आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट
आपण सगळेच चित्रपट बघत असतो. काही जण अधून मधून तर काही अगदी नियमीतपणे.
आपण कोणते चित्रपट येव्हढ्यात पाहिले आहेत?
या यादीत
अगदी सगळे चालतील फ्रेंच, इटालियन, स्पॅनीश, इंग्रजी, हिंदी, मराठी, तामीळ...
डॉक्युमेंटरीज, आर्ट फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, फिचर फिल्म्स आणि अगदी ऍडल्ट सिनेमे सुद्धा!
;)

मात्र या चर्चेत नुसते चित्रपटाचे नाव देवू नका, त्या चित्रपटात काय आवडले/नावडले तेही द्या.
चित्रपट पाहिल्यावर काय वाटले, भावले, पटले न पटले व तसे का वाटले हे दिलेत तर बहारच!
शिवाय चित्रपटाचे संक्षिप्त कथानक दिले तर फार उत्तम. मात्र सस्पेन्स असेल तर शेवट देवू नका हे सांगणे नलगे!

या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला माहीत नसलेल्या भाषांमधील जागतिक चित्रपटांची ओळख व्हावी ही अपेक्षा आहे.
(त्यामुळे अति गाजलेले हिंदी, मराठी, इंग्रजी सिनेमे यात आले नाहीत तरी चालतील असे वाटते.)

आपला
गुंडोपंत

Comments

हैद्राबादी बकरा

काल आम्ही "हैद्राबादी बकरा" हा चित्रपट आमच्या संगणकावर पाहिला. चित्रपटाने प्रचंड निराशा केली. या विनोदी चित्रपटांच्या मालिकेतील हा तिसरा चित्रपट, याआधी आलेले अनुक्रमे अंग्रेज आणी हैद्राबादी नवाब हे चित्रपट प्रचंड विनोदी होते. हे चित्रपट लो बजेट असुन मुख्यत्वे करुन हैद्राबादी हिंदीत आहेत, हैद्राबादमधिल लोकांचे रहाणीमान तेथिल म्हणी वापरुन उत्तम् विनोदाची भट्टी जमली होती. पण या तिसर्‍या चित्रपटात मात्र मजा नाही आली.

कसा काय?

संगणकावर म्हणजे जालावर?
तो कसा काय बॉ?
आधीचे दोन्ही बघायला आवडतील...

आपला
गुंडोपंत

नाही

जालावर नाही हो, चकती आणुन पाहिला. आधीचे २ नक्की पहा, बरेच दिवस आठवुन आठवुन हसाल. यांच्या चकत्या बाजरात सहजपणे उपलब्ध आहेत. (नाही मिळाल्या तर मी देतो, आपण पुण्यात असताल तर.)

चकतीवर... मग ओके

अच्छा! चकतीवर... मग ओक्के आहे...
मी जालावरच चित्र्पट मिलतात का असा बराच शोध घेतला पण कुठे बघायला मिळाले नाहीत हो!

आपला
गुंडोपंत

भेजा फ्राय

मी जालावरच चित्र्पट मिलतात का असा बराच शोध घेतला पण कुठे बघायला मिळाले नाहीत हो!

भेजाफ्राय वापरून बघा. मी वापरत नाही पण अनेकजण (पेशन्स ठेवून) वापरतात! तेथे "लाईव्ह भारतीय चॅनल्स" पण दिसतात. हे सर्व कायदेशीर आहे का नाही त्याची कल्पना नाही.

सहमत आहे

अंग्रेज बघितला होता ....... दोन तास नुसते खो खो हसत होतो.

द वे होम - कोरीयन चित्रपट

द वे होम - कोरीयन चित्रपट

एवढ्यात नाही, बराच काळ झाला हा सिनेमा पाहून. पण हा चित्रपट जरूर बघा असे सांगण्यासारखा आहे.

संक्षीप्त कथानक -खरे तर इथे वाचा.

आर्थीक दुस्थीतीमुळे, एका आईला तिचे एक अत्यंत लाडावलेले, बेजबाबदार शहरी मुलं, शहरात सांभाळ करणे अवघड होते म्हणून ती त्याला आजीकडे खेड्यात नेऊन सोडते. तो स्वार्थी शहरी मुलगा, त्या खेड्यात अत्यंत खडतर आयुष्य जगणार्‍या, मुक्या व अशिक्षीत आजी कडे हळुहळू कसे प्रेम, दया, निस्वार्थ, संमजसपणा शिकतो, ते बघण्यासारखे आहे.

उल्लेखनीय - ह्यातील जख्ख म्हातारी आजी चे काम केलेली कलाकार, अभिनय तर सोडाच, आयुष्यात त्या स्त्रीने कुठलाही चित्रपट देखील पाहीला नाही.

इशारा - सामान्य प्रेक्षकास हमखास रडू येईल.

येथे एक झलक पहा.

मला तरी हा सिनेमा म्हणजे आपल्या सर्वस्व देणारी पृथ्वी व सतत ओरबाडून घेणारे आपण मनुष्य यांचीच कथा वाटते.
बघीतल्यावर जरुर सांगा, कसा वाटला.

सुरेख

द वे होम - सुरेख सिनेमा. विमानात पहायला मिळाला होत. मनात आठवण कोरून गेला.
आजी कधीच विसरता न येइल अशी आहे. तसेच मुलगा व त्याचे बदलणारे भावविश्वही.

सुसमन!

'सुसमन'नावाचा एक हिंदी चित्रपट बरेच वर्षांपूर्वी पाहिला होता,हातमाग विणकरांवर तो सिनेमा आहे.ओम् पुरी,शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा,नीना गुप्ता ,अन्नू कपूर इ.च्या भूमिका आहेत.
नीना गुप्ता फॅशन डिझायनर असते,कुलभूषण हातमाग वाल्यांकडे तिला घेऊन जातो,ओम् पुरी हा सर्वात उत्तम विणकर असतो,त्याला ती स्वत: डिझाईन्स देते आणि प्रदर्शनासाठी बरीच ऑर्डर देते. शबाना,त्याची बायको त्यातलीच एक विणलेली साडी ठेवून घेते आणि विपरीत अवस्थेमुळे पैशासाठी तालुक्याच्या बाजारात विकते,नीनाचे डिझाईन प्रदर्शनाच्या आधीच बाजारात आलेले पाहून ती भडकते.आणि मग पुढे होणारी परवड.. असा चित्राचा गाभा आहे. सर्वांचीच कामे अतिशय नैसर्गिक!ओम् पुरी तर हातमाग विणकर वाटावा इतका सही उतरला आहे.अत्यंत उत्कृष्ठ चित्रपट! पण त्याची तबकडी/कॅसेट कुठेच उपलब्ध झाली नाही.
स्वाती

सुसमन म्हणजे?

सुसमन म्हणजे?

अभिजित...

काय कळाना

तिकल्ड्या ठिकानि पघितल.पन काय घावल न्हाई.
आमचा येक मित्र ब्यांकेत व्हता. त्यला ब्रांच मिळाली पुण्याजवळची पाषाण. आलेल्या गि-हाईकाला पत्ता विचारला कि तो सांगायचा सुस् चान्न नान्न. त्यला अदुगर सम्जायच नाई. मंग समाजलं. त्ये सुस- चांदे- नांदे अश्या नावाची जवळळी गावं हाय.
मंग ह्ये सुसमन म्हंजे सुस चं गावकरी म्हनायच का?
प्रकाश घाटपांडे

सुसमन

सुसमनचा अर्थ मलाही माहित नाही,पण सिनेमा पाहिला त्यावरून विणकर,हातमागाशी संबधित काही असावा असे वाटते.कोणाला माहित असल्यास कृपया सांगावे,
स्वाती

पिच्चर

आम्ही इदेशी पिच्चर एन् एफ् ए आय् ( फिल्म आर्काईव्ह) ला पघतो. पन खर सांगु का ते पाट्या वाचायला गेले कि कि मंग पिच्चर कं ध्यान जात नाही. पिच्चर पघायला गेले कि त्ये काय बोलतात ते समजत न्हाई. म्हन्जे निस्ता मुक पिच्चर वानी. मंग तामिळि पाह्यला काय आन कोरियन सम्दे यका माळ्चे मनी. आन् विंग्रजी अस्ले कि त्यंचे अक्सेंट समजत न्हाई. येक जन् म्हन्ला ते टारझन दी येप म्यान पिच्चर मध्ये पाट्या चालु व्हतात त्यात म-हाटी नाव हाय् पघुन ये. मी गेल्तो तर पाट्या सोडूने त्याच्या पल्याड काय हाय् त्येच पघायला लागलो. आन् ते म-हाटी नाव का काय त्येच्याकं ध्यान क्वाँचय?
प्रकाश घाटपांडे

वासुदेव बळवंत फडके.

अतिशय छान सिनेमा.
अजिंक्य देव ने वासुदेव बळवंत फडक्यांची भुमिका छान वठवलेय.
रमेश देव यांना चित्रपटात फार काम नाही पण जे काही थोडं काम आहे त्यावरून ते एक कसलेले कलाकार आहेत हे सहज सिद्ध होतं.
रामोशाची भुमिका केलेल्या कलाकाराचं नाव माहीत नाही पण हा एक अतिउच्च दर्जाचा कलाकार आहे हे कळून येईल.
सोनाली कुलकर्णीच काम सुद्धा ठीक आहे पण तो सहज अभिनय वाटत नाही. पण तिचं काम सहनेबल तर नक्किच आहे.
ब्रिटीश गव्हर्नरचा बेरकी पणा त्याच्या नजरेतून सहजपणे व्यक्त होतं.

चित्रपटातील ठिकाणं, कलाकारांचे कपडे यामुळे खरोखरच जुना काळ निर्माण होतो.

चित्रपटाचा काही भाग फिल्मि स्टाईल वाटतो. पण तो नसता तर हा चित्रपट न होता एक डॉक्युमेन्ट्री फिल्म झाली असती. त्यामुळे ते खपवून घेता येईल.

हल्ली आम्ही मराठी सिनेमा पाहतो

बर्‍याच महिन्यांत कोणताही चित्रपट पाहण्याची संधी मिळाली नाही परंतु हल्ली बरेच मराठी चित्रपट पाहिले.

पक पक पकाक
अगं बाई अरेच्चा
कायद्याचं बोला वगैरे

लवकरच,

डोंबिवली फास्ट आणि
श्वास

पाहण्याचा मानस आहे.

काय आवडलं? - मराठीत इतके सिनेमा येत आहेत हेच आवडलं.

फारा वर्षांनी मराठी चित्रपट पाहिलं की भरत जाधवचा सुमार चित्रपट खबरदारही तीन तास पहावला जातो हे कळलं. ;-)

डेमन, शाहरुख आणि मी

एवढ्यात चित्रपट बघण्याचा योग आला नाही. शेवटचा पाहिला(परत) तो मॅट डेमनचा गुड विल हंटींग. एमाआयटी कालेजात सफाईचे काम करणारा एक तरूण तिथल्या गणिताच्या प्राध्यापकांनी बाहेर फळ्यावर लिहीलेली गणिते लीलया सोडवतो. त्याची असामान्य बुद्धीमत्ता पाहून प्राध्यापक त्याला स्वतःबरोबर काम करण्यास प्रवृत्त करतात. पुढे काय होते ते बघण्यातच मजा आहे. मॅट डेमन आणि रॉबिन विलियम्स यांचा अभिनय अफलातून आहे. याचे लेखन मॅटने बेन ऍफ्लेकबरोबर केले आहे.
दुसरा चित्रपट शतरंज के खिलाडी. याविषयी काय बोलावे? बघा आणि आनंद लुटा इतकेच म्हणू शकतो.

तसे शाहरुखचा डॉन आणि रामूचा आगही पाहिले. त्यांच्याविषयी इथे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

काहि आठवताहेत ते

सर्वप्रथम या चर्चेबद्दल गुंडोपंतांचे आभार

फ्रेंच चित्रपट:
याँऽयुकऽ नोऽएल: मेरी ख्रिसमस
यावर मी मिसळपाव वर लिहिले होते.

इटालियन
ladri di biciclette: द बायसिकल थीफ
यावर मी मनोगतवर लिहिले होते.

अरेबिक
Lakposhtha hâm parvaz mikonand: टर्टल्स कॅन फ्लाय
यावर मी मनोगतवर लिहिले होते.

२ चायनिज आणि १ इराणी
नावे कळली नाहि व सबटायट्ल्स नव्हती. पण कथा अशा:
एक इराणी तरुण शिक्षिका शाळेत बाँब ठेवायला नकार देते. त्यामुळे भर बाजारात गाठून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला जातो. तेव्हा ती त्यांच्यातील एकाला त्याच्याच बंदुकीने ठार मारते. व घाबरून अज्ञातवासात जाते. तिची ही कथा

चायनिज चित्रपट मात्र फार लक्षवेधी वाटले नाहित. पण त्यातील ऍक्शन सीन्स खल्लास जबरदस्त होते

धाटणी बाहेरचा इंग्रजी चित्रपटः
The Long Walk Home...
अमेरिकेतील सुप्रसिद्ध काळ्यांनी उभारलेल्या मॉंटेग्मेरी बॉयकॉट वर आधारीत नितांत सुंदर चित्रपट.
ट्रेलरः

ब्रोकबॅक माऊंटन आणि ट्रान्सअमेरिका
लायब्ररीत ऑस्कर विनिंग चित्रपटांचे बुकीग केले होते. त्या सिरिज मधे हे चित्रपटहि आले. यात काय् बघायचं म्हणून बाजूला टाकणार होतो. पण तरीही मिळेल तो ऑस्कर विनिंग चित्रपट बघायचा म्हणून बघितले. आणि माझा पूर्ण अपेक्षाभंग झाला. दोन्ही चित्रपट नितांत सुंदर आहेत. हे चित्रपट वरवर पहाता अनुक्रमे समलैगिंक संमंध आणि छक्के या विषयावर आहेत. पण दोन्ही चित्रपट त्याहिपुढे जाऊन त्या व्यक्तीचा जीवनपट इतक्या कुशलतेने उलगडतात की हे चित्रपट इतरांपेक्षा वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतात

ट्रेलर्सः

अजून आठवतील ते देत जाईनच :)

-(चित्रपटप्रेमी) ऋषिकेश

चार्ली विल्सन्स् वॉर आणि जुनो

नुकतेच बघितलेले चित्रपट

चार्ली विल्सन्स् वॉर आणि जुनो

चार्ली विल्सन्स् वॉर :

थोडक्यात : टेक्सासच्या एका (बदफैली) काँग्रेसमन् ने शितयुद्धात रशियाची एकहाती तोडलेली नांगी. अतिशय वेगवान कथानक. त्याला जोड देणारे चटपटीत संवाद. टॉम हँक्सचा उत्कृष्ट अभिनय. पाकिस्तानी अध्यक्ष झियांच्या भुमिकेमध्ये आपला ओम पुरी! ज्युलिया रॉबर्टसची निवड मात्र 'जोआन' ह्या पात्राच्या भुमिकेसाठी किंचित खटकली.

गुण : ९.५/१०

जुनो

थोडक्यात : १६ वर्षाची जुनो मित्राकडून गरोदर होते. विषय जुना असला तरी दिग्दर्शकाची मांडणी अतिशय नाविन्यपूर्ण त्यामूळे अजिबात रटाळ होत नाही. पात्रनिवड उत्कृष्ट १०/१०!!
वास्तवदर्शी सहज सुंदर चित्रपट

गुण: ९/१०

शक्य असल्यास दोनही चित्रपट आवर्जुन पहा!

चांगली चर्चा

गुंडोपंत,

चर्चेला चांगला विषय निवडलात, फक्त यात वाद कसा घालायचा ते समजत नाही आहे! अर्थात एखाद्यास आवडलेला चित्रपट कसा "ग्रेट " नाही ते लिहू शकू म्हणा:) असो.

मधल्या काळात "अवेक" हा चित्रपट पाहीला. मूळ भाग असा आहे की कधी कधी संपूर्ण ऍनेस्थेशिया देऊनपण माणसांची डोकी शस्त्रक्रीयेच्या वेळीस जागी असतात. अर्थातच संवेदना होत असते पण हालचाली मात्र करता येत नाहीत, भाव दाखवता येत नाहीत. पण बाकी चित्रपट काहीतरीच वाटला.

तसाच दुसरा पाहीलेला पण लहान मुलांचा चित्रपट म्हणजे "एन्चांटेड". परीकथेतील (ऍनिमेटेड) पात्रे खर्‍या जगात येतात. आमच्या लहानमुलीने तो सिनेमा एन्जॉय केला त्यामुळे आम्हीपण :-)

काही कायम आवडलेले अमेरिकन चित्रपसः इट्स वंडरफूल लाईफ आणि तसाच ए टाईम टू कील. अजून ही बरेचसे जाता येता पहायला आवडतात.

नॉन्सेन्स - डोके बाजूला ठेवून बघण्याचा, आपण पाहतोय म्हणजे पोरकट तर नाहीना अशी शंका येइल असा एक सिनेमा (विमानात फुकट पहायला मिळाल्यास अथवा केबल वर असला तरच आणि दुसरे काहीच करायला नसले तर पहाण्यासारखा म्हणजे उमा थर्मन असलेला "माय सुपर एक्स गर्लफ्रेंड"...

बघण्यासारखे दोन

दी गॉड्स् मस्ट बी क्रेझी
आफ्रिकेतील एका मूळ रहिवाशांना एका वैमानिकाने टाकलेली एक बाटली मिळते, त्यांना वाटते देवाने ती पाठवली. त्या बाटलीचा ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करतात पण लवकरच त्यांच्या लक्षात येते की कधी नव्हे ती त्यांच्यात त्या बाटलीमुळे भांडणे सुरू झाली आहेत आणि म्हणून गॉडस मस्ट बी क्रेझी कारण त्यांनी ती बाटली दिलेली असते. पुढे काय काय होते, कथा रोमँटिकही आहे, विनोदी आणि हृद्य. मिळाल्यास जरूर बघा. आम्ही दोन तीनदा बघूनही कधीही कंटाळा आलेला नाही.
http://www.imdb.com/title/tt0080801/

मेल ब्रूक्सचा हिस्टरी ऑफ द् वर्ल्ड -१ असाच खूप एंजॉय केला आहे. लेखन/दिग्दर्शन मेल ब्रूक्सचे, त्यामुळे चित्रपट अतिशय फाजील/चटोर/टवाळ आहे पण त्याच्या हुषारीची कल्पना चित्रपट बघूनच येईल.
http://www.imdb.com/title/tt0082517/

दी गॉड्स् मस्ट बी क्रेझी

दी गॉड्स् मस्ट बी क्रेझी - विनोदी पण विचार करायला लावणारा,
माझाही आवडता चित्रपट आहे.

व्हिडिओदुनिया.कॉम्

बर्‍याच जणांनी जालावर कोठे चित्रपट पाहता येतो का असे विचारले आहे... आणि इतर अनेकांच्या मनातही असेल.

http://www.videoduniya.com/ येथे चित्रपट पाहता येतात. दर्जा बेताचा आहे हे मात्र ल़क्षात घ्यावे. पण संग्रह दांडगा आहे. काहीकाही वेळा चांगली प्रतही मिळते.

ऐष करा लेको...

एकलव्य

दोन्ही

उत्तम संग्रह आहे, पण
अंग्रेज व हैद्राबादी बकरा दोन्ही येथे दिसले नाहीत

सीडी शोधतो

अंग्रेज

अंग्रेज इथे पहा. मला तरी हा सी ग्रेडचा लो बजेट फालतू चित्रपट वाटला. अर्ध्या तासाच्या वर बघू शकलो नाही.
-कोलबेर

तसेच

http://www.stage6.com
इथेही काही चित्रपट बघता येतील. हिंदी/मराठी चित्रपट कमी आहेत, इतरभाषीय चित्रपट/चित्रफिती बर्‍याच आहेत. दर्जा बर्‍यापैकी चांगला आहे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मी पाहिलेले

आमच्या कडे एस बी एस नावाच्या चॅनलवर बहुतेक सगळ्या भाषातले चित्रपट येत असतात.
त्यात मागे नाइन क्विन्स (Nueve reinas ) हा स्पॅनीश/ अर्जेंटिनाचा चित्रपट पाहिला. खुपच मनोवेधक चित्रण, गतिमान व खुप गुंतागुंतीची कथा. यातले रिचर्ड डरिन चे काम आवडले. सिनेमा काय आहे ते मुद्दाम सांगत नाही. मात्र शेवट चकित करून सोडतो. नक्की पाहा, मी सलग दोन वेळा पाहिला आहे. (त्याचे कारणही तुम्हाला कळेलच).
लेखन, दिग्दर्शन - फाबियां बेलिन्स्की
येथे रिव्ह्यु १ रिव्ह्यु २

नाइन क्विन्स - Nueve reinas

झलक

एका शॉटची झलक द्यायचे विसरलो ती येथे पहा.

मस्तच!

हा नऊ राण्यांचा चित्रपट मी दोनदा बघितला. शेवटचे गुपीत माहीत असल्यामुळे अनेक तपशील लक्षात आले, त्यामुळे दुसर्‍यांदा वेगळी मजा वाटली.

भाषा

सब टायटल्स् सहीत बघीतलात का? ही झलक तरी काहीच कळली नाही :(

हा इंग्रजीतही आला होता

मी मात्र सब टायटल्स् सहीतच पाहिला. (नाहीतर काहीच कळला नसता)
मी वर एस बी एस च उल्लेख केला. त्यावरचे सगळे सिनेमे सब टायटल्स् सहीत असतात

हा इंग्रजीतही आला होता

मी मात्र सब टायटल्स् सहीतच पाहिला. (नाहीतर काहीच कळला नसता)
मी वर एस बी एस च उल्लेख केला. त्यावरचे सगळे सिनेमे सब टायटल्स् सहीत असतात

फ्रेंच सिनेमा - ल बॅत्तेमाँ दा ली दु पापिलिआँ

काल रात्री परत एस बी एस वरच फ्रेंच सिनेमा Le Battement D'ailes Du Papillon ल बॅत्तेमाँ दा ली दु पापिलिआँ
(इम्ग्रजी: The Beating Of The Butterfly's Wings ) हा पाहिला.

ल बॅत्तेमाँ दा ली दु पापिलिआँ

जरा वेगळा. आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेला काही ना काही अर्थ व कारण असते असा संदेश देणारा.

परत याचाही लेखक /दिग्दर्शक एकच आहे: लौरें फिरोदे

रेह्व्यु येथे आहे.
सिनेमा बरा होता. ऑड्रे तातु ने (नायिका) इतका मक्ख पण केला आहे की विचारू नका (Audrey Tautou) पण बाकी एरिक सहीत इतर सगळे कलाकार चांगले आहेत

-निनाद

अ पॉर्नोग्राफिक अफेयर - आँ लियाझाँ पॉर्नोग्राफिक

अजुन एक फ्रेंच सिनेमा -
Une liaison pornographique (1999) (A Pornographic Affair) आँ लियाझाँ पॉर्नोग्राफिक /अ पॉर्नोग्राफिक अफेयर पाहिला, वेगळाच विषय.

A Pornographic Affair

फक्त सेक्स करण्यासाठी म्हणून जाहिरातीतून, पॅरिस मध्ये नायक नायिका भेटतात. पण पुढे हे भेटणे तेव्हढेच रहात नाही.

त्यातला सेक्स हा भाग आधीच गेल्याने त्यांना एकमेकांची वेगळीच ओळख होत जाते व ते नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पण पुढे... पडद्यावर पहा (हा हा हा - कसा दुष्टपण केला मी)
नताली बे (बाये?) व सर्जी लोपेझ दोघेही मस्त. विषेशत: नतालीचा पहिल्या भेटीत असणारा अस्वस्थपणा झकासच दाखवला आहे. नंतरही मोकळेपणा मस्तच आहे.

नाव पॉर्नोग्राफिक असले तरी सिनेमा 'स्वच्छ' आहे. काळजी नसावी... (गेली बहुतेक निम्मी व्ह्युअरशीप ;-) )

रिह्यु येथे आहे

दिग्दर्शक: फ्रेडरिक फाँटेन
मुख्य पात्रे: नताली बे, सर्जी लोपेझ

मुळ सिनेमा फ्रेंच आहे. मला एस बी एस च्या कृपेने इंग्रजी सबटायटल्स सहीत बघायला मिळाला (म्हणून कळला)

मागच्या वर्षीचा शॉर्टबस

केवळ पोर्नोग्राफी वरून आठवले.

२००६ साली "शॉर्टबस" नावाचा चित्रपट पाहिला. त्याचा आयएमडीबी दुवा.

एक जोडप्यांना सल्ला देणारी मानसशास्त्रीय सल्लागार असते. तिचे स्वतःचे लैंगिक आयुष्य बरेच उत्तम चालू आहे असे भासले, तरी ती गुप्तपणे त्याविषयी अतृप्त असते. तिच्याकडे दोन पुरुषांचे जोडपे आपल्या समस्या सोडवण्यासाठी येते. त्यांच्या ओळखीने ती एका सेक्सक्लबमध्ये जाते. (कथानकाचा दुवा.) त्या सल्लागारिणीच्या-तिच्या पतीच्या, आणि सल्ल्यासाठी आलेल्या त्या जोडप्याच्या, समस्यांचे भावनिक मूळ काय, ते कसे निरसावे, हा कथावस्तूचा संघर्ष. संभोग हा आत्म-त्रस्त नसून आनंदमय असू शकतो, असावा, हा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन कथानकात सर्वत्र जाणवतो.

यात सर्व प्रकारचे लैंगिक संबंध थेट चित्रित केले आहेत. सामान्य "ए" चित्रपटांसारखे चित्रण अंधुक निळ्या प्रकाशात नसून पोर्नोग्राफिक चित्रपटांसारखे लख्ख पांढर्‍या प्रकाशात केलेले आहे.

तरी हा चित्रपट पोर्नोग्राफी नाही असे माझे, आणि माझ्या ज्या मित्रांनी चित्रपट बघितला त्यांचे मत आहे. कारण लैंगिकता आणि लैंगिक क्रिया ही त्या चित्रपटातील प्रमुख पात्रांच्या भावनिक जीवनाला स्पर्श करणारा जरुरीचा भाग आहे, त्यांच्या भावनिक समस्येचे कारण आहे. चित्रपट बघताना प्रेक्षकाला पात्रांच्या भावनाविश्वात गुंतायला होते, आणि संभोगाची दृश्ये त्या अनुषंगाने प्रासंगिक वाटतात.

(पोर्नोग्राफी मध्ये भावनाविश्व वगैरे नसतेच, आणि प्रेक्षकाचे मन संभोगक्रियेत गुंतवायचे हेच दिग्दर्शकाचे उद्दिष्ट असते. कथावस्तू असते, पण ती साधारणपणे क्षुल्लक आणि निरर्थक असते.)

नावात "पोर्नोग्राफी" नसले तरी "शॉर्टबस" हा चित्रपट लहान मुलांनी बघण्यासारखा नाही. पण तरीही स्वच्छ मनाच्या प्रौढाने बघितल्यास हा चित्रपट स्वच्छच आहे, आवडण्यासारखा आहे.

इरॉस थेरपी

त्याच रात्री पुढे इरॉस थेरपी Eros Therapy (I Am Your Man) हा २००३ सालचा, फ्रेंच, काहीसा विनोदी सिनेमा बघितला पण काही आवडला नाही, काहीच्या काहीच होता. (आणि नावावर जाऊ नका, तसेही काहे नाहीये) मात्र सिनेमात
काही अनपेक्षित वळणे इंटरेस्टींग होती त्यामुळे उत्सुकता टिकवू शकला, नाहीतर संपेपर्यंत झोप्लोच असतो.

दिग्दर्शक: डेनियल दुब्रॉ
प्र. भू. : कॅथरीन फ्रॉट, इसाबेल कार, फ्रांस्वा बर्लांड, आदी.

eros-therapy

eros-therapy1

रिह्यु येथे आहेच.

एक न आवडलेला सिनेमा, अर्थातच एस् बी एस कृपेने सब टायटल्स सहीत.

-निनाद

वा वा! 'द मोटरसायकल डायरीज'

वा! वा! बरेच चित्रपट यादीत दिसत आहेत.
चित्रपट पाहतांना मला वेळ लागतो बॉ. मी कधी तरीच पाहतो तो पण कुणी आधी पाहिलेला असेल तरच. मी मात्र इतका काही फाष्ट नाही...

त्यामुळे खुप दिवसांनी कसाबसा मला ऑस्कर विनर 'द मोटरसायकल डायरीज' नावाचा चित्रपट चकतीवर मिळाला...पाहिला... झकास आहे!

१९५२ सालची दक्षिण अमेरिकेत घडणारे ही कथा आपल्याही मनात खुप प्रश्न उपस्थित करून जाते हे नक्की.
आधीचा उथळपणा, नंतरचे अनुभव व त्यातुन येत जाणारी दृष्टी व काहीसे शहाणपण. मी तर एकदम इम्प्रेस्स् आहे बॉ!

शिवाय दक्षिण अमेरिका, तेथली सामान्य माणसं नि त्यांची राजकिय परिस्थिती यावरही काही भाष्य करून जातोच हा चित्रपट.

त्यांचे ते जगणे शेवटी कुष्टरोग्यांच्या आश्रमात काम करणे... भारावून टाकणारे आहे.

खुपच आवडला आहे हा सिनेमा मला. वॉल्टर साल्लेस नावाचा कुणी डायरेक्टर आहे.

तुम्हाला कुठे बघायला मिळाला तर नक्की पाहा. काही वेगळा विचार करणारी / करु शकणारी लोक या जगात होती, आहेत या विचारानेच परत उत्स्फूर्ततेने जगावसं वाटायला लागतं.

इथे त्याची थोडी माहीतीपण आहे. http://us.imdb.com/title/tt0318462/

आपला
गुंडोपंत

आज चक्क धूम

आज आमच्या एस बी एस वर चक्क धूम चालू आहे

वा

चर्चेचा विषय सुरेख आहे. इथे आलेले प्रतिसाद वाचून 'बघितलेच पाहिजेत' अशा चित्रपटांच्या यादीत भर पडली. अलीकडे मी 'रोमन हॉलिडे', 'माय फेयर लेडी', 'तारे जमीं पर' (हा फर्स्ट डे फर्स्ट शो!)इ. चित्रपट पाहिले. या चित्रपटांबद्दल मी काय बोलणार शिवाय इथल्या जवळ जवळ प्रत्येकाने ते पाहिले असतीलच.

साधरण २-३ वर्षांपूर्वी आशियाई चित्रपट स्पर्धेत दाखवले गेलेले काही चित्रपट (सबटायटल्स सहीत) पाहण्याचा योग आला होता. त्यावेळी 'कलर ऑफ पॅराडाईस' , 'चिल्ड्रन ऑफ हेवन', 'ओसामा' (हे तिन्ही मुस्लिम देशांतले सिनेमे होते, भाषा आता आठवत नाहीत) तसेच 'द रोड होम' (चिनी) असे काही चित्रपट पाहिले. हे सर्वच अफलातून आहेत.

राधिका

काही अजून

अमेली (Amelie) हा फ्रेंच चित्रपट गेल्या वर्षी पाहिला होता. त्याच्या वेगळेपणामुळे आणि त्यातील नायिकेच्या अतिशय बोलक्या डोळ्यांमुळे लक्षात राहिलेला. त्याबद्दल अधिक माहिती येथे.

आपल्या लहानग्या मुलीने सौंदर्यस्पर्धा जिंकली पाहिजे म्हणून कॅलिफोर्नियाला निघालेल्या कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींची कथा सांगणारा 'लिटल मिस सनशाईन' देखील असाच लक्षात राहणारा चित्रपट. निश्चा वाचणारा घुमा भाऊ, चेन-स्मोकर आई, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला मामा, आयुष्यात यशस्वी कसे व्हावे याची व्याख्याने देऊन त्यातून पैसा मिळवण्याचा 'अयशस्वी' प्रयत्न करणारे वडील आणि मादक पदार्थांच्या आहारी गेलेले आजोबा या सगळ्या यातल्या इतर वेगवेगळ्या व्यक्ती. हॉटेलात खाणं यायची वाट पाहत असताना आई-वडिलांत काहीतरी क्षुल्लक वाद होतो. तो पाहून कसनुशी होणारी ती मुलगी अगदी जिवंतपणे एकाच छोट्या प्रसंगात दाखवली आहे, तो लाजवाब.

द ट्रेजर ऑफ सिएरा मॅड्रे हा हंफ्रे बोगार्टचा चित्रपट आणि डॉग डे आफ्टरनून हा अल पचिनोच्या सुरुवातीच्या काळातला चित्रपट - हेही आवडले. नुकताच 'देअर विल बी ब्लड' हा चित्रपट पाहिला. टेक्ससमध्ये तेलाचे साठे शोधून यशस्वी झालेल्या व्यावसायिकाबद्दलचा. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांचा विरस होऊ नये म्हणून हे अगदीच ढोबळ वर्णन, पण एकंदरीत चित्रपट 'सिटीझन केन'च्या अंगाने जातो.

बाकी वर सांगितलेल्या संकेतस्थळांव्यतिरिक्त गूगल व्हिडिओवर आणि यूट्यूबवरही काही चांगले चित्रपट पाहता येतील. जसे की राशोमोन, एक रुका हुआ फैसला, ग्रेप्स ऑफ रॅथ, स्पिलबर्गचा ड्युएल इ.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

फॅरनहीट ९/११

मायकल मूर चा
फॅरनहीट ९/११ पाहिला.
बाकी तर सगळे माहीत होतेच.

आपला मुलगा या युद्धात गेला आहे हे सत्य मान्य करण्याचा प्रयत्न करणारी व त्या अनुषंगाने हे सर्व का? असा येणारा प्रश्न खूप अस्वस्थ करून गेला.

एकुणच विचारात पडलो.

झोप् आली नाही.

बराच राग आला.

अस्वस्थता देवून गेला हा सिनेमा(?)/डॉक्युमेंटरी.
-निनाद

फॅरनहाईट ९/११

फॅरनहाईट ९/११ मधल्या एका प्रसंगावर पंजाबी डबींग करून पाकीस्तानी लोकांनी हा धमाल व्हिडीयो बनवला आहे! चाचू बुश झिंदाबाद!!!

दिसत नाहे????

बघायचा आहे,
पण दिसत नाही???

परत लिंक देणार का?

-निनाद

ऍन इनकन्व्हीनियंट ट्रूथ

माहीतीपटांचा विषय काढला तर, ऍन इनकन्व्हीनियंट ट्रूथ पण पहाण्यासारखा आहे. सांगायची गरज नसावी पण ऍल गोअर चा हा माहीतीपट पर्यावरण बदलासंबंधात आहे.

अजून नाही पाहिला...

पाहण्याच्या माझ्या लिस्ट वर आहे हा. अजून नाही पाहिला...
-निनाद

सहमत

ऍन इनकन्व्हीनियंट ट्रूथ आणि फॅरनहाइट ९/११ दोन्ही उत्कृष्ट माहितीपट आहेत. दोन्हीही पहाण्यासारखे आहेत.
मायकेल मूरचा सिको पाहिला आहे का कुणी?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सिको

हो सिको पाहिला आहे. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याच्याशी खूप जवळचा विषय असल्याने मला आवडला. मायकल मूर हा बर्‍याच गोष्टी खूप एक्जाजरेट (फुलवतो?) करतो त्याकडे थोडे दुर्लक्ष करावे! आमच्या इथल्या प्राध्यापक बाईंनी तर तो ह्यावर्षी त्यांच्या वर्गातल्या मुलांना वर्गातच दाखवला.

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद. बघण्याच्या यादीत टाकला आहे. मायकेलचा बोलिंग फॉर कोलंबाइन फारच प्रभावी वाटला होता.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सेक्सी बॉइज

आज आमच्या एस बी एस वर
स्टिफन कझांजियन (Stéphane Kazandjian)लिखित, दिग्दर्शीत,
सेक्सी बॉइज हा २००१ सालचा फ्रेंच सिनेमा पाहण्याचा विचार आहे.
जागा राहिलो आणि सगळा सिनेमा पहिला तर उद्या कसा होता सांगेनच. :)

साधारणपणे लेख दिग्दर्शक एकच असला की मग सिनेमा काही वेगळाच बनतो असे मला वाटते.

शिवाय त्या नंतर "तरूण मुलांमधे कॅन्सर" हा वेगळा विषय असलेला का स्पॅनीश सिनेमा प्लँता ए ४ (Planta 4A) 4th Floor पण आहे. २००३ साल चा हा सिनेमा माँट्रीयल फिल्म फेस्टीव्हलचे पिपल्स चॉइस पिपल्स अवॉर्डस घेवून गेला होता.

दिग्दर्शक आहे ऍंतोनियो मर्सेरो . (Antonio Mercero)

बघु कितीवेळ जागा राहतो :)
-निनाद

झोपेचा विजय

एकही पाहिला नाही :((

झोपेचा विजय झाला.
रात्री ८.३०ला झालेले आक्रमण थेट सकाळी ११ला संपले.
मस्त झोप झाली पण. खुप दिवसांनी इतकी झोप्.

-निनाद

आज प्रयत्न करून पाहतो.

आज प्रयत्न करून पाहतो. आज पण बरे सिनेमे आहेत असे दिसते.
मिस्टर ऍव्हरेज (comme Tout Le Monde) आहे आज. हा पण फ्रेंच. आमच्या एस बी एस ला फ्रेंच सिनेमे आवडतात बहुतेक्.

आज एस् ओ एस म्हणजे शॉर्ट् ऑन स्क्रीन्स आहेत. हे कधी कधी बरे असतात.

-निनाद

 
^ वर