सकाळ(पुणे) वाचक व्यासपीठ

"फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"
या विषयावर "वाचकांचे व्यासपीठ" या सदरात अठरा पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.(दै.सकाळ शनिवार३१ मे २००८).त्यांत श्री. प्रकाश घाटपांडे यांचे पत्र केंद्रस्थानी ठळक टंकात छापले आहे ते येणे प्रमाणे:

....
वैज्ञानिक चिकित्सेकडे ज्योतिषांची नेहमीच पाठ
प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे आवाहन समस्त ज्योतिर्विदांना केले आहे.या निमित्ताने या विषयावरील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.समस्त ज्योतिर्विदांनी यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध अर्थतञ्ज्ञ (कै) वि.म.दांडेकरांनी यापूर्वी फलज्योतिषाच्या चाचणीचे प्रयत्‍न केले होते.’सप्ताहिक सकाळ दि. ८ जुलै१९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात: "शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या, तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फ़रक दिसावयास हवा.तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमधे काही योग प्रामुख्याने दिसावयास हवेत. पण माझ्या जवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या आहेत त्यांवरून तरी हा फ़रक दिसून येत नाही."
भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यानी म्हटले होते की जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?" आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ मध्ये रा.ज. गोखले या पुण्यातील भूगोल शिक्षकाने "फलज्योतिष चिकित्सा" नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सर्व चिकित्सा केली होती.फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी एका निर्णायक समितीची स्थापना केली.ज्योतिर्विदांना एक विनंती केली की आपले वर्तविलेली भविष्यें त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी.त्यासाठी यथोचित पारितोषिकही देण्याची तयारी ठेवली होती.पण त्यासाठी त्यांनी फलांसंदर्भात अटी घातल्या.याचा फ़ारसा परिणाम ज्योतिषांवर झाला नाही व त्यांनी प्रतिसादही दिला नाही.
..........................................................प्रकाश घाटपांडे, पुणे
******************************************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांच्या वरील लेखनावरून दिसते की:
*वि. म.दांडेकर यांना फलज्योतिष विषयाचे ज्ञान होते. त्यांचा अभ्यास होता.
* मात्र ते अंधविश्वासू नव्हते. चिकित्सक अभ्यासक होते.
*म्हणून त्यांनी फलज्योतिषाच्या सत्यासत्यतेची पडताळणी करायचे योजले.
*त्याकरिता त्यांनी शंभर मतिमंद मुलांच्या आणि शंभर सर्वसाधारण मुलांच्या पत्रिका गोळा केल्या.
* मतिमंद मुलांच्या शंभर पत्रिकांत कोणताही सामाईक घटक दिसून आला नाही.
*शंभर सर्वसामान्य मुलांच्या पत्रिकाही अभ्यासल्या.
* या दोन प्रकारच्या पत्रिकांत उठून दिसेल असा कोणताही भेद आढळला नाही.
* वि.म.दांडेकर यांनी शंभर घटस्फ़ोटितांच्या पत्रिकाही प्रयत्न पूर्वक गोळा केल्या.
* या पत्रिकांतही त्यांना कोणताही सामाईक घटक(commona factor) आढळला नाही.
यावरून तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो की फलज्योतिष ही एक निरर्थक गोष्ट आहे. निरर्थक या शब्दासाठी थोतांड असा पर्यायी शब्द आहे.

Comments

नसेल

नसेल येत त्या चिकित्सा करणार्‍या बिचार्‍या रा. ज. गोखले आणि दांडेकरांना जोतिष, ते पडले भुगोल शिक्षक अर्थतज्ञ! जोतिषी नाही ...
आणि तुम्ही म्हणत असलात त्यांना जोतिषी तर सांगा मग त्यांची पदवी आणि कुठे घेतले त्यांनी शिक्षण?!

त्यांनी आपापल्या अर्थशास्त्र आणि भुगोलातले प्रयोग केले असते आणि काही निष्कर्ष निघालेच असते तर काही म्हणण्यात दम आहे बॉ!

मला तर रा. ज. गोखले यांनी भुगोलावर केलेलेही काही लेखन सापडले नाही.

आणि चालायचेच... सगळ्यांनाच कुठे जमायला हो इतकी जोतिषाची साधना? उथळ पाण्याला खळखळाट असायचाच.

लोक आपले (च) म्हणणे ऐकत नाहीत म्हणून,
तुम्ही नका फार त्रागा करून घेवू या थोतांडी चिकित्सेपायी! ;)

आपला
गुंडोपंत

माहितीवर आधारित निष्कर्ष

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. गुंडोपंत म्हणतातः "आणि तुम्ही म्हणत असलात त्यांना जोतिषी तर सांगा मग त्यांची पदवी आणि कुठे घेतले त्यांनी शिक्षण?!"

**वि. दांडेकर यांनी साप्ताहिक सकाळ मधे लिहिले ""शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या, तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फ़रक दिसावयास हवा.तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमधे काही योग प्रामुख्याने दिसावयास हवेत. पण माझ्या जवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या आहेत त्यांवरून तरी हा फ़रक दिसून येत नाही."
.....यावरून अनुमान निघते की ते ज्योतिषाचे चिकित्सक अभ्यासक होते. नसते तर अशा पत्रिका गोळा करते ना.ज्योतिषविषयक ज्ञान नसते तर "फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फरक दिसावयास हवा" असे विधान करते ना. इथे त्यांची विधाने मी सत्य धरली आहेत. असत्य लिहिण्यात काही हेतू असतो.दांडेकरांचा काही हेतू असणे संभवतच नाही. इथे त्यांचे कोणतेही हितसंबंध नाहीत. एक आदरणीय विचारवंत अशी त्यांची प्रतिमा आहे.
...रा. ज. गोखले हे ज्योतिषी होते असे कोणी म्हटलेले नाही. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. ग्रंथप्रामाण्य मानणारे नव्हते.ज्योतिषी भाकिते वर्तवितात त्यांत काही तथ्य असते की नाही हे त्यांना पडताळायचे होते.भूगोलशिक्षकाने ते पडताळूंनये असे मुळीच नाही. त्यासाठी ज्योतिषाच्या ज्ञानाची काही आवश्यकता नाही.त्यांनी ज्योतिषांना भाकिते सांगण्याचे आवाहन केले होते. समजा त्या काळच्या एका प्रसिद्ध व्यक्तीचे आठ दिवसांत निधन होईल असे भाकित कोणी वर्तवले. तर सत्यासत्यता ठरवण्यासाठी ज्योतिषाचा अभ्यास नको.

:)

;)
सोडले!

आपला
गुंडोपंत

आणि

घटस्फोटीतांचे आणि मतिमंदांचे प्रश्न इतके समोर असतांना ते सोडवायचे सोडून,
या चिकित्सेत कुठे लक्ष घालता?

आपला
गुंडोपंत
(लेखक "चमत्कारीक लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'चमत्कारीक' द्यायला काय हरकत आहे?)

सहमत

सहमत

पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्योतिषी एका व्यासपिठावर !

यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही इतर संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे पुन: पुन्हा चिकटवले जात असल्याचे निदर्शनास आल्याने हा प्रतिसाद संपादित करण्यात आला आहे.

वारंवार सूचना देऊनही सातत्याने उपक्रमाच्या लेखनविषयक धोरणाशी सुसंगत नसलेले लेखन करत राहणार्‍या सदस्यांच्या लेखनासाठी प्रकाशनपूर्व संपादकीय परवानगी आवश्यक करणे आणि/किंवा इतर मर्यादा आणणे आवश्यक होऊ शकते.

संपादन मंडळ

हे येथुन

कुणी काढेल का?
ही बातमी तशीच्या तशी येथे चिकटवण्यात आली आहे.

अर्रर!
पण मग याच न्यायाने वरचा चर्चा प्रस्तावही काढावा लागेल!
;))
आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)

फेयर यूज

पण मग याच न्यायाने वरचा चर्चा प्रस्तावही काढावा लागेल!

मला वाटते फेयर यूज च्या कलमाखाली हे चालेल. अनेक पत्रांपैकी एक पत्र सरांनी येथे दिले आणि त्या अनुषंगाने आपली मतेही लिहिली आहेत. आणि सदर पत्राचे मूळ लेखक उपक्रमाचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यामुळे काही अडचण येऊ नये.

नाही!

मला नाही वाटत की हे येथे चालावे.
न्याय सर्वांना सारखाच असावा.
यनावलांचेही चिकटवलेले लेखन काढलेच पाहिजे.
त्यांचे मतेच फक्त येथे असणे योग्य.
आणि सदर पत्राचे मूळ लेखक उपक्रमाचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यामुळे काही अडचण येऊ नये.

का अडचण येवू नये?
पत्र सकाळ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. यनावाला किंवा घाटपांडे साहेबांच्या ब्लॉगवर नाही. तसेच यनावाला यांनी घाटपांडे यांची परवानगी घेतल्याचीही कोणतीही नोंदणी येथे केलेली नाही. उपक्रमाच्या एका लेखकाचे लेखन दुसर्‍या लेखकाने (पुर्व प्रसिद्ध असले तरी) परत येथे देण्याचे काही एक कारन नाही.
शिवाय त्यावर सकाळचाही हक्क आहेच.
त्यानुसार येथे प्रताधिकार भंग झाला आहेच.

आपला
गुंडोपंत

फेयर यूज

मोठ्या सदरातील छोटा भाग उद्धृत केलेला चालतो. अठरा पत्रांपैकी एक पत्र उद्धृत करणे कॉपीराइटचा भंग करणारे ठरेल असे वाटत नाही. फेयर यूज ची कायदेशीर मर्यादा काय हे मला माहीत नाही. यावर आधीही चर्चा झाल्याचे आठवते.

पत्राचा

पत्राचा भाग दिला असता चालेल.
पण पत्रच कसे चालेल?
हा भागही १०% पेक्षा जास्त नको.
अन्यथा ही चोरीच आहे यात संशय नाही.

आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)

प्रताधिकारभंग?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मी जी अनुमाने मांडली ती श्री. प्रकाश घाटपांडे यांच्या पत्रातील माहितीवर आधारित आहे. ते पत्र कांही जणांच्या वाचनात आले नसेल.म्हणून उद्धृत केले.संदर्भदुवा दिला असता तरी चालले असते. पण यात प्रताधिकारचा भंग झाला असे मला मुळीच वाटत नाही. एकतर मी श्री. घाटपांडे, सकाळ ही नावे दिली आहेत. तसेच इथे कोणताही अर्थिक व्यवहार नाही. त्यामुळे अधिकारभंगाचा प्रश्न उद्भवत नाही.

तसे

तसे सकाळ ने काही म्हंटलेले नाही. तुमच्या कडे सकाळ चे ना हरकत पत्र असेल तर हा वाद येथे संपला.
पण तसे जर नसेल तर हे लेखन म्हणजे यात प्रताधिकारचा भंग झाला आहे यात वाद नाही.

आपला
गुंडोपंत
(लेखक "ढापू लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'ढापू' द्यायला काय हरकत आहे?)

पत्रलेखक

हे उपक्रमीच असून त्याबाबत या लेखाच्या लेखकांनी तसा खुलासा केलेला आहे. तसेच, सदर लेखाच्या लेखकाने मूळ पत्रासोबत आपले विचारही मांडलेले आहेत. तसेच, पत्रलेखकाने आपले पत्र वर्तमानपत्रात जाहिर केलेले आहे.

माझ्या मते,

१. वरील लेख जसाच्या तसा उपक्रमाच्या धोरणात बसू शकेल.
२. पत्रलेखकाने आक्षेप घेतला तर त्यांच्या पत्राचा मसूदा काढून तेथे फक्त दुवा देता येईल. (यावरील माझे मतः घाटपांड्यांना तसा आक्षेप घेण्याची गरज मला दिसत नाही.)

कसे

१. वरील लेख जसाच्या तसा उपक्रमाच्या धोरणात बसू शकेल.

ज्या धोरणात हे लेखन बसते असा दावा आपण करता ते धोरण कृपा करून येथे द्याल काय?

आपला
गुंडोपंत

खोडसाळ

हा प्रतिसाद काढून टाकण्याच्या प्रकार खोडसाळ पणाचा आहे आणि मी त्याचा निषेध करतो.

मी

मी नाही करत निषेध!
मला वाटतं की ढापाढापी करून चिकटवण्यापेक्षा आपले आपण लिहावे.
आणि ही भुमिका मी कायमच घेत आलो आहे.
हवं तर बातमीचा गोषवारा द्यावा. झालेच तर त्यावर आपली प्रतिक्रीया द्यावी. पण बातमीच का चिकटवावी तशीच्या तशी?

उद्या तुमचे लेखन कुणी चोरले तर?

आपला
गुंडोपंत

योग्यच झाले

काही सदस्यांनी एका संकेतस्थळावरील प्रक्षोभक आणि एकांगी (प्रसंगी अत्यंत विनोदी :p) लेखांना जिथेतिथे चिकटवण्याशिवाय काही केल्याचे आठवत नाही. याआधी त्यांना रीतसर सूचना दिली गेल्याचे वाचले होते. त्यामुळे झाले ते योग्यच असे वाटते.

वि म दांडेकर

वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. माझ्याकडे पाहुन त्यांनी प्रथम तुच्छ्तेचा कटाक्ष टाकला. नंतर नाईलाजे आत बोलावले. त्यांची 'महाराष्ट्राचा कुंडली संग्रह' या म.दा. भटांच्या पुस्तकाला प्रस्तावना दिली होती. मी ती वाचली आहे आणि त्यावर माझ्या काही शंका आहेत असे म्हणुन मी त्यांना पंचमातील गुरु या त्यांच्या प्रस्तावनेतील उदाहरणा बाबत खालील प्रश्न विचारले.
१) आपल्याला सायन पत्रिका अभिप्रेत आहे कि निरयन्? निरयन असल्यास कुठले अयनांश?
२) आपण भावचलित पहाणार का? असल्यास भाव मध्य कि भावारंभ?
३) भावेश महत्वाचा कि पंचमातील गुरु?
४) गुरु स्वतःच्या स्थानाची हानी आणि समोरच्या स्थानाची वृद्धी करतो यावर आपले मत काय?
५) पंचमातील गुरु हा काही शिक्षणक्षेत्राशी संबंधीत असल्याचा एकमेव निकष नव्हे. अन्य योग आपण तपासायला तयार नाही मग ज्योतिषातला "साकल्याने" विचार हा कसा होणार?
परिणाम असा झाला कि मला बसायला खुर्ची मिळाली आणि त्यांनी सांगितले कि मी ज्योतिष अभ्यासक नाहि मि ज्योतिषांच्या मदतीने हा प्रकल्प करतो आहे. मग पुढचा विषय चाचणीचा होता. त्यावेळी संगणकाच्या व संख्याशास्त्राच्या मदतीने आता या विषयाचा एकदा काय तो निकाल लागला जाईल असे त्यांचे मत होते. म.दा भट व व.दा भट या दिग्गज ज्योतिषांच्या मदतीने त्यांचा प्रयत्न चालू होता. त्यांच्या मताशी अर्थातच मी असहमत होतो. कारण इथे प्रश्न क्रमांक ४७ मध्ये वाचा. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा त्यांचा संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते. तेव्हाही मी कार्यक्रमाला हजर होतो.
प्रकाश घाटपांडे

सिनास्ट्री

"मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय?"

आधुनिक ज्योतिषात अशा जोड्प्यांचा विचार करता येतो. तसेच नव्हे तर अनेक नातेसंबंधांचा विचार करता येतो. उदा. मित्र-मित्र, मालक-नोकर, दोन सहकारी किंवा भागीदार. त्याला 'सिनास्ट्री' असे इंग्लिश मध्ये म्हणतात. घाटपांड्याना समग्र ग्रंथ वाचायची सवय नसलेल्यामुळे एखाद्या विषयाचा सर्वसमावेशक आढावा घेऊन मग भाष्य करायचे ही वैज्ञानिक शिस्त त्यांना परिचयाची नसावी.

साहेब!

घाटपांड्याना समग्र ग्रंथ वाचायची सवय नसलेल्यामुळे
साहेब,
आपण इतरांच्या सवयी काढू नयेत.
त्यांचे आणि माझे कितीही मतभेद असले तरी त्यांच्या बद्दल मला अतिशय आदर आहे. त्यानी कधीही उथळपणे माहिती दिलेली नाही.
आधी त्यांचे लेखन वाचा आणि मगच बोला!

आणि म्हणूनच मी आपल्या या लेखनाचा निषेध करतो. तुम्ही असे बेजबाबदारपणे वैयक्तिक विधान केल्या बद्दल त्यांची माफीच मागितली पहिजे.

आपला
गुंडोपंत

वैयक्तिक् विधाने?

मी केलेल्या विधानाला घाटपांड्यानी दुस-या एका च‌र्चासूत्रात केलेल्या प्रतिवादाचा संदर्भ आहे. मुद्दा वैज्ञानिक शिस्त पाळण्याचा आहे. त्यांनी आधुनिक ज्योतिषाचा सखोल (समग्र) आढावा घेताला तर 'सिनास्ट्री' सारखा ठळक विषय त्यांच्या नजरेतून सुटला नसता.

तो संदर्भ कुठे दिला आहे या लेखनात???

आणि जरी तो संदर्भ आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी कुणी कसे संशोधन करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपली त्यांच्यावरीला वयक्तिक टीका मला पटली नाहीये. त्यांचा या विशयातला व्यासंग मोठा आहे. शिवाय त्यांची भुमिका ताठर नाही. वैचारिक मतभेद हे वैचारीकतेने सोडवले तरच योग्य! वैयक्तिक कशाला होता?

आणि आपण म्हणता त्याच न्यायाने
आपण येथे काय काय लेखन केले आहे ते सांगा.
आपले वैज्ञानीक शिस्तीने झालेले संशोधन सांगा.
प्रकाशित झालेले पेपर्स/पुस्तके सांगा.

आपला
गुंडोपंत

सहमत

आपली त्यांच्यावरीला वयक्तिक टीका मला पटली नाहीये. त्यांचा या विशयातला व्यासंग मोठा आहे. शिवाय त्यांची भुमिका ताठर नाही. वैचारिक मतभेद हे वैचारीकतेने सोडवले तरच योग्य! वैयक्तिक कशाला होता?

सहमत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुणी कसे संशोधन करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आह

म्हणजे, अटी नियम, कायदे-कानू, नीतिमत्ता फक्त ज्योतिषांनी पाळायची, अनिसने नाही. आणि बाकीच्यांनी त्यावर हूं की चूं पण करायचे नाही. हेच खरे ना?

युयुत्सू यांच्या टिप्पणीचा निषेध

घाटपांड्याना समग्र ग्रंथ वाचायची सवय नसलेल्यामुळे

सदर प्रतिसादकर्त्याचे उपक्रमावरील लिखाण हे प्रक्षोभक व वैयक्तीक रोखाचे आहे. मी याचा तीव्र निषेध करतो.
युयुत्सु यांनी त्वरीत श्री घाटपांडे यांची वैयक्तीक टिप्पणीबद्दल माफि मागावी अशी मागणी करतो.

युयुत्सू,
आपले कोणतेही "तर्कशुद्ध" लिखाण मी उपक्रमावर वाचलेले नाही. केवळ "गोंधळ" (केऑस) माजवण्याच्या प्रयत्नापेक्षा तसेच घाटपांड्यांसारख्या अभ्यासु सभासदावर वैयक्तीक टिप्पणीसारख्या हास्यास्पद प्रयत्नापेक्षा तुमचे स्वतःचे लिखाण उपक्रमावर आले तर वाचायला आवडेल. श्री घाटपांडे हे सिद्धहस्त लेखक असुन त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन आम्ही वेळोवेळी वाचले आहे. आपल्यालाही जर एखाद्या विषयात उत्तम गती असेल तर लिखाण करून ते सिद्ध करा व मग वाद घाला.

उपक्रमराव,
आपले चाललेल्या प्रकाराकडे लक्ष असेल अशी आशा आहे.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

वा!

वा छानच सांगितलेत आपण.
प्रतिसाद आवडला.

त्यावेळी संगणकाच्या व संख्याशास्त्राच्या मदतीने आता या विषयाचा एकदा काय तो निकाल लागला जाईल असे त्यांचे मत होते.

असं कधीच होणार नाही. हा प्रश्न कधीही न संपणार्‍यातला आहे.

मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार?

वा! अतिशय योग्य प्रश्न आहे हा.
पण काही वेळा मात्र हे सहजतेने उघड होते. एकदा मी (सप्तमात/शी शनी, राहु व मंगळाचे प्रताप पाहून) एका बाईंना त्यांच्या विवाह संबंध फारसे आनंदी नसल्या बद्दल सुचकपणे विचारले होते. तर त्या रडायलाच लागल्या हो एकदम! माझीच मोठी पंचाईत झाली. राहुने प्रतापी पणे भरपुर फसवाफसवी केली होती त्यांच्या लग्न संबंधात. संसारिक संबंध संपल्यात जमा असले तरी पण रहात होते मात्र नवरा बायको म्हणून.

त्या नंतर पुढचे विचारतांना/सांगतांना मात्र मी अगदी जपूनच... :)

आपण म्हणता तसे, खरं तर असे अनेक प्रश्न आहेत.

एकुणच कायद्याला फसवणं फार सोपं असतं, पण जर पत्रिका योग्य असेल तर ज्योतिषाला फसवणं कठीण असे माझे एक मित्र म्हणत, ते मला पटते!

(ते पुढे खरेच झाले)

आपण ज्योतिषी आहात या विषयी गुंडोपंतांना तीळमात्रही शंका नाही! ;))

आपला
गुंडोपंत

दांडेकरांचे संशोधन

*त्याकरिता त्यांनी शंभर मतिमंद मुलांच्या आणि शंभर सर्वसाधारण मुलांच्या पत्रिका गोळा केल्या.
* मतिमंद मुलांच्या शंभर पत्रिकांत कोणताही सामाईक घटक दिसून आला नाही.
*शंभर सर्वसामान्य मुलांच्या पत्रिकाही अभ्यासल्या.
* या दोन प्रकारच्या पत्रिकांत उठून दिसेल असा कोणताही भेद आढळला नाही.
* वि.म.दांडेकर यांनी शंभर घटस्फ़ोटितांच्या पत्रिकाही प्रयत्न पूर्वक गोळा केल्या.
* या पत्रिकांतही त्यांना कोणताही सामाईक घटक(commona factor) आढळला नाही.
----------------------
हे दांडेकरांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे का? आणि गोळा केलेली माहिती पुनर्तपासणीसाठी उपलब्ध आहे का?
वास्तविक दांडेकरांच्या संशोधनाचा दाखला दिल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. प्रचलित ज्योतिषातील कॊणती टेक्निक्स त्यांनी वापरली. बहूतेक सर्व टेक्निक्स वापरुन त्यांनी हा निष्कर्ष काढला असेल तर त्यात थोडेफार तथ्य आहे असे मानावे लागले. तरी पण "शंभर" ही संख्या मोठ्ठे प्रश्न चिन्ह निर्माण करते.

शिस्त


घाटपांड्याना समग्र ग्रंथ वाचायची सवय नसलेल्यामुळे एखाद्या विषयाचा सर्वसमावेशक आढावा घेऊन मग भाष्य करायचे ही वैज्ञानिक शिस्त त्यांना परिचयाची नसावी


हे मी वाचकांवर सोपवतो. पण युयुत्सू म्हणजे पुर्वाश्रमी चे युयुत्सु वा सर्किट नव्हेत.
प्रकाश घाटपांडे

<<मतिमंदाच्या कुंडल्या आणि अनिसची चलाखी>>

गेल्या रविवारी भरत इतिहास संशोधक मंड्ळातील अहि-नकुलांच्या सभेस मी उपस्थित होतो. त्यात नरेंद्र दाभोलकरानी मनुष्य जन्माच्या सात वेळा सांगता येतात असे विधान केले. हे विधान माझ्यादृष्टीने ज्योतिषाच्या विकासासाठी पूरक ठरणार आहे (कसे ते आपण नंतर बघु). त्यात त्यांनी आणखी असे विधान केले की नाळ कापे प‍र्यंत गर्भ मातेच्या शरीराचाच एक भाग असतो (एकदम मान्य). आता गमतीची गोष्ट अशी की, जन्मजात मंतिमंदता ही गर्भावस्थेत निर्माण होत असेल तर जन्मानंतरची कुंडली चाचणीसाठी वापरणे हे बुद्धिभ्रंशाचे लक्षण आहे. जन्मजात मंतिमंदता, गर्भ मातेच्या शरीराचाच एक भाग असताना (नऊ महिन्यांच्या कालावधीत) निर्माण झाल्यामुळे मातेची कुंडली (आणि पित्याची पण) बघणे आवश्यक आहे.

बुद्धीभ्रंश


आता गमतीची गोष्ट अशी की, जन्मजात मंतिमंदता ही गर्भावस्थेत निर्माण होत असेल तर जन्मानंतरची कुंडली चाचणीसाठी वापरणे हे बुद्धिभ्रंशाचे लक्षण आहे.


हीच गोष्ट कोणत्याही वैशिष्ट्यपुर्ण असलेल्या गोष्टीसाठी लागु आहे. शिवाय सिझेरियन कुंडली बाबत काय? ज्योतिषांना दुसरी कुठली वेळ देता येणार आहे ? कुंडली बनवण्यासाठी. सिझेरिन ची वेळ ही काहि दिवस अलिकडे घेता येते. मग कुंडलीसाठी जन्मवेळ बदलणे डॉक्टरच्या हातात आले ना. त्याच्या आता जवळपास बालकाचा पहिला श्वास हीच जन्मवेळ मानावी असे ज्योतिषात बहुसंमत आहे. ८० ते ९० च्या दशकात हा प्रश्न् ज्योतिष वर्तुळात बहुचर्चित होता.
स्त्री पुरुष फलबीजन ही वेळ आधुनिक वैद्यकातही सांगता येत नाही. ज्योतिषात मात्र संकल्पनात्मक का होईना आधान लग्न कुंडली यावर आधारित आहे. जन्म कुंडली सरळ नउ महिने नउ दिवस मागे सरकवतात. प्रत्यक्षात ती कधी वापरत नाही.
काही ज्योतिषी पण चलाख आहेत. ते याला विद्या म्हणतात शास्त्र म्हणण्याच्या फंदात पडत नाहीत.
प्रकाश घाटपांडे

कृपया उदा. देउन स्पष्ट करा

"हीच गोष्ट कोणत्याही वैशिष्ट्यपुर्ण असलेल्या गोष्टीसाठी लागु आहे."

कृपया उदा. देउन स्पष्ट करा

असे

कृपया उदा. देउन स्पष्ट करा

या चर्चेत ज्योतिषी पारदर्शकता दाखवू शकतात का? असे विचारल्यावर अवश्य म्हणून तुम्ही दडी मारलीत, कशी दाखवणार पारदर्शकता हे विचारले तर उत्तर दिले नाही. या चर्चेतही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना शिताफीने टाळले आहे. तुम्ही नुसते प्रश्न विचारायचे (प्रकाशरावांनी दिलेल्या युक्तिवादाला सोडून तुम्ही विचारलेला प्रश्न असंबद्ध आणि बालिश/शाळकरी वाटतो आहे. पण असो.) आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत असे चालणार नाही.

प्रश्न असंबद्ध आणि बालिश/शाळकरी??

एक इंग्लिश म्हण आठवली - कॊणताही प्रश्न चूकीचा नसतॊ, फक्त उत्तरे चूकीची असतात.

जबरदस्त!

आता गमतीची गोष्ट अशी की, जन्मजात मंतिमंदता ही गर्भावस्थेत निर्माण होत असेल तर जन्मानंतरची कुंडली चाचणीसाठी वापरणे हे बुद्धिभ्रंशाचे लक्षण आहे. जन्मजात मंतिमंदता, गर्भ मातेच्या शरीराचाच एक भाग असताना (नऊ महिन्यांच्या कालावधीत) निर्माण झाल्यामुळे मातेची कुंडली (आणि पित्याची पण) बघणे आवश्यक आहे.

हाहाहा! जबरदस्त! मग माता-पित्यांची कुंडली बघताना ते गर्भात असताना झालेल्या परिणामांबद्दल त्यांच्या आई-वडीलांची आणि त्यांच्या आई-वडिलांच्या आई-वडिलांची, त्यांच्या आई-वडिलांच्या आई-वडिलांच्या आई-वडिलांची .... अश्या सगळ्याच कुंडल्या पाहिल्या पाहिजेत.

पुन्हा मूल गर्भात असताना त्यांच्यावर ग्रहांचा बरावाइट परिणाम होत असलाच पाहिजे. मग गर्भधारणा झालेली वेळ ही खरी जन्मवेळ मानली पाहिजे. ही वेळ कशी सांगता येईल?

मतिमंदत्व हे पूर्वजन्मातील दुष्कर्मामुळे असेल तर? पूर्वजन्मात सदर व्यक्ती कोण होती हे ओळखून तिचीही कुंडली पाहायला हवी. पूर्वजन्म मनुष्येतर प्राण्याचा असेल तर जन्मवेळ कोणाला विचारणार?

थोडक्यात काय असंख्य पळवाटा. ज्योतिष्यांच्या भविष्याबद्दल सांगता येणार नाही पण कल्पनाशक्ती मात्र अचाट आहे. देशी हॅरी पॉटरच जणू ;)

शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम

शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?

निरुत्तर करणारा प्रश्न. शंभर कुंडल्यांना शंभर नियम, जन्मवेळ ठरवण्यात संदिग्धता, त्यामुळे एकाच व्यक्तीच्या अनेक कुंडल्या, शिवाय पूर्वकर्माचे गाठोडे, आणि सर्वात शेवटी परमेश्वराला शरण गेले की सर्व प्रश्न सुटतात, त्या सर्वशक्तिमान पित्यापुढे कसला शनि आणि कसला मंगळ? एकूण काय तर इतके असंख्य पॅरॅमिटर्स सांगून कोणालाही गुंडाळता येईल. अशी चतुराई किती दिवस चालते हे पाहणे मनोरंजक ठरावे. नव्या पिढीतल्या लोकांना या गोष्टी पचणे अवघडच आहे.

नशीब

"नव्या पिढीतल्या लोकांना या गोष्टी पचणे अवघडच आहे."

नशीब जेव्हा आयुष्यात दगा देते तेव्हा पिढी नवी असो वा जुनी सगळे पचवायला लागते

हा हा हा हा

>>नशीब जेव्हा आयुष्यात दगा देते तेव्हा पिढी नवी असो वा जुनी सगळे पचवायला लागते.

म्हणजेच रंजल्यागांजल्यांच्या जिवावर ज्योतिष्यांची थोतांडे खपतात, असेच ना?

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

कृपया वैयक्तिक टीका टाळावी

कृपया कोणत्याही चर्चेत वैयक्तिक टीका टाळावी.
ही चर्चा आहे. भांडण नव्हे.

मूळ मुद्द्याला बगल

आपण माझ्या मूळ मुद्द्याला बगल द्यायचा प्रयत्न करत आहात. (भारत इतिहास संशोधक मंड्ळातील सभेत दाभोळरांनी पण हेच केले). माता-पित्यांच्या कुंड्ल्या या अभ्यासासाठी आपण उपलब्ध का केल्या नाही?

कदाचित मूळ मुद्द्याला बगल देणे ही सर्वश्रेष्ठ विज्ञाननिष्टा असेल...

उरलीसुरली विश्वासार्हता

आपण माझ्या मूळ मुद्द्याला बगल द्यायचा प्रयत्न करत आहात. (भारत इतिहास संशोधक मंड्ळातील सभेत दाभोळरांनी पण हेच केले). माता-पित्यांच्या कुंड्ल्या या अभ्यासासाठी आपण उपलब्ध का केल्या नाही?

कदाचित मूळ मुद्द्याला बगल देणे ही सर्वश्रेष्ठ विज्ञाननिष्टा असेल...

आता काय आहे तुमचा मूळ मुद्दा? अशी असंबद्ध आणि निराधार विधाने करून तुम्ही आपली उरलीसुरली विश्वासार्हता गमवून बसाल बाकी काही नाही. यू आर ट्राइंग टू बी स्मार्ट बट द इफेक्ट इज क्वाइट् द काँट्ररी! असो.

मूळ मुद्दा

माता-पित्यांच्या कुंड्ल्या या अभ्यासासाठी आपण उपलब्ध का केल्या नाही?

उत्तर

ज्योतिषांनी या कुंडल्या आपणहून का मागितल्या नाहित? ह्या कुंडल्यांचा अभ्यास माता पित्याच्या कुंडल्यांशिवाय करता येणार नाहि असे एका तरी ज्योतिषने का ठणकावले नाही???

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

ज्योतिषांनी या कुंडल्या आपणहून का मागितल्या नाहित?

माझ्या एका मित्रांनी अशी मागणी १३ मेला नारळीकरांना तसेच संख्याशास्त्र विभाग व सकाळ यांना लेखी पत्र पाठ्वून केली होती. नारळीकर व त्यांच्या चमूपैकी कॊणीही या पत्राला उत्तर लिहीण्याचे सौजन्य दाखवले नाही. ही वैज्ञानिकांची पारदर्शकता...

अनवस्था की झाकली मूठ?

जन्मजात मंतिमंदता, गर्भ मातेच्या शरीराचाच एक भाग असताना (नऊ महिन्यांच्या कालावधीत) निर्माण झाल्यामुळे मातेची कुंडली (आणि पित्याची पण) बघणे आवश्यक आहे.

-युयुत्सू

मग माता-पित्यांची कुंडली बघताना ते गर्भात असताना झालेल्या परिणामांबद्दल त्यांच्या आई-वडीलांची आणि त्यांच्या आई-वडिलांच्या आई-वडिलांची, त्यांच्या आई-वडिलांच्या आई-वडिलांच्या आई-वडिलांची .... अश्या सगळ्याच कुंडल्या पाहिल्या पाहिजेत.

-नवीन

नवीन यांना माझा दुजोरा.

एखाद्या बालकाच्या भविष्यावर त्याच्या समस्त पितरांचा परिणाम होणार असेल तर पत्रिका शोधत आफ्रिकेत जावे लागेल. किंवा बिग बँगपर्यंत? की त्यामागे होऊन गेलेल्या (!!!!??) विश्वांमध्ये? की त्याच्या मागील चौर्‍यांशी लक्ष जन्ममरणाच्या फेर्‍यां‍मध्ये?

ही अनवस्था की झाकली मूठ? छे! छे! हे तर चाचणी होण्याआधीच 'ज्योतिष हे थोतांड आहे' हे मान्य करण्यासारखे झाले.
कृपया ज्यांना पूर्ण होराशास्त्र / कुंडलीशास्त्र / विद्या इ. माहित आहे अशा लोकांनी याबद्दल स्पष्टीकरण करावे.

{एक शंका - कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही. क्षमस्व! (हिरोशिमा आणि नागासाकी या दोन ठिकाणी झालेल्या अणूहल्ल्यात किंवा परवाच चीनमध्ये झालेल्या भूकंपामुळे) ठार झालेल्या अनेक निष्पाप माणसांच्या कुंडलीत अकाली मृत्यूयोग होता काय? असल्यास का?}

विसुनानांशी सहमत | स्पष्टीकरण मिळावे

एखाद्या बालकाच्या भविष्यावर त्याच्या समस्त पितरांचा परिणाम होणार असेल तर पत्रिका शोधत आफ्रिकेत जावे लागेल. किंवा बिग बँगपर्यंत? की त्यामागे होऊन गेलेल्या (!!!!??) विश्वांमध्ये? की त्याच्या मागील चौर्‍यांशी लक्ष जन्ममरणाच्या फेर्‍यां‍मध्ये?

सहमत आहे. "एक पायरी मागे जाणे" हे इन्फायनाइट लूप सारखे आहे.

ही अनवस्था की झाकली मूठ? छे! छे! हे तर चाचणी होण्याआधीच 'ज्योतिष हे थोतांड आहे' हे मान्य करण्यासारखे झाले.
कृपया ज्यांना पूर्ण होराशास्त्र / कुंडलीशास्त्र / विद्या इ. माहित आहे अशा लोकांनी याबद्दल स्पष्टीकरण करावे.

याचे तर्कसंगत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे.

{एक शंका - कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही. क्षमस्व! (हिरोशिमा आणि नागासाकी या दोन ठिकाणी झालेल्या अणूहल्ल्यात किंवा परवाच चीनमध्ये झालेल्या भूकंपामुळे) ठार झालेल्या अनेक निष्पाप माणसांच्या कुंडलीत अकाली मृत्यूयोग होता काय? असल्यास का?}

याचेही तर्कसंगत स्पष्टीकरण मिळायला हवे.

अकाली मृत्यु

{

एक शंका - कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही. क्षमस्व! (हिरोशिमा आणि नागासाकी या दोन ठिकाणी झालेल्या अणूहल्ल्यात किंवा परवाच चीनमध्ये झालेल्या भूकंपामुळे) ठार झालेल्या अनेक निष्पाप माणसांच्या कुंडलीत अकाली मृत्यूयोग होता काय? असल्यास का?}

याचेही तर्कसंगत स्पष्टीकरण मिळायला हवे.

स्पष्टीकरण

२१) हिरोशिमा वा नागासाकी शहरात अणुबॉम्ब पडला त्या वेळी लाखो लोक मेले, विमान अपघात, रेल्वे दुर्घटना वा भूकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्यूयोग होता असे म्हणायचे का?

प्रकाश घाटपांडे

निष्पाप माणसांच्या कुंडलीत अकाली मृत्यूयोग होता काय

या प्रश्नाचे उत्तर देण्यास आवश्यक माहिती उपलब्ध नाही.

पुन्हा गल्लत्

एखाद्या बालकाच्या भविष्यावर त्याच्या समस्त पितरांचा परिणाम होणार असेल तर पत्रिका शोधत आफ्रिकेत जावे लागेल.

१. असे विधान मी केव्हा आणी कुठे केले?
२. अनिस ने आक्षेप घेतला किंवा प्रश्न विचारला की ती विज्ञाननिष्ठा आणी ज्योतिषानी आवश्यक माहितीची न्याय्य मागणी केली "ती झाकली मूठ", "पळवाट" इ.इ. याला वैज्ञानिक पारदर्शकता म्हणायची का?

विधान आणि अर्थ

यापूर्वीच्या प्रतिसादात टंकलेले एक वाक्य मी विचाराअंती गाळले होते. ते आपोआप समजावे ही अपेक्षा होती.
ठीक!
ते वाक्य असे-
जर मातापित्याच्या कुंडल्या हव्याच असे विधान असेल तर मग फक्त त्यांच्याच का? त्यांचाही जन्म काही 'अयोनी' नाही. (जसे जैवविज्ञानात गुणसुत्रे- पुढचे समजेल अशी आशा आहे.)
स्वगत-आता यावरून गुणसुत्रे आणि कुंडली यांच्यातील साम्यावर चर्चा घसरू नये. साम्य असलेच तर ते येथेच संपते याची जाणीव मला तरी आहे बुवा!.

 
^ वर