तू बर्फी, मी पेढा..;)
राम राम मंडळी,
उपक्रमवर अद्याप कविता विभाग सुरू झालेला नाही. तो जोपर्यंत सुरू होत नाही तो पर्यंत उपक्रमवर कुणीही काव्यलेखन करू नये अशी उपक्रमने नुकतीच एक सूचना केली होती, ती अद्याप स्मरणात आहे.
परंतु आज पुढे ढकललेल्या एका ईपत्रातून मला एक कविता मिळाली ती येथे द्यावीशी वाटते/वाटली. ही कविता निखळ करमणूक करणारी असून मला अत्यंत आवडली. केवळ कविता विभाग सुरू न झाल्यामुळे (!) येथे कुठलाही काव्यप्रकार प्रसिद्ध करण्यावरच उपक्रमने बंदी केली आहे याची मला कल्पना आहे. तरीही हा गुन्हा मला मान्य असून मी तो जाणीवपूर्वक करत आहे. शिक्षा म्हणून उपक्रमाच्या सभासदत्वाला मुकण्याचीही माझी तयारी आहे!
तू आणि मी!
तू सुई, मी दोरा
तू काळी, मी गोरा!
तू पोळी, मी भात
तू फुटबॉल, मी लाथ!
तू बशी, मी कप
तू उशी, मी झोप!
तू बॉल, मी बॅट,
तू उंदीर, मी कॅट!
मी मुलगा, तू मुलगी
तू साडी, मी लुंगी!
तू लव्ह, मी प्रेम,
तू फोटो, मी फ्रेम!
तू डोकं, मी केस
तू साबण, मी फेस!
तू निसर्ग, मी फिजा
तू कविता, मी माझा!
तू घुबड, मी पंख
तू विंचू, मी डंख!
तू सांबार, मी डोसा
तू बॉक्सर, मी ठोसा!
तू कणीक, मी पोळी
तू औषध, मी गोळी!
तू पेट्रोल, मी कार
तू दारू, मी बार!
तू दूध, मी साय
तू केस, मी डाय!
तू चहा, मी लस्सी
तू कुमकुम, मी जस्सी!
तू तूप, मी लोणी
तू द्रविड, मी धोणी!
तू बर्फी, मी पेढा
तू बावळट, मी वेडा!
तू कंप्युटर, मी सीडी
तू सिग्रेट, मी बिडी!
तू कंप्युटर, मी मेल
तू निरंजन, मी तेल!
तू टायगर, मी लायन
तू दादर, मी सायन!
तू केस, मी कोंडा
तू दगड, मी धोंडा!
;)
--तात्या.
Comments
मी
मी कॉफी तू चहा
मी तुला पाह्ते तू मला पहा!!!
:)
पल्लवी
प्रतिसाद
तू मूर्ती मी माळ, तू नान्गर मी फाळ
तू चहा मी गाळ,तू आई मी बाळ
असे काहीही
असे काहीही आणी कितीही लिहिता येईल..
तू चड्डी मी नाडी
तू बिडी मी काडी
तू खरूज मी नायटा
तू सिग्नल मी बावटा
तू की बोर्ड मी माऊस
तू ढग मी पाऊस
तू भात मी वरण
तू करंजी मी सारण
तू व्हिस्की मी सोडा
तू गाढव मी घोडा!
सन्जोप राव
काहीही...
तू बटण मी बक्कल
तू डोकं मी अक्कल
काहीहीही
असे काहीही आणी कितीही लिहिता येईल..-सहमत.
तू मनोगत मी उपक्रम
तू तटस्थ मी चक्रम
तू पाव मी वडा
तू बकरी मी रेडा
तू तंबाखू मी चुना
तू नवथर मी जुना
तू ओवी मी शिवी
तू चॉकलेट मी काकवी
तू गुलाल मी बुक्का
तू गुडगुडी मी हुक्का
तू चिमणी मी कावळा
तू गारदी मी मावळा
तू वुडलँड मी बाटा
तू हातोडी मी वरवंटा
तू कविता मी धडा
तू सोसायटी मी वाडा
अमर्याद...
कितीही लिहिता येईल
तू उद्या मी आज
तू उद्धव मी राज
तू बंद मी चालू
तू मुलायम मी लालू
तू विनायक मी वरद :)
तू विलास मी शरद
मस्त! ;)
तू विनायक मी वरद :)
तू विलास मी शरद
हे बाकी मस्तच! ;)
तात्या.
आणि एक
तू भेंडी मी पावटा
तू निशाण मी बावटा
तू बर्फी मी पेडा
तू शाणी मी येडा
तू शरद मी बाळ
तू पैजण मी चाळ
तू उगाच मी शौकीन
तू युजर मी ऍडमिन
अजुन् थोडे
तु भगवान मी हेवान
तु देवाण मी घेवाण
अजुन थोडेसे
तु व्हिस्की मी जीन
तु बक्कल मी पीन
तु वजन मी काटा
तु बिरला मी टाटा
तु पेग मी सीप
तु बटन मी झीप
तु सकाळ मी रात्र
तु ताम्ब्या मी पात्र
तु खुर्ची मी टेबल
तु स्टीकर मी लेबल
विरोपातून आलेले साहित्य, कविता आणि इतर
विरोपातून आलेले साहित्य, चित्रे इ. विरोपाद्वारेच मित्रमैत्रिणींना पाठवणे शक्य असल्याने इथे वेगळ्याने ते देण्याची गरज नाही. विरोपाद्वारे फिरणारे साहित्य आधीच बर्याच जणांनी वाचले/पाहिले असणे शक्य आहे. अश्या प्रकारचे लेखन मी मराठी या अनुदिनीवर किंवा मित्रमैत्रिणी या याहू ग्रुप वर वाचता येईल.
या संकेतस्थळाचे माहितीप्रधान लेखन आणि चर्चा असे स्वरूप असावे आणि टिकून राहावे म्हणून आणि स्वरचित कविता प्रकाशित करण्यासाठी इतर मराठी संकेतस्थळे आणि केवळ कवितांना वाहिलेली संकेतस्थळे उपलब्ध असल्याने इथे स्वरचित कवितांचा वेगळा विभाग असण्याची आवश्यकता नाही.
वेळोवेळी केलेल्या विनंत्या आणि सूचना यांची दखल घेऊन सदस्यांनी जाणीवपूर्वक त्यांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.
उपक्रमराव,
वेळोवेळी केलेल्या विनंत्या आणि सूचना यांची दखल घेऊन सदस्यांनी जाणीवपूर्वक त्यांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.
उपक्रमराव,
आपल्या प्रतिसादाची वाटच पहात होतो. म्हटलं एवढा छान टाईमपास चाललाय, मंडळी जरा एन्जॉय करताहेत, तरी अजून उपक्रमरावांचा नियम सांगणारा प्रतिसाद कसा आला नाही? ;)
असो, उपक्रमचा नियम मोडून मी येथे काव्यप्रकार प्रकाशित केला याबद्दल मी उपक्रमची पुन्हा एकदा हात जोडून आणि नाक घासून क्षमा मागतो. पण या निमित्ताने पुन्हा एकदा खालील काही विचार व प्रश्न मनात येतात, ते येथे कोकणी मोकळेपणानी मांडू इच्छितो!
ही एक कविता सोडा. हा फक्त शब्दांच्या आणि यमकांच्या कोलांट्या उड्या असलेला एक टाईमपास होता हे आम्हीही जाणतो. पण उत्तम कविता, उत्तम गझल या साहित्यप्रकाराला उपक्रमाचे दरवाजे बंद आहेत, या गोष्टीचे एक उपक्रमी या नात्याने मनापासून वाईट वाटते!
आणि स्वरचित कविता प्रकाशित करण्यासाठी इतर मराठी संकेतस्थळे आणि केवळ कवितांना वाहिलेली संकेतस्थळे उपलब्ध असल्याने
२) अहो ते झालंच हो! त्यात असं मोठं तुम्ही काय सांगितलंत? स्वरचित कविता प्रकाशित करणार्यांना बाहेरचा रस्ता मोकळा आहे, हे ओघाने आलंच!
या संकेतस्थळाचे माहितीप्रधान लेखन आणि चर्चा असे स्वरूप असावे आणि टिकून राहावे म्हणून
का हो मालक? अहो जसं कविता/गझला करणार्यांसाठी इतर संकेतस्थळांचा रस्ता मोकळा आहे, तसंच माहितीप्रधान लेखन आणि चर्चा करणार्यांसाठीही इतर संकेतस्थळांचा रस्ता मोकळा आहेच की!
उपक्रमच्या http://mr.upakram.org/node/11 या लेखात,
'आपल्या अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे.'
असं म्हटलं आहे.
एखाद्या सभासदाला आपल्या अनुभवविश्वातून, भावविश्वातून आपले विचार प्रकट करण्यासाठी मुभा फक्त गद्यलेखनातच का असावी??
'विचारांची देवाणघेवाण करता यावी' असं आपण म्हटलं आहे. एखाद्या सभासदाला चार सहा ओळीतल्या उत्तम काव्यातून आपले विचार मांडावेसे वाटले तर त्याने ते मांडायचे नाहीत. का? तर येथे पद्यलेखनाला परवानगी नाही म्हणून! हे कितपत योग्य आहे?
असो! माझ्याकडून हा विषय संपला आहे. शेवटी आपण मालक आहात त्यामुळे, 'आपण म्हणाल तीच पूर्व!' हे ओघाने आलंच!
पुन्हा एकदा क्षमस्व!
तात्या.
व्यवहार्य
एकूणच इथे शब्दांचा कीस पाडण्याशिवाय काही घडलेले नाही :) म्हणून मीही एक प्रतिसाद देऊन त्यात भर घालतो आहे. कवितांसाठी विभाग असणे नसणे कितपत व्यवहार्य आहे हे काळच ठरवेल असे दिसते.
सबुरी
>>साहित्यप्रकाराची खिचडी करण्यापेक्षा, कवितांसाठी वेगळे उप-संकेतस्थळ स्थापन व्हावे, असे मला वाटते.
असेच 'मि. उपक्रम' ह्यांना देखिल वाटत असल्यास आणि त्यांनी तसे जाहिर केल्यास सगळेच सबुरीने घेतिल असे वाटते.
इतर विषय आणि नाव
उपक्रमच्या ह्या स्थळावर मुख्यत: माहितीप्रधान लेख, चर्चा, सध्या असलेल्या (आणि भविष्यात येणाऱ्या) समुदायांच्या अंतर्गत होणारे लेखन यांचा समावेश असावा. भविष्यात इतर विषयांना वाहिलेली उपस्थळे निर्माण करता येणे शक्य आहे. पण याबाबत आताच काही सांगता येणार नाही.
संकेतस्थळाच्या नावातील mr चे स्पष्टीकरण इथे वाचता येईल.
२००७ चे 'काव्य -स्वातंत्र्यसमर!'..
भविष्यात इतर विषयांना वाहिलेली उपस्थळे निर्माण करता येणे शक्य आहे.
या वाक्याचे मी स्वागत करतो, आणि 'स्वरचित काव्य' या विषयाला वाहिलेलं उपस्थळही येथे निर्माण होईल अशी आशा बाळगतो.
पण याबाबत आताच काही सांगता येणार नाही.
तरीपण आणि एक डाव ट्राय मारा की राव! ;)
असो, 'उपस्थळ' हा शब्द आवडला!
आपला,
(काव्यलेखन हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ज्वाजल्यपूर्ण उद्गार उपक्रमवर प्रथमच काढून '२००७ च्या काव्यस्वातंत्र्य समराची' ठिणगी पेटवणारा!)
तात्या. ;)
छान
छान आहे उत्तम..........
नियम म्हणजे नियम??
अरे हो हो!
किति बाचाबची चाललि आहे? ईतक्या छान साईट वर असलि भांडण नकोत.
पण खर सांगू का?? कवितांसाठि वेगळा विभाग हवाच ह्या साईट वर!!
मग?? उपक्रम राव ... kadhi ughadtay.....vegla vibhag?? आपल्या मंडळिंच्या मनातल्या कवितांसाठि??
आबा....