महात्म्याचा पराभव

वरील शिर्षक हे म.टा. मधील अग्रलेखाचे आहे, खालचा लेख हा म.टा.चा अग्रलेख आहे! मी फक्त उर्धृत करत आहे. तो वाचत असतानाच तसेच महात्मा गांधींची ६०वी पुण्यतिथीच्या निमित्ताने नक्की आज भारतीय समाजात नक्की गांधीवाद कुठे दिसतो आणि गांधीवादी कुठे दिसतात असे वाटते?

महात्म्याचा पराभव

मोहनदास करमचंद गांधी! माणसाचा महामानव आणि महामानवाचा महात्मा कसा बनतो, याचे मूतिर्मंत उदाहरण. कमरेला पंचा आणि हातात काठी घेणाऱ्या कृश शरीरयष्टीच्या या माणसाने कोणतेही शस्त्र हाती न घेता ब्रिटिशांची सत्ता उलथवली. एका बाजूला क्रांतिकारकांनी पुकारलेला ओजस्वी लढा आणि दुसऱ्या बाजूला महायुद्धानंतर खिळखिळी झालेली ब्रिटिश व्यवस्था यामुळे भारतावरील सत्ता सोडणे गोऱ्यांना क्रमप्राप्त होते, असा युक्तिवाद कोणी मांडेलही. पण गांधीजींच्या आंदोलनामुळे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला राष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले, शिवाय या चळवळीला नैतिक अधिष्ठानही लाभले, हे नाकारता येणार नाही.

गेल्या शतकाने जगाला दिलेल्या पाच युगपुरुषांची यादी करायची, तर माओ-त्से-तुंग, माटिर्न ल्युथर किंग, लेनिन, नेल्सन मंडेला यांच्याबरोबरीने महात्मा गांधींचे नाव आदराने घ्यावे लागेल. अशा या महात्म्याला ईहलोकीची यात्रा समाप्त करणे भाग पडले, त्या घटनेस आज साठ वषेर् होत आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीला देश आदरांजली वाहात असताना महात्माजींकडून आपण काय शिकलो आणि त्यांची शिकवण कितपत आचरणात आणली, याचाही विचार करायला हवा. तो मन सुन्न करणारा आहे. गांधीजी या शब्दाबद्दलच घृणा बाळगणाऱ्या पंथाचे लोक आजही त्यांची निंदा करण्यात धन्यता मानत आहेत. पण महात्माजींच्या नावाची जपमाळ सतत ओढत, मतांचा जोगवा मागून सत्तेची सिंहासने उबवणाऱ्या राज्यर्कत्यांनी महात्माजींची दर घडीला हत्या करण्याचे गेली साठ वषेर् चालवलेले पाप अधिक भयावह आहे. गांधीजींनी ज्या ज्या आघाड्यांवर काम केले व समाजशुद्धीचा यज्ञ चालवला, त्या सर्व क्षेत्रांत त्यांचेच पाठीराखे म्हणवणाऱ्यांनी राजकीय स्वार्थाचा चिखल निर्माण केला. त्यामुळेच त्यांच्या हौतात्म्याला साठ वषेर् झाली, तरी राजकीय हत्यांचे सत्र थांबलेले नाही आणि अस्पृश्यतेच्या रुढींचेही पूर्णपणे उच्चाटन होऊ शकले नाही. कायद्याने स्पृश्यास्पृश्य भेदभाव नष्ट झाले; संसद, विधिमंडळे व अन्य सभागृहांत रिझवेर्शन मिळाले आणि नोकरी-शिक्षणात राखीव जागांची सोय झाली, म्हणजे अस्पृश्यता निवारण झाले, अशी सोयीची समजूत राज्यर्कत्यांनी करून घेतली. अस्पृश्यतेची भावना खरेच नाहीशी झाली असती, तर खैरलांजीचे काळे पर्व होऊ शकले नसते.

गांधीजींनी समाजाला एकत्र आणण्यावर भर दिला. त्यांचे अनुयायी मात्र कधी जात, कधी धर्म, कधी प्रांत, तर कधी वर्गाच्या नावाखाली समाजाला दुभंगवून त्यांच्यातील विद्वेषाच्या आगीवरच आपल्या पोळ्या भाजू पाहात आहेत. 'वैष्णव जन तो तेणे रे कहीये जो पीड परायी जाने रे' हा त्यांचा धर्म होता. सुशिक्षित तरुणांची बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आकाशाला भिडणारी महागाई, विजेचे, पाण्याचे दुभिर्क्ष या आणि अशा शेकडो समस्यांमुळे भारतवासी पीडित असताना केवळ सेन्सेक्स वधारला, उंच इमारती, मॉल्स आणि पंचतारांकित हॉटेल्स उभी राहिली व मूठभर लोकांच्या खिशात पैसे खुळखुळू लागले, म्हणजे देशात सुबत्ता आली असे उच्चरवात सांगणारे राज्यकतेर् देशात आहेत. त्यांना त्या महात्म्याची शिकवण कशी उमगावी? अखंड हिंदुस्थानची फाळणी ब्रिटिशांनी केली. स्वातंत्र्य मिळण्यापूवीर्च तसा आग्रह महमद अली जीना यांनी धरला होता. पण फाळणीचे खापर महात्माजींच्या माथी फोडणारे पंथ आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्यापैकी काहींना पुढे जीनांच्या 'महानते'ची जाणीव झाली, ही गोष्ट वेगळी. पण १९४७च्या फाळणीला विरोध करणाऱ्यांनीच पुढे भारताच्या केलेल्या अनेक भावनिक फाळण्यांची गणती कोण करणार? गांधीजींनी स्वदेशीची चळवळ केली. त्यांच्याच पक्षाच्या आजच्या नेत्यांनी परकीय गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली भारतीय बाजारपेठेचे दरवाजे परकीयांना खुले केले. ग्राहकवादाचे स्वागत करताना इथला शेतकरी, कारागीर व कामगार यांचे किती नुकसान होते, त्याची काळजी करण्याच्या मनस्थितीत कोणी नाही. गांधीजींनी 'चले जाव'चा नारा देऊन इंग्रजांविरुद्ध देश पेटवला.

इंग्रज गेले आणि आता भारतात शिकून तयार झालेले हुशार आणि होतकरू तरुणही स्वत:लाच 'चले जाव'चा आदेश देत इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक होऊ लागले. परदेशातील पक्का माल इथे येऊ लागला आणि बुद्धिमत्तेचा 'पक्का' माल देशाबाहेर जाऊ लागला. जे राज्य करतात, त्यांचीच पुढली पिढी परदेशगमनात आघाडीवर असल्याने कोण कोणाला थोपवणार? 'सेवा और सादगी' हे व्रत गांधीजींनी हयातभर अंगीकारले. बिर्ला, बजाज यांच्यासारख्या उद्योगपतींनाही त्यांनी साध्या राहणीची दीक्षा दिली. आज मात्र उद्योगपतींच्या उंची राहणीमानाशी स्पर्धा करणारी जीवनशैली राजकारण्यांनीच अवलंबलेली दिसते. असो.

गांधीजींच्या हौतात्म्याच्या साठाव्या वर्षी त्यांचे स्मरण करताना त्यांच्याच शिकवणुकीचा पराभव करण्याचे पाप आपण करत आहोत, याची थोडी जाणीव राज्यकतेर् आणि राजकारण व समाजजीवनाच्या विविध स्तरांवर वावरणाऱ्यांनी ठेवली, तरी ती महात्म्याच्या स्मृतीला आदरांजली ठरेल.

Comments

आजी/नात न्याय

माझ्या बहिणीला पंजाबी सूट आणि आजीला नऊवारी साडी कुठल्याशा समारंभाच्या निमित्ताने मी खुद्द दिले आहेत. आजी आणि नातीला सरसकट एकच न्याय लावावा या बाबतीत माझा वैयक्तिक विरोध आहे. बहीण गंमत म्हणून एकवेळ नऊवारी नेसेलही (पण बहुतेक आहेर वाया जाईल), आजी तर सलवार कमीज घालण्यास साफ नकार देते.

अवांतर

वरील तक्त्यात शेख अब्दुल्ला कुठे दिसत नाहीत ते? कारण ते पंडित नेहेरूंचे बंधू असल्याची "कुजबुज" मी काही वर्षांपूर्वी ऐकली होती! कदाचित नवीन "संशोधनात" त्यांचे नाव वगळले असावे!

हा तक्ता अगदी खरा आहे असे जरी मानले तरी ऋषिकेश म्हणतात त्या प्रमाणे "ग्राऊन्ड रियालिटी" काही बदलत नाही. देवदेव करीत त्यांच्या नावाचा फायदा उपटणारे अजून दोन-चार पिढ्यातरी विनाधोक आपला धंदा करू शकतील.

असो, चर्चा महात्मा गांधींवर चालू आहे तेव्हा सदर तक्ता येथे अवांतरच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चालकांना निवेदन

चाणक्यरावांचा प्रतिसाद बालिश वाटल्याने त्यावर टीकात्मक टिप्पणी करणारा माझा इथला प्रतिसाद उडवलेला दिसतो. शक्यतो मॉडरेटर्सनी चर्चेत भाग घेऊ नये असा समस्त फोरम साईट्स वरती एक अलिखीत नियम असतो आणि तो इथेही पाळला जावा. अन्यथा आपल्या विरोधात आलेले प्रतिसाद उडवुन चर्चा एककल्ली होण्याची आणि सभासदांचा इंटरेस्ट् त्यातून कमी होण्याची शक्यता संभवते.

वाचकांचा रसभंग टाळण्यासाठी चालकांनी कृपया ही खबरदारी घ्यावी ही नम्र विनंती.

मजकूर संपादित. कृपया, संकेतस्थळावरील सदस्यांविषयी व्यक्तिगत रोखाची टीकाटिप्पणी, आरोप करणे उपक्रमाच्या ध्येयधोरणांत बसत नाही याची नोंद घ्यावी.

-संपादन मंडळ.

हा काय प्रकार आहे?

मी कुणावरही व्यक्तिगत आरोप केलेला नाही.
माझा मूळ प्रतिसाद उपक्रम ह्यांच्या खरडवहीत अजुनही पहायला मिळेल (त्यांनी उडवला नसल्यास!) माझे लिखाण संपादीत करुन वर हा नसता आरोप संपादन मंडळाने माझ्यावर करू नये.

माझ्या प्रतिसादात उडवण्यासारखे काहीही नव्हते असे प्रतिपादन करणारा 'सुनील' ह्यांचा प्रतिसाद आला होता. तो देखिल आता उडवलेला आहे. त्यांनी कुणावर व्यक्तिगत आरोप केला होता ते कळावे. तसेच संकेतस्थळाची ध्येय धोरणे कुठे वाचता येतील ते कळावे त्यामध्ये आपली व्यक्तिगत आरोपांची व्याख्या देखिल कळेल अशी अपेक्षा आहे.

आजच्या मटातील लेख

आजच्या मटातील हा लेख. खास करून शेवटचा परिच्छेद हा विशेष. विचार करायला प्रवृत्त करणारा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2747133.cms

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सुरेख लेख

वाह!!! फार सुरेख लेख आहे. सुनीलराव, इथे दुवा दिल्याबद्दल आभार
तुम्ही म्हटल्या प्रमाणे शेवटचा परिच्छेद

"गांधी समजून घेणे ही कष्टप्रद, पण आनंददायी अशी उठाठेव आहे; कारण गांधींविषयीची समजूत जशी वाढत जाते, तसे आपणही वाढलेले असतो! तेव्हा गांधींच्या खुनानंतर साठ वर्षांनीही ही उठाठेव करायला हरकत नाही!

"

अप्रतिम!!

चित्रपट.

हे दृश्य गांधी चित्रपटात पाहण्यासारखे आहे. गांधी आरोपी म्हणून न्यायालयात येतात आणि ब्रुम्सफिल्ड त्यांना आदर म्हणून जागेवर उभे राहतात. न्यायाधीश उभे म्हणून सर्वच न्यायालय उभे राहते. ( प्रेक्षकात टाळ्याचा कडकडाट).

गांधींनी अहिंसेचा पुरस्कार हिटलर विरुध्द व्हावा असे प्रतिपादन केले असताना एका जर्मन नागरिकाने सांगितले की आमच्या कडे कोठे ब्रुम्सफिल्ड आहे?

सुंदर

अतिशय सुंदर लेख. गांधीजींच्या विचारांमागची भूमिका इथे स्पष्ट दिसते. हे संपूर्ण निवेदन आंतरजालावर उपलब्ध आहे का?

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

इंदिरा गांधींसंबंधी....

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
ही माहिती पाहा. किती खरे आणि किती खोटे हे आपले आपण ठरवा.

कठीण

याला पुरावा काय ते दिलेले नाही. लग्नाचे आहे ते चित्र खोटे आहे असा मथळा देऊन ते खोटे ठरत नाही. अशी ष्टोरी कुणाबद्दलही लिहीता येणे सहज शक्य आहे*, पण यावर विश्वास बसणे कठीण आहे.

*हे थोडे वर्तक ष्टाइल वाटते. क्यालिफोर्निया म्हणजे पूर्वीची काशी वगैरे काहीतरी :)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

नाही पटले

राजेंद्रशी सहमत. (फक्त वर्तक बर्‍याचदा पुरावे पण देतात आणि त्यांनी कॅलीफोर्नीयाची "काशी" केली नव्हती ! :-) )

आपण दाखवलेल्या संकेतस्थळावरील माहीती न पटणारी आहे. कुठलेही संदर्भ नाहीत हे त्याचे मुख्य कारण. शिवाय एकंदरीतच भडक लिहीणे वाटले.

तरी पण विचार करा की त्यात जे काही म्हणले ते सर्व खरे आहे (मला वाटत नाही, वादापुरतेच खरे मानतो):

आपण इंदीरा गांधींचा विचार हा त्यांच्या राजकीय जीवनावरून करू शकतो - त्यात शिव्या घालायच्याच असल्या तर तशा घालायला भरपूर स्कोप त्यांनी ठेवला होता. आणि तो स्कोप त्यांनी जो ठेवला त्याचे कारण त्यांचा धर्म नव्हता तर त्यांची वृत्ती होती.

त्याजर मुसलमान होत्या तर त्यांचे दहन कसे केले गेले. त्या इतक्या मंदीरात कशा जायच्या. पुरीच्या मंदीरात जाण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने का केला असावा वगैरे अनेक प्रश्न त्यात येतात.

या वर अजून बरेच मुद्दे मांडता येतील पण इतके प्रतिसाद म्हणून पुरेसे वाटते.

 
^ वर