सदभावना दिवस

राम राम
राजीव गांधी यांचा जन्म दिवस देशभर सदभावना दिस म्हणून पाळला जातो.त्याची माहिती पाहिजे हाये ! काय महत्व हाये सद्भावना दिसाचे.कामून साजरा करतेत काय योगदान.बाबूरावला या इषयावर सोसायटीच्या मिटींग मधी बोलायचं हाये तवा द्या बरं पटकन माहिती.

Comments

भावना!

आम्हाला फकस्त आम्च्या वर्गातली भावना च म्हायीत हाये भौ.
पन आता आम्ही नै बर्का त्याच्यात! आता ती बी फिरती २ पोरास्नी ग्येवून

आपला
गुंडोपंत

चक्क चक्क

काय योगदान? अशा प्रश्न तुम्ही राजीव गांधींचे आडनाव गांधी आहे हे माहीत असूनही विचारलात.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

म्हण्जे

म्हणजे गांधी आडनाव लावले की झाले म्हणता?
वा आपण पण उद्यापास्न गाधीपंत नाव घेणार बॉ!!

दिवस घालणार ना पण माझा?
आपण त्याला हवं तर 'गेंडा दिवस' असे नाव देवू .

काय म्हणता?

आपला
गांधीपंत

पाणघोडा दिवस

हे काय, गुंडोपंत?
गेंडा दिवस कसा? 'पाणघोडा दिवस' असे नाव हवे.

अवांतरः
खरडवहीतला फोटो पाहून आम्ही आपल्याला हिप्पोपोटॅमस अर्थात पाणघोडा समजत होतो. (हे. ह. घ्या. हं!)

अहो खरंय

अहो खरंय हो विसुनाना, पण 'पा ण घो डा' म्हणणं जरा वेळखाऊ आहे ना... गेंडा कसा जरा म्हणायला पटकन शिवाय ते गुंडो च्या जास्त जवळ ना!?

आपला
गुंडोपंत

हिप्पो

... गेंडा कसा जरा म्हणायला पटकन शिवाय ते गुंडो च्या जास्त जवळ ना!?

आहे खरा पण तो पाणघोडाच आहे त्याचे काय? ;) हिप्पोदिवस म्हणा की?

गेंडोपंत

गेंडोपंत

जय गेंडास्वामी..

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

असद्भावना दिन

एक् दिवस सदभावना दिन घोषित केला कि उरलेले दिवस असदभावना दिवस असे अघोषितच आहे.
म्हणजे काहीही करायची मोकळीक. २६ जाने, १मे, १५ ऑगस्ट याला सरकारी खात्यात ह्जेरी असणं महत्वाचे अन्यथा तुमच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही टांगती तलवार.

प्रकाश घाटपांडे

सद्भावना, प्रयत्न

राजीव गांधी यांचा जन्म दिवस देशभर सदभावना दिस म्हणून पाळला जातो.

सदभावना म्हणजे काय? तुम्हाला सद्भावना म्हणायचे आहे काय?

त्याची माहिती पाहिजे हाये !

ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्यावतीने काय प्रयत्न केले हे जाणून घ्यायला आवडेल.

आपला
(प्रश्नांकित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

ह्यो घ्या महा प्रयत्न

ह्या असा शोधून् राह्यलो.

तुम्हाला सद्भावना म्हणायचे आहे काय?

हा ना भो.

बाबूराव

गोपनीय दिवस

सद्भावना दिवस तसा गोपनीय दिवस दिसतोय ! कारण त्याचीबातमी कुठे दिसली नाही . गुगलवर देवनागिरीमधे शोधल्यास जास्त करून दैनी़क जागरण आणि हरीयाणातीलच बातम्या दिसल्या.

माझ्यापुरते बोलायचे झाले तर, मला आधी माहीत असते तर मी त्या दिवशी उपक्रमवर नक्की सद्भावनेच्या भरात लिहीले असते ;)

दंडवत

एवढी भारी महीती आल्यावर,मला काय बी गरज राहिली नाय शोधाशोध कराची
पुना एकवार सगळ्याला महा दंडवत :(

बाबूराव

मग झाले का भाषण?

सोसायटीतले बाबुरावाचे भाषण कसे झाले ते पण कळवा की राव...

भाषण झाले

भाषण झाले ! बाबूराव आधी सद्भावना म्हंजी काय यावर( ५ मि.)बोलले. मंग हळूहळू बंधूभाव,प्रेम,हिंदुस्तानाच्या संसकुरुतीवर् बोलले .(१० मि. )मंग दहशतवादा वर बोलले पुन्हा शांतता अन सद्भावावर आले.शेवटचे (५ मि.)राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांततेसाठी कसे प्रयत्न केले मंग म्होरं काय झालं असं सांगून् शेवट् जीवनात सद्भावाची गरज किती महत्वाची असा प्रशन् केला उत्तर बी देलं लयी टाळ्या मिळाल्या म्हया भाषणाला :)

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

लय भारी

टैम नै घालवायचा..

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

दोन

पुण्यात हिंजवडी जवळ, वाकड चौकात सद्भावना दिना निमित्त एक भला मोठा फलक लावला आहे. त्यावर राजीव गांधींचे टिळा लावलेले मोठे छायाचित्र आहे आणि बाजुला सर्वातवर सोनिया, शेजारी असेच कोणी, असे करत काही कॉग्रेसजनांचे फोटो चौकोनांध्ये आहेत आणि लिहिले आहे कि राजीव गांधींना कोटी कोटी प्रणाम. आता हे पाहिल्यावर मला प्रश्न पडला कि १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात जिथे सोनियाची सत्ता आहे तिथे तिच्याच राजीवला फक्त २ कोटी (कोटी+कोटी) प्रणाम? :)





मराठीत लिहा. वापरा.

हवे ते

१ आणि १ किती?

सर्व सामान्य माणुसः दोन
अभियंता: एक सुद्धा, दोन सुद्धा होउ शकतात आणि अकरा सुद्धा होउ शकतात
चार्टर्ड अकौंटंटः तुम्हाला किती हवेत.





मराठीत लिहा. वापरा.

भिंतीवरील लिखाण

निवडणुकीच्या दिवसांतील घोषणायुद्ध :

नागपुरांत भिंतीवर एके ठिकाणी लिहिले होते
स्थिरता के लिये राजीव गांधी
राजीव गांधी एक आँधी

त्याच खाली विरुद्ध पक्षाने लिहिले होते
कैसी स्थिरता कैसी आँधी?
सीमेंट, भूखंड, बोफोर्स गांधी

हल्ली असं आहे..

हल्ली असं आहे..

भारतात लोकशाही आहे, तिथे म्हणे काहीही चालतं!!
सोनियाच्या भारतावर म्हणे एडविनचं ही प्रेम होत!!





मराठीत लिहा. वापरा.

कोण हा एडविन?

एडविना माउंटबॅटन माहित आहे पण हा एडविन कोण? कोणाचा प्रियकर नक्की? जवाहरलाल नेहरूंना पुरुषात फाजील स्वारस्य असल्याचे वाचले नव्हते पूर्वी.

-राजीव.

शु. चि

खरंतर शु चि ने एडविनाच सुचवला होता. पण आम्हाला पटेना. तुमचे बरोबर आहे. जवाहरलाल नेहरूंना पुरुषात फाजील स्वारस्य असल्याचे वाचले नव्हते पूर्वी. हे कितपत खरे आहे हे सांगणे अवघड आहे बॉ. कदाचित उद्या असे सांगणारे सुद्धा पुढे येतील.





मराठीत लिहा. वापरा.

अजून एक आठवण

१९८४ च्या राजीवलाटेत (इंदिरा गांधींच्या हत्येनंतर) एक घोषणा प्रसिद्ध झाली होती. (कुठली ते कळेलच):

ठाण्यात एके ठिकाणी काँगेसच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या कचेरीबाहेर लोकांना खूष करायला एक पिंप भरून काहीतरी ठेवले होते. त्या पिंपाच्यानळातून टप टप थेंब पडत होते. पिंपाच्या मागच्या भिंतीवर जरा उंचीवर इंदिराजींचे चित्र आणि खाली (पिंपाच्या जस्ट वरती मागे) खालील घोषणा:

इंदिराजी की अंतीम इच्छा
बूंद बूंदसे देश की रक्षा
 
^ वर