सुस्वागतम्!

आपल्या अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. मराठीतून लेखन, चर्चा करण्याची सोय इथे आहेच शिवाय बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप/कम्युनिटी आणि स्क्रॅपबुक सारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या संकेतस्थळावर लेख आणि चर्चा हे दोन प्रमुख लेखनप्रकार आहेत. अनुभव, अनुवाद, बातमी, माहिती, संदर्भ, विचार, व्यक्तिचित्र या आणि अश्या इतर सर्व गोष्टींसाठी "लेख" हा लेखनप्रकार वापरता येतो. चर्चेच्या माध्यमातून एखाद्या विषयाचा निरनिराळ्या बाजूंनी विचार करण्याचा मार्ग मिळतो. विविध क्षेत्रातील लोकांचे अनुभव आणि विचार यांच्यामुळे एका व्यक्तीच्या लक्षात येणार नाहीत असे अनेक पैलू, कंगोरे चर्चेच्या माध्यमातून पुढे येतात. रचनात्मक पद्धतीने होणाऱ्या चर्चा सर्व सहभागी लोकांच्या तसेच वाचकांच्या माहितीत मोलाची भर घालतात.

गूगल, याहू आणि ऑर्कुट सारख्या संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप्स/कम्युनिटीज सारखी सुविधा "समुदाय" या माध्यमातून इथे उपलब्ध आहे. कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना समुदायाच्या रूपात एक मंच मिळतो. येथे सदस्य त्यांच्या सामायिक आवडीनिवडी किंवा ध्येय धोरणांवर लेख, चर्चा आणि प्रतिसादांच्या माध्यमातून माहितीचे आणि विचारांचे आदानप्रदान करू शकतात.

ऑर्कुटसारख्या संकेतस्थळांवर असणाऱ्या स्क्रॅपबुक सारखी सुविधा "खरडवही"च्या रूपात इथे उपलब्ध आहे. याशिवाय व्यक्तिगत निरोप, विरोपाने प्रसूचना (इमेल नोटिफिकेशन्स), RSS feeds अश्या सुविधा उपलब्ध आहेत.

तुमचा 'उपक्रम'वरील वावर आनंददायक ठरेल अशी आशा आहे!

अधिक माहितीसाठी : साहाय्य

 
^ वर