साडेसाती

नमस्कार धोंडोपंत शास्त्री व ज्योतिष शास्त्राचे अधिकारी मंडळी,
(आणी अर्थात माझ्यासारखे हौशे, नवसे व गवसे)
काही शंका विचारतो आहे. आशा आहे यावर काही चांगली चर्चा घडेल अशी आशा आहे.

साडेसाती मध्ये शनी माणसाला जमिनीवर आणतो असे म्हणतात. यावर कोणी काही सांगू शकाल का?

शनी वक्री असता व मार्गी असता काय फले देतो? फलांमध्ये काय फरक असतो?

शनी राशी च्या शेवटी फले देतो असे मानले जाते. ते का?

आणि तसे असेल तर शनी सध्या कर्क राशीत आहे त्यानुसार तो साधारण पणे काय फले देईल असे वाटते?

आणी कॄपा करुन
यांनी असे सांगितले तसे झालेच नाही / हे सगळे फलतू असते हो! / वगैरे वगैरे साठी या आधीची चर्चा (प्रतिसाद) वापरावेत.

आपला
गुंडोपंत

Comments

हा कोणता ग्रह?

"सर्व प्रश्नांना उत्तरे देतील असे 'हाडांचे ज्योतिषी' आपली सेवा करण्यास उत्सूक आहेत!"

सही आहे!

हा 'पुर्व' ग्रह दिसतोय!?

हा! हा! हा!

आपला
अण्णा

होय

श्री. अण्णासाहेबांच्या शेरेबाजीला आम्ही उत्तर देत नाही. कारण ज्योतिष हा विषय टवाळकीचा नसून गांभिर्याने पहाण्याचा आहे.

श्री. गुंडोपंतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अशी --

१) होय. साडेसातीमध्ये अशा अनेक घटना घडतात की ज्यामुळे माणूस "जमिनीवर" येतो. ह्याचा प्रत्यय प्रत्येकाला आयुष्यात येतोच येतो. त्याला साडेसाती म्हणण्यापेक्षा, पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे "बॅड पॅच" असा शब्द रूढ झाला आहे.

२) पारंपारिक ज्योतिषात शनी स्वराशीत, स्वराशीच्या व्ययात आणि धनात असता साडेसाती आणतो असे मानले आहे. सध्या शनी वक्र गतीने सिंहेतून कर्केत आला आहे. त्यामुळे मिथुन, कर्क आणि सिंहेला सध्या साडेसाती सुरू आहे.

३) ग्रह वक्री असतांना त्याची फले स्वराशीत किंवा उच्चराशीत असल्याप्रमाणे तीव्र होतात. तो जर पापग्रह असेल तर फळांची तीव्रता अतिदाहक असते.

४) शनीची साडेसाती एखाद्या राशीच्या प्रत्येकाला असली तरी त्या फळामध्ये भावापरत्वे फरक पडतो. त्यामुळे ती रास वैयक्तिक कुंडलीत ज्या स्थानात असेल त्यानुसार साडेसातीचे फलादेश मिळतात.

५) साडेसातीत जन्मचंद्रावरून् शनीचे भ्रमण होत असलेने चंद्राचे कारकत्व तो विस्कटून् टाकतो. चंद्र हा मनाचा कारक असलेने साडेसातीत मानसिक क्लेष घडतात. मनाचे संतुलन माणूस हरवून बसतो.

६) शनीची दृष्टी ही घातक मानली गेली आहे. त्यामुळे तो जिथे नजर टाकतो त्या गोष्टीची तो हानी करतो असे म्हटले आहे. शनीच्या देवळातही आपण् पाहिले असेल की शनीदेवाच्या मूर्तीचे तोंड हे दर्शन घेणार्‍याच्या समोर नसून वेगळ्या दिशेला असते.

शनी जेव्हा राशीतून् पुढे जातो तेव्हा त्याची दृष्टी त्या राशीवर पडत नाही. त्यामुळे तो राशीतून निघून गेल्यावर चांगले फलादेश मिळतात असे मानले जाते.

७) वर सांगितल्याप्रमाणे कर्क रास कोणत्या स्थानात आहे त्या प्रमाणे फळे मिळतील. जर का ती त्रिकस्थानात असेल तर फळे फारच वाईट अनुभवास येतील.

आमच्या स्वतःच्या कुंडलीत आमची जन्मरास कर्क असून ती षष्ठस्थानात म्हणजे त्रिकस्थानात आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे आम्हाला फारच त्रास झाला आहे.

तेथे षष्ठात रवी-चंद्र युती म्हणजे अमावास्या योग आहे. हा योग प्रकृतीला घातक आहे. षष्ठस्थान हे रोगस्थान असलेने तेथील जन्मचंद्रावरील शनी भ्रमणामुळे आम्हाला प्रकृतीचा खूप त्रास या साडेसातीत झाला. भावपरत्वे आणि राशीपरत्वे फल मिळाले. मानसिकता ढासळली. उच्चरक्तदाबाचा विकार जडला.

हे स्थान अर्थत्रिकोणातील असल्यामुळे आर्थिक बाबतीत मोठे अपयश आले.

षष्ठावरुन मामा मावशींचा विचार केला जातो. या साडेसातीत आमच्या मामांचे निधन झाले.

आपला,
(विस्तृत) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किटराव

सर्किटराव,

शनीचा त्रास कमी करण्याचे अनेक उपाय सुचवले जातात. पण आम्ही ते सुचवत नाही कारण आम्ही स्वतः ते करीत नाही.

आमच्या मताप्रमाणे, ग्रहांचे परीणाम हे त्यांच्या भ्रमणानुसार होतात आणि जो पर्यंत ती भ्रमणे कोणी बदलू शकत नाही तो पर्यंत उपाय हे उपाय नसतातच.

हे आमचे वैयक्तिक मत आहे आणि आमचा या शास्त्राकडे पाहण्याचा वैयक्तिक दृष्टीकोण आहे. याच्याशी इतर ज्योतिषांनी सहमत असले पाहीजे याची आवश्यकता नाही.

अभ्यासक म्हणून आमची स्वतःची मते आम्ही बाळगतो.

अंगठ्या, जप, उपवास, आरत्या या गोष्टी करून शनीचे भ्रमण बदलता आले असते तर आम्ही ते केले असते. पण तसे करता येत नाही . त्यामूळे हे उपाय केवळ "मानसिकता टिकवण्यापुरतेच" असतात, परिस्थिती बदलण्यासाठी नव्हेत..... हे आमचे मत आहे.

आपला,
(स्वमतवादी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

जरूर

सर्कीटराव,

जरूर. तुम्ही त्यांना फाट्यावर टाकायचे की **ट्यावर हा तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. जिथे जागा मोकळी असेल तेथे टाका.

आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

हाऽहाऽहा

पंत,

खरे कोकणे हो तुम्ही. झकाससे उत्तर दिलेत.

बापू

मानसिकता?

अंगठ्या, जप, उपवास, आरत्या या गोष्टी करून शनीचे भ्रमण बदलता आले असते तर आम्ही ते केले असते. पण तसे करता येत नाही . त्यामूळे हे उपाय केवळ "मानसिकता टिकवण्यापुरतेच" असतात, परिस्थिती बदलण्यासाठी नव्हेत..... हे आमचे मत आहे.

जर हे उपाय करुनही त्यांचा मानसिकता टिकवण्याव्यतिरिक्त काहीही उपयोग नसेल तर यावर विश्वास ठेवण्याची मानसिकताच विकसित होऊ न देणे हितावह नाही का?

शामभट्ट् व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

शामभट्ट् व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत हे चिंतामण् मोरेष्वर् आपटे यांचे १८९३ सालातले पुस्त़क् वरदा बुक्स पुणे यांनी प्रकाशित केले आहे.धोंडोपंतांना आवडेल्
http://www.orkut.com/Profile.aspx?uid=4023171411045231898
वर् जाउन् माझ्या आल्बम् मध्ये फोटो बघा

शनीची साडेसाती?

ग्रह म्हणजे दगड,माती ,वायू यांचे निर्जीव, निर्बुद्ध गोळे आहेत.वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते आपापल्या कक्षेत भ्रमण करीत असतात. ती कक्षा बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नाही.हे निर्विवाद वैज्ञानिक सत्य आहे.
इथून(पृथ्वीवरून) नुसत्या डोळ्यांनी शनीचा ठिपका दिसू शकतो. पण शनीवरून पृथ्वी तशी दिसणारही नाही. असे असता येथील भारत देशातील मुंबई नगरीत दादर भागात रहाणार्‍या एका विशिष्ट व्यक्तीकडे वक्रदृष्टी करून शनी त्याला पीडा देतो असे मानणे हास्यास्पद आहे.
'शनी माहात्म्या'तील कथा खरी मानायची तर "चल रे भोपळ्रया टुणुक टुणुक " मधील म्हातारी भोपळ्यात बसून गेली हे सत्य मानावे लागेल.

श्री. यनावाला

श्री. यनावाला यांसी,

सस्नेह नमस्कार.

आम्ही तुमच्या मतस्वातंत्र्याचा आणि मतांचा आदर करतो. तुम्ही कशावर विश्वास ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे आम्ही कशावर ठेवायचा हा आमचा.

पण आपण आपले मत मांडतांना, जे व्यक्तिगत उल्लेख केलेत ते कृपया टाळावेत, अशी तुम्हाला विनंती आहे.

कारण आम्ही कुठे राहतो याचा या विषयाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे यापुढे ही गोष्ट आपण कटाक्षाने पाळावी अशी अपेक्षा आहे.

आपला,
(आग्रही) धोंडोपंत

तुमच्या शनिमहात्म्याच्या मुद्द्यावर आम्ही काहीही भाष्य करणार नाही कारण त्याचा संबंध धार्मिक गोष्टींशी आहे. ती कथा खरी मानायची की नाही हा निर्णय तुमचा तुम्ही घ्यावा.

आपला,
(तटस्थ) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

व्यक्तिगत उल्लेख?

श्री. धोंडोपंत यांसी ;
सप्रेम नमस्कार.

आपले पत्र (प्रतिसाद) वाचून सखेदाश्च्रर्य वाटले. 'उपक्रम' जे सदस्य आहेत त्यांतील कोणाचीही यत्किंचितही व्यक्तिगत माहिती मला नाही.कोणाचेही खरे नाव ,व्यवसाय, पत्ता यां पैकी काही म्हणजे काही सुद्धा मला ज्ञात नाही. हे त्रिवार सत्य आहे. आपण यावर विश्वास ठेवावा अशी कळकळीची विनंती आहे. मुंबई हा माणसांचा महासागर आहे, दादर हा गजबजलेला भाग आहे ,हे अनेकांच्या परिचयाचे आहे. तेथे वास्तव्यास असलेली विशिष्ट व्यक्ती शोधून काढणे हे बुद्धिमत्तेचे काम आहे.शनी ग्रहाजवळ ती बुद्धी नाही. कारण ग्रह हे निर्जीव ,निर्बुद्ध गोळे आहेत हे ठसवण्यासाठी मुंबई,दादर या नावांचा उल्लेख केला एव्हढेच.
कळावे, राग नसावा. आपला ;
यनावाला

यनावाला व अण्णा, चुकी च्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे.

यनावाला व अण्णा,

चुकी च्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे.

या साठी आधीची चर्चा पाहावी.

आपला
गुंडोपंत

साडेसात च का आठ का नाही.

महर्षी धोंडपंत.
शनी ची साडेसाती च का.
साडेसातच का आठ का नाही.किंवा सात का नाही.आणि दुसरे असे की शनी च्या मंदिरात शनी चे तोंड भ़क्ताकडे नसते.मात्र शणी शिंगणापुर येथील शणी देवाचे तर सर्व् भक्तांकडे लक्ष असते.मग शनी देवाचा आशिर्वाद कसा असेल.तो एकासाठी चांगला आणि एकासाठी त्रासदायक कसा असेल.शनी पासून् देव् ही सुटले नाही. आणि दानव् ही.मग शनी पासुन सुटण्याचा मार्ग् लोक् का शोधत असतात.

शनी ला थोडा डचकलेला.

धार्मिक गोष्ट

प्राध्यापक महोदय,

आपल्या ज्योतिषविषयक प्रश्नाचे उत्तर आम्ही दिले आहे. पण आपला दुसरा प्रश्न एका देवस्थानाशी निगडीत आहे. त्यावर आम्ही भाष्य करू इच्छित नाही.

कारण धार्मिक स्थळांवर भाष्य करून कोणाच्या भावना दुखवल्या जाऊ नयेत असे आम्हाला वाटते.

त्यामुळे आम्ही ज्योतिषावर बोलू, मंदिरांबद्दल आणि देवस्थानांबद्दल बोलणार नाही.

आपला,
(स्पष्ट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रा. बिरूटे

प्रा. डॉ. दिलीप बिरूटे यांसी,

सस्नेह आदरयुक्त नमस्कार,

साडेसात वर्षे एवढ्यासाठी की शनी साधारणपणे एका राशीत अडीच वर्षे राहतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, स्वरास(जिथे जन्मकुंडलीत चंद्र आहे ती) त्याच्या व्ययात म्हणजे आधीच्या स्थानात आणि धनात म्हणजे द्वितीयात म्हणजे पुढील स्थानात या तीन ठिकाणी प्रत्येकी अडीच वर्षे वास्तव्याची साडेसात वर्षे होतात.

हा शनी वास्तव्याच्या साधारण काळ आहे. म्हणून ती साडेसाती. पण साडेसाती म्हणजे मोजून साडेसात वर्षे नव्हेत. कारण जेव्हा शनी वक्री असतो (retrograde) होतो, तेव्हा त्याची गती कमी होते आणि त्यावेळेस तो मागे सरकत जातो आहे असे भासते.

यामुळे जे अंश तो मागे सरकतो, ते पुन्हा मार्गी झाल्यावर भरून काढून त्यानंतर पुढील वाटचाल सुरु होते. त्यामुळे साडेसातीचा कालावधी वाढतो.

सध्या शनी सिंहेतून वक्री होऊन कर्केत आला आहे. आता तो १५ एप्रिल रोजी स्तंभी होईल आणि १८ एप्रिल पासून मार्गी होईल. त्याला कर्क रास पुन्हा पार करायला, जुलै उजाडेल. त्यामुळे कर्क आणि सिंह राशीची साडेसाती लांबली आणि मिथुन ची पुन्हा सुरु झाली. ती शनी सिंहेत गेल्यावर जुलै मध्ये संपेल.

आपला,
(विस्तृत) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

कर्क

मिथुनेची जुलै मध्ये संपेल.....
तर कर्क राशीची साडेसाती कधी संपणार हे सांगू शकाल का?
धन्यवाद.

फार सुंदर पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देताय...

धोंडोपंत महाराज,

आपण फार सुंदर पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देताय. शिवाय यनावाला यांच्या प्रतिसादला दिलेला यांना दिलेला प्रतिसाद छानच आहे.

आम्ही तुमच्या मतस्वातंत्र्याचा आणि मतांचा आदर करतो. तुम्ही कशावर विश्वास ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे आम्ही कशावर ठेवायचा हा आमचा.

(हे तर विशेष आवडले!)

आपला

गुंडोपंत

क्षमा असावी!

ज्योतिष्या चा मी अधिकारी नाही.
ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही त्यावर मत व्यक्त करणे योग्य वाटत नाही,
त्यामुळे वाचन करतो आहे.

प्रतिसाददेण्यामागे मने दुखवण्याच हेतू नव्हता.
परंतु, कोटी करण्याचा मोह आवरला नाही.

आपला
अण्णा

ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी..

प्रकाश घाटपांडे
आत्मस्तुतीचा दोष
फ़लज्योतिष
ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद ले. प्रकाश घाटपांडे
हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने नव्याने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे
प्रा. जयंत नारळीकरांनी १३ एप्रिल २००३ मध्ये लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत
परीक्षण लिहिले आहे. ते www.faljyotishachikitsa.blogspot.com वर उपलब्ध आहे.
हे पुस्तक सर्वसामान्यांनी चिकित्सकाच्या चष्म्यातून , चिकित्सकांनी
सर्वसामान्यांच्या चष्म्यातून आणी ज्योतिषांनी अंतर्मुख होवून वाचावे असे
आहे. अधिक संपर्कासाठी ९९२३१७०६२५ प्रकाश घाटपांडे

परीक्षण

तुम्ही दिलेल्या लिंकवरून नारळीकरांचे परीक्षण वाचले. आपण फलज्योतिषाची वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकित्सा केलेली आहे असे समजले. त्यातील काही विषयांवर आपण इथे काही लिहिलेत तर सर्वांना उपयोगी पडेल.

- अमृतांशु

साडेसाती

धोंडोपंत आणि इतर लोकहो,

माझे अहोभाग्य कि या मस्त जागेचा शोध लागला. प्रतिक्रिया आणि उत्तरे वाचताना मनःपूत हसलो. धन्यवाद्. ज्या सगळ्यांचे हातभार हे स्थान निर्माण करण्यात लागले आहेत त्याना आभार.

मला काही प्रश्न पडलेत त्यांची उत्तरे मिळाल्यास कृपा होईल,
सिंह राशीची साडेसाती कधी संपेल आणि कुंभेची कधी सुरु होईल ?
याचे काही टेबल आहे का? म्हणजे एका दृष्टिक्षेपात सगळ्या राशींची पूर्वीची आणि येणारी साडेसाती कळेल?

-कुम्पणस्थ

साडेसाती

माजे नाव अर्चना जयसिंग वाघ आहे माजे जल्म दिवस 22/03/86 असून मजा जल्म सकळे 5.30 वाजता पुणे शहरात madhe झाला आहए माजी रास कर्क आहे तर तू मी सागू सकाल का मला साडे सती चालू आहे का ??? आणि ती काढे संपणार आहे ?

माझा एमिल archanawagh9819@gmail.com

 
^ वर