आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!

आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!

आजही गुडोपंतांना त्या तत्वाने ग्रासले होते. अधुन मधून असेच होते. काही करण्याची इच्छा रहात नाही. जगापासून वेगळेच झालो आहोत अशी भावना येते. आणि ही भावना काही तात्पुरती नसते बरं. ही अशी कायम स्वरूपी डोक्यात बसून राहते कुठे तरी मागे. काम ही धड होत नाही. आणि खूप कामं पण आहेत.

खालच्या रबर मॅटस् बदलायच्या आहेत. नवीन वजनं आणायला झाली आहेत. एकदा व्यायामशाळेला रंग देवून घ्यायचा आहे. शिवाय मुलांना फीची आठवण करून द्यायची आहे. दोन वेळा वजनं आणायला म्हणून मुंबई ला जाण्यासाठी पंचवटीचं रिझर्वेशन केलं पण दोन्ही वेळा गेलेच नाहीत.
पुर्वी सारखं हल्ली लिखाणही होत नाही.

ही भावना म्हणजे एखाद्या अचानक पणे घडलेल्या गोष्टीचा परिणाम नाहीये. काहीच करण्याची इच्छा नाही. म्हणजे अगदीच डाउन वाटणे. आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!

अरे ही काय भानगड आहे?

याला नैराश्य म्हणतात. हे बहुतेक सगळ्यांनाच कधी ना कधी ग्रासते.
निराशपणा कधी जाणवून जातो?
१. काही करण्याची इच्छाझात नाही
२. जेंव्हा तुम्हाला तुम्ही उदास आहात हे जाणवतं
३. उगाच दु:खी राहता
४. किंवा एकप्रकारचं रितेपण मनात भरून जातं

हे सगळ्यांनाच जाणवतं. मग काय त्यात?

पण हे जर सलग दोन आठवड्यांच्या पेक्षा जास्त काळ असेल तर नैराश्य आहे असे मानायला जागा आहे.
नैराश्यात खालील महत्वाची लक्षणं दिसतात.

१. वजनात लक्षणीय बदल घडतो (कमी होते/वाढते)
२. मनोवृत्ती चंचल होतात, एकतर गोष्टी करायची खूप घाई होते किंवा अगदीच ३. ढीलेपणा येतो.
४. अकारणच थकवा जाणवतो.
५. एखाद्या गोष्टीवर लक्ष देवून काम करणे जमत नाही. गोष्टींचा सलग विचार करता येत नाही.
६. छे! या पेक्षा मृत्यु काय वाईट? जगाने आपल्यावर सूड उगवला आहे, किंवा आपण या जगाच्या लायकीचेच नाही आहोत असे विचार मनात यायला लागतात.

म्हणजे एकाच वेळी सगळं जाणवतं?
नाही, यातले काही विचार मनात येवून जातात. याची व्याप्ती किती ते नैराश्याची पातळी किती आहे नि कोनत्या प्रकारचे नैराश्य आहे यावर अवलंबून असते. आपल्याला असे का वाटते याची कारणे बाहेरच्या जगात शोधत किंवा
नैराश्य घेवून अनेक लोक वर्षानुवर्षे जगत राहतात.
पण या भावनेवर काही उत्तर असू शकते.

म्हणजे हे जे काही वाटतं ते एक प्रकारचं आजारपण आहे?

अर्थात! हा एक आजारच आहे. फक्त मनाला झालेला आजार.

कसा बॉ बरा करायचा हा आजार मग?

खालच्या काही गोष्टी केल्या तर हा आजार चटकन आटोक्यात येण्यासारखा आहे.

मात्र जर आयुष्यातला रस संपून आता हे आयुष्य सगळं संपवण्याचे विचार मनात असतील लगेच तुमच्या डॉक्टरला भेटा व त्याला सांगा की मला निराश वाटतंय. या क्षणाला हे बाहेरून मदत घेणे अतिशय महत्वाचे आहे!

असो, अगदी संपवण्यासरखे नाही पण उदासी जात मात्र नाही मग काय करायचे या साठी खालचे उपाय करून पहा.
१. बोला - 'हे' सगळं बोलण्यासाठी कुणालातरी शोधा. मन कुणापाशी तरी मोकळं करा. मित्र, मैत्रिण, आई, वडील कुणीतरी जे तुम्हाला समजून घेईल. कुणीच जवळ नसेल तर तुम्ही सरळ एक मनोविकास तज्ञ गाठा व त्याच्याशी बोला!

२. जेवण - जेवणाला नियंत्रणात आणा. त्याल एक वेळ ठरवून घ्या. किती जेवणे योग्य आहे याचा ताळा घ्या. काय जेवतो आहोत याचा विचार करा. योग्य ते प्रोटिन्स व व्हिटॅमिन्स मिळत आहेत की नाही हे एकवार तपासा.

३. व्यायामाला लागा. व्यायामासारखा उपाय नाहीळीखाला मैदानी खेळ, लांब फिरायला जाणे, सायकलींगला जाणे, पोहोणे किंवा योगासने करणे यातून शरीराची गतीमान हालचाल होवून मेंदू आनंददायी द्रव्ये स्रवतो. यामुळे मनाला बरे वाटू लागते. म्हणजे निसर्गाने शरीर व मन हे एकत्रच बांधलेले आहे!

४. लिखाण - जे काही वातते ते सगळे लिहुन काढा. तुम्ही काय लिहिता आहात याचा विचार करू नका. फक्त रोज लिहित जा. मागे पाने उलटून कधी पाहिलेतच तर कळेल की काय कारणांमुले उदास वातत होतं ते.

हे उपाय करून पहा.
या शिवायही अजूनही अनेक उपाय असु शकतात. हे शक्य होत नसेल तर त्वरित तज्ञांचे मार्ग दर्शन घ्या!
हे करायला लागल्यावर काही दिवसातच फरक जाणवेलच. एक प्रकारचा उत्साह मनाला जाणवू लागेल. परत आनंदाचे दिवस येतील.
काही तरी करावंसं वाटायला लागेल.

आपला
गुंडोपंत

Comments

माहितीपूर्ण ...

गुंडोपंत ,
तुमचा लेख माहितीपूर्ण आहे. यालाच "डिप्रेशन्" का कायसेसे म्हणतात का ? तुमच्या स्वतःच्या नावाने सुरवात करून मात्र चांगलाच "गुगली" तुम्ही टाकलात हे मात्र खरे ! सुरवातीची काही वाक्ये वाचून "अरेरे .." असे कायसेसे म्हणत होतो आणि नंतर जाणवले : हा एक माहिती देणारा लेख आहे ; नॉट् नेसेसरीली ओटोबायॉग्राफिकल् .(बहुदा हे खरे असावे. थोडक्यात आम्ही तुमचा गुगली नीट खेळलो :-) )

तुम्ही सांगितलेले उपाय (अर्थातच )आवडले . मात्र एक शंका वाटते , ज्याचे डिप्रेशनचे स्वरूप "क्लिनिकल्" असे आहे (म्हणजे सहजसाध्य नसणारे) त्याला हे उपाय कितपत लागू पडतील ? अन्य उपाय , डॉक्टरी सल्ला , यांव्यतिरिक्त अशा व्यक्तिला "प्रोझॅक्"ला शरण जावे लागेलच , नव्हे का ? किंबहुना , अशा व्यक्तिचे उपचार तुम्ही वर्णिलेल्या "कॉमन् सेन्स्" उपायानी होणार नाहीत अशी मला जबरदस्त शंका आहे...

तीव्रता

डिप्रेशनची तीव्रता मोजण्यासाठी साठी एक मार्ग बर्न्स डिप्रेशन चेकलिस्ट आहे. यात साधारण ११ च्या वर स्कोअर आल्यास व्यावसायिक मदत घ्यावी असे म्हणतात. हा तीव्रता मोजण्याचा एक मार्ग आहे, व्यावसायिक निदान नव्हे. पण जर आत्महत्येचे विचार वारंवार मनात येत असतील तर मात्र तज्ञांची मदत लवकरात लवकर घ्यावी.

यावर फिलिंग गुड हे पुस्तक मिळाल्यास जरूर वाचावे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

एलिस्

नैराश्य या विषयाशी संदर्भात REBTचे विषय डोक्यात घोळायला लागले. आणि काय आश्चर्य ! बर्न्स् हे REBT च्या बाबतीत चक्क एलीस या मूळपुरुषाचे नातू लागतात असे विकि एंट्रि सांगते ! :-)

प्रोझॅक - प्रश्न

नैराश्यावर बाहेरून औषधे घेणे हा उपाय काही कालावधीसाठी नक्कीच प्रभावी असतो. परंतु दीर्घकालीन उपायासाठी ध्याना सारखा उपाय नाही!
प्रोझॅक (किंवा तत्सम)च्या दीर्घ वापराने अनेक प्रश्न उभे राहतात. याची सवय लागू शकते.
मनाला कायमच्या कुबड्या देणे व फ्रॅक्चर झाले आहे ते बरे होई पर्यंत कुबड्या देणे यात खूप मोठा फरक आहे.
नैराश्याला ओळखून त्याला व्यवस्थित पणे हुलकावणी देवून अथवा त्याची खेळी खळून शेवटी आपल्या पायावर उभे राहणे महत्वाचे आहे.

मात्र सत्य हेच की हा नैराश्याचा भाग प्रत्येकाला ग्रासतच असतो. नैराश्य कधी ग्रासलेच नाही अशी व्यक्ती मिळणे शक्य नाही!

आपला
गुंडोपंत

प्रोझेक-प्लासिबो?

प्रोझॅक (किंवा तत्सम)च्या दीर्घ वापराने अनेक प्रश्न उभे राहतात. याची सवय लागू शकते.
प्रोझॅकबद्दल आजच ही बातमी वाचली. यावर इतर तज्ञांचे मत काय हे बघणे रोचक ठरावे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

जबाबदारी घ्यावी ......

इतर भावनांप्रमाणेच नैराश्याची भावना आपण स्वतःच निर्माण करीत असतो हे लक्षांत घेऊन तिचा त्याग करणे किंवा तिला गोंजारत बसणे आपल्याच हातांत आहे हे लक्षांत घ्या.

आवडते संगीत किंवा आवडती गाणी ऐकण्याने नैराश्य ओसरते असा अनुभव आहे.

नैराश्य व आनंदीपणा दोन्ही संसर्गजन्य आहेत. यावर 'स्माईल थेरपी' उपयुक्त आहे. याबाबतींत मी ३ ऑक्टोबर २००७ ला उपक्रमवर लिहिलेला 'स्माइल् थेरपी' हा लेख वाचावा.

आणखी एक (काहीसा चमत्कारिक) उपाय. आपल्याल नैराश्य आले आहे हे स्वतःशी कबूल करा. ते बळजबरीने झटकून न टाकता त्याचा ज्यास्तींत ज्यास्त अनुभव घ्यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. असे करतांना आपण त्याची तीव्रता आपल्या मर्जीने वाढवत आहोत व वाढवू शकतो हे लक्षांत येईल. त्यावरून नैराश्यावर आपले नियंत्रण असल्याचे जाणवेल. मग ते आपणच ते कमी करू शकतो वा त्यागू शकतो हे जाणवेल.

कोणत्या

आपल्याल नैराश्य आले आहे हे स्वतःशी कबूल करा. ते बळजबरीने झटकून न टाकता त्याचा ज्यास्तींत ज्यास्त अनुभव घ्यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.
हे कोणत्या स्थितीतील नैराश्य आहे यावर अवलंबून आहे. मात्र आपल्या म्हणण्यात १००% तथ्य आहे.

नैराश्याला झटकायला फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते - तुम्ही स्वतः

आपला
गुंडोपंत

मनोविकारांचा मागोवा

मनोविकारांचा मागोवा हे डॉ.श्रीकांत जोशी यांचे पुस्तक वाचनीय आहे. मन सुद्धा थकत असते. जरा ईश्रांती घ्यायची. दाक्तरकून टानिक घ्यायचं. हाँ आता पैशे लागनार.दाक्तर आवशिद आल म्हन्जे चरक आस्तुया.म्हनुन त मंग ल्वॉक मांत्रिक तांत्रिक बुवा बाबा ज्योतिषी याच्या माग जात्यात. सस्तात काम. हा नंतर "सस्ता पड गया ना महेंगा! "अस म्हनन्याची पाळी न्हाई आलि म्ह्ण्जे झाल. हा आता षड्रिपु का काय जे म्हंतात ते ! त्यांन्ला दाबाया गेल कि मंग हे ईकार डोस्क वर काडत्यात. सासुन् सासुन र्‍हातय ते कुकर च्या शिट्टिवानी बाहेर पडतय. न्हाय पडल त वाल् जातुय.
प्रकाश घाटपांडे

अगदी योग्य

आमच्या घाटपांडे साहेबांनी सूचवलेले मनोविकारांचा मागोवा हे डॉ.श्रीकांत जोशी यांचे पुस्तक अतिशय उत्तम आहे.
मिळाल्यास जरूर वाच. अगदी संग्रही ठेवून अधून मधून वाचत राहण्यासारखे आहे हे.

आपला
गुंडोपंत

विषादयोग

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे विषादयोग पुस्तक पण चांगले वाटले.

मनोविकास प्रकाशन का?

प्रकाशक कोण आहे?
मनोविकास प्रकाशन का?
त्यांचे 'स्वभाव विभाव' पण चांगले आहे.

डॉ. किशोर फडके याच्या आर इ बी टी वर आधारीत पुस्तकांची काही माहीती कुणाला आहे का?

आपला
गुंडोपंत

कदाचीत असेल

प्रकाशक कोण आहे?

आत्ता ते माझ्यासमोर नाही, त्यामुळे माहीत नाही. स्वभाव-विभाव पण चांगले पुस्तक आहे.

माहिती

माहिती आवडली.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

बरेच दिवसांनी

बरेच दिवसांनी अनुताईंचे नाव वाचले. निमित्त- गुंडोपंतांचा वाचनीय आणि विचारकरणीय(!) लेख. उत्कृष्ट लेखाबद्दल धन्यवाद, अभिनंदन आणि अभिवादन.--वाचक्‍नवी

लेख आवडला

लेखातील माहिती आणि ती सांगण्याची 'स्टाइल' आवडली.
स्वाती

लेख+ शैली+

सहमत. आगे बढो गुंडोपंत.

धन्यवाद!

आवर्जून सांगितल्याने बरे वाटले!
आशा आहे याचा कधीतरी, कुणालातरी उपयोग होईल!

आपला
गुंडोपंत

अगदी

असेच म्हणतो. स्टाईल आणि सबस्टन्स दोन्ही मस्त.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

माहिती आवडली पण एक चांगला उपाय राहून गेला

गुंडो, माहिती आवडली.

नैराश्य झटकून टाकण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट करणे. जसे,

  • आपल्या आवडीचे वाद्य वाजवणे किंवा वाजवायला शिकणे, किंवा इतर जसे नृत्य, चित्रकला वगैरे.
  • आपल्या आवडीचे एखादे काम किंवा स्वयंसेवा करणे.
  • आपल्या आवडीचा एखादा खेळ शिकणे.

यांतून पहिली गोष्ट अशी होते की तुम्हाला तुमच्या चाकोरीबाहेरील माणसे भेटतात. नव्या ओळखी होतात. मन रमते, आपल्याला आवडणारे काम करायची स्फूर्ती राहते. इ.

अवांतरः बाहेर ३ इंच बर्फ पडला आहे. सकाळी ५ वाजता बाहेर स्नो झाडावा लागणार या काळजीने प्रियालीताईंना नैराश्याचा झटका येण्याची जबरदस्त शक्यता आहे..... ह. घ्या.

वा उत्तम उपाय

वा! उत्तम उपाय आहे हा -
असेच उपाय येवू द्या अजून पण.

आपला
गुंडोपंत

उपाय सुचवा

गुंडोपंत, आम्हीही गेले बरेच दिवस या व्याधीने ग्रस्त आहोत त्यामुळे उपाय सुचवू शकत नाही पण तुम्ही आणि इतरांनी सुचवलेले उपाय करून पाहतो.

अवांतर - आयुष्यातला कमी झालेला 'रस' कृत्रिमपणे भरण्याचा प्रयत्न केल्यास क्षणिक फायदा होतो पण (रसाचा प्रभाव) 'उतरताच' पुन्हा हा रोग नव्या जोमाने डोके वर काढतो ;)

कोण ग्रस्त नाही?

नवीना,
या व्याधीने कोण ग्रासले नाहीये?
पण किती ग्रासू द्यायचे हे तुमच्या हातातच आहे हे लक्षात ठेवा.

तपासून पहा!
मात्र माझे उपाय करतांना नैराश्य व त्यावर मात हा खेळ काही दिवस सुरु राहील. आपल्याला निराश विचार येत आहेत हे ज्या क्षणी समजेल त्या क्षणी विचार तपासा की कुठून सुरु झाले हे विचार?
उदास विचारांचे बटन शोधा. कशामुळे ते बटन दाबले जाते ते शोधून काढा - निराशेतून लवकर बाहेर याल.

पण असं तर होत नाहीये ना? की हा खेळ आहे व 'मी उदास आहे' हा खेळ खेळायची चटक तुम्हाला लागली आहे?
फार आकर्षक असतो हा खेळ!
आपला
गुंडोपंत

चॉकलेट

डार्क चॉकलेट खाणे, शॉपिंग करणे असे नैराश्यावरचे काही आनंददायक उपाय ऐकून आहे. मुक्तसुनितांनी सुचवलेली 'प्रोझॅक' बाकी वैद्यकीय सल्ल्यानेच घेतलेली बरी. होमिओपॅथीमध्ये नैराश्यावर काही प्रभावी औषधे आहेत. 'ट्रॅंक्विल' हे त्यातले एक.
नैराश्य बर्‍याच प्रमाणात अनुवंशिक असते. कधीही कुणीही त्याला बळी पडू शकतो. सावधगिरी आणि वेळीच उपचार यांनी हा आजार आटोक्यात राहू शकतो.
सन्जोप राव

एक उपाय..

एक उपाय!

अधनंमधनं मिसळपाव डॉट कॉमवर चक्कर टाकायला, काही लिहायला, इतरांचं वाचायला, बरावाईट प्रतिसाद द्यायला हरकत नाही/नसावी!

आंतरजालावर वावर असणार्‍या मराठी माणसांकरता, तेथील उत्साहवर्धक आणि जिन्दादिल वातावरण हा नैराश्यावरचा कदाचित एक उपाय असू शकतो! आजच्या घडीला सुमारे पाच-सहाशे आंतरजालीय मराठी माणसांकरता मिसळपाव हे एक घटकाभर विरंगुळ्याचे स्थान आहे अशी आमची माहिती आहे! :)

असो...!

आपला,
(उत्साही!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हा हा हा!

हा येकदम बेष्ट पैकी उपाय आहे बरं का!
उत्साही लोकांमधे वावरणे हा पण चांगला उपाय आहे.

आपला
मिसळप्रेमी
गुंडोपंत

'योग्य मूल्यमापन करणे'

गुंडोपंत,
आपला लेख छानच आहे. नैराश्य हा या शतकाचा महत्वाचा रोग होवू पाहतो आहे असे मध्ये कुठेतरी वाचनात आले.
वर संजोप राव म्हणतात तसे हा विकार अनुवंशिक आहे असे ही ऐकून आहे.

या वर मला अजून एक उपाय सुचवावासा वाटतो तो म्हणजे
'योग्य मूल्यमापन करणे'.
म्हणजेच एखाद्या विशिष्ट गोष्टीमूळे नैराश्य आले असेल तर
त्या गोष्टीचे आपल्या जीवनातील स्थान,
भावविश्वाचा किती भाग त्याने वापला आहे? मग इतर गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या बद्दल विचार.
निराशा आणणारी गोष्ट किती काला साठी आपल्या आयुष्यावर परिणाम करु शकते?
असा साकल्याने विचार केला तर निराशा आणणार्‍या गोष्टीतली हवा अनेकदा निघून जाते.

आपला लेख चांगला आणि उपयोगी आहे.
-- लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

वा सुयोग्य प्रतिसाद

वा लिखाळा,
सुयोग्य प्रतिसाद!
खुपच महत्वाचा मुद्दा मांडला गेला.

(फक्त निराश व्यक्ती त्यावेळी हे मुल्यमापन योग्य रीतीने करण्याच्या परिस्थितीत असावी... अन्यथा तज्ञांकडून मदत घेणे उत्तम!)
आपला
गुंडोपंत

उपाय

सतत व्यस्त राहण्याचा प्रयत्न करणे हा एक सोपा उपाय वाटतो. शरिराने व्यस्त राहणे नव्हे तर मनाला व्यस्त ठेवणे यात सगळे आले गाणे ऐकणे, व्यायाम करणे इथपासून लेखन, वाचन, स्वयंसेवा, खेळ (अगदी बर्फ काढणेही चालेल ;)).. काहिहि करून मनाला निराशावादि विचार करायला वेळच द्यायचा नाहि :)

-(बिझी)ऋषिकेश

उपाय चांगला पण

ऋश्या हा उपाय चांगलाय पण

दरवेळी काम करतोच असे नाही. नैराश्यात काही करण्याची इच्छा राहत नाही हाच प्रश्न असतो ना!
तरी व्यस्त ठेवणे हा काहीसा उपाय आहे. म्हणजे हुलकावणी देण्यासारखा...
आपला
गुंडोपंत

चांगला लेख

गुंडोपंत,
तुम्ही सांगितलेले उपाय अगदी योग्य वाटतात. प्रियालीने म्हटल्याप्रमाणे इथल्या हिवाळ्यात नैराश्य येण्याचा चांगलाच धोका असतो, विशेषतः जर आजूबाजूला कोणी नसले तर. मला स्वतःला हिवाळ्यात इथला दिवस कमी असतो ते अजिबात आवडत नाही, कंटाळा येतो - पण यावर उपाय म्हणून काही कामाबरोबरच घरात दिवे लावणे, चांगले संगीत इत्यादी उपयुक्त असते. तसेच लोकांना घरी बोलवून खायला प्यायला घालणे इत्यादीतही वेळ चांगला जातो (नशिबाने दिवाळी, थँक्सगिव्हिंग आणि ख्रिसमस हे सण त्याच सुमारास येतात). करमणुकीसाठी नुसते टीव्ही बघणे ही पॅसिव्ह (मराठी शब्द?) कृती झाली, तिचा फायदा तेवढ्यापुरताच असतो. स्वतःच्या हाताने काही सर्जनशील गोष्टी करणे (अगदी स्वयंपाकही) यासारखा कंटाळा घालवण्याचा उत्तम उपाय दुसरा नसावा.

पण असे सामान्य उपाय काही रूग्णांसाठी पुरेसे नसतात - कारण त्यांना हव्या असलेल्या आधाराचा अभाव. कधी कुटुंबाचा अभाव किंवा दुर्लक्ष. तर कधी आरोग्याच्या विम्याचा अभाव. पण हे महत्त्वाचे सांगितलेत की रूग्णाने बोलले पाहिजे. त्याचबरोबर अजून एक सांगावेसे वाटते ते म्हणजे रूग्णाजवळच्या लोकांनी डिप्रेशनचा बाऊ न करता बोलले पाहिजे. अल गोर यांची पत्नी टिपर गोर हिने मेंटल हेल्थ अर्थात मानसिक आरोग्य हा "न बोलण्याचा" विषय न बनता आरोग्यविषयक मुख्य मुद्दा असला पाहिजे असा प्रचार केल्याचे स्मरते. त्याचे कारण ती स्वतः क्लिनिकल डिप्रेशन अशा अवस्थेतून गेली होती. पण त्याचबरोबर ही ट्रीटमेंट सावधपणे करणे अतिशय जरूरीचे आहे. आज अमेरिकेत मला काही तरूण अमेरिकन लोक माहिती आहेत ज्यांची मनोविकार तज्ञाकडे कायम ये जा चालू असते. त्यांच्यापैकी कित्येकांना लहान वयात अशा ट्रीटमेंटची गरज खरोखरच होती का असा मला प्रश्न पडतो. अटेंशन डेफिसिट हायपरऍक्टिव डिसऑर्डर (एडीएचडी) या नावाने ओळखल्या जाणार्‍या सर्वसाधारणपणे लहान मुलांमधे आढळणार्‍या अवस्थेत अमेरिकेतील स्टॅटिस्टिक्सप्रमाणे दर २५-३० मुलांमागे एक अशा मुलाला हा रोग असतो - हे प्रमाण खरे आहे का अशी मला कधीकधी शंका वाटते. असूही शकेल, पण रोगाचे निदान करताना अतिउत्साही लोकांनी चुकीचे निदान केले असल्याची शक्यताही असावी - यावर कोणाला माहिती असल्यास जरूर लिहावी ही विनंती. अशा रोगांचे निदान झालेल्या मुलांना किशोरवयातच ट्रीटमेंटच्या निमित्ताने विविध औषधाच्या गोळ्या दिल्या जातात, पण कधीकधी त्यांची सवयही त्यांना झालेली असते. अतिरिक्त औषधांचा/ किंवा त्याच्या साईड-इफेक्टांचा परिणाम म्हणून माणसे ज्या मरगळलेल्या अवस्थेत असतात ते बघून वाईट वाटते.

गरज नसताना

त्यांच्यापैकी कित्येकांना लहान वयात अशा ट्रीटमेंटची गरज खरोखरच होती का असा मला प्रश्न पडतो

गरज नसताना मानसोपचारतज्ञाकडे सतत उगाच धाव घेणे हा हि एक न्यूनगंडाचा (अथवा आत्मविश्वासाच्या अभावाचा) नमुना समजायला हरकत नसावी :) अशावेळी हे 'तज्ञ' त्या व्यक्तीला इथे येण्याची गरज नाहि असे सांगतात का? :)

-ऋषिकेश

दोन टोके

मला वाटते या बाबतीत अमेरिका आणि भारत ही दोन टोके आहेत. शॉपिंग स्ट्रेसमुळे थेरपी घेणारे अमरू आणि स्किझोफ्रेनिया झालेला असतानाही मांत्रिक, नवस करणारे भारतीय दोन्ही टोके वाईटच. यासाठी मानसिकता आणि मानसोपचार यांच्याबद्दल जास्त जागरूकता आली पाहिजे. म्हणजे कुठले अपचन आणि कुठले अपेंडीक्स यातला फरक लक्षात येईल आणि त्याप्रमाणे उपचारही होतील.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

असेच

म्हणायचे आहे. फूटबॉल सीझन संपल्यामुळे 'क्लिनिकली डिप्रेस्ड' होणारी एक असामी परिचयात आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

हा सुरेख उपाय

स्वतःच्या हाताने काही सर्जनशील गोष्टी करणे हा सुरेख उपाय आहे.
पण कधीकधी निराश मनस्थितीला धक्का मारून त्या रुतलेल्या ठिकाणातून बाहेर काढावे लागते. औषध तेंव्हा ते काम करते. पण त्याचाच अतिरेक झाला की मग काय होते याचा उहापोह आपण केला आहेच. म्हणूनच मी औषध मर्यादीत कालावधी साठीच असावे असे म्हणतो!

रूग्णाजवळच्या लोकांनी डिप्रेशनचा बाऊ न करता बोलले पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. डिप्रेशन डिप्रेशन खेळायची सवय नको लागायला. अनेकदा असे झालेले दिसून येते. थोड्या कणखर व सुस्प्ष्ट भूमीकेने हे सोडवता येते.

आपला
गुंडोपंत

व्याख्याने, गप्पा आणि इतरांशी ओळखी.

अनेक शहरात वेगवेगळ्या विषयावर व्याख्याने, प्रवचने चालू असतात. ते ऐकायला जावे. मनाला बरीच माहिती मिळते.

गप्पा हाही मनाला विश्रांती देण्याचा मार्ग आहे अर्थातच नैराश्याच्या गोष्टी टाळाव्याच.

प्रवास करावा आणि ओळखी वाढवाव्या.

कोठून येई मला कळेना ...

चांगला विषय आणि मूळ लेखन!

प्रतिसाद वाचून आणि त्यावरून उपक्रमींच्या "डिप्रेशन"च्या ज्ञानची कल्पना येऊन काळजी वाटली! (ह.घ्या.)

सर्व प्रतिसाद आवडले. आता मला वाटते ते!

मला एकदा सुचवावेसे वाटले की डिप्रेशन आले तर उपक्रमावर येऊन चर्चा करा. पण त्यामुळे उगाचच गैरसमज होईल की मी कायमच डिप्रेस असतो म्हणून ;)

पण डिप्रेशन हा थोड्याफार फरकाने वृत्तीचा भाग असू शकतो. तो आपण प्रयत्न केला तर बरापण आपणच करू शकतो असे वाटते. त्या संदर्भात मला बालकवींच्या खालील ओळी आठवतात:

कोठून येई मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंर्तहृदयाला

मला बालकवींबद्दल जास्त माहीती नाही, पण त्यांच्यात कवीची प्रतिभा असूनही कुठेतरी जीवनात नैराश्य होते. त्यांचे खालील छोटे (अपूर्ण) काव्य पहा एकीकडे सुंदर वर्णन आणि दुसरीकडे नैराश्यः (त्यांनी त्याला अपूर्ण का म्हणले ते माहीत नाही). जशी आठवते तशी

रात्र संपली दिवसही गेले अंधपणा ये फिरून धरेला खिन्न निराशा परी हृदयाला या सोडीत नाही
नित्यापरी रवीकिरणे देती, रंग मनोहर सांध्य मुखी ती, खळबळ ओढा गुंगत गिती, राईतून वाहे
सुंदर सगळे मोहक सगळे, खिन्नपणा परी मनीचा न गळे, नुसती हुरहुर होत जीवाला का न कळे काही
चंद्रबिंब धरी अभिनव कांती, मेघ तयाने धवलीत होती, परी हृदयी नैराश्य काळीमा मम खंडीत नाही
भोवर्‍यात जणू अडलो कोठे, स्वप्न भयंकर दिसते वाटे, जीवन केवळ करूणा संकुल नैराश्ये होई

कधी कधी अशी उदासीनता का येते हे कळले नाही तरी स्वतःच्या बाबतीत डोळस असणार्‍या व्यक्तीस आपली ती "फेज" कधी चालू होत आहे हे सवयीने समजू शकते आणि त्यावर आपल्याला उल्हासीत करणारे उपायपण सुचू शकतात. बरेचसे उपाय वर गुंडोपंतांनी आणि इतरांनी सुचवलेले आहेत. त्यातील एक औषध घेणे हा उपाय सोडल्यास बाकी सर्व मान्य होतात. आता गंमत पहा प्रोझॅक घेतल्यावर डीप्रेशन जाते तर त्याचे साईड इफेक्टस हे त्यांच्याच संकेतस्थळावर सांगीतल्या प्रमाणे: nausea, difficulty sleeping, drowsiness, anxiety, nervousness, weakness, loss of appetite, tremors, dry mouth, sweating, decreased sex drive, impotence, and/or yawning ! म्हणजे आपण बिल माहरने परवाच म्हणल्याप्रमाणे आपण औषध बरे होण्यासाठी घेत आहोत का आजारी पडण्यासाठी हा मोठा प्रश्नच ठरतो! थोडक्यात शब्दशः रोगापेक्षा इलाज भयंकर...

अमेरिकेत (कदाचीत इतर प्रगत राष्ट्रातही असेल) सायकॅट्रीस्ट कडे जाण्याचे प्रमाण अधिक आहे, काउंन्सेलींग करणे अधिक आहे त्याचे एक मुख्य कारण म्हणजे अस्तित्व हरवलेली कुटूंब व्यवस्था. "फॅमिली सपोर्ट सिस्टीम" ला खरे तर खूप महत्व आहे. आपल्याकडे कधीकाळी अतिरेक काही वेळा झाला असला, कधी कुणाला त्रास झाला असला तरी त्यामुळे कायम सरासरी मदतच झाली आहे. पण तो भाग ज्याला अप्रत्यक्ष फायदा म्हणता येईल त्यात मोडतो, त्यामुळे पिकते तिथे विकत नाही अशी अवस्था होते. म्हणून नातेवाईक, चांगले मित्र यांची गरज नितांत असते - आपल्याला आणि त्यांनाही आपली. त्यांच्या असण्यामुळे एकवेळ अडचण झालेली परवडते पण नसल्यामुळे होणारा खोळंबा हा जास्त बोचरा ठरू शकतो.

हा हा हा!!

मला एकदा सुचवावेसे वाटले की डिप्रेशन आले तर उपक्रमावर येऊन चर्चा करा. पण त्यामुळे उगाचच गैरसमज होईल की मी कायमच डिप्रेस असतो म्हणून ;)

हा हा हा!!! मग मी पण डिप्रेस्ड आहे!

आपला
गुंडोपंत

कळते पण वळत नाही!


अमेरिकेत (कदाचीत इतर प्रगत राष्ट्रातही असेल) सायकॅट्रीस्ट कडे जाण्याचे प्रमाण अधिक आहे, काउंन्सेलींग करणे अधिक आहे त्याचे एक मुख्य कारण म्हणजे अस्तित्व हरवलेली कुटूंब व्यवस्था. "फॅमिली सपोर्ट सिस्टीम" ला खरे तर खूप महत्व आहे. आपल्याकडे कधीकाळी अतिरेक काही वेळा झाला असला, कधी कुणाला त्रास झाला असला तरी त्यामुळे कायम सरासरी मदतच झाली आहे. पण तो भाग ज्याला अप्रत्यक्ष फायदा म्हणता येईल त्यात मोडतो, त्यामुळे पिकते तिथे विकत नाही अशी अवस्था होते. म्हणून नातेवाईक, चांगले मित्र यांची गरज नितांत असते - आपल्याला आणि त्यांनाही आपली. त्यांच्या असण्यामुळे एकवेळ अडचण झालेली परवडते पण नसल्यामुळे होणारा खोळंबा हा जास्त बोचरा ठरू शकतो

.
महत्वपुर्ण विवेचन! आर्थिक स्वायत्तता आली तशी एकमेकांना एकमेकांची गरज कमी झाली. ग्लोबली जोडलो पण लोकली तुटलो. संवाद हा कमी झाला. एटीकेट्स् व मॅनर्स यात संवादाची उस्फुर्तता दबून गेली. मैत्रीचे व्यावसायिकि करण झाले. मनांचे यांत्रिकीकरण झाले. माणसं बायोकेमिकल रोबो झाली. कामात गुरफटून घेउ लागली. कधी वर्कहोलिक कधी अल्कहोलिक. मनाची आंदोलने कधी डावीकडे कधी उजवी कडे मंद मंद मग कधितरी बंद; मन व शरीर.

प्रकाश घाटपांडे

लै भारी विषय

पंत,
विषय आवडला आणि त्याबरोबर केलेली विषयाची मांडणीही, कोणालाही लिहिते करणारा हा चर्चा विषय.....!!!!
पंत,
बाकी असा निराशेचा झटका कोणाला चुकला असेल शोधले पाहिजे. निराशा कशामुळे येते आणि त्यावर उपाय कोणते हेही आम्हाला माहित नाही. त्या अवस्थेतून जाणार्‍यावर औषधांचा फरक पडतो की देवधर्माचा तेही आम्हाला माहित नाही. पण, अवस्था मात्र महाभयंकर असते, सतत जीवन संपवण्याचा विचार येतो. आणि हळू हळू माणूस त्याही अवस्थेतून बाहेर येतो.....तो पर्यंत त्याचे औषधे घेऊन झालेली असतात, देवधर्मही झालेले असतात, एखादे-दोन पेगही घेऊन झालेले असतात, पर्यटन झालेले असते, दोस्तांबरोबर गप्पाच्या मैफिली झडलेल्या असतात, लहानग्या मुलाचे गोड पापे घेऊन झालेले असतात,या आणि असेच कोणत्यातरी निमित्ताने त्याचा उत्साह पुन्हा वाढायला लागतो,नव्या उत्साहाने तो पुन्हा जगरहाटीत व्यस्त होतो. आता हे असे का ?

लोकहो, तुम्ही आम्हाला नावं ठेवली तरी चालतील, पण सांगू का च्यायला ....याच्यात आम्हाला देवाच्या लिलेचाच भास होतो राव.......!!!! संकटे तोच निर्माण करतो आणि तोच मार्ग दाखवतो........!!!

देवभक्त अन देवाच्या लिलांना टरकलेला
प्रा.डॉ.... ......

देवभक्तीला नावे का ठेवावी?

लोकहो, तुम्ही आम्हाला नावं ठेवली तरी चालतील, पण सांगू का च्यायला ....याच्यात आम्हाला देवाच्या लिलेचाच भास होतो राव.......!!!! संकटे तोच निर्माण करतो आणि तोच मार्ग दाखवतो........!!!

प्रा.डॉ, देवभक्तीला आणि श्रद्धाळूंना कोणी नावे का ठेवावी? देवावर श्रद्धा ठेवण्यात काहीही गैर नाही. श्रद्धेचं बळ सर्वात बळकट असतं असं माझं मत आहे. केवळ श्रद्धेने कठीण प्रसंगांतून पार पडणारे अनेकजण पाहिले आहेत. मला व्यक्तिशः त्यांचे कधीही हसू आलेले नाही उलट, त्यांच्या विश्वासाचे कौतुक वाटते.

असो. आपल्या श्रद्धेने आपले आणि इतरांचे कोणतेही नुकसान तर होत नाही ना हे पहाणे महत्त्वाचे आणि तसे नुकसान होत नसेल तर श्रद्धाळूंनी घालावा की सत्यनारायण.. इतर कोणालाही त्यांना हसायची गरज नाही.

अगदी हेच

अगदी हेच म्हणायचे आहे. तारतम्य असले, आजूबाजूचे भान असले आणि आपले/इतरांचे नुकसान होत नाही ना एवढे पाहिले तर कोणी देवाला जाऊन येत असले, नामस्मरण करत असले तर काही वाटायला नको.

आता परत श्रद्धा, सत्यनारायण वगैरेवरून शिर्‍यावर जाणार की काय चर्चा? :-)

हे डेंजरस आहे!

नैराश्यात एखादे-दोन पेगही घेऊन झालेले असतात हे फार डेंजरस सोल्युशन आहे! सर येवढे उदास मनस्थितीत नक्की टाळा. एक वेळ आनंदासाठी चालेल.

बाकी इतर आपल्याला मानवतील ते कोणतेही उपाय उत्तम. देवाचे ध्यान हा उत्तम उपाय आहेच.
मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक ध्यानाला बसा.

आपला
गुंडोपंत

हा टोला लय भारी.........

मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक ध्यानाला बसा. : ))))))))))

हे पहा - मदत

हे पहा,
येथे चांगली मदत उपलब्ध आहे.

बियॉंड ब्ल्यु
रिच आउट
इट्स ऑलराईट

यातील इट्स ऑलराईट ही साईट जरा वेगळी आहे.

बियॉंड ब्ल्यु मात्र नक्कीच कामाची आहे.

-निनाद

नैराश्यावर उपाय करताना जर घरच्यांची मदत नसेल तर्..

मला असं वाटतं की मी नैराश्याकडे जात आहे.

माझ्याकडून् मी काही उपाय चालू केले देखील जसं वाद्य शिकणे, गोल्फ् शिकणं. पण याला घरातून् सपोर्ट् मिळत नाही.
याचं महत्त्व सांगायला गेलं तर "तुला कसलं आलं आहे नैराश्य.." असं झटकून् टाकलं जातं.
थोडक्यात मन मोकळं करायला, शेअर करायला पण घरातल्या व्यक्ति असमर्थ ठरतात अश्या परिस्थीती मी काय करावं?

काही सल्ला?

सल्ला

तुला कसलं आलं आहे नैराश्य??
घरचे तुम्हाला फार फार महत्वाचा प्रश्न विचारत आहेत. कसंल नैराश्य आलं आहे ते शोधा मग योग्य उपाय सापडेलच. घरच्यांशी चर्चा करा म्हणजे तुम्ही केवळ बोला असे नाहि घरचे हि असे प्रश्न विचारणारच :) पटतंय का?
-(चकटफू सल्लागार;) )ऋषिकेश

बरोबर आहे पण्..

"तुला कसलं आलं आहे नैराश्य??.."

हा प्रश्न कुठल्या टोन मधे विचारला जातो त्यावर पण अवलंबून् आहे ना? झटकून् टाकणं जास्त लागतं
मदत करण्याच्या उद्देशाने असा प्रश्न विचारला गेला असता तर नक्कीच फायदा झाला असता.

फुकट सल्ला

माझ्याकडून् मी काही उपाय चालू केले देखील जसं वाद्य शिकणे, गोल्फ् शिकणं. पण याला घरातून् सपोर्ट् मिळत नाही.

हे फारसे योग्य नाही. सपोर्ट का मिळत नाही याची कारणे शोधा आणि या गोष्टीत तुम्हाला का रमावेसे वाटते हे घरच्यांना शांतपणे समजावून द्या. याहूनही एक बरा उपाय म्हणजे तुमच्या कार्यक्रमांत (ऍक्टीविटीज) घरच्यांनाच सहभागी करा म्हणजे जोडीने गोल्फ खेळा.

याचं महत्त्व सांगायला गेलं तर "तुला कसलं आलं आहे नैराश्य.." असं झटकून् टाकलं जातं.

याचं महत्त्व सांगताना "नैराश्य" हा शब्द उच्चारू नका कारण या शब्दावर जर "तुला कसलं आलं आहे नैराश्य" असे ऐकायला मिळत असेल तर घरचे तुम्हाला नैराश्य येतं आहे हे समजून अधिक बिथरत आहेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणून तुम्हाला झटकून टाकत आहेत हे समजा. याला वेगळ्या शब्दांत जबाबदारी टाळणे म्हणता येईल.

त्यापेक्षा, काही वेगळे उद्योग केल्याने घरात आनंद राहतोय, प्रसन्न वाटतं आहे याची घरच्यांना जाणीव करून द्या.

थोडक्यात मन मोकळं करायला, शेअर करायला पण घरातल्या व्यक्ति असमर्थ ठरतात अश्या परिस्थीती मी काय करावं?

बरेचदा घरातल्यांना तुमचे मन मोकळे करणे नको असते कारण त्याचा ताण त्यांनाही जाणवतो. मन मोकळे अशा व्यक्तीकडे करावे जिला तुमच्या दु:खाने फारसा फरक पडत नाही पण ते ऐकण्याची तयारी आणि वेळ आहे.(म्हणूनच लोक मानसोपचार तज्ज्ञांच्या सोफ्यावर तासन् तास घालवून वर पैसे मोजतात) तेव्हा एखादा मित्र-मैत्रिण तयार करा.

अवांतरः येथे अमेरिकन लोकांचे उदाहरण डोळ्यापुढे येते. हे लोक कोणत्याही ओळखीपाळखी शिवाय एकदा बोलायला सुरूवात केली की आपला डिवोर्स कसा झाला, पहिला जोडीदार किती वाईट होता, आपली वयात आलेली पोरं कशी बहकली आहेत, आपल्याला लवकरच आणखी एक मूल हवं आहे हे बिनधास्त सांगून मोकळे होतात. हे भकल्याने त्यांना मानसिक समाधान लाभते का ते तेच जाणोत.

सपोर्ट

तुम्ही जर सावध होऊन आधीच मन रिझवण्याचा मार्ग शोधला असलात, तर त्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण त्या मार्गावर जाताना घरच्यांकडून पुरेसा आधार मिळत नसला आणि तुम्हाला तो हवा असला तर तुमच्या अपेक्षा घरच्यांना विश्वासात घेऊन समजावून द्या - अगदी अशा डिप्रेशनच्या वेळीसुद्धा. खालचा दुवा हवे तर तुमच्या जवळच्या व्यक्तींना विश्वासात घेऊन दाखवा, आणि तुमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यात दोन्ही डिप्रेस्ड आणि अशा व्यक्तीचे नातेवाईक/मित्र यांसाठी काय करावे असा सल्ला आहे.

http://www.nmha.org/go/information/get-info/depression/what-to-do-when-d...

तसेच कोणाशी या विषयावरून बोला. एखादा मित्र किंवा वेळ पडली तर डॉक्टरांशी देखील. तसेच इथे सर्वांनी दिलेले सल्ले विचारात घेण्यासारखे आहेत. शिवाय तुम्ही उपक्रमाचा तुम्हाला पडलेला प्रश्न सोडवायला वापर केलात हेही चांगलेच झाले.

धन्यवाद प्रियाली आणि चित्रा..

तुम्ही सुचवलेले उपाय नक्कीच आमलात आणायचा प्रयत्न करेन्.

"..बरेचदा घरातल्यांना तुमचे मन मोकळे करणे नको असते कारण त्याचा ताण त्यांनाही जाणवतो. मन मोकळे अशा व्यक्तीकडे करावे जिला तुमच्या दु:खाने फारसा फरक पडत नाही पण ते ऐकण्याची तयारी आणि वेळ आहे...."
हे प्रियालीचं वाक्य अतिशय शक्य आहे.
जवळचे नातेवाईक, ज्यांच्याकडे मन मोकळं करावं, एकतर एकदम डिफेन्सिव्ह तरी होतात नाहीतर जजमेंटल तरी. त्यातून नवीन मतभेद आणि नवीन ताण. असे अनुभव आल्यावर मी तो उपाय वापरण्याचं सोडून् दिलं.

मित्र, मैत्रिण जमवणं हा उपाय वापरून् बघतो. पण आजकाल आपण आपल्यातच एवढे व्यस्त असतो त्यामुळे अशी व्यक्ति भेटणं हे सुद्धा जरा अवघडच दिसतं आहे. पण प्रयत्न नक्कीच करून बघेन्.

धन्यवाद गुंडोपत, हा विषय मांडल्याबद्द्ल ! मला नक्कीच मदत झाली. एवढं व्यक्त करायची संधी तरी कुठे मिळाली होती आजवर? नंदन, राजेन्द्र यांनी सुद्धा व्य. नि. मधे काही पुस्तकांची नावं सुचवली आहेत. ती पण वाचून काढेन.

 
^ वर