उपक्रमः भविष्यकालीन योजना
नमस्कार,
१. उपक्रमचे मुखपृष्ठ अधिक आकर्षक करता येईल का?
आठवा मनोगताचे जुने मुखपृष्ठ (हाय!) रंगलेल्या चर्चा, नवीन चर्चा. (प्रशासकांच्या आवडीचे निवडक) मनोगत विशेष!. या धर्तीवर काही करता येईल का? सोबत मराठी वृत्तपत्रे, मराठी ब्लॉग यांचे फीड वापरुन उपक्रमास इंटरनेटवरील मराठीतील अव्वल संकेतस्थळ करणे. व उपक्रमास भेट दिल्यावर इतर संकेतस्थळांना भेट देण्याची काही गरज नाही असे करता येईल का?
२. लेखांना दर्जा/अंक देण्याची सोय देता येईल का?
३. कंपूबाजी बद्दल उपक्रम यांचे काय मत आहे? मी सर्किट यांचा फ्यान आहे हे सर्किट यांच्या व्यक्तिरेखेत किंवा माझ्या व्यक्तिरेखेत ठळकपणे दिसावे अशी सोय करता येईल का? (हे केवळ उदाहरण म्हणून घ्यावे!)
४. काही लेखांवर "छापण्यायोग्य आवृत्ती" (http://mr.upakram.org/book/export/html/9) ऊर्फ मुद्रणसुलभ पान अशी सोय दिसते... मात्र सगळ्या लेखांवर ही सोय उपलब्ध नाही असे का?
अजून या संकेतस्थळावर इतर काही सुविधा असाव्यात असे वाटते का?
Comments
मनोगत सिंड्रोम
१. उपक्रमचे मुखपृष्ठ आकर्षक हवे असे मलाही वाटते. (बरेचदा विंडोज एक्सप्लोर उघडल्याचा भास होतो. :( स्पष्ट विधानाबद्दल माफी). परंतु मनोगतासारखेच हवे असे अजीबात वाटत नाही.
२. ही चांगली कल्पना आहे.
३. उपक्रम यांचे मत उपक्रम देतीलच परंतु कंपूबाजीला व्यवस्थापनाने खतपाणी घालू नये असे वाटते. आपण त्यासाठी आहोतच. तुम्ही ज्यांचे फॅन आहात त्यांचे पंखे नसणारे कदाचित या गोष्टी उगाळून एखाद्याला त्रास देण्याची शक्यता आहे.
४. हे जाणून घ्यायला आवडेल.
५. लेख संपादित झाल्यावरही प्रथम प्रतिसाद देण्यापूर्वी पुनः संपादित करण्याची सोय आवडेल.
६. प्रतिसादांची उघडझाप आवडेल. (जरी त्यातील तांत्रिक अडचणी माहित असल्यातरी.)
७. सर्व अंक मराठीत पाहायला आवडतील.
८. शुद्धलेखनाला आणि अगदी शब्दार्थ/ समानार्थी शब्द समजावून देणारी एखादी मदत/ सोय असणारी प्रणाली विकसित केल्यास आवडेल. (ही अतिअपेक्षा वाटते तरीही!)
९. लाश्ट् बट नॉट लिश्ट माझ्यासकट सर्व उपक्रमींना मनोगत सिंड्रोमातून बाहेर आलेले बघायला आवडेल. रोग्याला बरे व्हायला थोडा वेळ लागतो हे मान्य करून मुन्नाभाईच्या आवेशात सर्वांना 'गेट वेल सून मामू' असे सांगायलाही आवडेल. ;-) (हे सर्वसामान्य विधान आहे, केवळ वरील चर्चेशी संबंधित आहे असे कृपया समजू नये.)
(शेवटचा मुद्दा कृपया हलकाच घेऊ नये. बाकीच्या मुद्द्यांबद्दल काहीही म्हणणे नाही.)
मनोगत सिंड्रोम
हे अगदी खरे आहे. केवळ उदाहरण म्हणून मी मनोगताचा उल्लेख केला. अर्थात तसा करायला नको होता. Not failure, but low aim, is crime! :)
उपक्रम प्रमाणेच कन्नड भाषेसाठी असलेले संपदा डॉट नेट http://sampada.net/ पाहिलेत का? मुखपृष्ठ साधे तरीही अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे.
किंवा तमिळ भाषेचा ब्लॉग ऍग्रीगेटर गिल्ली http://gilli.in/ े, हिंदी भाषेचा ब्लॉग ऍग्रीगेटर नारद (http://narad.akshargram.com/) ही संकेतस्थळे पाहिलीत का?
ही बहुतेक सर्व संकेतस्थळे खुल्या मनाने मदतीची (आर्थिक व इतर) अपेक्षाही करतात. याबाबत उपक्रमाचे काय धोरण आहे?
संपदा आणि नारद
मला विशेष आवडले. दुव्याबद्दल धन्यवाद.
मला तरी/ विक्शनरी
माहित नाही पण मदत करायला आवडेल. निदान आपल्याजवळ शब्दकोष उघडून पंडिती शब्द शोधून काढणे, एखाद्या शब्दाचे लिंग, व्युत्पत्ती, वचने शोधून काढणे हे परदेशात बसून शक्य नसल्याने (आणि भारतात फोन करून आई-वडिलांना विचारण्याएवढी संपत्ती आणि उत्साह नसल्याने) एखादा ऑनलाईन मदतनीस कामाला येईल असे वाटते.
विकिपीडियावर विक्शनरी म्हणून प्रकल्प सुरु केल्याचे आठवते पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद नाही. :(
मोल्जवर्थ
मोल्जवर्थ मला माहित आहे. त्यात एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द ही मिळतात. बरेचदा तो शब्द चालवून दाखवलेलाही असतो. परंतु त्याचे लिंग व वचने कळत नाहीत. तसे करण्यासाठी बरीच धडपड करावी लागेल असे वाटते पण ती नक्कीच उपयुक्त असेल.
दुसरा शब्दकोष कोणता? दुवा देऊ शकाल का?
वा
मी प्रथमच विश्वजालावर मराठी शब्दकोष पाहिला. चांगला आहे.
(त्यात शब्दकोष हाच शब्द सापडला नाही :)
-- लिखाळ.
कमालच झाली
तेथे पाहिजे जातीचे हेच खरे :)
-- लिखाळ.
मला वाटतं
मनोगतकारांच्या वेबपेजचे नावही माझी अडगळ असे किंवा तत्सम आहे, असे पूर्वी पाहिल्याचे आठवते. स्वतःच्या क्रिएटिविटिला ते तसे संबोधत असावेत. 'माझी अडगळ' हे त्यांचे मत आहे की स्वतःच्या पोरांना 'मेल्या गिळ की!' म्हणणार्या आईचे प्रेम आहे ते त्यांचे तेच जाणोत.
पण जाऊ दे की! :)
हेच..
६. प्रतिसादांची उघडझाप आवडेल. (जरी त्यातील तांत्रिक अडचणी माहित असल्यातरी.)
हेच म्हणतो!
आजही मनोगत हे माझं पहिलं प्रेम आहे तरीही,
९. लाश्ट् बट नॉट लिश्ट माझ्यासकट सर्व उपक्रमींना मनोगत सिंड्रोमातून बाहेर आलेले बघायला
आवडेल.
हेच म्हणतो!
मनोगत मेरा एक सुंदर सपना था जो बित गया!
आता इथे उपक्रमवर नव्याने डाव मांडू! नव्याने डाव रंगवू!!
आपला,
(मुसाफीर!) तात्या.
उपस्थिती
या डाविकडील भागामध्ये आलेल्या सदस्यांची आणि पाहूण्यांची संख्या इंग्रजी आकड्यात दिसते ती मराठीमध्ये असावी.
बाकी सर्व छान :)
प्रतिसादांची उघडझाप नसल्यामुळे वेळ वाचतो आहे. त्यामुळे ते बरे आहे असे वाटत आहे.
धन्यवाद/काही उत्तरे
हे संकेतस्थळ अधिक चांगले बनवण्यासाठी सदस्यांचा उत्साह पाहून आनंद झाला. आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद!
मुखपृष्ठाचे हे स्वरूप तात्पुरते आहे. मुखपृष्ठ अधिक उपयोगी होण्यासाठी लवकरच बदल केले जातील.
लेखांना दर्जा/अंक देण्याची सोय देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, इतर बाजूंचा विचार करून भविष्यात अशी सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
याशिवाय इतर तांत्रिक बदल आणि छोट्या अडचणींवर उपाय जसजसे शक्य होईल तसतसे केले जातील.
विविध उपक्रमांना/विषयांना वाहिलेले समुदाय, प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. एकाच विषयाची आवड असलेल्यांना समुदायाच्या अंतर्गत एकत्र येणे शक्य आहे. तुम्ही म्हणता तशी सोय देणे या उद्दिष्टाशी सुसंगत नाही असे वाटते.
मदतीच्या कोणत्याही प्रस्तावाचे स्वागतच आहे. आपल्याला कोणत्या प्रकारची मदत (तांत्रिक किंवा इतर) करणे शक्य आहे आणि त्यासाठी किती वेळ देता येणे शक्य आहे ते निरोपातून कळवावे.
खल्लास्!
तुमचा त्वरित आलेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे.
संकेतस्थळाचा उद्देश ना नफा ना तोटा स्वरुपाचा असला तरी हे संकेतस्थळ यशस्वीरीत्या/यशस्वीरित्या चालू ठेवण्यासाठी आवश्यक असणार्या होस्टिंग/नियमित डेटाबेस बॅकअप/संकेतस्थळाची कायम उपलब्धता (हाय अव्हॅलॅबिलिटी) वगैरे खर्चिक सुविधांसाठी लागणारा पैसा जे सदस्य स्वेच्छेने देऊ इच्छितात त्यांच्याकडून घेण्यास काहीच प्रत्यवाय नसावा.
तुम्हाला सविस्तर व्य.नि पाठवत आहे.
प्रत..
तुम्हाला सविस्तर व्य.नि पाठवत आहे.
याची प्रत मला बघायला आवडेल..
तात्या.
चांभारचौकशी
mr.उपक्रम हे नाव मला आवडले. पण हे असे नाव संकेतस्थळाला देण्यामागील प्रेरणा सांगू शकाल काय?
(इतरत्र कोठे याबद्दल लिहिले असल्यास क्षमस्व!!)
मिसेस उपक्रम का नाही?
mr.उपक्रम हे नाव मला आवडले.
मलाही आवडले..
पण हे असे नाव संकेतस्थळाला देण्यामागील प्रेरणा सांगू शकाल काय?
हेच विचारतो...
शिवाय,
'mr. उपक्रम' च का? 'mrs. उपक्रम' का नाही? असेही विचारतो! ;)
आपला,
(स्त्रीदाक्षिण्यवादी) मिष्टर तात्या!
उद्देश आणि प्रेरणा
या संकेतस्थळावर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, इतिहास या व इतर विषयांवर मराठीतून माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत असा उद्देश आहे.
या संकेतस्थळाचा मराठीशी असलेला संबंध अधोरेखित करण्यासाठी mr (जो मराठी भाषेसाठीचा आंतरराष्ट्रीय कोड आहे) असे उपनाव दिले आहे. प्रेरणा अर्थातच विकिपीडीयाची.
तेवढेच ज्ञानप्रकाशात...
काय भारी चर्चा चालली आहे इथे! या सगळ्या पंडितांना (यात पंडिताही आल्या / ली) मी विनम्र वंदन करतो.
मग या प्रतिसादाचे प्रयोजन काय? तर तेवढेच ज्ञानप्रकाशात...
सन्जोप राव
आशीर्वाद!
काय भारी चर्चा चालली आहे इथे! या सगळ्या पंडितांना (यात पंडिताही आल्या / ली) मी विनम्र वंदन करतो.
आता वंदन करताच आहात काहितरी आशीर्वाद हा दिलाच पाहिजे! ;)
जा वत्सा संजोप, जा! मराठी संकेतस्थळावर तुला प्रतिसादांची कधीही कमी पडणार नाही! तथास्तू! ;)
आपला,
(इ-क्षेत्रातील प्रतिसादांच्या बेरजेच्या राजकारणातला शरद पवार!) तात्या.
क्या बात है..
तुझ्या प्रतिसादांसाठी मराठी संकेतस्थळांची कधीही कमी पडणार नाही !
क्या बात है..
मिलिंदा तुझी सुधारणा आवडली! कुठल्याही एका संकेतस्थळाची मक्तेदारी आणि हुकूमशाही या पुढे चालणार नाही, हे सूचित करणारी!
सभासदांमुळे एखाद्या संकेतस्थळाला शोभा आहे, संकेतस्थळामुळे सभासदाला नव्हे! हेही ठासून सांगणारी! ;)
आपलं,
(शेपटीवर पाय पडलेलं कोकणी फुरसं! ) तात्या! ;)
"मुखपृष्ठ
उपक्रमकार,
नमस्कार.
("मुख्य" ह्या विशेषणाचा उगम "मुख" ह्या नामातच असला तरी) "मुख्यपृष्ठ" आणि "मुखपृष्ठ" ह्या शब्दांचे अर्थ काहीसे भिन्न आहेत. "मुख्यपृष्ठ" म्हणजे "main page"; "मुखपृष्ठ" म्हणजे "face page". मराठीत "मुखपृष्ठ" हा शब्द पूर्णपणे रूढ झालेला आहे. सम़जा त्या रूढीकडे दुर्लक्ष करून "मुख्य" हा शब्द वापरायचे तुम्ही ठरवलेत तर "मुख्यपृष्ठ" असा सामासिक शब्द न वापरता "मुख्य पृष्ठ" असे दोन स्वतंत्र शब्द तुम्ही वापरणे उचित होईल.