पोलिसांचे खच्चिकरण

तिकडे उत्तर प्रदेशात पोलिसनिवडी बद्दल आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेला कालगितुरा रंगात आलेला असतानाच इकडे आपल्या आदर्श म्हणवल्या जाणार्य़ा महाराष्ट्रातही खुद्द गृहमंत्रीच पोलिसांच्या मारेकयांना सामिल झाल्याने अधिच मनोधैर्य खचलेल्या पोलिसांचे अनखिनच खच्चिकरण झाले आहे. जीवाचे रान करून नव्हे जीवाची बाजी लावून अतिरेक्यांच्या मुस्क्या बांधनाया धडाडीच्या अनेक अधिकायांचे खच्चिकरण सतत राजकारणी आणि वरिष्ठ करत असतातच. परंतू काल-परवा पर्यंत आपले आबा "पोलिसांनो, तुमची शत्रे फक्त शोभेची नाहीत हे अतिरेक्यांना दाखवून द्या" असे म्हणत पोलिसांचे धैर्य वाढवण्याचे काम करताना आपण पाहत होतो. वाटत होते आता पुन्हा एकदा पोलिस अतिरेक्यांवर बंदुका रोखताना घाबरायचे नाहीत. पण कालच्या घटनेने पोलिसांचीच काय, सामान्य जिद्न्यासू माणसाची सुद्धा मती गुंग झाली असेल.
त्याचे झाले असे की, रमजानचा महिना सुरु झाला. सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा राजकारण्यांच्या इफ्तार पार्ट्या सुरु झाल्या. त्यात अर्थातच महाराष्ट्रात कॊंग्रेस सर्वात पुढे होते. आता जर सगळी गठ्ठा मते त्यांनाच गेली तर कसे, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गोटात (आणि पोटात) ही उठला आणि त्याचाच परिणाम म्हणुन आबांनी सुद्धा इफ्तार पार्टी झोडली. आणि ती सुद्धा मुंबईतल्या पाकिस्तानात, थेट भिंवडीत. आबा हे सुद्धा विसरले की हीच ती भिवंडी जिथे त्यांच्या जवानांची (पोलिस शिपायांची) दिवसा ढवळ्या कातडी सोलून अन डोळे फोडून हत्या केली होती. हेच ते भिवंडीवाले होते ज्यांना त्यांच्या अतिरेकी कारवायांवर डोळा ठेवणारी पोलिस चौकी नको होती.
आबा, काय हे, कोणत्या तोंडाने त्या जवानांच्या विधवांना तोंड दाखवणार तुम्ही? तुमच्या सुद्धा तोंडाला जवानांचे रक्त लागलेच शेवटी! म्हणणार तरी काय म्हणा, तुम्ही पडले शेवटी मोठ्या दलाली राजकारण्याचे चेले ज्यांनी महाराष्ट्रात जाती-पातीच्या राजकारणाला लहाणाचे मोठे केले. तुमचे साहेबही शेवटी वर्षानुवर्षे नेहरु-गांधींच्या ताटताले मांजर होतेच ना. तेव्हा ते गूण तुमच्यात सुद्धा दिसणारच म्हणा. आम्ही जनताच शेवटी मूर्ख ठरलो. तुमच्या सारख्या राजलारण्यांच्या जातीवाल्यांकडून (खरे तर गिधडांकडून) काही अपेक्षा ठेवल्या.
----
बरेच दिवसांत मराठी टंकित न केल्याने काही शब्द लिहिताना चुका होत आहेत. त्या कशा सुधारवायच्या हे कृपया कोणी सांगू शकेल काय?
द्न्य कसे टंकावे?
जाणार्य़ा कसे टंकावे?
शब्दावरची चंद्रकोर कशी टंकावी?

लेखनविषय: दुवे:

Comments

सहाय्य

----

बरेच दिवसांत मराठी टंकित न केल्याने काही शब्द लिहिताना चुका होत आहेत. त्या कशा सुधारवायच्या हे कृपया कोणी सांगू शकेल काय?
द्न्य कसे टंकावे?
जाणार्य़ा कसे टंकावे?
शब्दावरची चंद्रकोर कशी टंकावी

आपण आपल्या वरील प्रश्नांसाठी मुखपृष्ठावरील 'सहाय्य' वर टिचकी मारुन उत्तरे मिळवू शकता.
पोलिसांना स्वायत्तता दिल्याने प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नाला अनेक आयाम आहेत. आपल्याला मान्य ते समाजकारण अन्यथा ते राजकारण हे प्रत्येक ठिकाणी घडत. आबांना पोलिस खात्याची नस चांगलीच माहित आहे.
प्रकाश घाटपांडे

पण म्हणून काय

पोलिसांच्या मारेकर्‍यांसमवेत पार्ट्या कराव्यात?

मारेकरी

नक्की कोण कोण मारेकरी या पार्टीत होते सांगता येईल काय?

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

सहमत!

या प्रश्नाला अनेक आयाम आहेत.
हे सहमत.
आपल्या भावना कळल्या. ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे ही जाणवतं पण
इतक्यावर हे काही सोडवता येत नसते केन्डेसाहेब.

आपला
गुंडोपंत

लेख!

विचार करायला लावणारा लेख!

तात्या.

मांजर

>>तुमचे साहेबही शेवटी वर्षानुवर्षे नेहरु-गांधींच्या ताटताले मांजर होतेच ना.

ताटातले नव्हे तर ताटा खालचे मांजर असा वाक्प्रचार रुढ आहे बहुदा!! माझ्या डोळ्यापूढे एकदम आपले पवार साहेब गुबगुबीत मांजर बनुन समस्त गांधी नेहरूंच्या पार्टी मध्ये ताटात वाढले आहेत असे आले :-)

धन्यवाद

कोलबेरशेठ (कोलबेरपंत जरा आडवळणाचे वाटले म्हणून तात्यांचा शेठ शब्द उचलला),
हो, ताटाखालचेच बरोबर आहे. चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
असाच लोभ असावा.

हीच ती भिवंडी

हीच ती भिवंडी जिथे त्यांच्या जवानांची (पोलिस शिपायांची) दिवसा ढवळ्या कातडी सोलून अन डोळे फोडून हत्या केली होती.

ही भावना थोडीशी समजली, पण पूर्ण समजली नाही.

मी ठाणे जिल्ह्यात राहात नाही, त्यामुळे दुरून मी असे म्हटले तर चालेल का?

हाच तो ठाणे जिल्हा जिथे त्यांच्या जवानांची (पोलिस शिपायांची) दिवसा ढवळ्या कातडी सोलून अन डोळे फोडून हत्या केली होती.

बहुधा तुम्ही म्हणाल की नाही, एका भिवंडीचा गुन्हा पूर्ण ठाणे जिल्ह्याला लागू होत नाही. (असे म्हणावे, असे मला वाटते. नाही तर मी "हाच तो महाराष्ट्र..." किंवा "हाच तो भारत...", किंवा "हीच ती मानवजात..." अशी उदाहरणे देत जाईन, आशा आहे कधीतरी तुम्ही "गैरलागू" असे म्हणालच.)

कोणाच्यातरी क्रूरकर्मामुळे पूर्ण भिवंडी गावावर बहिष्कार टाकावा असे मला वाटत नाही. एखाद्या गुन्ह्यासाठी एखाद्या पूर्ण गावाला/समाजाला दंड हा आपल्या सामाजिक नैतिकतेला मान्य नाही. (म्हणजे यू एन् ओ च्या कायद्याखाली तो सरकारचा गुन्हा/युद्धकालीन गुन्हा वगैरे मानला जातो.) त्याच प्रकारे "अमुक गावात समारंभ बंद" किंवा "अमुक जमातीसाठी शुभेच्छा बंद" असा सार्वजनिक दंड, अशी सार्वजनिक अवहेलनाही अयोग्य मानावी.

गुन्हा करणार्‍या विवक्षित व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे, हे तर खरेच. पण तशी होऊ नये असे या राजकारण्यांपैकी कोणी त्या ठिकाणी (किंवा अन्यत्र) म्हटले आहे काय?

धनंजयराव

श्री धनंजयराव,

मी ठाणे जिल्ह्यात राहात नाही, त्यामुळे दुरून मी असे म्हटले तर चालेल का?
हाच तो ठाणे जिल्हा जिथे त्यांच्या जवानांची (पोलिस शिपायांची) दिवसा ढवळ्या कातडी सोलून अन डोळे फोडून हत्या केली होती.
बहुधा तुम्ही म्हणाल की नाही, एका भिवंडीचा गुन्हा पूर्ण ठाणे जिल्ह्याला लागू होत नाही. (असे म्हणावे, असे मला वाटते. नाही तर मी "हाच तो महाराष्ट्र..." किंवा "हाच तो भारत...", किंवा "हीच ती मानवजात..." अशी उदाहरणे देत जाईन, आशा आहे कधीतरी तुम्ही "गैरलागू" असे म्हणालच.)
भिवंडीत पोलिस जवानांच्या हात्या झाल्यावर ठाण्यासह संपूर्ण महारष्ट्रातून त्याचा निषेध केला गेला. मात्र भिवंडीतील कोणत्याही सामजिक संस्थेने विषेशतः ज्या आबांच्या कार्यक्रमात उपस्थि होत्या त्यापैकी एकानेही त्याबद्दल दिलगिरीचा अथवा निषेधाचा चकार शब्दही काढलेला नाही. त्याउलट "कशी जिरवली" अशा अवेगात ते वावरताना दिसतात. आणि येवढे होऊनही आमचे कोणी काही वाकडे करणे तर सोडाच पण उलट आमच्या दाढ्या कुरवळण्यासाठी येतात असा संदेशच जणू त्यांनी दिला आहे.

त्याच प्रकारे "अमुक गावात समारंभ बंद" किंवा "अमुक जमातीसाठी शुभेच्छा बंद" असा सार्वजनिक दंड, अशी सार्वजनिक अवहेलनाही अयोग्य मानावी.
मात्र तेच खैरलांजीबाबतीत याच राज्यकर्त्यांनी केले आहे. अर्थात खैरलांजीतला प्रकार कमी दंडणीय आहे असे नव्हे. परंतू तेथे सुद्धा सगळेच दोषी नसावेत.

गुन्हा करणार्‍या विवक्षित व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे, हे तर खरेच. पण तशी होऊ नये असे या राजकारण्यांपैकी कोणी त्या ठिकाणी (किंवा अन्यत्र) म्हटले आहे काय?
मला वाटते तसा संदेश आबांनीच अप्रत्याक्षरित्या या कर्यक्रमातून दिला. कारण त्यांनी वेळ पडल्यास श्रीकृष्ण आयोगाच्या आंमलबजावणीसाठी सत्ता सोडू असे म्हटले पण पोलिसांच्या शिपायांना शिक्षा करण्याबद्दल शब्दही काढला नाही.

बाकी आम्हाला आपला तार्किक स्वाभाव आवडला. असेच परिक्षण करत रहावे जेणे करुन चर्चा अधिक पोक्त वाटेल.

 
^ वर