पुस्तक प्रकाशन विश्वाचा आढावा घेणारे संकेतस्थळ.

आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे.

आई जगदंबा भवानी ही अनेक प्रेरणांची स्त्रोत आहे. या अनेकविध प्रेरणेत शौर्य,शांती, भक्ति, बुद्धी, लेखन, कला इत्यादीचा समावेश होत असतो. हीच माता आपल्या भक्तांना शारदेच्या रुपात काव्य, लेखनाची प्रेरणा देत असते, आस्वादाची क्षमता देत असते. याच शारदारुपी मातेच्या पायावर आम्ही एक छोटेसे कमळ अर्पु इच्छितो.

या कमळाचे नाव आहे, www.pustakvishwa.com

या संकेतस्थळावर शारदेचे मूर्त स्वरुप असलेल्या पुस्तकांना, तिच्या या रुपावर प्रेम करणार्‍या भाषिक भक्क्तांना आणि लेखनकरुन विचारांना अक्षर करणार्‍या लेखकांना अढळ असे स्थान आहे.

या संकेतस्थळावर वाचकांना आपापल्या आवडत्या पुस्तकावर समीक्षण, परीक्षण, आवडलेला उतारा / कविता, वाचनालयाची यादी, लेखकांची यादी इत्यादी पाहता येतील.

त्याच बरोबर मराठी भाषेतील ५००/६०० पुस्तक प्रकाशकाना, ४००/५०० नियमित पणे मासिके वगैरे प्रसिद्ध करणार्‍या प्रकाशकांना आणण्याचा प्रयत्न राहील. त्यामूळे प्रकाशकांची पुस्तक सुची, आगामी प्रकाशने इत्यादीची माहिती वाचकाना अद्ययावत मिळत राहील अशी अपेक्षा आहे. जसेजसे महाजाल साक्षरता वाढत जाईल आणि तशीतशी त्या महाजालाच्या अमर्याद अश्या ज्ञान आणि माहितीच्या संकलन आणि वितरण क्षमतेचा लाभ आपल्या असंख्य अश्या मराठी बांधवाना मिळत राहील अशी अपेक्षा आहे.

मराठीच्या संवर्धनाचा हा प्रयत्न असल्यामूळे शारदेच्या कृपेशिवाय आपले हे प्रयत्न असफल राहतील. शारदेने मराठीभाषेवर प्रसन्न होऊन जगातील सर्व तंत्रज्ज्ञान, विचार, आचार मराठी भाषेत आणण्यासाठी या कमळाचा स्विकार करावा अशी मनापासून प्रार्थना कराविशी वाटते.

द्वारकानाथ कलंत्री

Comments

छान

छान आहे हे स्थळ, आवडले
आता कुणीतरी उपक्रम, लोकायत आणि हे नवीन प्रकाशन स्थळ या सगळ्यांचा आय डी एकच करता येईल का हे पण पाहिले तर बरे होईल.

-निनाद

खूपच अभिनव कल्पना आहे.

जसे याहु, रेडिफ मध्ये एकमेकांना निरोप पाठवता येतो तसेच या संकेतस्थळांना जोडता आले तर बरे होईल.

तंत्रज्ज्ञ लोकांनी यावर आपले मत व्यक्त करावे.

चांगला उपक्रम

चांगला उपक्रम सुरु केला आहे. वरची कल्पना मांडण्यासाठी वेगळा धागा सुरु आहेच :)
सुचना:
सदस्य व्यक्तिगत माहितीमध्ये "देवान घेवान: " असे आहे. ते देवाण घेवाण: असे हवे का?

हो.

शुद्धलेखनाच्या बर्‍याच चुका आहेत. मनोगतवर आहे तसे शुद्धि चिकित्सक निर्माण करावयाला हवे.

शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या चुका सुधारायला पाहिजेच, थोडा वेळ हवा.

कृपया, या संकेतस्थळावर ज्या काही चुका, अडचणी लक्षात येतील त्या आमच्या लक्षात आणून दिल्यास त्यावर लगेच आणि तत्काळ उपाययोजना स्विकारता येतील.

असेच

म्हणतो. स्तुत्य उपक्रम आहे.

----

असेच म्हणतो

स्तुत्य उपक्रम आहे.

स्तुत्य उपक्रम

स्तुत्य उपक्रम आहे पण वापरताना बर्‍याच अडचाणी आल्या.
खुप् हळु चालते. प्रतिसाद् उघडत नाहित या काही प्रातिनिधिक.
अपेक्षा करतो की या अडचणी लवकरच दूर होतील
या संकेतस्थळासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे अभिनंदन आनि आभार
अनिकेत केदारी

चांगला उपक्रम

चांगला उपक्रम आहे परंतु अद्याप संकेतस्थळ प्राथमिक अवस्थेत आहे असे वाटते.

शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत. पुस्तकांचे वर्गीकरण नाही. या संकेतस्थळावर शहरांनुसार ग्रंथालयाची माहिती, प्रकाशकांची माहिती, पुस्तकविक्रेत्यांची माहिती संकलित करता यावी असे वाटते.

खरे आहे.

प्रियाली ताई,

शुद्धलेखनाच्या चुका कालातंराने दुरुस्त करता येतील, मुख्य म्हणजे तांत्रिक अडथळे बरेच येत आहेत. उदा. पाने न खुलणे, मध्येच प्रतिबंधित क्षेत्र इत्यादी.

यात कृपया भर टाकण्याचा प्रयत्न करत जाणे, उदा. खरड फळा, आवडता उतारा, कविता, एखादा छोटासा लेख, व्यनि इत्यादी इत्यादी.

जसे जसे साहित्य निर्मितीचा वेग वाढेल तसे हे स्थळ जास्तीत जास्त लोकांचे ठरत जाईल.

आपल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद.

हे पचायला अवघड!

शुद्धलेखनाच्या चुका मुळातच होऊ दिल्या नाहीत की झाले. हे काम सगळ्यात सोपे. झालेल्या चुका वाचकांनी दाखवल्यानंतर त्यांबद्दल माफ्या मागितल्या की दुरुस्त्या सावकाश केल्यात तरी चालतील.---वाचक्‍नवी

पुस्तकविश्व

आपली तळमळ समजली. नेटाने चालू ठेवा. मदत मिळेलच. अभिनन्दन आणि शुभेच्छा.

वा!

हे स्थळ सर्व वाचनालये आणि पुस्तके विकत घेणारे या सर्वांना कळले पाहिजे तर उपयोग!

येथेच पुस्तकेही मिळतील असे पहा ना...

आपला
गुंडोपंत

येथे आपला सहभाग हवा.

गुंडोपंत,

आपल्यासारख्यांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय या स्थळाची प्रसिद्धी होणार नाही.

आपल्या पुस्तकप्रेमी मित्रमंडळीना या स्थळाची माहिती द्यावी ही विनंती.

आपला स्नेही,

द्वारकानाथ

निश्चितपणे

अहो मी निश्चितपणे मदत करेन - करतो आहेच.
परंतु याचे उपयोगिता मुल्य कसे वाढेल याचाही विचार करतो आहे.

मुख्य म्हणजे जोवर या प्रक्ल्पाला आर्थीक बळ स्वतःचे स्वतः तयार करता येत नाही तोवर त्याच्या विकासाची खात्री कशी घेणार आहात/आहोत?

एक तर मराठी समाज 'समाज या भावनेने' त्यासाठी उभा राहिला पाहिजे - जे अजून मराठी विकि वरही घडत नाही, हे तर सोडूनच द्या!
किंवा स्थळाने स्वतःचे पैसे मिळवू शकणारे मार्ग शोधले पाहिजेत्.

स्थळ पुस्तकां विषयी आहे, सर्व प्रकाशकांची पुस्तक विक्री एकाच ठिकाणी करण्याची आयती संधी!
पुस्तके खपायला लागली तर प्रकाशक आपणहून त्याला प्रसिद्धी देतीलच.
वाचनालये हे पुस्तकांचे मुख्य खरेदीदार, ते ही नवीन काय आले याचा संदर्भ म्हणून येथे पाहतील. पण तितके हे स्थळ सतत ताजे असायला हवे!

(आणि जाल २.० च्या मुख्य विचाराप्रमाणे लोकच जेंव्हा येथे माहिती देतील तेंव्हा आपोआपच स्थळ ताजे राहील. आणि तशी काळजी लोकच घेतील अशी परिस्थिती तयार होईल अशी आशा करतो.)

आपला
गुंडोपंत

शुभेच्छा...

सुंदर संस्थळ. या संकेतस्थळाला माझ्या व्यक्तिगत व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

धन्यवाद.

तात्या,

आपल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद.

आपल्या आवडत्या विषयावर आणि उपलब्ध पुस्तकावर पुस्तक परीक्षण लिहिले तर तो ज्ञान / माहिती रुपी ठेवा आपल्या वाचकविश्वात कायम स्वरुपी आणि जिज्ञासुना लाभप्रद ठरेल.

पुन्हा आपल्या सक्रिय प्रतिसादाच्या अपेक्षेसह्,

द्वारकानाथ

काय् झाले?

हे संकेतस्थळ् बंद पडले का? सध्या चालत नाही असे वाटते.

जर शक्य असेल् तर् का बंद पडले (तुमच्या अपेक्षेप्रमाणे काय होऊ शकले नाही) हे लिहिलेत् तर् इतर् मराठी संकेतस्थळ चालू करणार्‍याना त्यातून् काही शिकता येईल्.
मराठीवर्ल्ड या इंग्रजी नावाच्या मराठी संकेतस्थळाने मराठी पुस्तके विकण्याचा प्रयत्न केला होता तो काही दिवसांनी बंद पडला होता. आता हे आणखी एक स्थळ्. मला नेहमीच जालावर् व्यवसाय् करणार्‍यांचे (किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचे ) कौतुक् वाटते. आणि त्यामागचे कार्यकारण् संबध् शोधून् काढावेसे वाटतात्.

 
^ वर