सर्व समाजाची (जाती आणि जमातीची )माहिती हवी आहे ?

महाराष्ट्रातल्या विविध जाती आणि जमातींची माहिती हवी आहे . मातंग, चर्मकार,मेहतर, ढोर, बुरुड, पद्मशाली, कोल्हाटी,कुडमुडे जोशी, काशी कापडी, घिसाडी, परदेशी भोई, कहार, ढींबर, वेडू वाघरी, गोपाळ, वैदू, घारे कंजर, बेलदार, सिक्कल गार, टकारी, रामोशी, रजपूत भामटा, कंजारभाट, पारधी, छप्परबंद, राजगौंड, मांग गारुडी,मराठा, ब्राम्हण, मुस्लीम, आणि राहिलेल्या महाराष्ट्रातील विविध जाती जमातींची ,त्यांच्या रुढी,परंपरा, सण,उत्सव आणि समाजाबद्दलची माहीती हवी आहे. . जाणकारांनीच माहिती सांगावी असा आमचा हट्ट नाही, ज्याला कोणाला जशी असेल त्या स्वरुपात, अवांतर, विषयांतरासहीत, उपक्रमाच्या धेय धोरणात बसेल अशा सर्वांनी माहिती द्यावी ही नम्र विनंती !

आपला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Comments

कुणबी समाज?

कुणबी समाज (जात?) म्हणजे नक्की कोणता?
जसा चांभार, सुतार हे समाज त्यांच्या व्यवसायानुसार ओळखले जातात तसा कुणबी समाजाचा व्यवसाय कोणता?
मी कूठेतरी कुणबी शेतकरी असा शब्दप्रयोग वाचल्याचं आठवतय. कूणबी समाजातील ही पोटजात आहे का?
हा समाज देशावर, कोकणात आणि कर्नाटकात सुद्धा आढळतो का? (पेपरात कुणबी सेना म्हणून वाचलं होतं).
जाणकारांच्या उत्तराची वाट पाहत आहे.

धन्यवाद,
रम्या

जाणकारांच्या.......

जाणकाराच्या उत्तराची आम्हीबी वाट पाहतोय. कुणबी म्हणजे शासकीय आणि निमशासकीय सेवेत नौकरीसाठी धनदांडग्या मराठा या जातीच्या लोकांनी शेती करीत असल्याचा दिलेला शासकीय पुरावा म्हणजे कुणबी का ? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाणकाराच्या उत्तराची वाट

प्रा.डॉ. साहेब माझा अंदाज खरा ठरला, अजून तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत.
(इतर जाणकार उत्तर देतील त्यांच्या बद्दल संदेह नाही)

व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित. - संपादन मंडळ.

कोणी सांगितले आम्ही जाणकार आहोत !

आम्ही दिला प्रतिसाद रम्यासेठ ला ! ते काही बोलत नाहीत. आमच्या प्रश्नातच आमचे उत्तर दडलेले आहे,असे आम्हास वाटते !
जाणकारांचे उत्तरे येतीलच.

व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित - संपादन मंडळ.

कुणीबी

मला याबाबत विशेष माहीत नाही, परंतु तळकोकणात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळतो. मराठा जातीच्या समाजातील एका शेतकर्‍याला कोणा अधिकार्‍याने तुझी जात कुठली, या अर्थाने तुम्ही कोण?, असे विचारले असता त्याने कुणी बी असे उत्तर दिले. त्यामुळे या समाजाला कुणबी असे नाव पडले असे मागे एका वृत्तपत्रीय लेखात वाचल्याचे आठवते. 'कुणबी मातला की मराठा होतो', या जातीय/द्वेषमूलक म्हणीतून या जमातीकडे बघण्याचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्ट व्हावा.

बाकी गुगलले असता, संत तुकारामांच्या गाथेत - "बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां" अशी ओळ सापडली.

कुणबी-कुळंबी

मला वाटतं कुणबी हा कुळंबी या शब्दाचा अपभ्रंश असावा. हा शब्द कोकणातला असावा असेच वाटते. शेत कुळवणे म्हणजे शेत नांगरणे असे असावे त्यावरून पूर्वीच्या शेतमजूरांना कुळ-कुळंबी म्हटले जाई. पाण्यात चिंच कुळव असे ही ऐकले आहे, कुळव म्हणजे मळ, वरखाली कर इ. असावे.कुळवाड्याचं पोर इ. द्वेषमूलक शब्द म्हणा किंवा मातीत खेळणार्‍या लहान मुलाला मजेत म्हटलेले ऐकले आहे.

कुळ-कायद्यानुसार पुढे जो राबणार त्याचे शेत या कायद्याने मूळ मालकांकडून कुळांना जमिनी दिल्या गेल्या.

श्रीमान योगीत धाराऊ या संभाजी राजांना दूध पाजणार्‍या दूधआईचे वर्णन कुणबाऊ असे केले आहे. श्रीमान योगी ही कादंबरी म्हणून तो इतिहास नाही परंतु शिवाजी राजांच्या सैन्यात अठरा पगड जातींनी शस्त्रे उचलल्याचे दिसते म्हणूनच या समाजाची मराठा समाज म्हणून गणना होत असावी.

मी जाणकार नाही तेव्हा चू. भू. दे. घे.

या रंगातील सर्व शब्द या एकाच जमातीशी संबंधीत आहेत असे वाटते.

अवांतरः फारा वर्षांपूर्वी चित्रलेखांच्या अंकात सर्व जाती जमातीविषयी माहिती येत असे.

कुणबीण

केशव भिकाजी ढवळे यांनी न-वेळा पुनर्मुद्रित केलेल्या एका शब्दकोशात कुणबीण म्हणजे दासी हे वाचून तथाकथित कुणब्यांनी(९६-कुळी मराठ्यांनी) शब्दकोशाच्या हजारो प्रती उध्वस्त केल्या होत्या. ढवळ्यांना तो कोश, तो उल्लेख गाळून परत काढावा लागला. तसे पाहिले तर मराठीच्या कुठल्याही कोशात हाच अर्थ दिलेला असतो. जिजाबाईकडे कुणबिणी राबत असत, वगैरे उल्लेख ऐतिहासिक पुस्तकांत असतातच. --वाचक्‍नवी

आमची अपुरी माहिती

पुर्वीचे स्वतःला ९६ कुळी समजाणारे मराठा लोक कुणबी समाजाला सवलतींची कुणकूण लागल्यावर स्वतःला "कुणबी" समजू लागले. शिवाजी महाराज कुणबी होते असेही काही लोक म्हणतात. त्यावर देखिल वादंग आहे.
प्रकाश घाटपांडे

महार समाज ?

आपल्या महाराष्ट्रातल्या महार समाजाबद्दल माहीती हवी आहे. . महार समाज म्हणजे नेमका कोणता समाज. महाराष्ट्रातल्या पहील्या तीन अ़क्षरात महार हा शब्द येतो याचा अर्थ काय? कृपया जाणकारांनी याबाबत माहीती द्यावी अशी विनंती
आपला
कॉ.विकि

महा-राष्ट्र

महाराष्ट्र चा उगम महान राष्ट्र असाच असावा. (मराठेचा उगम मरहट्टे - महारथी असा असल्याचे वाचल्याचे स्मरते. महाराष्ट्र-मुंबई-मराठी म ने सुरु होणे योगायोग असावा.)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

महाराष्ट्र-मराठी

महाराष्ट्र-मुंबई-मराठी म ने सुरु होणे योगायोग असावा.)

महाराष्ट्री ही प्राकृत भाषा पूर्वी येथे बोलली जाई. मुघली काळात त्यांचे बरेच अपभ्रंश झाले तरी महाराष्ट्रीवरून महाराष्ट्र् आणि मराठी (महाराष्ट्रीचा अपभ्रंश) निर्माण झाले असावेत असे वाटते.

राष्ट्र

महार+राष्ट्र= महाराष्ट्र असे असू शकत नाही का?
आपला
कॉ.विकि

नाही

महार+राष्ट्र= महाराष्ट्र न होता महार्राष्ट्र झाले असते. (शिवाय महाराष्ट्रात महार हा बहुसंख्य समुदाय नाही. त्यामुळे अशा संधीविग्रहाचे खास प्रयोजन देखील नाही.)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

महाराष्ट्र = महारांचे राष्ट्र !

महार या मूळ जातीवरुन या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडलं हे मत येथील अनेकांना पचायला खूपच जड आहे यात शंका नाही. इतिहासाचार्य राजवाडे, भांडारकर, काणे वगैरे मंडळींनी महाराष्ट्र या शब्दाचं वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण करण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु ज्ञानकोशकारांनी आपल्या "प्राचीन महाराष्ट्र' या ग्रंथात सर्व आक्षेप निकालात काढून महार या जातीवरून महाराष्ट्र असं नाव पडलं असा निर्वाळा दिला आहे.

http://khattamitha.blogspot.com/2008/02/blog-post_05.html

मोल्जवर्थ म्हणतो

खट्टामिठावरील या लेखात "मोल्स्वर्थ यांनीही आपल्या मराठी शब्दकोशात महार या अस्पृश्‍य जातीवरून महाराष्ट्र हे नाव पडले असावे, अशा तऱ्हेचा अर्थ दिला आहे. " असे वाक्य येते.

हा मोल्जवर्थचा ऑनलाईन दुवा. मलातरी असा अर्थ मिळाला नाही.

खट्टा.. आणि खट्टाच!

इतिहासाचा अर्थ कसाही काढता येतो. छत्रपती शिवरायांना लुटारू-पेंढारी म्हणणारेही (अजूनही) आहेतच.
रामदास केवळ ठोसर होते म्हणून ते शिवरायांचे गुरू नव्हतेच असे म्हणण्यापर्यंत मजल पोचली आहे.
छत्रपतींचे बिरुद फक्त " क्षत्रियकुलावतंस" इतकेच होते असा (जावई)शोध लागल्यास नवल नको.

उपरोल्लेखित ब्लॉगस्पॉटवर नेहमी एका विशिष्ट जातीवर चिखलफेक आढळते. हे एकप्रकारे जातीयवादी लेखनच आहे.
इतिहासाचे प्रतिक्रियात्मक लेखन असे निवडून-निवडून देणारा हा ब्लॉग एका कावीळग्रस्त माणसाचा आहे असे वाटले.
त्यावर दिलेले पुस्तकांचे उतारे कोणत्या विचारसरणीच्या किंवा वादाच्या लेखकांचे आहे हे पाहिले असता
ते एकांगी आहेत याची खात्री पटते.

उपक्रमवरचे सदस्य सुजाण आहेतच. अधिक सांगणे नलगे.

वा पंकजराव

महार या मूळ जातीवरुन या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडलं हे मत येथील अनेकांना पचायला खूपच जड आहे यात शंका नाही. हे आपल म्हणण १००% सत्य
आपला
कॉ.विकि

गावगाडा

प्र. ना. आत्रे नामक एका ज्येष्ठ लेखकाचे "गावगाडा " नामक पुस्तक महाराष्ट्रातील सर्व जातीव्यवस्थांची अतिशय उत्तम माहिती देते. जातीव्यवस्थेबाबत हा एक पूर्ण संदर्भग्रंथ (कंप्लीट रेफरन्स) मानता येईल.

अनिल अवचटांचा बलुतेदारी नामक लेख एका पुस्तकात आहे (पुस्तकाचे नाव आत्ता आठवत नाही) पण त्या लेखातही बलुतेदारांतील १२ जातीविषयी चांगली माहिती मिळेल.

- (वाचक) आजानुकर्ण


आम्हाला येथे भेट द्या.

प्र नव्हे, त्रिं

"कर्ण" , तुम्ही "प्र. के. आणि त्रिं. ना. (त्रिंबक नारायण) या दोघांच्या नावांचा संकर केला आहे. :-)

नजरचूक

दुरुस्तीबद्दल धन्यवाद.


आम्हाला येथे भेट द्या.

गावगाडाबद्दल

स.ह. देशपांडे यांचा लेख :

http://www.epw.org.in/epw/uploads/articles/4221.pdf

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

मस्त

लेख उत्तम आहे. स.ह.देशपांडे यांनी लिहिलेली (बहुधा) मिलिंद बोकील यांच्या "जनांचे अनुभव पुसता" ची प्रस्तावना उत्कृष्ट आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

अजून एक प्रश्न

....गारुडी,मराठा, ब्राम्हण, मुस्लीम, आणि राहिलेल्या महाराष्ट्रातील विविध जाती जमातींची ...

मुस्लीम ही जात कशी काय झाली? अथवा वेगळा धर्म असल्यामुळे जमात म्हणता येते? त्यामुळे प्रथमच पडलेला प्रश्न - जमात म्हणजे काय? जात नाही ती जात ही व्याख्या मात्र मला व्यावहारीक पातळीवर पटते.

जात-जमात

यांचे इंग्रजी प्रतिशब्द कास्ट आणि ट्राईब लक्षात घेतले तर फरक कळण्यास अडचण येऊ नये.


आम्हाला येथे भेट द्या.

जमात

जमात शब्द उर्दू असावा. (जमात-ए-इस्लामी) अर्थ - समूह??

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

भरपुर साहित्य आहे

रामनाथ चव्हाण, उत्तम कांबळे यांची पुस्तके वा लेखमाला वाचल्या कि त्यात उदंड माहिती मिळ्ते. पुण्यात तरी ती सह्ज उपलब्ध आहे. " दलित ब्राह्मण" हा शरणकुमार लिंबाळेंचा कथा संग्रह अत्यंत वाचनीय आहे, उत्तम कांबळ्यांच 'प्रथा अशी न्यारी" यात ही अनेक उल्लेखा आहेत.
मुंबई इलाक्यातील जमाती हे खूप जुने पुस्तक " वरदा बुक्स " मधे अनुवादित आहे. गुन्हेगार जमातींची ' Modus Operendi' एका इंग्रज अधिकार्‍याने ते लिहिले आहे. आधिक तपशील अत्ता आठवत नाही. यनावाल सांगू शकतील. त्यांना विचारा.
प्रकाश घाटपांडे

हो मी ही मागे

हो मी ही मागे वाचलय हे पुस्तक.
हे ५० वर्षांपुर्वीचे पुस्तक पोलिस अधिकारी आजही वापरतात म्हणे...
मग ते अधिकारी किती पुर्वग्रह दूषीत असतीत, हे विचारायलाच नको नाही का?

आपला
गुंडोपंत

गुंडोपंतांशी असहमत

काही सूज्ञ् अधिकारीच ते पुस्तक वापरतात.Modus Operandi साठी . फासेपारधी जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का बसला आहे ते उगीच नाही, त्यात आपण गुन्हा करतो आहे हे त्यांना मान्यच नसते. तो त्यांचा परंपरागत साईड धंदा आहे.प्रथेचा भाग आहे. गुन्हेगार पकडण्यासाठी त्यांच्या पालावर जावेच लागते. लपवलेला मुद्देमाल व गुन्हेगार तिथेच सापडतात ही तपास अधिकार्‍यांचा आजही अनुभव आहे. वरिष्ट पोलिस अधिकारी स्टेजवर काहीही म्हणोत. समाजातील होतकरु तरुणांना प्रबोधित करणे, त्यांना पर्यायी उपजिविकेची व्यवस्था करुन देणे. समाजाच्या प्रवाहात सामावून घेणे ही दिर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.
खर तर प्रबोधन हे पोलिसांचे काम नव्हे. तरी देखील ते करत असतात आपापल्या परीने, कुवतीने हे मी पाहिले आहे.
प्रकाश घाटपांडे

यांतल्या अनेक जाती

मी कधी ऐकल्याही नाहीत.

ढोर, पद्मशाली, कुडमुडे जोशी, काशी कापडी, घिसाडी, ढींबर, वेडू वाघरी, गोपाळ, घारे कंजर, बेलदार, सिक्कल गार, टकारी, कंजारभाट, छप्परबंद, राजगौंड, मांग गारुडी हे सर्व कोण आहेत आणि ही लीश्ट कुठे मिळते?

-राजीव.

अगदी खरे

मीही यातली केवळ ढोर ऐकली आहे. बाकी कधी ऐकल्याही नाहीत.
कुडमुडे जोशी ही वेगळी जमात/जात आहे? की केवळ पौरोहित्य करणार्‍यांना पडलेले नाव आहे?

माझे बहुजातीय मित्र

डॉक्टर सहेब,

चांगला विषय शोधून दिलात. ही चर्चा वाचत असताना माझ्या नकळत लक्षात आले की माझ्या सख्ख्या मित्र मंडळात ढोर, चांभार, माधांग-जोशी (तुमच्या यादीत हे नाहीत), लमान, वंजारी, मांग, ब्राम्हण (कोकणस्थ, देशस्थ, ऋगवेदी, यजुर्वेदी), कुणबी, शहान्नवकुळी-मराठा, आक्करमासी-मराठा, तेली, जैन, मारवाडी, मारवाडी-ब्राम्हण, लिंगायत, वाणी, ... असे अनेक जाती पडजातीतले मित्र आहेत. त्यातल्या काहींच्या जीवनशैलीबद्दल लोकांना बरेचवेळा माहिती नसते वा गैरसमज असतात. तेव्हा वेळ काढून ढोर, माधांग-जोशी , लमान, वंजारी, मांग, लिंगायत तसेच वाणी यांच्या जीवनशैली बद्दल तसेच अनुभवाबद्दल एक वेगळा लेख लिहीन म्हणतो.

आपला,
(जातवाला) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

अजुन एक माहिती

नागपुरहून प्रकाशीत एक पुस्तक कि ज्यात केवळ ब्राह्मण समाजातील पोटजाती. रुढी. अस्मिता, परंपरा इ. माहितीचा कोष आहे. एके काळी कोकणस्थ - देशस्थ विवाह हा आंतरजातीय विवाहासारखा मानला जात असे.
पुस्तकाचे नाव व लेखक आठवत नाही. साधना मिडिया सेंटर शनिवार पेठ पुणे फोन नं०२०-२४४५९६३५ व्यवस्थापक श्री माटे यांचेकडे वर्गीकरण केलेलि यादी मिळते.
प्रकाश घाटपांडे

माझे सगळ्याप्रकारचे मित्र आहेत!!!

माझा एक मित्र(?) आहे. एकारांत.
हा स्वतः डॉक्टर आहे.
शिक्षण पुण्यातले. एकदा बोलतांना आपण कसे मल्टीकल्चर होत चाललो आहोत असा विषय निघाला.
तेंव्हा हा म्हणतो, "माझे पुण्यात सगळ्या प्रकार चे मित्र आहेत, साने, लेले, नेने, जोशी, देशपांडे झालेच तर तो खरे अगदी सगळ्या प्रकारचे!"
म्हणजे जणू 'ब्राह्मण पोटजाती तील मित्र असणे' हा ही एक मोठा कल्चरल एक्सटेंशनचा भागच होता त्याच्या साठी.

मी माझ्या मित्रांची आडनावे सांगितल्यावर तो काही बोलेनासाच झाला..
बहुदा आता मी त्या 'आपल्यातला' वाटत नसणार ;))))

आपला
गुंडोपंत

कल्चरल एक्सटेंशन

'ब्राह्मण पोटजाती तील मित्र असणे' हा ही एक मोठा कल्चरल एक्सटेंशनचा भागच होता त्याच्या साठी.

कठीण आहे - तुमच्या मित्राचे.

हे मराठी लोकांमधले झाले. मी एकदा एका सर्व भाषिक लोक असलेल्या एक प्रकारच्या भारतीय संस्कारवर्गात एका दाक्षिणात्य बाईबरोबर बोलत होते - तिचीही मुलगी माझ्याच मुलीच्या साधारण वयाची म्हणून ओळख वाढवायला. आधी काही वेगळे वाटले नाही पण नंतर असेच काहीतरी चालू असताना ती म्हणाली, आम्ही शैव आहोत आणि वैष्णव संस्कार टाळायचे असले तर ते येथे या वर्गात कसे शक्य आहे? तेथे आलेले एक मोठे गृहस्थ वैतागले तरीही त्यांनी तोल न ढळवता आपण एकत्र का येतो ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या बाईने नंतरच्या काही दिवसांतच मुलीला तेथे आणायचे थांबवले.

सहमत

कठीण आहे - तुमच्या मित्राचे.

सहमत आहे. माणसांची वर्तुळे इतकी संकुचित असू शकतात याचे आश्चर्य वाटले. सुदैवाने पुण्यात असूनही आमच्याकडे अशी काही बंधने नव्हती. त्यामुळे भाषा, धर्म वगैरेची आडकाठी न येता मैत्री करता आली. आणि यामुळे आपले विचार अधिक मोकळे व्हायला मदत होते असेही लक्षात आले.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कधी न ऐकलेल्या जाती

शाहिर आत्माराम पाटील यांच्या या गीतात बर्‍याच जांतीचा उल्लेख आहे.

http://www.manogat.com/node/9978

निराळे = आणखी एक जात

"निराळे" जातीतले लोक प्रामुख्याने मराठी असून ते महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या तीन राज्यातच व खूप कमी संख्येने आहेत.

आपला,
(निराळा) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

जातींविषयक माहिती

कालच्या लोकसत्तातील लोकरंग मध्ये "वरूणराज भिडे" यांचा १९९४ मधल्या लेखाची संपादित आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. ही माहिती राजकीय दृष्टीने लिहली आहे.
http://www.loksatta.com/daily/20071202/lokkal.htm इथे वाचा

 
^ वर