ऑर्कुट आता मराठीत

नमस्कार,
आज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.

तुम्हाला हे करायचे असल्यास . सेटींग मधे जाऊन प्रिफर्ड डीसप्ले लॅन्ग्वेज च्या बटानाद्वारे मराठी निवडा ऑर्कुटचा चेहरा मराठी होईल. अनेक भारतीय भाषा यात आहेत.

मूळस्थान | स्क्रॅपबुक | मित्र | समुदाय

मुखपृष्ठासाठी येथे मूळस्थान हा शब्द वापरलाय. मराठीचा जर का एखादा आदर्श संगणक शब्दकोष असता तर येथे सुध्दा होम साठी मुखपृष्ठ हाच शब्द आला असता. आता प्रत्येक संकेतस्थळासाठी वेगळी शब्दसंपदा लक्षात ठेवावी लागेल.

ऑर्कुटचा धक्का :
आजचे भविष्य: तुमच्यासाठी एक सुखद धक्का आहे.

नीलकांत

Comments

समजलं नाही,

नीलकांता,

तुम्हाला हे करायचे असल्यास . सेटींग मधे जाऊन प्रिफर्ड डीसप्ले लॅन्ग्वेज च्या बटानाद्वारे मराठी निवडा ऑर्कुटचा चेहरा मराठी होईल. अनेक भारतीय भाषा यात आहेत.

हे कसं करतात ते समजलं नाही. मी प्रयत्न करून पाहिला. प्लीज पुन्हा एकदा समजावून सांग.

तात्या.

असं,

ऑर्कुट उघडल्यावर आपला फोटो असतो डाव्या समासात, त्याखाली, प्रोफाईल आहे, तेथे सर्वात खाली सेटींग्ज आहे. त्यावर क्लिक करा.
नव्या पानावर तेथे सर्वात वरचे ऑप्शन आहे. डिस्प्ले लॅन्ग्वेजचे. तेथे एक ड्रॉप डाऊन बटन आहे त्यावर क्लिक करा आणि मराठीचा पर्याय निवडा.

नीलकांत

आवडलं आपल्याला !

निलकांत सेठ,
त्यांची मराठी आणि आमची मराठी एकदम मिळती जुळती आहे म्हणून तर फारच आवडली , बाकी आम्ही विवाहित असल्याने आमच्या प्रोफाइल मधे 'माली' येतंय (माली म्हणजे विवाहित का ? ) आणि खरड ला 'टाकाऊ' आणि 'भंगार 'हे शब्द मराठीचे आहे ही माहिती कळली.राहिलेली प्रोफाइल मधील सामाजिक,व्यावसायिक,वैयक्तिक माहिती भरताना मजा आली .चला आपली मराठी अटकेपार चालली याचा आनंद आहे ;)

आजचे भविष्य: तुम्हाला लाभलेल्या प्रारब्धाचा इतर जण हेवा करतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माली म्हणजे

माली म्हणजे मेल असावं.
(कारण माझ्याही प्रोफाईल मधे ते आहे. आणि आम्ही अजून सडेफटींगच :)

नीलकांत

स्पष्टीकरण

अहो ते माली ,एकल म्हणजे पुरुष आणि एकटा असं आहे.

....

एकटा म्हणजे अविवाहित

मेल म्हणजे पुरूष

माली म्हणजे मेल ( पुरूष) असं म्हणायचं होतं मला. एकल म्हणजे सिंगल.

ह्या ऑर्कुटने मात्र छान विनोद चालवलाय, स्क्रॅपबुकचं कधी भंगार करतं तर कधी टाकाऊ, हे पुरुषचं माली केलंय. प्रोफाईलला कधी प्रोफाईलच म्हणतंय तर कधी व्यक्तीचित्र ( हे छान आहे)
मुखपृष्ठाला मूळस्थान असं म्हणतंय.

मराठीचा एखादा प्रमाण संगणक शब्दकोश असता तर हे एवढं बिचकायला झालं नसतं.

नीलकांत

वा

प्र का टा आहे. चुकून दोनदा आला.

वा

वा माहिती बद्दल आभार. आता लगेच मराठीत बदल करुन टाकतो.
--लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

जितके जास्त तितके चांगले

जितके जास्त लोक मराठी चेहरा करतील तितके चांगले. मराठी मोठी भाषा असल्याची जाणीव गुगल ला लवकर होईल. जाहिराती ज्या दिवशी मराठीत दिसतील तो सुदिन. म्हणजेच भाषेला कमर्शियल ऍप्लिकेशन मिळेल. अर्थात मराठीची प्रगती वेगात होईल.
(अर्थातच इतर बाजूही असतीलच असे मला वाटते!)
-निनाद

 
^ वर