जगन्नियंता -२

तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो

या वाक्यावरून सदस्यांनी अनेक मते मांडली.

आवडते सुभाषित या चर्चेत होत असणारे विषयांतर या चर्चेत स्थलांतरित करण्यात आला.
त्यावर अनेक सदस्यांनी अतिशक रोचक माहिती देत वाद विवाद उपस्थित केले आहेत. यातले अनेक विचार अनादिकालापासून अनेक वाद विवादांमध्ये चालत आले आहेत. या चर्चेत अनेक प्रश्न त्याला उत्तरे व तसेच अनेक अपूर्ण प्रश्न व त्याला कुणीच न दिलेली उत्तरे असे काहीसे याचे स्वरूप राहिले. मात्र धनंजय व गुंडोपंतांमध्ये भली मोठी चर्चा होवून (आपण काय चर्चा करत आहोत ती आता एकमेकांनाच कळेनाशी झाली आहे अशा काहीशा(? )मुद्द्यावर येवून ;)) ) ती विझत आली आहे असे वाटत असतांनाच, हैयो हैयैयो! यांनी एक विचार मांडून चर्चेत परत जान आणली आहे असे दिसते. ५० प्रतिसाद पूर्ण झाल्याने चर्चा भाग २ मध्ये सुरू करत आहे कृपया पुढील प्रतिसाद येथे द्यावेत ही विनंती.

इच्छुक सदस्यांनी चर्चेचा धागा येथून पुढे चालू ठेवावा.

आपला
गुंडोपंत

Comments

गॅलीलिओ आणि सपाट पृथ्वी

कदाचीत अवांतर होईल पण "दिसतं तसं नसतं" अर्थात पृथ्वी ही गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते (उलटे नाही) हे त्याने सांगायचा प्रयत्न केला आणि पोपच्या तावडीतून तो गेल्या दशकात म्हणजे ४-५०० वर्षांनी सुटला. त्याची चूक अशी होती की जे तो पटवायचा प्रयत्न करत होता ते दृश्य स्वरूपात दिसत नव्हते. सूर्य दरोज पुर्वेकडून पश्चिमेकडे जाणार तर मग तो नाही का पृथ्वीभोवत् फिरत? उगाच भलतेसलते काय? !

असो. तरी देखील आजही अशी प्रामाणिक मते आहेत ज्यांची फ्लॅट अर्थ सोसायटी आहे. ते आजही सप्रमाण सिद्ध करत आहेत की पृथ्वी सपाट आहे. Earth is Flat NOT World is Flat!

भूस्थिरवादाचा पुरस्कार

ही चर्चा मी (आणि काही अन्य उपक्रमी)ही उपक्रमावर करत आहोत (भाग १भाग २). वाटल्यास "सपाट भूमीचा पुरस्कार" असेही त्या चर्चेचे सूतोवाच करू शकलो असतो.

पोपच्या तावडीतून सुटका म्हणूनच पृथ्वी गोल आहे असे मान्ञ् नये, तर नव्हे तर तसे विचार करून पटले म्हणून मानावे. पटले नाही तरी पोपचे म्हणणे मानायची गरज नाही, सपाट पृथ्वी कूर्माच्या पाठीवर आहे असे मानावे. जम्बूद्वीपाभोवती गोलाकार समुद्र मानवेत.

मुख्य हे की पृथ्वी गोल हे पटले पाहिजे - पटल्याशिवाय मानणे म्हणजे केवळ आळस. पटले नाही तर पोप काय आणि गॅलिलेओ काय - सगळे गप्पा सांगणारे लोक.

विश्वसनीय ज्ञानसंचय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विश्वसनीय ज्ञानसंचय
जेव्हा एखाद्या विधानाची सत्यासत्यता पडताळणे आपल्याला शक्य नसते (उदा.पुंजवाद) तेव्हा तञ्ज्ञांचे मत स्वीकारावे.ज्ञानाच्या क्षेत्रातील तञ्ज्ञ म्हणजे वैज्ञानिक.येथून कोट्यवधी कि.मि.दूर अंतरावर ताशी लक्षावधी कि.मि. वेगाने भ्रमण करणारे उपग्रह अंतरिक्षात पाठवून माणूस त्यांचे पृथ्वीवरून नियंत्रण करू शकतो.यावरून विज्ञानप्रणित ज्ञान किती विश्वसनीय आहे हे समजते.
हजारो वैज्ञानिकांनी कित्येक शतकांच्या एकत्रित परिश्रमाने हे ज्ञान मिळविले आहे.सर्व मानवजातीच्या विश्वासार्ह ज्ञानाचा हा संचय आहे.त्यावर कोणाचा एकाधिकार नाही.तसेच ते श्रद्धेवर आधारलेले नाही. त्यातील विधानांची सत्यता पडताळण्याचा अधिकार सर्वांना आहे."संशयात्मा विनश्यति" असा दंडक इथे नाही. यास्तव विज्ञानाची कास धरावी."शरीरशास्त्राच्या कोणत्याही अधिकृत पुस्तकात आत्म्याचा उल्लेख नाही. म्हणून आत्मा नाही" असे विधान केले त्याचे कारण हे.
सर्व इंद्रिये एकसमयावच्छेदे करून कार्यरत झाल्याने शरीरात जे चैतन्य निर्माण झाल्यासारखे दिसते त्याला आत्मा म्हणत असतील तर ते मान्य आहे. मात्र त्याचे अधिष्ठान शरीर आहे.अशरीरी आत्मा म्हणजे काय ते मला समजत नाही.जसे अमूर्त मनाचे अधिष्ठान मेंदूत आहे. मेंदू बंद पडला की मन संपते तद्वतच शरीर कार्य बंद पडले की आत्मा उरत नाही.

 
^ वर