दिवाळी अंक

सर्वात आधी, सर्व उपक्रमी मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रहो, दिवाळीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. फटाके, फराळ, नवे कपडे, पैपाहुण्यांच्या गाठीभेटी, मित्रमंडळींबरोबर मजामस्ती अशी कितीतरी आकर्षणे आपल्याला दिवाळीची वाट पाहायला लावतात. पण दिवाळीच्या फराळाइतकाच चविष्ट प्रकार म्हणजे दिवाळी अंक!! खरे की नाही? दिवाळीच्या आधीपासून दुकानात हजेरी लावणारे, वेगवेगळ्या विषयांना, वाचकांना, वयोगटांना वाहिलेले असे अनेक अंक आपले लक्ष वेधत असतात. फराळाचे साहित्य, कपडे, आकाशकंदिल, दिवे या दिवाळीच्या यादीत "दिवाळी अंक" हमखास असतातच. "दिवाळी अंक" आता मराठी संस्कृतीचा भाग झाल्यासारखा आहे. तर चर्चेचा विषय असा की आपले आवडते, आवडलेले दिवाळी अंक कोणते? दिवाळी अंकातून आपली अपेक्षा, मनोरंजन, साहित्यिक माहिती, वर्षभविष्य (!), इ. इ. काय असते? याशिवाय दिवाळी अंकांशी संबधित काहीही!

पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा! ही दिवाळी आनंदाची आणि समृद्धीची जावो!

Comments

अजून घेतले नाही !

नवीन दिवाळी अंक अजून घेतले नाही. ग्रंथालयात एकदा सर्व दिवाळी अंक आले आणि व्ही आय पी लोकांचे वाचून झाले की, आम्ही फुकटे वाचक मग त्याच्यावर तुटून पडतो ! :) तो पर्यंत जानेवारी चा महिना उजाडलेला असतो !
आवाज लय आवडतो हं आपल्याला, तितकाच आपण विकत घेतो. अजून घेतला नाही, पण वाचल्यावर इथं लिहून काढीन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा गुरुजी

>> ग्रंथालयात एकदा सर्व दिवाळी अंक आले आणि व्ही आय पी लोकांचे वाचून झाले की, आम्ही फुकटे वाचक मग त्याच्यावर तुटून पडतो ! :)

वा गुरुजी आयडिया झकास आहे :) अहो पण नवीन अंक घेतले नाहीत तरी जुन्या, पूर्वी वाचलेल्या अंकांबद्दल, त्यातल्या आवडलेल्या लेखांबद्दल काही लिहा. तुमचे विद्यार्थी (म्हणजे आम्ही हे काय वेगळे सांगायला हवे?) वाचायला उत्सुक आहेत.

जनू बांडे

"जनू बांडे" हे सर्वप्रथम आवाजमधेच वाचले बर का!

आवाजची ती दोन पानभरची व्यंगचित्रे पहील्यापानावर विशिष्ट जागी खिडकी, सुचक व्यंगचित्रे .... :-)

बाकी जी, चंदेरी, चंद्रलेखा, षटकार, लोकप्रभा, आणी ते वैद्यकिय कुठले हो?.. मजा यायची...

शतायुषी

सहजराव,अहो तो अंक शतायुषी!
आणि किस्रीमचा अंक पण छान असायचा..लोकसत्ता,म.टा. .ही आवडायचे.
ज्योतिषवाला धनुर्धारी..त्यावर पण सगळ्यांच्या उड्या असायच्या लायब्ररीत..
स्वाती

शतायुषी

यावेळी शतायुषीच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला मी टिस्मा त गेलो होतो. भरघोस प्रतिसाद मिळाला.

शतायुषी" alt="">
शतायुषी

प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

कित्येक वर्षांनंतर शि.द. फडणीसांचं चित्र पाहायला मिळालं. धन्यवाद.

शि.द.?

हे चित्र शि. द. फडणीसांचे की श्याम फडणीसांचे? मला श्याम फडणीसच माहित आहेत आणि त्यांचे व्यंगचित्रही असेच दिसते. शि. द. त्यांचे वडिल का? :-(

फडणीसांच्या व्यंगचित्रांवर चित्रात्मक लेख कोणाला टाकता आला तर बहार येईल. मलाही त्यांची चित्रे खूप आवडतात.

शि.द.च

शि.द. फडणीस बरोबर आहे. मला श्याम फडणीस माहीत नाहीत पण शि.द. आपल्या गणिताच्या पुस्तकातील चित्रे काढायचे त्यामुळे त्यांचं वळण नीट लक्षात आहे. :-)
तुम्हाला श्याम जोशी म्हणायचं आहे का? श्याम जोशी पु.लं च्या पुस्तकात व्यंगचित्रे काढायचे (अपुर्वाइ, पुर्वरंग वगैरे)

श्याम जोशी आता हयात नाही

श्याम जोशी आता हयात नाही त्यामुळे शि. द. फडणिसच असणार. ही त्यांचीच स्टाईल आहे

श्याम जोशी

तुम्हाला श्याम जोशी म्हणायचं आहे का? श्याम जोशी पु.लं च्या पुस्तकात व्यंगचित्रे काढायचे (अपुर्वाइ, पुर्वरंग वगैरे)

हो हो! माझा काहीतरी भलताच गोंधळ झाला. ;-) श्याम जोशीच योग्य. मला एकदम श्याम फडणीस वाटून गेलं. सुधारणेबद्दल धन्यवाद!

अपूर्वाई

अपूर्वाईतील चित्रे शि.द. फडणिसांचीच होती असे मला आठवतंय. ती चित्रे मला अजूनही डोळ्यासमोर दिसताहेत. पूर्वरंगबद्दल खात्री नाही.
श्याम् जोशी म्हणजे पूर्वी मटात येणार्‍या 'कांदे पोहे'वाले न? आणि चिंटूवालेही तेच न?

नक्की का?

तुम्ही नक्की आहत का?.. कारण मला अपुर्वाइतल्या त्या मॉजिनिजच्या गोष्टीच्या वेळची तो मक्ख वेटर् आणि सांडलेला चहा आणि त्या चित्रापुढे असणारी झोकात असलेली 'श्या' ही श्याम जोशींची स्वाक्षरी आठवते आहे. बहुतेक कोट्याधीश पु.ल. सोडल्यास बर्‍यच पुस्तकात मी श्याम जोशींचीच चित्रे पाहिल्या सारखी वाटताहेत पण तरी हे सगळं स्मरणशक्तीवर आहे.. त्यापेक्षा कोणाकडे प्रत असल्यास खात्री करेल काय? (माझी प्रत भारतात आहे :( )
ता.क. माझ्यापकडे जेव्हा श्रीविद्या प्रकाशन पु.लं.च्या पुस्तकांचं प्रकाशन करित असे तेव्हाचं पुस्तक आहे मौजचं नाही

आणि चिंटुवाले चारुहास पंडित आणि कोणीतरी (दुसर्‍या चित्रकाराचं नाव विसरलो).. पण श्याम जोशींच चिंटु नक्कीच नाही.

प्रभाकर वाडेकर

चिंटू चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा!

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

जवळजवळ नक्की(?!)

कारण मला अपुर्वाइतल्या त्या मॉजिनिजच्या गोष्टीच्या वेळची तो मक्ख वेटर् आणि सांडलेला चहा आणि त्या चित्रापुढे असणारी झोकात असलेली 'श्या' ही श्याम जोशींची स्वाक्षरी आठवते आहे.

मला 'नुसतीच दाढी, आत ऋषीच नाही' यासाठीचं शिदंचं चित्र आठवतेय. (म्हणजे इंग्लंडला जायचे म्हणून सगळा साहेबी पोशाख पण आत माणूसच नाही असे. )

मी उद्या तुम्हाला खात्रीशीर सांगू शकेन. चिंटूच्या बाबतीत मात्र माझा घोटाळा झाला. क्षमस्व.
अवांतर : पुलंच्या काही पुस्तकांमधील चित्रे वसंत सरवटे यांची आहेत.

आता १००% नक्की!

अपूर्वाई समोर ठेवूनच हे लिहीत आहे. अपूर्वाईतील सर्व चित्रे शि.द. फडणिसांचीच आहेत. मुखपृष्ठ मात्र दीनानाथ दलालांचे आहे. अपूर्वाई किर्लोस्करमध्ये येत होती तेव्हा त्यातील चित्रे फडणिसांची होती. पुस्तक काढताना इतर काही मुद्दे आले असावेत आणि असे झाले असावे.

:)

धन्यवाद..उगाच (नसलेल्या) स्मरणशक्तिवर विसंबुन राहु नये :) का कोण जाणे मला ती चित्रे श्याम जोशींची वाटत होती.. असो.. चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद

पूर्वरंग

पूर्वरंगमधली चित्रे फडणीसांचीच आहेत. पहिल्या आवृत्तीपासून. कारण त्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत पु. लं. म्हणतात की - फडणीसांची चित्रे आणि दरमहा किर्लोस्करातून येणारे माझे लेख यांचे असे काही गणित जमले आहे की, दुसर्‍याच एका मासिकात त्यांची चित्रे पाहून माझे आणखी एखादे प्रवासवर्णन सुरू झाले की काय अशी कोणीतरी धास्ती घेतल्याचे कळले :)

अपूर्वाई

पु. लं. म्हणतात की - फडणीसांची चित्रे आणि दरमहा किर्लोस्करातून येणारे माझे लेख यांचे असे काही गणित जमले आहे की, दुसर्‍याच एका मासिकात त्यांची चित्रे पाहून माझे आणखी एखादे प्रवासवर्णन सुरू झाले की काय अशी कोणीतरी धास्ती घेतल्याचे कळले :)

हो.हो. हे वाचल्याचे मलाही आठवतेय. पण अपूर्वाईतील चित्रे पण फडणिसांचीच आहेत असा आपण निर्वाळा देऊ शकता का? तसे केलेत तर फार बरे होईल! म्हणजे मला पुस्तकाची शोधाशोध करायला नको.
आणखी एखादे प्रवासवर्णन वरून तसे वाटते आहे खरे. माझी तर जवळजवळ खात्रीच आहे. तरीही....

निर्वाळा

संदर्भासाठी माझ्याकडे अपूर्वाई नाही, त्यामुळे छातीठोकपणे सांगू शकत नाही :(. पण गुंड्याला कडेवर घेऊन आगगाडी दाखवणारी इंग्लिश आई, पॅरिसमध्ये दूध हवे म्हणून रेखाटलेली गोमाता, आयफेल टॉवर आणि त्याच्या बाजूला हात उंचावलेल्या माणसाचे चित्र, झिरमिळ्या असलेले काडेचिरायती चेहर्‍याचे देशी विद्वान,ऑक्सफर्डचे विद्यार्थी आगगाडीतून युद्धाला निघाल्यावर त्यांना निरोप देणार्‍या त्यांच्या प्रेयसीचा रुमाल -- इ. चित्रे आठवतात. त्यांच्यातील रेघेचे वळण टिपिकल फडणीशी आहे, यात काही शंका नाही.

शि. द. फडणीसच

शतायुषी च्या अंकात यावेळी चित्रे भरपुर आहेत आणी ती शि.द. फडणिसांची आहेत.
प्रकाश घाटपांडे

फडणीसांची वेब साईट

ही पहा


आम्हाला येथे भेट द्या.

धन्यवाद

धन्यवाद

दिवाळी

भारतात असताना बरेच दिवाळी अंक आवडायचे. त्यातल्या त्यात आठवणारी नावे म्हणजे चंदेरी, किस्त्रिम, षटकार, लोकप्रभा वगैरे. आता इथे आल्यावर दिवाळीही नाही आणि दिवाळी अंकही नाही. असो.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

इसकाळमधली बातमी-परदेशात दिवाळी अंक उपलब्ध

अहो राजेंद्रराव, ही ईसकाळमधली बातमी वाचली नाही का?
संकेतस्थळावर मिळवा दिवाळी अंक!

दिवाळी अंक -खरेदी

मी कालच ८ दिवाळी अंकांची मागणी नोंदवली. ६ पेक्षा जास्त नोंदवले तर ३०% सवलत् आहे आणि जगभर कुठेही टपालखर्चही चकटफू आहे. अजून काय पाहिजे. मी पहिल्यांदाच मागावले आहेत त्यामुळे अनुभव नाही पण एकदम Professional सुविधावाटली. माझ्या एका स्वित्झर्लंडमधल्या मित्राने गेल्या वर्षी मागवले होते आणि तो खूप खूष आहे. म्हटले आपण पण मागवून् पाहू. फक्त अंक दिवाळीनंतर पोहोचणार आहेत पण त्याला नाईलाज आहे.

धन्यवाद

जितेनराव,
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता दिवाळीनंतर का होइना दिवाळीअंक वाचायला मिळतील.
दिवाळीच्या शुभेच्छा.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आवडते दिवाळीअंक

आपल्यालाही दिवाळीच्या शुभेच्छा.

आवडते दिवाळी अंक म्हणजे मोठीच यादी आहे - पण त्यातला एकच एक आवडतो असे नाही.

मौज, अबकडई, अक्षर, ललित, दिपावली, माहेर हे अंक घरी घेतले जायचे. ते वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतात, मौजचा दिवाळीअंक घरी आला नाही अशी (कळायला लागल्यापासून) एकही दिवाळी आठवत नाही. किस्त्रीमही, आणि इतर अंकही आवडतात.

 
^ वर