स्वातंत्र्यवीर सावरकर - माहीतीपूर्ण संकेतस्थळ

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी. आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे. तेथे माहीतीवाचण्या व्यतिरीक्त एमपी३ मधे सावरकरांचे आणि त्यांच्यावरील इतर मान्यवरांची भाषणे ऐकण्याची व्यवस्था आहे. खाली टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी वाचा. (म.टा. ला काय झाले?)

संकेतस्थळः

toi_savarkar

Comments

वा !

विकास,
संकेतस्थळ पाहिले. चांगले आहे.
माहिती बद्दल धन्यवाद.
--लिखाळ.

सर्वात महत्वाचे कार्य.

या संकेतस्थळावर वेळोवेळी भर टाकण्यात येईलच. सावरकरांचे सर्वात महत्वाचे आणि अविवादास्पद कार्य म्हणजे मराठी भाषेला दिलेली पुर्नसंजीवनी. त्याबद्दल येथे भरपूर लिहिले गेले पाहिजे. आज मराठी भाषेच्या संदर्भात त्यांचे विचार आणि प्रेरणा आपल्याला उपयुक्त ठरतील यात संशय नाही.

त्यांना कळवा

चांगली सुचना. त्यांना तसे कळवावे. सावरकरांच्या बाकीच्या प्रकाशीत केलेल्या गोष्टीत जर काही चूक दाखवायचे असले तर अवश्य येथे सांगा.

जयोस्तुते

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र जसे ध्वनीमुद्रित झाले आहे त्यासंबंधी थोडेसे...

स्वातंत्र्यदेवीच्या स्तोत्राचे पहिले कडवे जे ध्वनीमुद्रित झाले आहे ते पुढीलप्रमाणे...

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीति संपदांची
स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखतशी

या कडव्यातील तिस-या ओळीत एक छोटीसी सुधारणा हवी असे मी फार पूर्वी वाचले होते. दुस-या, तिस-या व चवथ्या ओळींचा अर्थ असा होतो:

स्वातंत्र्यदेवीला उद्देशून कवी म्हणतातः

स्वातंत्र्यदेवी तू या सर्वांची राज्ञी म्हणजे राणी आहेस,
परवशतेच्या म्हणजे पारतंत्र्याच्या नभात म्हणजे आकाशात तूच आकाशी असतेस...
स्वातंत्र्यदेवी तूच एक लखलखणारी चांदणी असतेस

ओळ क्र. ३ मध्ये नभातआकाशी असे एकाच अर्थाचे दोन शब्द कारण नसताना येतात. सावरकरांसारख्या शब्दचिकित्सक व्यक्तीकडून ही चूक व्हायला नको / होणार नाही. एकाच अर्थाचे दोन शब्द येणे हे गैर नाही, अर्थ ठासून सांगण्यासाठी हे जरूर केले जाते. पण या ठि़काणी अर्थाची द्विरुक्ती होऊन कल्पना स्पष्ट होत नाही, उलट गोंधळ उडतो.

वरील ओळीत पुढील प्रमाणे सुधारणा केल्यास अर्थ नीट लागतोच पण जास्त स्पष्ट होतो.

परवशतेच्या तमात तूची आकाशी होशी

अर्थ अतीशय स्पष्ट आहे:

परवशतेच्या म्हणजे पारतंत्र्याच्या तमात म्हणजे अंधःकारात तूच आकाशी असतेस...
स्वातंत्र्यदेवी तूच एक लखलखणारी चांदणी असतेस


मी वाचल्याप्रमाणे ज्या व्यक्तीने ही सुधारणा सुचवली त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना पत्र लिहून कळविली. त्यांचे याबाबत सकारात्मक उत्तर आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते स्वातंत्र्यवीरांचे अक्षर थोडे किरटे होते त्यामुळे तमात च्या ऐचजी नभात वाचले गेले असावे व त्यावरून ध्वनीमुद्रण झाले असावे. (वाचा: तमात नभात)

नितीन

 
^ वर