मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.
थोडक्यात मराठीला जिवंत राखणारे हे लोकांनी लोकांसाठी चालवलेले (एक स्थळ सोडून? ;))) ) भाषेचे झरे आहेत.
त्यात उपक्रमाने तर मागच्या वर्षात माहितीच्या साठ्यात खरंच मोलाची भर घातली आहे असे दिसून येते.
भाषेपासून तर तंत्रज्ञानापर्यंत सदस्यांनी लेख लिहिले आहेत.
म्हणजे यांचे महत्व जालावर वावरणार्या मराठी जनांसाठी अतोनात आहे.
अशा वेळी गुगल वर निव्वळ 'मराठी' असा शोध घेतला असता त्यात पहिल्या पानावर जाऊ द्या, पण पहिल्या दहा पानातही ही स्थळे कुठेच दिसत नाहीत!
असे का?
१. जालावर या संकेत स्थळांना काहीच किंमत नाही का?
२. की ही स्थळे डिमॉझ वर नोंदलीच गेली नाहियेत?
३. की मुद्दाम सर्च मध्ये येवू नयेत म्हणून वेगळी ठेवली गेली आहेत?
असे झाले असेल असे मला तरी वाटत नाही.
की माझी सर्च चुकते आहे?
गुगल म्हणजे जगाचा अंत नाही हे मान्य आहे. पण आजच्या घडीचे ते चलनी नाणे आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.
अनेक नामवंत मराठी अभियंते या स्थळांवर वावरत आहेत. त्यांना जालावर 'स्थळ वर कसे आणायचे' ही कला अवगत आहेत.
या शिवाय मिलिंद भांडारकरां सारखे मोठे खेळाडू या भाषेच्या रिंगणात असतांना एकही सर्च इंजिनात मराठीचा हा गंध पसरू नये? (मला कल्पना आहे की ते कदाचित वैयक्तिरित्या काही करू शकत नसतील, पण ज्ञान, महत्वाच्या टीप्स तर नक्की देतील ना...?!?)
अरे! आपल्या आईसाठी तरी हे करा रे!!!
मला वाटते की मराठी अशी सर्च आल्यावर हा देवाण घेवाण करता येणारा भाषेचा ठेवा सर्वात आधी दिसावा.
ज्ञान भाषेत आहेच... ते जालावरही वेगाने उतरते आहे.
मात्र हे ज्ञान लोकांना दिसले तर ती ज्ञान भाषा बनायला काही मदत होईल.
गुंडोपंत व इतर सदस्य जर माहिती काढून कष्टाने लेख लिहित असतील, तर ते लेखन अधिकाधीक लोकांपर्यंत गेलेच पहिजेत. असे लेखन लोकांपर्यंत न गेले तर तो गुन्हाच आहे!
जर हे स्थळ तसा प्रयत्न करणार नसेल मजा नाही. व्यवस्थापनाने या साठी जे जे आवश्यक आहे ते ते केलेच पाहीजे! एक प्रकार चे मार्केटींगच समजा ना.
अन्यथा चार टाळ्क्यांच्या "वा, छान" साठी गुंडोपंतानी येथे लिखाण करण्यात काय अर्थ आहे?
आपला
व्यथीत
गुंडोपंत
Comments
टॅग्ज?
कदाचित लेखाच्या सुरवातीलाच शोधयंत्राला सापडतील असे टॅग्ज देता येतील का?
ड्रूपल मध्ये तशी सोय आहे का?
हे टॅग्ज ईंग्रजीत देता आले तरी उत्तम...
शिवाय हे दुवे दिसले नाहीत तरी चालतील किंवा दिसण्या न दिसण्याचीही सोय करता येवू शकेल का?
आपला
गुंडोपंत
द्रुपल/वर्डप्रेस
कंटेन्ट म्यानेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये वर्डप्रेसाधारित संस्थळांवर "पोस्ट स्लग" म्हणजे लेखनाचा दुवा कोणत्या अक्षरांचा असावा हे लेखकाला ठरवता येते. द्रुपलमध्ये ती सोय नसावी. त्यामुळे शुद्धलेखनासाठी केलेल्या लेखनासाठी node/1234 असे दुव्यामध्ये येते. त्याऐवजी node/shuddhalekhan असे आले तर गूगलसारख्या साईट्सना shuddhalekhan असे सर्च केले तर ते लगेच सापडेल.
सर्च अल्गोरिदममध्ये तुमच्या एखाद्या लेखाची लिंक काय आहे खूप महत्त्वाचे असते. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या लेखाची लिंक.
याशिवाय देवनागरीऐवजी इंग्रजी रोमन शब्द टाकून सर्चिंग होत राहणारच आहे. कारण ते अधिक सोयीचे आहे. सर्च इंजिनसाठी शुद्ध व प्रमाणभाषेचे महत्त्व खूप जास्त आहे. मराठीत सूचना हा शब्द सुचना किंवा सुचणा असा कसाही लिहिला तरी आमचेच कसे योग्य हे सांगण्यासाठी मारामारी होते किंवा स्वतःच्या सोयीने शुद्धलेखन वाचा असे सांगितले जाते. त्याऐवजी जगात १०० पैकी ८० लोक तरी instruction असाच शब्द वापरतील त्यामुळे गूगलमध्ये चु़कीचा शब्द टंकला तरी गूगल योग्य तो शब्द सुचवून त्यानुसार माहिती देईल.
आम्हाला येथे भेट द्या.
अच्छा!
अच्छा!
"पोस्ट स्लग"हे कळले पण वर्डप्रेस सारखी सोय नसली तरीही काहीतरी तर दिसायला हवे ना...
गुगल वर तर जणूकाही ही स्थळे अस्तित्वातच नाहीत अशी परिस्थिती आहे.
कमीतकमी उपक्रम म्हणून तर दिसायला हवे?
गूगलमध्ये चु़कीचा शब्द टंकला तरी गूगल योग्य तो शब्द सुचवून त्यानुसार माहिती देईल.
हीच सोय मराठीत झाली तर नक्की शब्द कोणता हे वारंवार कळून तो शब्द तसा शुद्ध लिहिण्याची आपोआप सवय होईल.
लवकरात लवकर असे घडो हीच शुभेच्छा!
आपला
गुंडोपंत
मला नक्की हेतू कळला नाही
मला तुमचा नक्की हेतू कळला नाही. कारण गुगलवर मराठी लिहिल्यावर् जी संकेतस्थळे दिसतात ती सगळी मराठीशीच निगडित आहेत की. का तुम्हाला असे म्हणायचे आहे तुमच्या आवडीची स्थळे पहिल्या पानावर दिसत नाही आहेत याचे तुम्हाला दु:ख आहे? या दोन्ही पूर्ण् भिन्न गोष्टी आहेत.
गूगल एखाद्या संकेतस्थळाला किती महत्व देते याचे वेगवेगळे निकष आहेत आणि ते शोधून काढण्यासाठी (किंवा योग्य तो परिणाम साधण्यासाठी) लोक खूप पैसे खर्च करतात. SEM हा एक नवीन व्यवसायच त्यावर निघाला आहे.
गुगलवर तात्पुरते वरचे स्थान् मिळवता येईलही. पण शेवटी संकेतस्थळावरचा मजकूर् आणि ते किती जुने आहे यावर् ते ठरणार आहे. कारण काळाच्या ओघात किती स्थळे टिकून रहातात हे ही पहायला हवे. पहिल्या पानावर येणारी स्थळे अशा कसोटीला टीकून उरली आहेत.
मला कुठले स्थळ चांगले आणि वाईट ते म्हणायचे नाही. हे ज्याचे त्याने स्वतःपुरते ठरवायचे आहे. पण तुम्हाला हवे असलेले स्थळ आले नाही म्हणून ती शोध प्रक्रीया योग्य नाही असे नाही.
गुगल वर दिसायला नको का?
कारण गुगलवर मराठी लिहिल्यावर् जी संकेतस्थळे दिसतात ती सगळी मराठीशीच निगडित आहेत की.
हो पण त्यांचे कंटेंट्स व उपक्रमाचे कंटेंट्स यात जमीन आस्मान चा फरक आहे. हा माहीतीचा साठा आहे!
आज मला इतिहासावर माहीती हवी असल्यास त्या सर्च मध्ये विकी दिसले तरी उपक्रमावरील लेख दिसत नाही... तसे का होते?
इथले लेखही अभ्यासपूर्ण असतातच ना...
का तुम्हाला असे म्हणायचे आहे तुमच्या आवडीची स्थळे पहिल्या पानावर दिसत नाही आहेत याचे तुम्हाला दु:ख आहे?
नाही! मी वर म्हणालोच आहे की त्या त्या विषयावरचा उपक्रमावरचा लेखही गुगलच्या सर्च मध्ये दिसावा... अन्यथा इतके लेखन करून काय उपयोग?
गुगलवर तात्पुरते वरचे स्थान् मिळवता येईलही.
मला यात वरच्या खालच्या स्थानाविषयी म्हणायचे नाहीये... गुगलला ही माहीती सहजतेने सापडतच नाहीये हा मुद्दा आहे.
पण तुम्हाला हवे असलेले स्थळ आले नाही म्हणून ती शोध प्रक्रीया योग्य नाही असे नाही.
शोध प्रक्रीया योग्य नाही असे मी कुठेही म्हंटलेले नाही! माझा मुदा फक्त उपक्रमही मराठी म्हंटल्यावर कुठेतरी का होईना दिसावे इतकाच आहे.
या स्थळावरची माहीती भरपूर आहे. शिवाय हे काही वर्तमानपत्र नाही...
या माध्यमात काळाच्या पलीकडे जाण्याची सोय आहे. मागच्या वर्षी लिखित ज्योतिषा वरचा लेख आजही महत्वाचा असू शकतो. तो सर्च घेतली असता गुगल वर दिसायला नको का?
सदस्य इतकी मेहेनत घेत असतांना, त्यांची मेहेनत लोकांपर्यंत पोहोचतच नसेल तर मग कशाला खटाटोप करायचा?
"मराठी" म्हंटल्यावर दुसर्या पानावर का होईना पण उपक्रम दिसायलाही नको का गुगल वर?
आपला
गुंडोपंत
सहजराव आमच्या खरडवहीत म्हणतात,
सहजराव आमच्या खरडवहीत म्हणतात,
"एकदम बरोबर आहे. ही संकेतस्थळ गुगल, याहू मधे एकदम पहील्यापानावर आली पाहीजेत. पण स्वतःहून सदस्यांनी काही उत्साहाने करायला जाऊ नये, जर सर्च इंजीनस् मधे नीट सबमीट् नाही झाले किंवा रिपिट् झाले तर ब्लॅकलीस्ट् देखील होऊ शकते."
हे मान्य आहे पण, माझ्या दुसर्या प्रतिसादात स्थळ जोरात प्रमोट न करता, तो तो लेख प्रोमोट करण्याचा प्रयत्न आहे. शोधात लेख पहिल्या पानात येवू लागले तर त्यात उपक्रम आपोआपच वर राहील ना?
मात्र ते ब्लॅकलिस्ट चे नियम माहीतीकरून मगच ही सुवीधा अंमलात आली तर बरे.
[माझे शब्द, सुरेश भट या साईटसही दिसत नाहीत... त्यामुले हा ड्रुपलचा इश्यु आहे की काय असेही वाटले...]
आपला
गुंडोपंत
सर्च इंजिन
सर्किटशेठ सर्च इंजिनांच्या अल्गोरिदमबद्दल लिहितीलच पण आम्हाला असलेली चार आण्याची माहिती येथे देतो.
एखाद्या संकेतस्थळाकडे जाणार्या दुव्यांची संख्या (इनकमिंग लिंक्स) यांचा सर्च इंजिन अल्गोरिदम मध्ये मोलाचा वाटा आहे. यासंकेतस्थळांकडे येणार्या इनकमिंग दुव्यांची संख्या कमी असल्याने असे होत असावे.
गूगलची विकीपीडिया कडे असलेली कृपादृष्टी पाहता विकीपीडियाची पाने प्रथम दिसतील असे त्यांनी मुद्दाम केले असावे असे वाटते.
आम्हाला येथे भेट द्या.
विकि
विकि पहिले दिसले तर दिसू देत! काहीच हरकत नाही.
पण 'मराठी' असे सर्च केल्यावर कुठेतरी का होईना पण उपक्रमही यावे, ही अपेक्षा रास्त आहे असे मला वाटते.
आपला
गुंडोपंत
विकीपीडियाची पाने
असे सर्किट यांनी मागे सांगितल्याचे आठवते पण मराठी गूगलचे मराठी विकिपीडियाशी संधान नाही. मराठी विकिवर बरेच लेख आहेत पण सर्च इंजिनमार्फत शोधले असता शोध दिसत नाही.
मनोगताची पाने गूगल सर्चवर सापडतात. मला मनोगताचा शोध अशा सर्च मधूनच लागला होता. (काही कविता शोधताना) उपक्रमाची पानेही दिसून येतात पण इथे ब्लॉगपोस्टशी गूगलचे संधान आहे का असा प्रश्न पडला कारण ब्लॉग्जची जंत्री सर्वप्रथम येते.
मग
मराठी विकिवर बरेच लेख आहेत पण सर्च इंजिनमार्फत शोधले असता शोध दिसत नाही.
याचा अर्थ हे लेख लोकांना चटकन उपलब्ध होत नाहेयेते. म्हणजेच ज्ञान आहे पण पोहोचत नाहीये...
ड्रुपलचे समजले का असे होते ते.
पण विकिचेही का होते आहे?
आपला
गुंडोपंत
रोबोट
मला वाटत येथे युनीकोड ची अडचण असावी कारसुपक्रम, मिसळपाव व माझे शब्द असे टाईप केल्यावर तर मराठी संकेतस्थळेच दिसतात पण हीच नावे इंग्रजी मध्ये लिहली असता काहीतरी वेगळेच दिसते ... ह्यावर विचार केला गेला पाहीजे. शक्यतो गुगल चा जो रोबोट आहे तो युनीकोड संकेतस्थळे व इंग्रजी संकेतस्थळे असा वेगळा विदा तयार करत असावा व त्या रोबोटला उपक्रम हेच upakram आहे हे जेव्हा कळेल तेव्हाच तो ही संकेतस्थळे देखील पहिल्या पानावर् दाखवू लागेल असा माझा कयास आहे, मी प्रयत्न करित आहे, पण मार्ग लवकर निघेल ह्याची कल्पना नाही पण एक सुचना आहे जर संकेतस्थळाची नावे कुठे तरी [खाली वर, डावीकडे उजवीकडे] इंग्रजी मध्ये लिहून ठेवावीत व ते प्रत्येक पानावर दिसेल अशी सोय करावी येणे करुन गुगल रोबोट आपल्या पडताळनीमध्ये ह्या संकेतस्थळांची इंग्रजी नावे सुध्दा साठवून ठेवेल व पुढील सर्च मध्ये दाखवेल.... प्रयोग करुन पाहत आहे देख ते है आगे क्या होगा...
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
शक्यता आहे
शोधयंत्रे अशी
युनोकोड व इंग्रजीतून वेगळ विदा तयार करण्याची शक्या असावी.
आपल्या प्रयोगातून काय निष्पन्न होते हे पाहणे महत्वाचे ठरावे.
यावर सर्किटरावांचे काही मत नाही का?
आपला
गुंडोपंत
म्हणजे जोडणी
म्हणजे इतर संकेतस्थळांवर मराठी ह्या शब्दावर टिचकी मारली असता समजा उपक्रम, मनोगत, मिसळपाव ही स्थळे उघडत असली, तर मराठीचा संबंध ह्या स्थळांशी जोडणे शोधयंत्राला सोपे जाईल.
म्हणजेच या स्थळांची एकमेकांशी जोडणी आवश्यकच आहे असे म्हणायला हरकत नाही...! :)
या शिवाय अजून कुठे या लिंक्स देणे, असणे किंवा आणवून घेणे शक्य आहे?
या शिवाय उपक्रमाच्य मेटाटेग्ज मध्ये ही 'मराठी' हा शब्द नाहीये का?
आपला
गुंडोपंत
हे सही!!!
एक मजा बघा: याहू वर "माहितीपूर्ण" ह्या शब्दाचा शोध घेतल्यास पहिला दुवा माझ्या "माहितीपूर्ण लेखनाचा आहे".
हे बाकी सहीच!!! म्हणजे माहीतीपूर्ण धोरणाची याहूनेही खिल्ली उडवली की काय? ;)))
आपला
गुंडोपंत
तिसरे पाचवे पान
मला तिसर्या-पाचव्या पानावर उपक्रम आणि मनोगत सापडले. मिसळ-पाव त्या मानाने नवीन आणि कदाचित कमीवेळा उघडले जात असेल तर (मला नक्की माहीत नाही, केवळ अंदाज), आणि गूगल शोध इंजिनाची क्रम लावायची तशी पद्धत असेल तर ते पहिल्या दहा पानात येण्याची शक्यता कमी.
'मराठी संकेतस्थळ' असा शोध घेतला तर उपक्रम-मनोगत पहिल्या पानावर आणि मिसळपाव दुसर्या पानावर आढळले.---वाचक्नवी
मराठीतली थोर संकेतस्थळं आणि मराठमोळी टपरी हा फरक! :)
'मराठी संकेतस्थळ' असा शोध घेतला तर उपक्रम-मनोगत पहिल्या पानावर आणि मिसळपाव दुसर्या पानावर आढळले.---
अहो अगदी बरोबर आहे! शेवटी मनोगत, उपक्रम ही मराठीतली थोर संकेतस्थळं आहेत तेव्हा त्यांचा मान हा पहिल्याच पानावर असायला हवा!
अहो आमची मिसळपाव म्हणजे साधी एक मराठमोळी टपरी! तिला दुसर्या पानावर स्थान मिळाले हेसुद्धा खरं तर आश्चर्यच आहे! आमच्या मिसळपावचे नांव दुसर्याच काय परंतु कुठल्याच पानावर नसले तरी मिसळपावला काहीच फरक पडत नाही!
आपला,
(मिसळप्रेमी!) तात्या अभ्यंकर.
असं कसं?
तात्या,
आमच्या मिसळपावचे नांव दुसर्याच काय परंतु कुठल्याच पानावर नसले तरी मिसळपावला काहीच फरक पडत नाही!
असं म्हणू नका... चिडलात का?
ही स्थळे थोर असोत नाही तर चोर असोत... 'मराठी' असे सर्च केल्यावर यायला हवीत इतकेच.
आणि जालावरचे मिसळपाव चे वय पाहता, दुसर्यापानावर आले यात काही विषेश नाही.
अगदी अल्पावधीत ते पहिल्या पानावर झळकू लागेल यातही मला शंका वाटत नाही!
मात्र 'या स्थळाचे मालक या नात्याने' ही चर्चा तुमच्या साठीही तितकीच महत्वाची आहे. तेंव्हा वैयक्तिक न घेता, यातल्या काही माहीतीचा आधार घेवून आपण मिसळीला मराठी च्या सर्च शी बांधू शकलात तर मजा आहे...
काय म्हणता?
आपला
गुंडोपंत
गुंड्याभाऊ,
असं म्हणू नका... चिडलात का?
अरे बाबा चिडू कशाला? मी मुळीच चिडलेला वगैरे नाहीये!
अगदी अल्पावधीत ते पहिल्या पानावर झळकू लागेल यातही मला शंका वाटत नाही!
That's it! आणि ते पहिल्या पानावर कसं येईल हे पाहण्याकरता आपण समर्थ आहोत. आपल्या लेखनात, सभासदांबद्दलच्या लोकशाही धोरणात, मिसळपाववरील कौटुंबिक आणि खेळीमेळीच्या वातावरणात तेवढा दम हवा! आज ना उद्या जगाला मिसळपावची आपणहून नोंद घ्यावी लागेल!त्याकरता मिसळपावने सर्च इंजिनात यावं याकरता अन्य काहीही वेगळे प्रयत्न मिसळपाव करणार नाही!
मात्र 'या स्थळाचे मालक या नात्याने' ही चर्चा तुमच्या साठीही तितकीच महत्वाची आहे. तेंव्हा वैयक्तिक न घेता, यातल्या काही माहीतीचा आधार घेवून आपण मिसळीला मराठी च्या सर्च शी बांधू शकलात तर मजा आहे...
काय म्हणता?
मी वैयक्तिक घेत नाहीये! आज ना उद्या आपल्या परिने मिसळपावचंही नांव होईल इतकंच!
तात्या.
हेच
'मराठी संकेतस्थळ'
हा वाक्प्रचार मला या स्थळांवर आल्या नंतर कळला!
त्या आधी मी आपले नुसतेच 'मराठी' असे शोधत असे.
कदाचीत इतर सदस्यही सर्वसाधारण शोध असाच घेत असणार असे वाटले.
म्हणून फक्त मराठी हे 'जेनेरीक टर्म' वापरली.
मराठीचे जालावरचे मुख्य दिपस्तंभ म्हणून ही स्थळे आधी दिसावीत असे वाटते.
आपला
गुंडोपंत
मला मात्र
उपक्रम पहिल्या प्रथम सापडले. मात्र मी ते देवनागरी मधून टंकीत केले होते. तेच इंग्रजीतून टंकीत केले तर लवकर सापडत नाही.
आपला,
(उपक्रमी) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
उपक्रम, मिसळपाव.
इतरांच्या अनुभवापेक्षा माझा अनुभव वेगळा आहे. रोमन लिपीत वा देवनागरीत उपक्रम किंवा मिसळपाव टंकून गूगल सर्च केले की मला पहिल्या पानावर या स्थळांची नावे मिळतात. नुसते 'मराठी' किंवा रोमन लिपीत 'मराठी वेबसाइट्स' शोधल्यास मिळत नाहीत हे मात्र खरे. उपक्रमच्या बाबतीत तर उपकर्म पाहिजे की उपक्रम अशीही विचारणा होते. तेव्हा आपण समजतो तितकी काही परिस्थिती दारुण नाही. संकेतस्थळ हा शब्द किंवा स्थळांची ही नावे ज्याला माहीत नाही त्याला मात्र ही स्थळे शोधणे शक्य होणार नाही. कदाचित माझ्या संगणकयंत्रावर या स्थळांच्या पत्त्याच्या कुकीज तयार झाल्या असतील म्हणून हे शक्य होत असावे. सर्व कुकीज पुसून टाकल्या तर कदाचित वेगळे होईल.--वाचक्नवी
हे पाहिले का?
सर्च करतांना मला हे सापडले...
सगळे मराठी जगत एकत्रच करून टाकले की या विशाल खापरेंनी...
http://www.khapre.org/
पहा... मराठीत बातम्याही मिळत आहेत हे इथेच कळले मला...
आपला
गुंडोपंत
मराठी बातम्या
मराठी बातम्या हॅलो मराठी वरही मिळतात. इथे आर. एस. एस. चालते हे विशेष.
मला नाही सापडल्या
मला नाही सापडल्या मराठी बातम्या..?
कुठे आहेत...?
आपला
गुंडोपंत
विसुनाना?
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
सगळे मराठी जगत एकत्रच करून टाकलेकी या विशाल खापरेंनी...
विशाल खापरे म्हणजे "विसुनाना' असावेत!(चु.भु.दे.घे.)
गूगल शोध
गूगल वर पुढील प्रमाणे शोध घेतल्यास माहिती मिळते.
मराठी लेख
मराठी चर्चा
तंत्रज्ञान मराठी
गणित मराठी
दिवाळी अंक
लेखमालिका
ज्योतिषशास्त्र
गुंडोपंत :)