उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
प्रकाशित् झालेले बरेचसे संशोधन् टाकाउ असते
युयुत्सू
June 1, 2008 - 3:38 am
खाली संदर्भ दिलेला एक पेपर बराच चर्चेत् आहे. बहूतेक् सर्व चर्चेचा सूर लेखक महाशयांच्या बाजूने आहे ज्योतिषाच्या निंदकानी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यानी हि सर्व चर्चा मूळा पासून आणि पुनः पुनः वाचावी.
समग्र ग्रंथ वाचल्यावाचून उगाच देई दूषण तो एक मूर्ख हे समर्थवचन आठवून मग टीका करावी.
http://medicine.plosjournals.org/perlserv/?request=get-document&doi=10.1...
दुवे:
Comments
आमचा प्रयत्न
म्हणजे अप्रकाशित असलेले बरेचसे साहित्य टिकाउ असते असा होत नाही .आमचा प्रयत्न हा टाकाऊ तुन टिकाउ काही बनतय का हे शोधण्याचा आहे. मूळ दुव्यातील मुद्दे मान्यच आहेत.
ही गोष्ट व्यावहारिकदृष्ट्या शक्य वाटत नाही.
माणुस कायमच वाचक / श्रोता / चिंतक राहील एवढा साहित्याचा पसारा आहे. अभ्यासक हा जन्मभर विद्यार्थीच असतो. [ असे वाक्य फेकले कि लोक आपल्याला शिक्षक / मार्गदर्शक या भुमिकेतुन पहायला लागतात शिवाय नम्रतेचे ही भांडवल करता येते]
तटस्थतेचा मुद्दा असा आहे कि त्रयस्थच तटस्थ असु शकतो. मग तो इतका त्रयस्थ असावा कि त्या विषयाशी संबंधितच नाही वा त्याला काही घेणेदेणेच नाही.
प्रकाश घाटपांडे
तो एक् मूर्ख्...
"ही गोष्ट व्यावहारिकदृष्ट्या शक्य वाटत नाही." असे घाटपांडे म्हणतात.
चला आता एक बरे झाले, घाटपांड्यांच्या पुस्तकावर टीका करयाला ते वाचयायची आवश्यकता नाही. आणि हो, तुमच्या नारळीकरांच्या थिअरीला कोणते प्रायोगिक आधार आहेत ते सांगाल का जरा?
ग्रंथ
"समग्र ग्रंथ वाचल्यावाचून उगाच देई दूषण तो एक मूर्ख हे समर्थवचन आठवून मग टीका करावी." यातील ग्रंथ हे अनेक वचन आहे असे मी गृहीत धरले आहे.
डबल ब्लाईंड टेस्ट ऒफ अस्ट्रॊलॊजी या वर तसेच पाश्चात्य जगात चालले्ल्या संख्याशास्त्रीय चाचण्या या आधारावर ही चाचणीची संकल्पना आहे. १९३५ सालची चाचणी येथे पहा
प्रकाश घाटपांडे
दूसरा मुद्दा
"अप्रकाशित असलेले बरेचसे साहित्य टिकाउ असते असा होत नाही", असे घाटपांडे म्हणतात.
पण जे टिकते ते नक्कीच टिकाउ असते... हा हा हा हा !
विरोधाभास
प्रकाशित् झालेले बरेचसे संशोधन् टाकाउ असते
हे सांगायला आपण प्रकाशीत संदर्भ देता... त्याचा अर्थ ते पण परत एक "कोणी तरी संशोधन करून, ते प्रकाशीत केले" - पण मग ते का टि़काऊ धरायचे? (ह.घ्या.)
संशोधन चुकीचे असण्यामागील मूळ कारण हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पैसा आणि दुसरे कारण म्हणजे हेतू असतात - अर्थात कधी कधी नवीन संशोधनामुळे आधीचे निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात, कालबाह्य अथवा मर्यादीत ठरू शकतात. यातून न्यूटन आणि आईनस्टाईन पण सुटलेले नाहीत. पण म्हणून जर कोणी म्हणायला लागले की संशोधन प्रकाशीत करायची गरज नाही ते ही संशोधन प्रकाशीत करून तर त्याला काही विशेष अर्थ नाही. जगात अनेक रोजच्या रोज प्रकाशने होत असतात ती काही थांबत नाहीत तर ज्यांना कुणाला काही संशोधन करून प्रकाशीत करायचे असेल त्यांना करूद्यात, जर लोकांना आवडले, तर टिकेल नाहीतर कालबाह्य होईल. पण त्यातून संशोधन करायची सवय लागणे, विचार नीट मांडणे वगैरे होत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे मला वाटते.
दुव्यातील निबंध वाचलेला आहे
आणि त्या निबंधातली गणिते बरोबर आहेत.
हे वाक्य दुव्यातील शोधनिबंधाच्या संदर्भात कळले नाही.
दुव्यावरील शोधनिबंधाचा रोख असा काही आहे : "सत्य-असत्याच्या अभ्यासप्रकल्प-पूर्व शक्यतेची सम्यक् कल्पना असावी, आणि तिची चर्चा व्हावी. त्यावर अभ्यासप्रकल्पाच्या निष्कर्षाचा अर्थ ठरतो." अशाच प्रकारचा विचार मी येथे दिलेल्या अभ्यासप्रकल्पाच्या बाबतीत (भाग २ मध्ये) केलेला आहे.
त्यामुळे दुव्यावरील शोधनिबंधाचा चर्चाप्रस्तावातील उद्धृत वाक्याशी फारसा संबंध कळत नाही.
अनिसचा प्रकल्प्
तुमचा प्रकल्प "टाकाऊ" ठरू नये अशी माझी मनोमन इच्छा आहे. मी आपले टिपण वाचायचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण तुमच्या आणि माझ्या मराठीत जमीनअस्मानाचे अंतर असल्याने बर्याच ठेचा लागल्या. एका मराठीतून दूसर्या मराठीत रुपांतर करायची नितांत आवश्यकता आहे. कृपया त्याची इंग्लिश पीडीएफ असल्यास उपलब्ध करून द्यावी, ही विनंति.
इंग्रजी दुवा
पीडीएफ नव्हे, पण एका ब्लॉगवर इंग्रजी पाठ्य दिलेले आहे. (दुवा)
डॉ. आयोनीडस यांच्या शोधनिबंधापेक्षा/इतकेच इंग्रजी सोपे वाटावे.
घाईत लिहिल्यामुळे, ब्लॉगवर काही स्पेलिंगे चुकली असतील, क्षमस्व.
सहमत
ज्योतिषाच्या निंदकानी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यानी हि सर्व चर्चा मूळा पासून आणि पुनः पुनः वाचावी.
हे वाक्य दुव्यातील शोधनिबंधाच्या संदर्भात कळले नाही.
सहमत आहे. लेखातील निष्कर्ष थोडा जनरलाइझ केल्यासारखा वाटतो. मानसशास्त्रावरील एखादा शोधनिबंध आणि पदार्थविज्ञानातील एखादा शोधनिबंध यातील निष्कर्ष पडताळून बघता येण्याची शक्यता अर्थातच वेगवेगळी असेल. फ्रॉईडची कुठलीही थिअरी प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही तरीही ती सर्वमान्य आहे कारण याला बरेच पुरावे सापडले आहेत इथे एक वाक्य आठवते. "ऑल जनरलायझेशन्स आर डेंजरस, इन्क्लूडींग थिस वन."
विरोधाभास - युक्तीवादामध्ये एक गल्लत
या युक्तीवादामध्ये एक गल्लत आहे. मूळ निबंधामध्ये 'बरेचसे' (मूळ लेखकाने वापरलेल्या मोस्ट या शब्दाबद्दल माझा प्रतिशब्द) हा शब्दप्रयोग यथायोग्य युक्तीवाद करून वापरला आहे. त्यात प्रकाशित होणे हा टाकाऊपणाचा निकष मानलेला नाही (जो तुम्ही तुमच्यायुक्तीवादामध्ये मानला आहे). तर 'बरेचसे' संशोधन चूकीचे का ठरते याची सखोल कारणमिमांसा केलीली आहे. मूळ निबंध टाकाऊ ठरवायचा असेल तर तशी कारणमिमांसा करणे आणि मूळ निबंधातील प्रत्येक विधानाचे खंडन करणे तुम्हाला पण बंधनकारक आहे. तुम्ही सर्क्युलर लॉजिकच्या सापळ्यात अडकला आहात असे मला वाटते.
विनोदी
ते वाचतीलच हो. ज्योतिष्यांनी हे वाचण्याची जास्त आवश्यकता आहे. तुम्ही दिलेला दुवा वैज्ञानिक संशोधनाबद्दल आहे आणि तो एका वैज्ञानिकाने लिहिलेला आहे. एवढी पारदर्शकता ज्योतिषी दाखवू शकतात का? नाही, कारण धंदा बुडेल! फलज्योतिषाच्या वैज्ञानिक चिकित्सेपासून पळ काढून संशोधनच कसे चुकीचे असते असे 'गिर्या तो भी तंगडी उपर' प्रकारचे त्याचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न अधिकच हास्यास्पद आहे.
एवढी पारदर्शकता ज्योतिषी दाखवू शकतात का?
अवश्य!
कशी?
अवश्य? कशी तेही स्पष्ट करा.
अवश्य
ज्योतिषांनी अवश्य दाखवावी असा अर्थ अभिप्रेत धरतो.
प्रकाश घाटपांडे
बीटिंग अराऊंड?
पारदर्शकता अवश्य दाखवू म्हणून नंतर तोंडही न दाखवणे याला व्यवहारचातुर्य म्हणावे का? चिकित्सेला सामोरे जाण्याची तयारी नाही तेव्हा हल्ली संशोधनच कसे चुकीचे असते हे भासवण्याचा प्रयत्न सहजपणे लक्षात येणारा आहे म्हणून तर नाही?
सन्शोधन म्हणजे नुसतेच बाड नको
सन्शोधनाचा उपयोग लोकान्च्या कल्याणासाठी व्हायला हवा.
लोककल्याण
मुलभुत् संशोधना नंतर उपयोजित असलेला तो भाग आहे. आण्विक संशोधना नंतर अणुबाँब कि अणुभट्टी ? हा भाग मानवी संवेदनशीलतेवर आहे.
६०) फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे?
इथे वाचा.
प्रकाश घाटपांडे
पारदर्शकता
ज्योतिषांकडून पारदर्शकतेची अपेक्षा करणा-यांची पारदर्शकता तपासण्यात मी सध्या व्यग्र आहे. त्यांची मोळी बांधून झाली की मी इकडे आलोच.
का?
का? तुम्ही स्पष्टिकरण आधी दिले तरी चालेल. "तुम्ही दिलेला दुवा वैज्ञानिक संशोधनाबद्दल आहे आणि तो एका वैज्ञानिकाने लिहिलेला आहे. एवढी पारदर्शकता ज्योतिषी दाखवू शकतात का?" या प्रश्नाला तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने 'अवश्य' असे उत्तर दिले होते. वैज्ञानिक पारदर्शकतेचा पुरावा (अजाणतेपणी) तुम्हीच दिलेला आहे. त्यामुळे ज्योतिष्यांची पारदर्शकता सिद्ध करणे (तुम्ही 'अवश्य' असे सांगून ठेवल्याने) बंधनकारक आहे. नाहीतर आधीच अविश्वासाच्या भोवर्यात अडकलेला तुमचा आतापर्यंतचा वावर हास्यास्पद होण्याचा धोका आहे.
प्राधान्य
मी हे बंधन नाकारलेले नाही. प्राधान्य कोणत्या विषयाला द्यायचे हा सर्वस्वी मा़झा वैयक्तिक प्रश्न आहे
एक प्रश्न
अनिसच्या ध्येयधोरणांशी माझी सहमती आहे अशातला अजिबातच भाग नाही, पण ज्योतिष शास्त्र/विद्या/थोतांड (ज्याला जे म्हणायचे आहे त्यासाठी सर्व चॉइसेस!)बद्दल आपण बोलत आहात म्हणून काही प्रश्नः
बाकी सर्वांचे सोडा, पण तुम्ही कधी स्वतःचे भविष्य पाहीले आहे का? आणि ते खरे ठरलेले जाणवले आहे का?
हा प्रश्न उत्सुकतेपोटी विचारत आहे. पण उत्तर स्वानुभवावर आधारीत असू देत ऐकीव नाही.
माझ्यापुरते बोलाल तर ज्योतिष शास्त्र/विद्या म्हणून असू शकेल इतके मला वाटते पण ते कुणाला सांगता येत असेल - विशेष करून अधुनिक काळात - याबाबत मात्र मला विश्वास नाही :-)
माझे भविष्य्
हो माझ्या पत्रिकेवरून वर्तवलेले भविष्य (एका जर्मन तंत्राच्या आधारे) खरे ठरल्याचा अनुभव आहे.
जर्मन तंत्र??
मग भारतीय फलज्योतिष शास्त्र/तंत्र(नवा शब्द!) बाद काय? तसे मान्य कराल काय?