये अर्थ विषयक तारे तोडत असतो.

उदा. भारत आर्थिक संकटात असतांना परदेशी भारतीयांनी आपले पैसे भारताबाहेरच ठेवले होते, इत्यादी...
जसे काही राजाभाऊंनी भारताला वाचवायला, अर्थ मंत्र्यांना आपला फंडच देवू केला होता!

आपला
(लोकांनी तोडलेले तारे हताशपणे वाचणारा)
गुंडोपंत

जो द प्लंबर

अमेरिकेत जो द प्लंबर किती आहेत यावर निवडणुकांचे निकाल अवलंबून नसतील ना!! ;-)

खरे आहे

>>>जो द प्लंबर पेक्षा मला ब्रॅडली इफेक्ट बद्दल अधीक काळजी वाटते.

ब्रॅडली इफेक्टची काळजीच नाही, तो आहे याची खात्री वाटते....

आमच्यासारख्या "लिबरल" राज्यात पण जेंव्हा झी अकलेचे तारे तोडणारे प्रत्यक्ष भेटले तेंव्हा हा इफेक्ट असणार/होणार याची खात्री वाटली ... आता येथील "इलेक्टोरल कॉलेजच्या" पद्धतीचा नक्की काय परीणाम होतो आणि कुणाला फायदा होतो यावर सर्व अवलंबून राहील.

छे! ही तर लष्करशाहीची कसोटी

लोकशाहीची कसोटी??
छे! ही तर लष्करशाहीची कसोटी!!

इतका युद्धखोर देश आहे हा.

जो निवडून येईल तो जगातला सगळ्यात मोठा लष्करशहा, कारण अमेरिकेचा संरक्षण खर्च हा सगळ्या मोठ्या देशांपेक्षा मोठा आहे, आणि युद्धे करण्याची खाजही!

कुणीही आले तरी अमेरिकन आक्रमकता कमी होईल असे वाटत नाही. उलट मंदीला उत्तर म्हणून नक्की काहीतरी खुसपट काढून नवीन युद्ध सुरु केले जाईल.

मकॅन येण्याची चांगली शक्यता असु शकते,
मागच्या वेळी अल गोर येण्याची खात्री असतांनाच जॉर्ज बुश आला होता, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

आपला
गुंडोपंत

ह्म्म्म्....

मिस टीन साऊथ कॅरोलायना रॉक्स! व्हिडीओ आवडला होता. त्याला खूपच प्रसिद्धी मिळालेली होती. रीडर्स डायजेस्ट मध्येही त्याबद्दल छापून आले होते.
शिवाय त्यावरचा एक गॅग व्हिडीओही पाहिला होता. एका मुलीचा अपघात होतो. एक जण म्हणतो "लवकर ९११ ला फोन लाव! दुसरी म्हणते "हो करते, पण नंबर सांग ना!" ;-)
पण सगळे अमेरिकन लोक असेच असतात का? अमेरिकेत राहणार्‍यांनीच खरं खोटं सांगितलं तर खरं काय ते कळेल.

-सौरभ.

===========

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

क्या बात है

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

तुम्हीही नेमाडपंथी दिसता. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हाहा

तुम्हीही नेमाडपंथी दिसता. ;)

मी देखील हे उदाहरणार्थ म्हणणारच होतो....

कुतूहल

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची निवडणूक बरेचदा आश्चर्यकारक असते. इराकमधील प्रचंड फियास्को, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था यानंतरही रिपब्लिकन पक्ष शर्यतीत राहू शकतो याचे राहून राहून आश्चर्य वाटते. अशा परिस्थितीत ओबामाला लँडस्लाईड विजय मिळायला हवा होता. पालिनम्याडमना पाहून बुश बरा असे म्हणायची पाळी आहे. आणि मॅकेन निवडून आल्यास बुशची गादी पुढे चालवणार असे दिसते आहे.

माझा फुल सपोर्ट ओबामा यांना!

----

कारण...

इराकमधील प्रचंड फियास्को, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था यानंतरही रिपब्लिकन पक्ष शर्यतीत राहू शकतो याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

कारण अमेरिकेत "कॉन्झर्वेटीव्ह ख्रिश्चन्स" , "अमेरिकन फॅमिली व्हॅल्यूज" वगैरे प्रकारात वरील विषय नगण्य ठरतात :-(

बुश-केरी निवडणूकीच्या वेळेस (२००४) अनेक रिपब्लीकन्स पाठीराखे मतदानाला जाणार नाहीत हे समजल्यावरे अशा प्रबळ राज्यांमधे "गर्भपात" आणि "लग्न कशाला म्हणावे" यावरून विविध प्रकाराने मतदारांसाठी "हो/नाही" ठराव आणले. त्याला पेटून जे जाणार नव्हते ते गेले. आणि गेले म्हणल्यावर आपोआप बुशला पण मत देऊन आले.

क्लिंटन म्हणाला "इट्स इकॉनॉमी स्टूपिड" आंणि जिंकला.
बुश कदाचीत मनातल्यामनात म्हणाला, "इट्स पॉलीटीक्स स्टूपिड" आणि वेड्याचा भाव आणत दुसर्‍यांदा पण जिंकला.

आज ओबामाच्या सभांमधे जसे क्लिंटन सर्वत्र हिंडत बोलतोय तसेच जर गोर ने कुठलाही आदर्शवाद चुकीच्या ठिकाणी चुकीच्या कारणासाठी मधे आणला नसता, तर जगाचे चित्र पण बरेच वेगळे दिसू शकले असते...

 
^ वर