उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
एवढ्यात वाचलेली अमराठी पुस्तके
नवीन
February 18, 2008 - 11:38 am
एवढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट या गुंडोपंतांच्या चर्चांवरून प्रेरणा घेऊन हा धागा सुरू करत आहे. मराठी पुस्तकांबद्दल मराठी साइट्सवर आणि ब्लॉगविश्वात बरेच लिखाण होत असते. पण अमराठी भाषांमध्ये विशेषतः इंग्रजीमध्ये होणारे लिखाण आणि त्यांच्या विषयांची व्याप्ती प्रचंड आहे. चर्चेची साधारण रूपरेषा, आपण इतक्यात वाचलेली कोणती पुस्तके तुम्हाला आवडली? कोणत्या कारणाने आवडली? या शिवाय ही पुस्तके कशी/कुठे उपलब्ध होतील? अशी असावी आणि याशिवाय आपणाला सुसंगत वाटेल अशी अतिरिक्त माहिती देण्यास काहीही हरकत नाही :)
मग सांगा बरे तुम्ही कोणती पुस्तके वाचलीत? आणि ती का आवडली?
दुवे:
Comments
चला मीच पहिला प्रतिसाद देतो
मी सध्या आपल्या कोर्डे साहेबांनी सूचवलेले व राजेंद्रानी दुजोरा दिलेले
एरिच् बर्न चे
'व्हॉट डू यु से आफ्टर यु से हॅलो' वाचतोय.
(हो अजूनही तेच वाचतोय :)))
मध्येच कंटाळा आल्याने सोडून दिले होते आता परत घेतले.)
म्हणजे बरे वाटते आहे. आपल्या लहानपणी घडलेल्या घटनांचा आपल्या "आयुष्य कसे जगावे" हे ठरवण्यामध्ये केव्हढा मोठा भाग असतो हे जाणवते आहे.
शिवाय प्रिझनर्स ऑफ बिलिफ असे पण एक पुस्तक इतक्यातच मिळाले आहे. ते पण वाचण्याचा विचार आहे.
(हे आवांतर मराठी: प. वि. वर्तकांचे वास्तव रामायण इतक्यातच वाचले.
लोहिया महाराजांचा किर्तन मार्गदर्शिका भाग ४ वाचला. आवडला.)
आपला
गुंडोपंत
नावावरून वाटले ...
'व्हॉट डू यु से आफ्टर यु से हॅलो' नावावरून असे वाटले की 'हॅलो' म्हणून झाल्यावर काय काय बोलायचे आपले विचार कसे व्यक्त करायचे अश्या स्वरूपाचे असेल पण विषय वेगळाच वाटतोय. जरा विस्ताराने आणि उदाहरणे देऊन काही सांगता येईल का?
नो लोगो
नाओमी क्लेन चे नो लोगो वाचले.
विचारसरणी बरीच नॉम चॉम्स्की सारखी आहे असे उगाच वाटले.
नो लोगो चे नावच एखाद्या लोगो सारखे लक्षात रहावे असे डिझाईन केले आहे.
पण पुस्तक वाचण्यासारखे आहे.
कॉर्पोरेट व मार्केटींग जगताविषयी बरीच अस्वस्थ करणारी माहिती यात आहे.
या मंडळींनी काही प्रमाणात जग आपल्या फायद्यासाठी वेठीलाच धरले आहे अशी ही जाणीव झाली.
तीचे नवीन आलेले
The Shock Doctrine वाचायचे आहे.
(पुस्तक आमच्या लायब्ररीत बुक करून ठेवले आहे!)
नाओमी क्लेन विषयी येथे वाचा
http://www.naomiklein.org/main
-निनाद
कारणांवर हल्ला
ऍल गोअरचे "ऍन ऍसल्ट ऑन रीझन" वाचत आहे. वैचारीक पुस्तक आहे आणि अमेरिका प्रसारमाध्यमांमुळे, विशेष करून टिव्ही मुळे कशी बदलली ते वाचण्यासारखे वाटले.
दान
बिल क्लिंटनचे "गिव्हिंग" पण अथ पासून इति पर्यंत अजून वाचलेले नाही, पण चांगले आहे.
'नेक्स्ट'
मायकेल क्रायटनची जनुक तंत्रज्ञानावरची 'नेक्स्ट' (कादंबरी)वाचली. (ही बेस्टसेलर का काय होती म्हणे!) एकादा टाईमपास साय-फाय चित्रपट पहात आहे असे वाटले.
उगीच मधेमधे वैज्ञानिक बातम्या, लेख वगैरे देऊन वजन वाढवण्याचा प्रयत्न आहे.
कागदी पाठीचे (पेपरबॅक) हे पुस्तक पदपथावर विकत मिळाले. त्याच लायकीचे आहे.
(फुकट मिळाल्यास एकदा अवश्य वाचावे.)
क्रायक्टन
क्रायक्टन ज्युरासिक पार्कपर्यंत ठीक होता असे वाटते. ग्रेट ट्रेन रॉबरी किंवा डिसक्लोझर हे ही छान होते. त्याचे ट्रॅव्हल्स नावाचे नॉन फिक्शन पुस्तक वाचण्यासारखे आहे. विशेषतः शेवटचे प्रकरण.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
क्रायक्टन?-क्रायटन!
अवांतर-
Crichton चा उच्चार क्रायटन असाच आहे असे वाटते.
प्र.: How do you pronounce your last name?
उ.: It sounds like Cry-ten (rhymes with frighten). It's Scottish.
संदर्भासाठी : ही त्याची मुलाखत वाचा.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
रोचक
माहितीबद्दल धन्यवाद. त्याने स्वतःच म्हटल्यावर उच्चार असाच असेल. गंमत म्हणजे ज्युरासिक पार्कच्या डीव्हीडीमध्ये स्पिलबर्गनेच त्याला क्रायक्टन असे म्हटले आहे. :))
अवांतरः आपल्या भारतीय लोकांची विशेषता म्हणजे आपण नावाचा उच्चार शक्य तितका बरोबर करण्याचा प्रयत्न करतो आणि हा खरोखरीच प्रशंसनीय गुण आहे. नाहीतर पाश्चात्य लोक बुद्धासारख्या सोप्या नावांचीही काय वाट लावतात हे वेगळे सांगायला नको.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
ज्युरासिक पार्क
क्रायटन पेक्षा डॉयलचे डायनॉसोर वाचा हो. झकास आहेत. मागे रोरायमा या पर्वताविषयी एक सुंदर कार्यक्रम दाखवला होता.
त्यात डॉयलच्या पुस्तकाबद्दल आणि प्रवासाबद्दल खूपच मस्त माहिती होती.
-- आजानुकर्ण
सहमत
माहितीबद्दल धन्यवाद. पुस्तक वाचलेले नाही पण नक्कीच वाचनीय असणार. डॉयल म्हणजे बाप माणूस. त्याची आणि क्रायटनची कितपत तुलना होऊ शकेल ठाउक नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
सिटाडेल
ए जे क्रोनिनचे सिटाडेल वाचले. एक नवशिका डॉक्टर, त्याची पहिली नोकरी, हळूहळू वाढत जाणारा आत्मविश्वास, मधेच गावातील मास्तरणीबरोबर प्रेम आणि लग्न असा काहीसा हिंदी शिणेमा आहे. (म्हणूनच तेरे मेरे सपने यावरून काढला का?) नंतर लंडनमध्ये आल्यावर नायकाचा प्रामाणिकपणा कमी होऊन धंदेवाईकपणा सुरू होतो. यामुळे त्याच्या बायकोची होणारी घुसमट, त्याचे एक अफेअर. शेवटी नायकाला पश्चाताप होतो आणि तो सुधारण्याचा निर्णय घेतो. इथपर्यंत ठीक, वाचत होतो. खरे तर इथे शेवट झाला असता तरी चालले असते. पण पुढच्या पानावर नायिकेला आक्शिडंटमध्ये मारून टाकले. तिथे आपण खरोखरच हिंदी चित्रपट बघतो आहोत असे वाटू लागले.
क्रोनिन चांगला लिहीतो, पण या पुस्तकाने थोडी निराशा केली.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
सिटाडेल
सिटाडेलचा मंगला निगुडकरांनी केलेला अनुवाद अतिशय सुरेख आहे. जरुर वाचा.
नायिकेचा मृत्यू हाच मला या कादंबरीचा 'हाय पॉइंट' वाटला.' तेरे मेरे..' मध्ये सुखांत आहे, तोच खरा रसभंग वाटतो... असो..
सन्जोप राव
गंमत
एकाच गोष्टीवर विरोधी मते पाहून गंमत वाटली. मला नायिकेचे अचानक मरणे थोडे कृत्रिम वाटले. असो.
क्रोनिनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतः सर्जन असल्यामुळे रोग, औषधे तसेच त्या काळचे वैद्यकीय क्षेत्र यांचे वर्णन तपशिलवार केले आहे.
---
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
इंपिरिअल ब्लँडिंग्ज
लाईफ ऍट ब्लँडिंग्ज संपवून सध्या इंपिरिअल ब्लँडिंग्ज वाचत आहे. इंपिरिअल ब्लँडिंग्ज मधली पिग्ज हॅव विंग्ज ही गोष्ट वाचणे चालू आहे. लठ्ठ डुक्करांच्या स्पर्धेत आपल्या डुकरिणीला (एम्प्रेस ऑफ ब्लँडिंग्ज) विजय मिळावा व प्रतिस्पर्धी डुकरीण (क्वीन ऑफ मॅचिंगहॅम) हरावी यासाठी अंकल गॅली आणि एम्सवर्थ यांचे प्रयत्न धमाल आहेत.
प्राईड ऑफ मॅचिंगहॅम हा डुक्कर आता स्पर्धेत नाही!
-- आजानुकर्ण
अमराठी पुस्तके
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सुप्रसिद्ध विवेकवादी (रॅशनॅलिस्ट) रिचर्ड डॉकिन्स यांची दोन पुस्तके:
१.गॉड डिल्यूजन
२. सेल्फिश जिन
गेल्या सहा महिन्यांत वाचली. बायबल वाचले नसल्याने "गॉड डिल्यूजन" मधील अनेक संदर्भ आणि संकेत समजले नाहीत. पण डॉकिन्स यांचे तर्कशुद्ध विवेचन आवडले.ही पुस्तके वाचल्याने डार्विनचा सिद्धान्त काही अंशीं समजला. तसेच जीवसृष्टीची निर्मिती आणि उत्क्रांती याविषयीच्या शंकांचे बरेचसे निरसन झाले. (असे वाटते.)
सेल्फिश जीन
या पुस्तकाच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त निघालेली खास आवृत्ती वाचली नसल्यास जरूर वाचावी. यात लेखकाने ३० वर्षात या क्षेत्रात झालेल्या बदलांनुसार त्याची काही मते कशी बदलली किंवा नाही याची शेवटी सुरेख चर्चा केली आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
भन्नाट दिसतेय
जालावर थोडी शोधाशोध करून पाहिल्यावर 'सेलफिश जीन' भन्नाटच आहे असे दिसतेय, याविषयी अधिक विस्ताराने काही सांगता येईल काय?
जॅरेड डायमंडचे "गन्स, जर्मस अँड स्टील" आणि "कोलॅप्स"
ही दोन पुस्तके वाचली.
पैकी "गन्स, जर्मस अँड स्टील" या प्रश्नाबद्दल विचार करते की "जगात कुठेही गेलो, तर मनुष्याच्या बुद्धीची क्षमता साधारण समसमानच दिसते. इतकेच काय, नागर नसलेल्या वन्य जमातीत केवळ तग धरण्यासाठीच पुष्कळदा शहरी लोकांपेक्षा अधिक हुन्नर, हजर/तल्लख बुद्धी आणि विविधकार्यकौशल्य लागते. मग आताचे प्रगत तंत्रज्ञान, त्यापूर्वी लागणारी थोडीफार स्थिर समाजव्यवस्था, त्यापूर्वी लागणारे अतिरिक्त कृषि-उत्पादन, त्यापूर्वी/त्याबरोबर लागणारी पशुसंवर्धन-कला ही शृंखला वेववेगळ्या प्रदेशांत मागे-पुढे का?"
याचे उत्तर लेखक भौगोलिक कारणे सांगून देतो - हवामानाची, वेगवेगळ्या प्रदेशांतील पाळण्यास योग्य असणार्या वन्य प्राण्यांची, कृषीस योग्य अशा वन्य वनस्पतींची तपशीलवार गणना करून. म्हणजे नागरीकरणाच्या वाटचालीसाठी निसर्गाची उपलब्ध साधने जिथे कमी आहेत, तिथेही मनुष्य ती शोधतोच, पण ती शोधेस्तोवर उशीर होतो, पुढची पायरी गाठण्यास आणखी उशीर होतो, आणि त्यामुळे आज दिसतात ते फरक दिसतात.
"कोलॅप्स"मध्ये त्याने बर्याच लुप्त संस्कृतींची उदाहरणे विशद केलेली आहेत. उत्खननात पाहाता, या अशा प्रकारची संस्कृती, जगातील इतर भागांत त्याच काळात होती, तितपत प्रगत दिसते. कधीकधी अधिक प्रगत असल्याचे दिसते. या ठिकाणी ती संस्कृती गडगडून लुप्त का झाली (कोलॅप्स का झाली)? त्याबाबत कारणमीमांसा केलेली आहे. लेखकाच्या विवेचनानुसार बहुतेक ठिकाणी नाशाचे बी पर्यावरणाच्या इतक्या अतिरेकी वापरात होते. हा अतिरेकी वापर पर्यावरणाच्या, वनस्पती/प्राणीसृष्टीच्या पुनरुत्पादनक्षमतेच्या अधिक होता. (सर्व उदाहरणे युरोपियन वसाहतवादाच्या आधीची आहेत.) लेखकाचा गर्भित (तसा बर्यापैकी उघड) इशारा आज "प्रगत" समाजांना आहे. या लुप्त संस्कृतींमधे सर्वनाशापूर्वी काही काळ भरपूर बांधकाम, त्या काळाच्या मानाने विकसित तंत्र वगैरे दिसते, पण हे बहुधा "जीवसृष्टीकडून घेतलेले कर्ज" असते.
एज ऑफ टर्ब्युलन्स
सध्या ऍलन ग्रीनस्पॅन चे 'एज ऑफ टर्ब्युलन्स' वाचत आहे. आत्मचरीत्र रोचक असले तरी ५०० च्यावर पृष्ठसंख्या आणि मुंगीच्या वेगाने वाचन ह्यामुळे गेले बरेच महिने हेच वाचत आहे. त्यापूर्वी इकडे बरेच गाजलेले 'वर्ल्ड इज फ्लॅट' (५००च्या वर पृष्ठ संख्या) अर्धवट वाचून सोडून दिले. जेव्हढे वाचले तेव्हढे बरे वाटले होते :)
एज ऑफ रीझन
थॉमस पेनचे हे १७९४ साली लिहीले गेलेले पुस्तक वाचत आहे. पुस्तक लहानसेच आहे पण लिहीण्याची शैली (भाषा नव्हे) आधुनिक म्हणावी अशी वाटते. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या मागणीवर थॉमस पेनचा खूप प्रभाव असल्याचे म्हटले जाते. हे पुस्तक मुळात वाचण्यासारखे आहे - देव मानणार्यांनी, न मानणार्यांनी. धर्मावरची त्याची मते या पुस्तकात लिहीलेली आहेत. प्राथमिकत: अब्राहमिक धर्मांबद्दलचे (ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम) हे विश्लेषण अमेरिकेच्या नागरिकांना अर्पण केले आहे.
The Age of Reason Being an Investigation of True and Fabulous Theology By Thomas Paine, Moncure Daniel Conway"> निष्पत्ती/अनुमानाचा काही भाग
असे असले तरी पेनचे मत प्रत्येकाला मत असण्याचे स्वातंत्र्य असावे असा आहे हे मुद्दाम नमूद करावे अशी बाब.. याबाबतीत अर्पणपत्रिका वाचण्यासारखी आहे -
The Age of Reason Being an Investigation of True and Fabulous Theology By Thomas Paine, Moncure Daniel Conway">अर्पणपत्रिका
पुस्तक गूगलवरही उपलब्ध आहे.
येथे पहा
फिंगरप्रिंट्स ऑफ द गॉडस्
हल्ली मी कोणतीही पुस्तके वाचत नाही. हल्ली मी पुस्तके ऐकते. त्यानुसार सध्या माझ्याकडे काही ऑडिओ बुक्स आहेत पण ती सर्व वेळघालवू (टाईमपास) प्रकारची आहेत.
काही महिन्यांपूर्वी ग्रॅहम हॅनकॉकचे फिंगरप्रिंट्स ऑफ द गॉडस् वाचत होते. पूर्ण वाचून झाले नाही, पुन्हा आणून वाचायला पाहिजे.
या खेरीज, विकिपीडिया वाचते. ;-)
पुस्तक ऐकणे म्हणजे...
हल्ली मी कोणतीही पुस्तके वाचत नाही. हल्ली मी पुस्तके ऐकते.
ही आमची प्राचीन भारतीय पद्धती. ह्याला आमच्या भारतीय इतिहासात "मौखिक परंपरा" म्हणतात :-) (ह. घ्या.)
ऐकवणारी पुस्तके
हं मीहि असा प्रयत्न केला होता. पेलिकन ब्रीफ ऐकायला आणलं होतं...पण बोर् झालं ;) स्वतः वाचण्याची मजा नाहि आली
(बोर) ऋषिकेश
५० मैल
रोजचा प्रवास करताना अशी पुस्तके बोर होत नाहीत.
सवयीचा प्रश्न आहे. :-)
५० मैल..
अरे बाप् रे! गॅसचे चटके आता चांगलेच बसायला लागले असतील :)..तेलाच्या डबड्याने आज आणखी एक उच्चांक प्रस्थापीत केला आहे..
मी कालच ऐकली
खरे आहे.
म्हैस आणि मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर कालच ऐकले. :))
अरे हो की
:).. हे लक्षातच आलं नाहि .. :).. मानण्यावर आहे... आणि वाचून दाखवणार्यावरही! हे खरंच
सहमत
मानण्यावर आहे... (आणि वाचून दाखवणार्यावरही!)
सहमत आहे. याच गटातील अजून एक म्हणजे अमिताभच्या आवाजातील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
अजून एक ऐकण्यासारखे पुस्तक
लहान मुलांचे "शार्लटस वेब". लेखक इ बी व्हाइट यांनीच पुस्तक इतक्या सुरेख आवाजात वाचले आहे.
पुस्तकही असेच खूप आवडेल याची हमी.
दुबा
अभिवाचन आणि श्रवण
"म्हैस" आणि श्राव्य माध्यमांतून ऐकलेल्या अन्य गोष्टींच्या अनुभवात असणारा फरक अनेक कारणानी असू शकतो. "म्हैस" मधील विनोदाची , त्यातील मार्मिकपणाची पातळी वगळूनही, हा एक "पर्फॉर्मन्स्" आहे हे लक्षात घ्यायला हवे. मला पेलिकन् ब्रीफ आणि इतर पुस्तकांच्या "ऑडीयो बुक्स्"बद्दलचा अनुभव ज्ञात नाही. परंतु हे मात्र खरे की, "लॉस्ट् इन् ट्रान्सलेशन" प्रमाणे "लॉस्ट् इन् लिसनिंग्" असा एक प्रकार असण्याची इथे शक्यता आहे. ("म्हैस" सारख्या प्रकारात "गेन्ड् इन् लिसनिंग्" होते ! :-) )
योग्य निरीक्षण
परंतु हे मात्र खरे की, "लॉस्ट् इन् ट्रान्सलेशन" प्रमाणे "लॉस्ट् इन् लिसनिंग्" असा एक प्रकार असण्याची इथे शक्यता आहे. ("म्हैस" सारख्या प्रकारात "गेन्ड् इन् लिसनिंग्" होते ! :-) )
अचूक शब्दात योग्य निरीक्षण!
गेन इन लिसनिंग
मला वाटते की ज्या साहित्यामध्ये ध्वनीची लय महत्त्वाची असते (उदा : कविता), किंवा लेखकाच्या मनात रंगपट किंवा नाट्यपूर्ण अभिव्यक्ती भिनलेली असते (यात "म्हैस" आलीच), तसे साहित्य अभिवाचनाने साध्या वाचनापेक्षा अधिक खुलते.
पण श्रवण वाचनापेक्षा आवडण्याचे वेगळेच एक कारण हल्लीच एका पुस्तकाच्या बाबतीत अनुभवले. हॅरी पॉटरचे १ले पुस्तक खूप आवडले, म्हणून पुढची भराभर वाचून काढली. पण भाग ४-५ पोचता असे जाणवले की (माझ्यासाठी) लेखिकेची लेखनशैली चावून चोथा झाली आहे. पण तरी कथेबद्दल उत्सुकता लागून होती. मग भाग ६ मुद्दामून श्रवण-पुस्तकातून ऐकला. वाचणारा उत्तम नाट्य-वाचक होता, त्यामुळे कथा उत्कंठेने ऐकली गेली. वाचताना मला एखादे सुंदर वाक्य घोळवायला आवडते. पण त्याच प्रकारे मी एखाद्या रटाळ वाक्यावरही नामर्जीने थबकतो. श्रवणात मात्र तसे थबकता येत नाही. या पुस्तकाच्या बाबतीत हे मोठे फायद्याचे होते.
भाग ७च्या तबकड्या न मिळाल्यामुळे पुन्हा कथावस्तूसाठी छापील पुस्तक वाचले. पण पुन्हा सुंदर लेखनाच्या दृष्टीने विरस झाला. एकच वाक्य विशेष आवडले, खूपच आवडले -
(संदर्भ : हॅरी विचारतो, की हे जे काय अनुभवतो आहे ते खरे की माझ्या डोक्यातच घडते आहे. त्याचा गुरू उत्तर देतो -)
“Of course it is happening inside your head, Harry, but why on earth should that mean that it is not real?”
"अर्थात हे तुझ्या डोक्यात घडते आहे, हॅरी, पण त्याचा अर्थ असा कुठे आहे मुळी, की ते खरे नाही?"
व्हॉट इज रियल?
व्हॉट इज रियल? ही संकल्पना आता वाचून/बघून/चावून चोथा झाली आहे (त्याची खरी कीक मेट्रिक्स ने दीली होती.. आणि ज्याची नक्कल रोलिंगबाई करत असाव्यात असे ह्या वाक्यावरून वाटते आहे) ..सबंध पुस्तकात जर हे एकमेव दाद देण्यायोग्य वाक्य असेल तर त्या हॅरी पॉटरला कधी हात लावला नाही ते उत्तमच झाले म्हणायचे.
ह्याबाबत मी बिल मारच्या, 'वय वाढलेले लोक कसे काय हॅरी पॉटर वाचू शकतात?' ह्या मताशी सहमत आहे!
श्राव्य माध्यम
श्राव्य माध्यमातून ग्रहण करताना मी सहसा गंभीर पुस्तके घेत नाही.
मेरी हिगिन्स क्लार्क
डॅन ब्राऊन
क्लाईव कसलर
जेम्स रोलिन्स
अशी ढांसू पुस्तके मला लागतात. (मराठी कथा श्राव्य माध्यमात उपलब्ध असत्या तर बाबुराव अर्नाळकर ऐकले असते बहुधा ;-))
एकंदरीत फ्री-वे वरचा कंटाळवाणा वेळ बरा जातो. फार लक्षपूर्वक ऐकावं लागत नाही आणि ऐकून झालं की विसरता येतं.
गंभीर विषयांवरील पुस्तके ऐकणे म्हणजे मलाही वर्गातला एखाद्या कंटाळवाण्या तासाला शिक्षकांची बडबड ऐकल्यासारखे वाटते.
दुव्या
बद्दल धन्यवाद!
अजून शोधतो.
मागे ही ऐकायचा प्रयत्न केला पण काही जमले/झेपले नाही.
परत ट्राय मारायला पाहिजे.
-निनाद
ऑनलाईन?
असेच म्हणतो :)
ऑनलाईन ऐकता येतात का? तर मग लगेच ट्राय करतो
डाऊनलोड
डाऊनलोड करता येतात.
मला वाटते प्रोजेक्ट गटेंबर्गवर पण आहेत काही.
गुगला...
-निनाद
ऑनलाईन नाही
मी ऑनलाईन ऐकत नाही, शोधाशोधीही करत नाही. ग्रंथालयात जायचं, सीड्या (सीडींचे अनेकवचन) ;-) आणायच्या आणि कारमध्ये ऐकायच्या. एवढंच करते.
बरीच पुस्तके
बरीच पुस्तके कळली. मी इंग्रजी काही वाचत नाहि.
१०व्वीच्या आधी पीजी वुडहाउस वाचले होते तेव्हढेच.
शिवानी
वुडहाउस, मार्क ट्वेन, ऑस्कर वाइल्ड - एक आवाहन
वर उल्लेखलेल्या लेखकांचे नाव मी बरेच ऐकले आहे पण यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही :(
यांनी लिहिलेली बरीच पुस्तके अनुक्रमे इथे, इथे आणि इथे आहेत. कोणकोणती वाचावीत?
पी जी वुडहाऊस
वुडहाऊस कोणतेहि वाचा आणि कुठुनहि वाचा मस्तच आहे :).. वुडहाऊस काय पुलं काय यांची पुस्तके कधीहि काढा.. आणि कोणतेहि पान उघडा.. केवळ आनंद देणारे लेखक :)
सहमत/असहमत
बाकी वरिल मते वैयक्तीक आहेत् असे समजतो :).. पण त्यातही
मान्य!
हे मात्र अमान्य (अर्थात वैयक्तीक मत;))
हे मात्र पटले :)
पुन्हा असहमत ! जर नॉस्टॅल्गिक व्हायला आवडत नसेल तर् मात्र हे खरं आहे ;) (असो ज्याचा त्याचा प्रश्न ;) )
माझ्याही मते दोन्ही.. मुळात मी वुडहाऊस वाचताना सुरवातीला सिरिज सांभाळल्या होत्या. पण आता कोणतेहि पुस्तक कोणत्या सिरिजचे आहे ही पर्वा न करता काढतो आणि वाचतो :)
वाइल्डची नाटके
इथून गंमत म्हणून सुरू करा. ही भन्नाट विनोदी आहेत. संवाद खटकेबाज तर आहेतच पण एक-एक वाक्य इतके अफलातून व्यंग्यपूर्ण असते की नाटक न बघताही वाचन मनोरंजक असते. मुख्य म्हणजे लहान असल्यामुळे शैली थोडीशीच आवडली, खूप नाही, तरी पूर्ण करायचे फार जिवावर येत नाही.
गटेनबर्ग वर दिसत आहेत :
ऍन आयडियल हजबंड
द इंपॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट
लेडी विडेमियर्स फॅन
अ वुमन ऑफ नो इंपॉर्टन्स
(एखादे नजरचुकीमुळे राहिले असेल)
धन्यवाद, संपादन मंडळास विनंती
ऋषिकेश, टग्या आणि धनंजय, धन्यवाद! तुमच्या शिफारसींमुळे वाचनाला दिशा मिळेल.
संपादक मंडळी, या छोट्या चर्चेचे स्वतंत्र चर्चेत रूपांतर करता येईल का? शक्य असल्यास करावे ही विनंती.
मी वाचलेली पुस्तके
गावी असेतो इंग्रजी वाचन नसल्यातच जमा होते, नोकरीनिमित्त बाहेर पडले आणि सुरू करावे लागले आणि आता आवडूही लागले आहे.
गेल्या वर्षभरापासून शेअरमार्केटवर जरा जास्तच जीव जडलेला असल्याने 'नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस' वाचायला उत्साह आला.
रॉबिन कुकच्या १-२ पुस्तकांचा मराठी अनुवाद वाचला आणि त्यातून आता मूळ कादंबर्या वाचायची प्रबळ इच्छा झाल्याने त्याची पुस्तके वाचायचा सपाटा चालू आहे. क्रोमोझोम-६, कोमा, ब्रेन, म्युटेशन, स्फिंक्स, फिव्हर, आऊटब्रेक, मॉर्टल फिअर, व्हायटल साइन्स, फॅटल क्युअर, टर्मिनल, कंटेजन, ऍक्सेप्टेबल रिस्क, इन्व्हॅजन, व्हेक्टर, ऍब्डक्शन, शॉक, सिझर, मार्कर, क्रायसिस ही वाचून झाली असून सध्ध्या क्रिटिकल वाचायला सुरूवात केली आहे. शास्त्रीय असूनही कळण्यास सोपी भाषा आणि ओघवते वर्णन हे रॉबिनचे मुख्य लेखनविशेष मला आवडले जे त्याचे लिखाण वाचायला मला नेहमी उद्युक्त करतात. फिव्हरमधल्या बापाचे आजारी पोरीबद्दलचे प्रेम् असो वा क्रोमोझोममधले जॅक आणि लॉरीच्या ग्रुपला वाटत असलेले बोनोबोंबद्दलची आस्था असो.. कुठेतरी ते कथानकात मला अपेक्षित असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणाच्या कल्पनेला साजेसे असते, हाही एक भाग असू शकतो.. किंवा असेल.
सायन्स फिक्शन आवडीचा विषय असल्याने त्यानुषंगाने वाचायला जे मिळेल ते घ्यायचे असे सुरू होते.. याच प्रयत्नात रॉबिन कुकच्या लेखनशैलीची आवड लागायच्या अगोदर 'हॉट झोन' पुस्तक वाचनात आले होते. किळस, शहारे, भीती वगैरे सगळे तुमच्यात आणून सोडेल अशी कादंबरी.. वाचायला नकोसेही वाटायचे आणि हवेसेही ! कादंबरी म्हणून इतकी खास वाटली नाही पण एकंदरीत अजब अनुभव होता..
फाउंटनहेड वाचायला सुरूवात केली होती पण नोकरी सोडल्याने वाचून पूर्ण व्हायच्या अगोदरच परत करावे लागले.. पुण्यात कुठे मिळू शकेल तर ते एक वाचन आवर्जून पूर्ण करायचे आहे.