ऊर्जेच्या शोधवाटा

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे "ऊर्जेच्या शोधवाटा". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के. आर्. दात्ये यांच्या कामाची. व्यवसायाने स्थापत्य अभियंता असणार्‍या दात्ये यांनी , गेल्या ५०हून अधिक वर्षांत पाणी आणि पाणीपुरवठा, ऊर्जा, आणि मूलभूत सुविधा या विषयांवर केलेल्या अभ्यासाचा , या क्षेत्रांत केलेल्या कार्याचा आढावा या पटामधे केलेला पहावयास मिळेल. CASAD, SARMET आणि SOPPECOM (www.soppecom.org) यांसारख्या संस्थांच्या उभारणीमधे त्यांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे. या संस्थांद्वारे त्यांनी पर्यावरणाचा तोल ढळू न देता विकासाच्या वाटा चोखाळणारे प्रकल्प आणि तंत्रज्ञान राबविले.

http://video.google.com/videoplay?docid=-6618479700629446868

अतुल पेठे यांनी संकल्पिलेल्या "ऐवज" या अनुबोधपटांच्या मालिकेतील हे पहिले पुष्प. विविध क्षेत्रामधे अनेक वर्षे पायाभूत काम केलेल्या , आणि तरीही उपेक्षिल्या गेलेल्या किंवा अज्ञात राहिलेल्या व्यक्तिंचा आणि त्यांच्या अमूल्य कार्याचा "ऐवज" लोकांपुढे आणणे अशी या मालिकेची संकल्पना आहे. ("ऐवज" व पेठे यांच्याविषयी एका वेगळ्या धाग्यामधे केव्हातरी.)

Comments

माहीतीपूर्ण

या माहीतीपूर्ण दुव्याबद्दल धन्यवाद! हा अनुबोधपट मी अजून केवळ१०-१५ मिनिटेच बघू शकलो. कदाचीत आज रात्री उशीरा अथवा उद्या बघू शकेन. पण अशी कामे चाललेली पाहून आणि त्यातही ८२ वर्षाची व्यक्ती तरूणांना लाजवेल अशा पद्धतीने काम करताना पाहून आनंद होतो.

उर्जेचा प्रश्न हा मूलभूत आहेच आणि वाढत जाणार आहे. त्याची काळजी करणे / विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. सध्या माझे सर्व्हर संबंधी काही या संदर्भात अभ्यास चालू आहे. त्या वरून आपणजो काही संगणकीय वापर करतो त्याला लागणारे डेटा सर्व्हर एकीकडे स्वस्त होताहेत पण दुसरीकडे ते चालू ठेवण्यासाठी लागणारी उर्जा ही अमाप लागत आहे (केवळ अमेरिकेत २००५ साली $२.१ बिलियन्स!).थोडक्यात हा विषय सर्वच अंगानी भिडणारा ठरणार आहे यात शंका वाटत नाही...खाली थोडे या विषयावरील वक्तव्य असले तरी ते दात्यांच्या संदर्भात नाही कारण मला ते अजून संपूर्ण ऐकायचे आहे. त्यावर नंतर लिहीनच. पण कदाचीत त्यांच्या प्रयत्नांना पण लागू होऊ शकेल असे वाटते.

त्याला लागणारे अपारंपारीक उपाय हे बर्‍याचदा अजूनतरी पूर्ण पणे उपयुक्त ठरत नाहीत कारण लागणारी उर्जा आणि अपारंपारीक स्त्रोत/साधने यातील फरक आणि मर्यादा. आता राजकीय कारणांमुळे अमेरिकेत कॉर्न पासून बायोफ्युएल चालू करण्याला चालना देत आहेत त्यामुळे शेतीचे पॅटर्न, मक्याची लागणारी विविध गरज इत्यादीत फरक पडणार आहे. शिवाय अशा बायोफ्युएलने जरी कार्बन डाय ऑक्साईड हा पर्यावरण बदलास कारणीभूत होणारा वायू कमी झाला तरी प्रदूषण करणारे नायट्रोजन युक्त वायू वाढतात.

अर्थात तरी देखील उपाय हे शोधावेच लागणार आहेत. त्याला पर्याय नाही.

उर्जा

पट अजून पाहिला नाही, बघून सांगतो.
पण उर्जा हाच मोठा प्रश्न होवून बसला आहे यात शंका नाही.
किंबहुना त्याच्या अतिवापरानेच हे प्रश्न निर्माण होत आहेत. पण त्यातून मार्गही दिसत नाही हे पण तितकेच खरे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर