सकाळ(पुणे) वाचक व्यासपीठ

"फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"
या विषयावर "वाचकांचे व्यासपीठ" या सदरात अठरा पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.(दै.सकाळ शनिवार३१ मे २००८).त्यांत श्री. प्रकाश घाटपांडे यांचे पत्र केंद्रस्थानी ठळक टंकात छापले आहे ते येणे प्रमाणे:

....
वैज्ञानिक चिकित्सेकडे ज्योतिषांची नेहमीच पाठ
प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे आवाहन समस्त ज्योतिर्विदांना केले आहे.या निमित्ताने या विषयावरील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.समस्त ज्योतिर्विदांनी यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध अर्थतञ्ज्ञ (कै) वि.म.दांडेकरांनी यापूर्वी फलज्योतिषाच्या चाचणीचे प्रयत्‍न केले होते.’सप्ताहिक सकाळ दि. ८ जुलै१९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात: "शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या, तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फ़रक दिसावयास हवा.तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमधे काही योग प्रामुख्याने दिसावयास हवेत. पण माझ्या जवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या आहेत त्यांवरून तरी हा फ़रक दिसून येत नाही."
भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यानी म्हटले होते की जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?" आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ मध्ये रा.ज. गोखले या पुण्यातील भूगोल शिक्षकाने "फलज्योतिष चिकित्सा" नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सर्व चिकित्सा केली होती.फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी एका निर्णायक समितीची स्थापना केली.ज्योतिर्विदांना एक विनंती केली की आपले वर्तविलेली भविष्यें त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी.त्यासाठी यथोचित पारितोषिकही देण्याची तयारी ठेवली होती.पण त्यासाठी त्यांनी फलांसंदर्भात अटी घातल्या.याचा फ़ारसा परिणाम ज्योतिषांवर झाला नाही व त्यांनी प्रतिसादही दिला नाही.
..........................................................प्रकाश घाटपांडे, पुणे
******************************************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांच्या वरील लेखनावरून दिसते की:
*वि. म.दांडेकर यांना फलज्योतिष विषयाचे ज्ञान होते. त्यांचा अभ्यास होता.
* मात्र ते अंधविश्वासू नव्हते. चिकित्सक अभ्यासक होते.
*म्हणून त्यांनी फलज्योतिषाच्या सत्यासत्यतेची पडताळणी करायचे योजले.
*त्याकरिता त्यांनी शंभर मतिमंद मुलांच्या आणि शंभर सर्वसाधारण मुलांच्या पत्रिका गोळा केल्या.
* मतिमंद मुलांच्या शंभर पत्रिकांत कोणताही सामाईक घटक दिसून आला नाही.
*शंभर सर्वसामान्य मुलांच्या पत्रिकाही अभ्यासल्या.
* या दोन प्रकारच्या पत्रिकांत उठून दिसेल असा कोणताही भेद आढळला नाही.
* वि.म.दांडेकर यांनी शंभर घटस्फ़ोटितांच्या पत्रिकाही प्रयत्न पूर्वक गोळा केल्या.
* या पत्रिकांतही त्यांना कोणताही सामाईक घटक(commona factor) आढळला नाही.
यावरून तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो की फलज्योतिष ही एक निरर्थक गोष्ट आहे. निरर्थक या शब्दासाठी थोतांड असा पर्यायी शब्द आहे.

Comments

मातापित्याच्या कुंडल्या का?

जर मातापित्याच्या कुंडल्या हव्याच असे विधान असेल तर मग फक्त त्यांच्याच का?

वर "<<मतिमंदाच्या कुंडल्या आणि अनिसची चलाखी>>"खालील मजकूर पहा
जन्मजात मंतिमंदता, गर्भ मातेच्या शरीराचाच एक भाग असताना (नऊ महिन्यांच्या कालावधीत) निर्माण झाल्यामुळे मातेची कुंडली (आणि पित्याची पण) बघणे आवश्यक आहे. याला एक पायरी मागे जाऊन शोध घेणे म्हणतात.

माझ्या परीने

माझ्या परीने ही भरकटलेली निराधार आरोपांची चर्चा संपली आहे
असे मी गृहीत धरतो!

आपला
गुंडोपंत

निराधार आरोप?

निराधार आरोप? कोणते आणी कसे? जरा साधार आढावा घेउन् सिद्ध करा.

वाद-संवाद

मतभिन्नता कायम ठेउन देखील संवाद होउ शकतो. त्यासाठी सभेचे व सभ्यतेचे संकेत पाळावे लागतात. परस्परांविषयी आदर भाव असावा लागतो. उपक्रमाचे सभासद हे मानवी स्वभावाच्या सर्व भावनांचे पैलू व्यक्त करतात पण भान ठेउन. मित्रत्वाच्या हक्काने चेष्टा देखील केली जाते पण प्रथम तो हक्क निर्माण केला पाहिजे. चेष्टा देखील इतकी दिलखुलास असते कि त्यात सर्वांनी समरसून जावे. आक्रमकते ने प्रसिद्धी मिळवुन अकांडतांडव केले तर पुर्वदुषित ग्रह तयार होतात. एकदा का पुर्वदुषित ग्रह तयार झाले कि ते जाता जात नाहीत. मग एक दरी तयार होते. वैयक्तिक स्वरुपाची टिका करण्यापासून विचारवंतही सुटु शकले नाही. पण विवेकाचे भान आल्यावर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. शब्द हे शस्र आहे.
या चर्चेत ते भान सुटत चालले आहे असे वाटते तरी देखील गाडी लवकरच रुळावर येईल असेही वाटते.
अवांतर- राजा भिकारी माझी टोपी चोरली; राजा भ्याला माझी टोपी दिली या गोष्टीची आठवण येते.
प्रकाश घाटपांडे

आपण् वेगळे काय् केलेत्?

आक्रमकते ने प्रसिद्धी मिळवुन अकांडतांडव केले तर पुर्वदुषित ग्रह तयार होतात. एकदा का पुर्वदुषित ग्रह तयार झाले कि ते जाता जात नाहीत.

ज्योतिषांना विश्वासात न घेता चाचणी जाहिर केलीत. आणीवर ज्योतिषांनी अपेक्षा केलेल्या फेअर गेमचे कोणतेही संकेत न पाळता वर ज्योतिषी पळ काढतात या सारखी बेछूट विधाने करून संवंग प्रसिद्धी मिळवता.

यदि त्वं नाचरो धर्मं किमर्थं तालुशोषणं|
एवं विधस्य हिंसा ते धर्मोस्माकं न संशय:||


आपण् वेगळे काय् केलेत्?

परस्परांविषयी आदर भाव

भारत इतिहास संशोधक संशोधन मंडळात दाभोळरांनी ज्या पद्धतीचे भाषण केले व विचारलेल्या प्रश्नांवर मूग गिळले त्यानंतर मला त्यांच्याबद्दल कॊणताही आदर राहिलेला नाही.

संदर्भाचा महापुर

असे अनेक संदर्भाचे महापुर् ओतता येतात. ते संशोधनाला उपयुक्त देखील असतात. २००३ पर्यंत जे शक्य होत ते दिल. आपण आपले संदर्भ वापरुन साहित्य तयार करा. एकमेकांचे संशोधन खोडणे हे संशोधकांचे चालतच राहणार आहे. समर्थक आपल्याला अनुकुल संदर्भ शोधणार तर विरोधक त्यांना अनुकूल संदर्भ शोधत राहणार.
जोपर्यंत अनिश्चितता आहे तो पर्यंत ज्योतिष या ना त्या स्वरुपात टिकून राहणार आहे. मग त्याला वैज्ञानिक आधार मिळो वा न मिळो.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर